युनिवर्सिटीत प्रवेश घेण्याआधी

Submitted by झंपी on 21 March, 2012 - 16:32

मला एक माहीती हवी आहे. तशी मी गूगलून शोधायचा प्रयत्न केला पण तरी कोणाचा अनुभव असेल तर बरा मुलीशी बोलण्याआधी. ती आधीच निराश आहे बर्‍यापैकी.

इथे अमेरीकेत युनिवर्सिटीत अ‍ॅडमिशन घेण्यासाठी वॉलन्टियर वर्कच्या अनुभवाचा किती फायदा असतो?

माझी मुलगी आता इथे दहावीत आहे, काही कारणामुळे तिला इतके वॉलन्टियर क्रेडिटस मिळाले नाहीत किंवा घेतले गेले नाहीत( बरीचशी कारणा मुळे शक्य झाले नाही), मुद्दा तो नाहीये. पण आता तिचे(मुलीचे) म्हणणं आहे की ह्यामुळे कुठल्याही चांगल्या युनिवर्सिटीत अ‍ॅडमिशनला परीणाम होणार?

कृपया इथे अनुभव लिहा. स्वतःचे लिहिलेत तर बरे. कोणाचे मुलगा/मुलगी ह्यांचा ताजा अनुभव असेल तर बरे. Happy

इथून तिथून तशी बरीच एकीव / गूगलून माहीती मिळते पण ती काही उपयोगाची नाही असे मला वाटते.

सरळ बघायला गेले तर वॉलन्टियर वर्कला किती महत्व असावे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉलेज/युनी चा प्रवेश हा बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतो. त्यात SAT/ACT, शाळेतला GPA, इतर उपक्रमात सहभाग, निबंध, समाजसेवा इत्यादी बर्‍याच गोष्टी येतात. प्रत्येक कॉलेजात समाजसेवा हवीच असे नाही, पण अर्जावर तशी नोंद असली तर काही कॉलेजात प्रवेशास मदत होते. मुलगी कॉलेजला जाण्याआधी किमान ७२ तास समाजसेवा हवी अशी माहिती बर्‍याच लोकांनी दिली. प्रत्यक्षात अर्ज करताना कुठेही ही माहिती विचारली नाही. पण इतर माहितीमधे आम्ही ती माहितीही भरली.
प्रवेशासाठी निंबंध लिहिताना तिने केल्याला समाजसेवेशी निगडीत विषयावर निबंध लिहिला.
कॉलेजवाले 'या कारणासाठी तुमचा अर्ज मंजूर्/नामंजूर करतोय' असं कधीच सांगत नाहीत.
अमेरिकेत हजारो कॉलेज असल्याने आणि प्रत्येकाचे स्वतःचे नियम असल्याने Thumb Rule म्हणुन समाजसेवा लागते की लागत नाही हे सांगता येत नाही.
समाजसेवा केली असेल, तर उत्तम.. जरूर नोंद करा..
केली नसेल.. घाबरून जाण्याचे कारण नाही.

ज्या कॉलेजला समाजसेवा ही Must आहे, त्याना एक-ना-धड्-भाराभर-चिंद्या पेक्षा एक किंवा दोन ठिकाणी समाजसेवा केल्याचे आवडते. मी सगळंच करतो पेक्षा मी हे करतो ते नीट पार पाडतो हे महत्वाचे.

मुलगी दहावीतच आहे.. अजून अर्ज करायला दोन वर्षं आहेत. वाटत असेल तर समाजसेवा सुरू करायला काहीही हरकत नाही. आणि Certificate महत्वाचे नाही समाजसेवा करणं महत्वाचं.

अजून काही माहिती हवी असेल तर विचारा...
(मुलगी यावर्षी Freshman आहे).

धन्यवाद. हि माहीती बरीच उपयोगी होइल.

आधी आमचे नक्की न्हवते इथेच रहायचे का भारतात. त्या गोंधळात लक्ष घातले नाही. आम्ही गेल्या वर्षीच जाणार होतो मग म्हटले कशाला?

मग आता इथेच रहायचे ठरले आहे. निदान ती १२ होइपर्यंत. पुढे आम्ही दोघे निघून जावू... वगैरे.

मग ती एकच मुद्दा घेवून बसलीय की, तुमच्यामुळे माझे क्रेडिट नाहीयेत. तिचे फ्रेंड्स गेल्या दोन वर्षापासून करताहेत. आता परत निर्णय बदललात तर काय? माझा इंटरेस्ट गेला.. वगैरे. तशी ती SAT चा अभ्यास करतेच आहे पण मग तिला वाटले की पाहिजे त्या कॉलेजात जावु शकणार नाही.

तिला मी हाही मुद्दा समजावून सांगितला की, कुठल्या युनिअवर्सिटीत गेलीस तरी तु पुढे काय करणार महत्वाचे. पण आजूबाजूला वगैरे पाहून तिला हे पटत नाही.

तिच्या मित्र मैत्रीणी आय्वी लीग वगैरे गोष्टी करतात :(.. प्रिंन्सटन सुद्धा चांगले आहे , पण तिला पटत नाही.

>>मुलगी कॉलेजला जाण्याआधी किमान ७२ तास समाजसेवा हवी अशी माहिती बर्‍याच लोकांनी दिली.<<

तेच ना, अशी माहीती एकली की गोंधळ उडतो.

हो ते आहेच पण तिला नकोय. म्हणून माहीत करून घ्यायचे होते का ते का नकोय? तिच्या मैत्रीणींनी डोक्यात भरलय की पेरेंट्स पासून लांब रहायचे कॉलेजला गेलो की... असे दिसतेय, कल्पना नाही मला अजून नक्की कारण काय.
तिला Yale/Stanford(CA) मध्ये जायचे आहे. बेसिकली तिला मैत्रीणी काय करताहेत ह्याच्यात रस आहे.

झंपी, समाजसेवा हवीच असे नाही. अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही करत असेल ते लिहिले तरी चालते. आमच्या इथे बर्‍याच मुलांना गरज म्हणून पार्ट टाईम जॉब करावा लागतो. समाजसेवा वगैरे साठी वेळच नसतो. त्यांच्यासाठी घरखर्चाला हातभार हीच समाजसेवा! खेळात सहभाग असेल तर त्यासाठीही बराच वेळ द्यावा लागतो. अशावेळी मुलं वर्षातून एक दोन इव्हेंटस ना ( थॅक्सगिविंग डिनर, कोट्स फॉर किड्स इ.) मदत करायला जातात.
तुमची मुलगी दहावीत आहे त्यामुळे तिला समाजसेवा करायची असेल तर अजूनही सुरुवात करता येइल. लोकल फूड पॅन्ट्री, अ‍ॅनिमल शेल्टर, साल्वेशन आर्मी सूप किचन, हॉस्पिटल, सिनियर सिटिझन,लायब्ररी वगैरे बरेच पर्याय आहेत. गावाच्या/काउण्टीच्या जत्रेसाठीही वॉलेंटियर लागतात. समर मधे सुट्टीत जास्त वेळ देता येइल समाजसेवेसाठी. अगदी ७२ तासच हवेत असे नाही. प्रामाणिक पणे मन लाऊन सेवा करणे महत्वाचे. बरेचदा किती तास काम केले यापेक्षा त्या अनुभवामुळे तुमच्यात झालेला सकारत्मक बदल, स्वतःचीच नव्याने झालेली ओळख वगैरे गोष्टी निबंधात लिहिणे महत्वाचे.
दुसरे असे की कॉलेजची निवड करताना ते स्वतःला योग्य आहे की नाही ते ठरवावे. मैत्रीण जाणार आहे हे कारण होऊ शकत नाही. तसेच आय व्ही लिग कॉलेज नाही मिळाले तरीही काही बिघडत नाही. इतर बरेच चांगले पर्याय आहेत. माझा मुलगा अकरावीत आहे. त्याचे म्हणणे आपल्या इथल्या पब्लिक युनिव्हर्सिटीत मला नक्की घेतील. Happy

पेरेंट्स पासून लांब रहायचे कॉलेजला गेलो की... <<< असं बर्‍याच मुलाना वाटतं. स्वातंत्र्य उपभोगायची त्यांची कल्पना असते ती. प्रिंस्टनला जरी गेलात आणि शेजारी घर असले तरी (पहिल्यावर्षी तरी) तिथेच रहावे लागते. त्यात तुम्ही, 'आम्ही Helicopter Parents' होणार नाही अशी तिला खात्री करून द्या. Ivy League बद्दल मुलाना सुरूवातीला खूप आकर्षण असते. आणि या वयात मैत्रिणी करतात तेच बरोबर असेही वाटत असते.
तुमचा निर्णय होत नसेल, तरी तिला आत्तापासून 'शाळेव्यतिरिक्त काहीतरी' करायला सांगा. मग ती समाजसेवा असो, खेळात सहभाग असो, शाळेचे Club असोत.... आणि उशीर वगैरे काहीही झालेला नाही.

आणि तास मोजू नका, जमेल ते करा... आणि स्वाती म्हणते तसे त्याचा सकारात्मक बदल काय होतो तो बघा... तुमच्या मुलीला शुभेच्छा..

विनय

मग ती एकच मुद्दा घेवून बसलीय की, तुमच्यामुळे माझे क्रेडिट नाहीयेत. >> आईवर गेलेली दिसतेय ! इतरांच्या चुका तेवढ्या दिसतात

प्रिंस्टन सुद्धा चांगले ? किती नोबेल लॉरेटस तिथून शिकलेत, अजून शिकवतात याची माहिती काढा . सुद्धा चांगले म्हणजे काय ?

मृ Proud

सुयोग, सुंदर आर्टिकल. अंडरग्रॅड स्थानिक विध्यापिठात करुन ग्रॅड प्रथितयश विध्यापिठात करावे, या मताचा मी आहे. तोपर्यंत मुलंहि मॅच्युर होतात आणि बर्‍याच प्रमाणात स्वावलंबी सुद्धा होतात.

My son is studying in 10th standard as per CBSC syllabus . He will complete his 10th exam by March 2013. After that we are planning to migrate midwest region of USA primarily for son’s higher education. In this regard I have following questions

1> How difficult is to get admission to 11th grade.?
2> What is the right time to move ? He will be free from exam in April 2013 & results are expected by May 2013.
3> He is planning to complete TOFEL & SAT. Does he need to do anything extra.

साहिल शहा...
१. खरं तर ११वीला प्रवेशात काही अडचण येऊ नये. पण नववीपासून पुढे GPA (Grade point Average) मोजला जातो. तेव्हा ९वी/१०वीचे कोर्स आणि/किंवा परीक्षा द्यावी लागेल. CBSC चा अनुभव नाही.
२.इथल्या शाळा ऑगस्ट/सप्टेंबरमधे सुरू होतात.
३.SAT दिलेली असल्यास ती कॉलेजसाठी नक्कीच फायद्याची ठरेल..

(यापेक्षा माझ्यासारख्या वेड्या माणसाला Proud फार माहिती नाही).

हे दोन आयडी त्यांना माहिती देत आहेत<<< ती माहिती त्यांच्यापुरती नसून कुणीही वाचावी व त्यांना उपयोग व्हावा म्हणुन आहे. 'एकमेका सहाय्य करू ....' हा एकच उद्देष आहे. बाकी खरा आयडी, खोटा आयडी, खरे पोस्ट , खोटे पोस्ट वगैरे काही माहित नाही.

साहिल शहा,
पब्लीक स्कूलला अ‍ॅडमिशन घेणार असाल तर अ‍ॅडमिशनचा काही प्रश्न येऊ नये. इथे तुम्ही ज्या भागात रहाल तिथल्या पब्लिकस्कूलमधे तुमच्या मुलाला अ‍ॅडमिशन मिळेल. मात्र इथे १०+२ असे नाही. हायस्कूल ग्रॅज्युएशनसाठी ९वी ते १२ वी चार वर्षांचे हायस्कूलचे कोर्सवर्क विचारात घेतले जाते. हे ग्रॅएशनचे नियम स्टेट प्रमाणे बदलतात. त्यामुळे १०वी च्या रिझल्ट नंतर किती कोर्सवर्क आवश्यक आहे त्याची चौकशी करा. ज्या भागात रहायला येणार आहात तिथल्या हायस्कूलच्या वेबसाईटवर संपर्क केल्यास तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

साहिल शहा
<<< we are planning to migrate primarily for son’s higher education )
माझा सल्ला : तुम्हाला इथे जॉब ऑफर किंवा बिझिनेस करणार असेल तर नो प्रॉब्लेम . अन्यथा , CBSC , १२ वी करुन मुलाला U/G साठी पाठवणे योग्य ( SAT-I , TOEFL score लागणार) . त्याहीपेक्षा इंडिया मधे U/G करुन ( GRE , TOEFL score ) Graduate Study ला पाठवणे बेस्ट ऑप्शन.

तुमच्या प्रश्नांची उत्तरे

१. ११ वी अ‍ॅडमिशन मिळायला काही डिफिकल्टीज येणार नाही. However, for U/G admission in some good universities 9 to 12 scores and equivalent coursework बघत असल्यामुळे अडचणी येतील.
२. तुम्ही एप्रिल - मे मधे मुव्ह होवु शकता , ऑगस्ट सप्टे . मधे स्कूल सुरु होतात.
३. SAT-I and some universities requirement for SAT-II (subject score) , तुम्ही १० वी नंतर मूव्ह झालात तर TOEFL लागणार नाही as he will have completed 2 years education here.

माझा अनुभव :
१. माझ्या मोठ्या मुलाला १२ वी CBSC नंतर ( with good score on SAT , SAT-II and TOEFL) चांगल्या universities ला अ‍ॅडमिशन मिळालेली. However, he preferred to complete U/G in India and then moved for Graduate study. Now after completing MS , working with one of the best Happy
२. We planned primarily .....( same as you thinking ) छोट्या मुलासाठी to Canada, after his 10th CBSC , had no difficulties for admission in 11th as well for U/G. However , do feel ..... Sad

शेवटी निर्णय तुमचा आहे ..मुलांचेही मत घेणे महत्वाचे अन कोणत्या फिल्ड मधे कसा स्कोप आहे त्याप्रमाणे ठरवा.
मला संपर्क करु शकता .

सगळ्याना धन्यवाद. (for quick response)

अथक,

मला तुमचे विचार पटले. But we are staying in Singapore now. (He is studying here in Indian School) जर तो २०१३ नन्तर सिन्गपोर मध्ये रहिला तर त्याला २ year national service करवी लागेल

माझी कंपनी ची शाखा फक्त USA & Singapore मध्ये असल्याने we are thinking to migrate in 2013.

तुम्हला mail करुन सविस्तर माहिती विचारिन. पुन्हा एकदा धन्यवाद

साहिल
गूड , तुमची कंपनी इकडे असल्यामुळे चांगलेच आहे . अ‍ॅडमिशन अन पुढिल शि़क्षणासाठी काहीही अडचण येणार नाही.
माझ्या मोठ्या मुलाने १२ वी CBSC ( DPS School branch) इंडिया बाहेरुनच केलेले , पण U/G साठी he preferred India and now we feel that option was good. शिक्षण at reputed Institute in India was good अन देशामधे खर्चही कमी Happy . छोट्याने १० वी CBSC इंडिया बाहेरुनच केले अन मग आम्ही इकडे येण्याचा निर्णय घेतला...शिक्षण , राहाणे , इतर खर्च भरपुर मोजतोय Sad

तुमच्या मुलाचे १० वी पर्यंत चे बहुतेक सगळ्या CBSC subject चे credits मिळतील . इकडे १२ वी करुन चांगली अ‍ॅडमिशन मिळेल यात वाद नाही , पण ४ वर्षे U/G चा खर्चही कमी नाही . U/G ला फी माफ अन स्कॉलर्शिप फार कॉम्पिटिटिव्ह असते. अरे हा , व्हॉलंटरी सर्व्हिस सर्टिफिकेट कॅनडामधे ४० तास आवश्यक आहे . US मधे पण domestic student ला लागणार , International student ला आवश्यक नाही.

मी तुम्हाला 'अमुक ऑप्शन चांगला' हे सांगत नाही पण अनुभव सांगतोय.

टिश स्कूल - फिल्म मेकिन्ग न्युयॉर्क मध्ये शिक्षण घ्यायचे असेल तर दहावी नंतर कि बारावी नंतर यावे? मंजे मुलीला कधी पाठवावे?

अमा, ग्रॅड स्कूलला पाठवावे. मुंबईत झेवियर्सला बॅचलर्स इन मास कॉम आहे बहुतेक. ते करून मग. अश्या प्रकारचे प्रोफेशनल एज्यु हे ग्रॅड स्कूलला जास्त बरे असं मला वाटतं.

भारतात बी.एस्सी. शिकलेल्या मुलांना सध्या जर्मनीमधे M.Sc. आणि पुढे PhD करायला जाण्यासाठी खूप चांगल्या संधी आहेत.. (इंग्रजीत शिक्षण, व्हिसा, नोकरीच्या सवलती वगैरे). विशेषतः भौतिकशास्त्रामधे.. कुणाला इच्छा असेल त मेल टाका..

विनय :

Pages