युनिवर्सिटीत प्रवेश घेण्याआधी

Submitted by झंपी on 21 March, 2012 - 16:32

मला एक माहीती हवी आहे. तशी मी गूगलून शोधायचा प्रयत्न केला पण तरी कोणाचा अनुभव असेल तर बरा मुलीशी बोलण्याआधी. ती आधीच निराश आहे बर्‍यापैकी.

इथे अमेरीकेत युनिवर्सिटीत अ‍ॅडमिशन घेण्यासाठी वॉलन्टियर वर्कच्या अनुभवाचा किती फायदा असतो?

माझी मुलगी आता इथे दहावीत आहे, काही कारणामुळे तिला इतके वॉलन्टियर क्रेडिटस मिळाले नाहीत किंवा घेतले गेले नाहीत( बरीचशी कारणा मुळे शक्य झाले नाही), मुद्दा तो नाहीये. पण आता तिचे(मुलीचे) म्हणणं आहे की ह्यामुळे कुठल्याही चांगल्या युनिवर्सिटीत अ‍ॅडमिशनला परीणाम होणार?

कृपया इथे अनुभव लिहा. स्वतःचे लिहिलेत तर बरे. कोणाचे मुलगा/मुलगी ह्यांचा ताजा अनुभव असेल तर बरे. Happy

इथून तिथून तशी बरीच एकीव / गूगलून माहीती मिळते पण ती काही उपयोगाची नाही असे मला वाटते.

सरळ बघायला गेले तर वॉलन्टियर वर्कला किती महत्व असावे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>शिक्षणाचे क्षेत्र, मुलांची तयारी, आईबापांची तयारी असे बरेच विषय त्यात येत>>>+१
धन्यवाद परदेसाई, असे महत्वाचे मुद्दे लक्षात आणुन दिल्याबद्दल. बाकी सध्या (पहिले पाऊल म्हणुन :))अर्थनियोजन करणे सुरु करावे.

मधुरीमा:

तुमची पोस्ट बघून घाम आला. कारण्--आत्ता आमची ही स्थिती आहे Happy तुमच्या पोस्टीमुळे डोळ्यासमोर चमकली.

कुण्या देसीने कॅरिबियन बेटांवर मेडिकल कॉलेज काढलंय. आमच्या ओळखीत इथून एका मुलीने यावर्षी तिकडे अ‍ॅडमिशन घेतली आहे. अगदी भारतात जाण्यापेक्षा जवळच्या अंतरावरचा ऑप्शन म्हणून आई वडिलांनी पाठवलं तिकडे.

करेबियन मधे अशी वैद्यकीय महाविद्यालयं आहेत.. जिथे शिकून इकडे पुढचे शिक्षण घेता येतं. (चीन, भारत, आणि करेबियन तीन ठिकाणची महाविद्यालयं ऐकलीत..)
देसी की विदेसी माहित नाही..

खरं म्हणजे मुलांना शिकवण्याची आर्थिक तयारी फ़क्त या विषयाचा एक धागा सुरू करायला हवा..कारण खूप माहिती हवी आहे त्यावर...कदाचित मीच सुरू करेन मला विकांताला वेळ मिळेल..नाहीतर कुणीतरी केल्यास हरकत नाही..
त्या वरच्या ४००००० डॉलरच्या आकड्याने झोप लागणार नाही आता बहुतेक..आणि नोकर्‍यांमधली अनिश्चितता आहेच...असो...
सर्वांनी खूप छान माहिती दिली आहे....आभार..
५२९ काही ठिकाणी असा उल्लेख वाचला की देशात कुठेही किंवा परदेशातही वापरता येतो..जर ते खरं असेल तर तळ्यात-मळ्यात असलेल्यांसाठी बरं म्हणजे मुलं कुठेही शिकली तरी पैसे उपलब्ध करून देता येईल फ़क्त ते वर परदेसाईंनी रिस्क म्हटलंय त्याचा अभ्यास करायला हवा......

पण मणिपाल किंवा करेबियन इ ठिकाणच्या डिग्रीला अमेरिकेत प्रॅक्टिस चे लायसन्स नसते ना? इथे यु एसेमिलीच्या परीक्षा द्याव्या लागत असतील असे मला वाटतंय.

>>पण मणिपाल किंवा करेबियन इ ठिकाणच्या डिग्रीला अमेरिकेत प्रॅक्टिस चे लायसन्स नसते ना? इथे यु एसेमिलीच्या परीक्षा द्याव्या लागत असतील असे मला वाटतंय.>>
बरोबर. सगळ्याच इंटरनॅशनल मेड ग्रॅड्सना परीक्षा द्याव्या लागतात.

पण मणिपाल किंवा करेबियन इ ठिकाणच्या डिग्रीला अमेरिकेत प्रॅक्टिस चे लायसन्स नसते ना? इथे यु एसेमिलीच्या परीक्षा द्याव्या लागत असतील असे मला वाटतंय.>>> नाही मै, मणिपाल इंस्टीट्यूट ग्रॅज्युएटस ना अमेरिकेत प्रॅक्टीससाठी लायसन्सचा प्रॉब्लेम येत नाही अशी माहिती आहे. युएसेमेलिच्या परीक्षांबाबत माहिती नाही, पण उद्याच मैत्रिणीला विचारते. तिची मुलगी तिथे मेडिकलला आहे. सविस्तर माहिती घेउन इथे लिहीते.

Pages