युनिवर्सिटीत प्रवेश घेण्याआधी

Submitted by झंपी on 21 March, 2012 - 16:32

मला एक माहीती हवी आहे. तशी मी गूगलून शोधायचा प्रयत्न केला पण तरी कोणाचा अनुभव असेल तर बरा मुलीशी बोलण्याआधी. ती आधीच निराश आहे बर्‍यापैकी.

इथे अमेरीकेत युनिवर्सिटीत अ‍ॅडमिशन घेण्यासाठी वॉलन्टियर वर्कच्या अनुभवाचा किती फायदा असतो?

माझी मुलगी आता इथे दहावीत आहे, काही कारणामुळे तिला इतके वॉलन्टियर क्रेडिटस मिळाले नाहीत किंवा घेतले गेले नाहीत( बरीचशी कारणा मुळे शक्य झाले नाही), मुद्दा तो नाहीये. पण आता तिचे(मुलीचे) म्हणणं आहे की ह्यामुळे कुठल्याही चांगल्या युनिवर्सिटीत अ‍ॅडमिशनला परीणाम होणार?

कृपया इथे अनुभव लिहा. स्वतःचे लिहिलेत तर बरे. कोणाचे मुलगा/मुलगी ह्यांचा ताजा अनुभव असेल तर बरे. Happy

इथून तिथून तशी बरीच एकीव / गूगलून माहीती मिळते पण ती काही उपयोगाची नाही असे मला वाटते.

सरळ बघायला गेले तर वॉलन्टियर वर्कला किती महत्व असावे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

BE Mech नंतर च्या शिक्षणासाठी ही जर्मनी बर्‍याच चांगल्या संधी आहेत असे नुकतेच ऐकले.. ते ही खरे आहे का?
आणि असेल तर प्रवेश प्रक्रिया काय असते?

कुणाला इच्छा असेल तर T U M . D E चेक करा.. (टेक्निकल युनी. म्युनिक).
कोर्स आवडले तर मला Contact करा..
पुढे काही मदत मी करू शकतो..

हा प्रश्न कदाचित या धाग्यावर चुकीचा असेल पण मला वाटतं कुठल्याही युनिव्हर्सिटीत प्रवेश घ्यायचा असेल तर पालक म्हणून पैशाची सोय आपण कशी काय करता किंवा काय करायला हवं यावरही मार्गदर्शन व्हायला हवं...कुणाकडे काही टिप्स???
सध्या देश-परदेश सगळीकडेच फ़िया इतक्य वाढताहेत की मुलं झाली की लगेचच त्यांच्या शिक्षणाचा विचार (पैशाच्या दृष्टीने) करायला हवा होता असं वाटायला लागलंय..आमची मुलं लहान असल्याने अजूनही करू शकतो म्हणून हा प्रश्न....

अगदी बरोबर.. अमेरिकेत असाल तर ५२९ प्लॅन, सरकारी रोखे (I-bonds) वगैरे नियमीत विकत घेऊन पैसे जमा करू शकता. हे पैसे शिक्षणावर खर्च केले तर मिळालेल्या व्याजावर कर नसतो इतकेच. ५२९ चे पैसे शेयरबाजारात गुंतवले जातात तेव्हा जपून.
तुमचं उत्पन्न सरासरी उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळेल याची अपेक्षा नसावी. शिक्षणावर होणारा खर्च भरून काढायला उरलेलं आयुष्य जाणार की काय असं हल्ली वाटू लागलंय. Private University मधे वर्षाचा खर्च ५०/५५ हजार आहे. चार वर्षांचा खर्च धरता Mortgage एवढे पैसे जाणार आहेत..

>>५२९ चे पैसे शेयरबाजारात गुंतवले जातात तेव्हा जपून.>>म्हणजे ते परस्पर तिथुन गुल होतील असा अर्थ आहे का??

५२९ मध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत ना?

शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी सुरुवातीची २ वर्षे कम्युनिटी कॉलेजमध्ये करुन नंतर चांगल्या युनिवर्सिटीतून ग्रॅजुएट होण्याचा पर्याय कोणी वापरला आहे का इथल्या? स्वतः किंवा मुलांसाठी?

तसं नाही. पण ५२९ मधले पैसे पटकन काढता येत नाहीत. तुम्ही जमवा-जमव करत ५०,००० जमवले आणि बाजार बुडाला तर त्याचे ५०० पण होतील नाही का? बहुतेक योजना Mutual Funds वाल्या असल्यातरी fund बुडत नाहीत असे नाही. तेव्हा गुंतवताना विचार करून गुंतवणे योग्य. तुम्हाला किती Risk घेणे परवडेल, किती Returns अपेक्षित आहेत, याचा पूर्ण विचार करून गुंतवा.. शेयरबाजारात भले भले बुडालेत म्हणून..

(गैरसमज नसावा: मोठ्या कंपन्या क्षणा-क्षणाला पैसे फिरवू शकतात. आपले पैसे बाहेर काढायला दिवस दिवस वाट बघावी लागते..)

आजच्या भावात भविष्यासाठी आगाऊ (अ‍ॅडव्हान्स मध्ये) क्रेडीट विकत घेण्याचाही ऑप्शन आहे ना काही ठीकाणी? पण मला वाटतंत बर्‍याच प्लॅन्स मध्ये ती क्रेडिट्स फक्त त्या त्या राज्यात वापरता येतात.

शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी सुरुवातीची २ वर्षे कम्युनिटी कॉलेजमध्ये करुन नंतर चांगल्या युनिवर्सिटीतून ग्रॅजुएट होण्याचा पर्याय कोणी वापरला आहे का इथल्या? स्वतः किंवा मुलांसाठी?>>हि ऐकिव माहिती मी पण ऐकली आहे. चांगल्या community/state college मधून २ वर्षे काढून पुढे जाणे स्वस्त पडते असे.

शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी सुरुवातीची २ वर्षे कम्युनिटी कॉलेजमध्ये करुन नंतर चांगल्या युनिवर्सिटीतून ग्रॅजुएट होण्याचा पर्याय कोणी वापरला आहे का इथल्या?>> माझ्या ओळखीत २-३ जणांनी हे केलं आहे. खर्चाच्या दृष्टीने बरे पडते.

परदेसाई,स्वाती२ अगदी उपयुक्त माहीती देत आहात. जमले तर वेगळा धागा काढा ना high school आणि त्यापुढील शिक्षण,फीज इ. यासाठी,प्लीज. आमच्यासारख्या घोडामैदान दूर नसलेल्यांना छान मार्गदर्शन मिळेल. Happy

शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी सुरुवातीची २ वर्षे कम्युनिटी कॉलेजमध्ये करुन नंतर चांगल्या युनिवर्सिटीतून ग्रॅजुएट होण्याचा पर्याय कोणी वापरला आहे का इथल्या? स्वतः किंवा मुलांसाठी?>>हि ऐकिव माहिती मी पण ऐकली आहे. चांगल्या community/state college मधून २ वर्षे काढून पुढे जाणे स्वस्त पडते असे.>>> हो. आमच्या इथे बरीचह मुलं हा ऑप्शन स्वीकारत आहेत. कम्युनीटी कॉलेज करून UNC-Chapell Hill, NCSU सारख्या चांगल्या युनिव्हर्सिटीमधे प्रवेश घेतला बर्‍याच मुलांनी.

शिक्षणाचे क्षेत्र, मुलांची तयारी, आईबापांची तयारी असे बरेच विषय त्यात येतात. पण पर्याय चांगला आहे. राधिका तुम्ही धागा काढा आणि लिंक द्या, पुढे प्रश्नोत्तरात भरपूर माहिती देता येईल.. Happy

दोन वर्षे कम्युनिटी कॉलेज आणि नंतर क्रेडिट ट्रान्सफर हा पर्याय माझ्या माहितीत काही अमेरिकन कुटुंबांनी स्विकारलाय. तुम्हाला पुढे काय करायचे आहे त्यावर हा ऑप्शन घेणे न घेणे अवलंबून आहे.
खर्च कमी करायचा अजून एक उपाय म्हणजे AP courses. यात ४ किंवा ५ स्कोर आला तर त्याचे कॉलेजसाठी क्रेडिट मिळते. तसेच dual credit course हायस्कूल मधे घेतल्यास ज्या युनिव्हर्सिटीशी याबाबत हायस्कूलने कोऑर्डीनेशन केले असेल तिथे आणि स्टेट मधल्या इतर पब्लिक युनिवर्सिटीत क्रेडिट मिळते. माझ्या मुलाने हे दोन्ही मार्ग वापरलेत. त्याने सोफोमोर असताना केमिस्ट्री आणिइ वर्ल्ड हिस्ट्री या दोन विषयांसाठी AP दिली. त्याच वेळी केमिस्ट्रीचे IU dual credit केले. यावर्षी त्याने AP eng Lit, AP US History घेतलेय. त्यातील US History IU dual credit आहे. पुढील वर्षी तो ४ AP courses घेणार आहे.
मी ५२९, I bond , coverdell हे तिनही पर्याय सेविंगसाठी वापरले. त्यापैकी ५२९ मधे एजबेस ऑप्शन न घेता माझे मी मॅनेज केले. वर्षातून एकदा इनवेस्टमेंट ऑप्शन बदलता येतो.

'तुमचं उत्पन्न सरासरी उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर कोणत्याही प्रकारची सरकारी मदत मिळेल याची अपेक्षा नसावी. शिक्षणावर होणारा खर्च भरून काढायला उरलेलं आयुष्य जाणार की काय असं हल्ली वाटू लागलंय. Private University मधे वर्षाचा खर्च ५०/५५ हजार आहे. चार वर्षांचा खर्च धरता Mortgage एवढे पैसे जाणार आहेत..'

विनय, हे तर खूपच आहे. म्हणजे दोन मुलासाठी चार वर्षाची फी २००,००+ २००,०० म्हणजे ४००,००० अमेरिकन डॉलर्स? इतक्या पैशाच प्लॅनि.न्ग कस करायच? त्यातून आय टी मधे सरासरी पेक्षा जास्तच असतो पगार. मग हे एवढे पैसे सरकारी मदतीशिवाय कसे जमवावे( एकीकडे घराचे हप्ते भरता भरता) यावर थोडे अनुभवाचे बोल आणि मार्गदर्शन यातून लेख लिहाल का एखादा?

मधुरीमा,
विनयने Private University बद्दल सांगितलं आहे. बाकीच्या University मधे फी कमी असते. पण त्यातही State Resident असाल तर कमी, non resident असाल तर जास्त असं आहे. मात्र दरवर्षी काही टक्के तरी फि वाढतच आहे. तोही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. बाकीच्या गोष्टी विनय, स्वाती, अथक सांगतीलच.

अंजली, स्वाती२ १००%
fafsa चं खूप ऐकलंय. गेल्यावर्षी त्यानी केलेली मदत २८००$ Unsubsidised.. म्हणजे परत द्यायचे आहेत.
Private college ला जायचे असेल तर Loan ला पर्याय नाही.
दोन मुलं एकाचवेळी College मधे असतील तर थोडं Discount मिळतं म्हणे. (अनुभव नाही).
लेख लिहिन लवकरच.. बघू..
देशाबाहेर शिक्षण शोधणं (अमेरिका सोडून) आता काळाची गरज होतेय.. Happy

देशाबाहेर शिक्षण शोधणं (अमेरिका सोडून) आता काळाची गरज होतेय>>> मेडीकलसाठी मुलं परत भारतात जात आहेत :). अर्थात सरकारी कॉलेजमधे त्यांना प्रवेश मिळत नाही पण 'होप मेडीकल इन्स्टीट्यूट' आणि अजून एक बेंगलोर जवळ आहे, त्याचं नाव विसरले. सध्या तिथे जायचं प्रमाण वाढलं आहे. तिथले ग्रॅज्युएटस इथे येउन रेसिडेन्सी आणि पुढे प्रॅक्टीस करू शकतात. याबद्दल कुणाला काही माहिती असेल तर द्या.

मणिपाल युनिव्हर्सिटीची साईट
http://www.manipal.edu/Pages/Welcome.aspx

खरोखरच उत्तम युनिव्हर्सिटी आहे. मी स्वतः पण तिथे १२ वी नंतर प्रयत्न केलेला अ‍ॅडमिशनसाठी.

विनय , लोनचे पर्याय बरे आहेत. शिक्षण झाल्यावर ,नोकरी सुरु झाली कि हप्ते सुरु होतात. निदान मास्टर्सला तरी तसे पर्याय आहेत. UG च पण तसच असेल ना?

Pages