चविष्ट पावभाजी कशी जमवावी?

Submitted by सायो on 15 March, 2012 - 12:53

पावभाजी करताना उत्तम जमण्याकरताा टिप्स, कोणते मसाले वापरावेत ह्याबद्दल चर्चा करा. जर पावाभाजी करण्याची मुख्य पाककृती हवी असेल तर ती पावभाजी रेसिपी इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुध्दा बर्याच भाज्या लो. क. करते. भाजी झाली की लगेच काडून घ्यावी म्हणजे मुलबाळ काळी भाजी म्हणून कटकट करत नाहीत. :अनुभवाने शहाणी झालेली बाई:

इथे वाचून मी कांदा फक्त वरून घालायला सुरूवात केली. मस्त टिप होती ती. चवीत बदल जाणवतो.

पाभात वांगं पण? Happy लाल भोपळा, दुधी भोपळा, गाजर, दोन तुकडे बीट हे सर्रास घातलेलं पाहिलंय. आलं-लसूण-पाभा मसाला असला की काहीही समजत नाही आत काय आहे ते Wink

वरती अनघाने लिहिल्याप्रमाणे, लोखंडाच्या कढईत शिजवलेला कुठलाही पदार्थ, खास करुन ज्यात आंबट पदार्थ घातला आहे तो, शिजवल्याबरोबर गरम असतानाच दुसर्‍या भांड्यात काढून घेतला पाहिजे, नाहीतर कळकतो.

येस. अनघा आणी दिनेशदा म्हणतात तसच केलं होतं मी. केल्या केल्याच खाल्ली आणि थंड होण्यापूर्वीच दुसर्‍या भांड्यात काढून ठेवली. Happy

शाब्बास शूम्पी !
लोखंडाच्या भांड्यात केलेले पदार्थ ( खास करुन पिठले, पालेभाजी ) चवदार होतात, हे ही खरेच आहे.

म्हणजे लो. कढईत आंबट घालून पदार्थ केला व लगेच काढून ठेवला तर चालतो का? मला वाटायचे की लो.क. त करतानाही आंबट घालायचे नाही. म्हणून मी टॉ, चिंच, दही घातलेले पदार्थ लो.क त केलेच नाहीत कधी.

चविष्ट पावभाजी कशी जमवावी>>>>
आईला करायला सांगावी. तिची खुपच चविष्ट असते... Happy

इथल्या काही टिप्स वाचुन बनवली पावभाजी. एकदम मस्तच झाली. मी अशी बनवली.
१० मिरच्या कोमट पाण्यात भीजवल्या, थोड्यावेळाने भीजवलेल्या मिरच्या, ७-८ लसुण पाकळ्या, ३/४ इंच आल, अर्धा चमचा जीर, ३ कोथंबिरीच्या काड्या आणि १ हिरवी मिरची अस मिक्सरला लाउन पेस्ट बनवली. टॉमॅटोची प्युरे बनवुन दुसर्‍या कढईत थोड्या तुपावर शीजवली. एका पसरट भांड्यात बटर टाकुन जीर कांदा टाकून शीजवला मग मिरचिची अर्धी पेस्ट टाकली. त्यात टोमॅटोची शिजवलेली प्युरे टाकली. थोडा वास सुटल्यावर बारीक चिरलेली सिमला मिरची टाकली आणि भरपुर परतली. मिरची लगेच शिजते मग त्यात थोडा चाट मसाला आणि बादशहा पाव भजी मसाला घलुन परतल. थोड परतल्यावर मॅश केलेल्या भाज्या (फ्लॉवर, बटटा आणि गाजर), बाहेर शिजवलेले मटार आणि मीठ घालुन शेवटी त्यावर भाज्यांचा स्टॉक घालुन उकळी आणली. सगळ्यात शेवटी फोडणीच्या भांड्यात बटर आणी तुप एकत्र करुन मिरच्यांची थोडी पेस्ट आणि पाव भजी मसाल्याची फोडणी घातली. तव्यावर बटर लाउन पाव भाजुन दिलेत.
अतिशय सुंदर रंग आणि चव. ज्यांनी ज्यांनी टिप्स दिलेल्या त्यांना सगाळ्यांना धन्यवाद.
आणि सगळी भाजी संपली आणि फोटो पण काढायला नाही मिळाला.

हो सुमेधा, चालतो.
चायनीज वोक लोखंडीच असतात आणि आपले डेरीवाले ज्यात रबडी करतात, ती कढईपण लोखंडीच असते.

काल ज्यु. मेंब्रांच्या डिमांडमुळे रात्री पा भा केली. एक अभिनव पद्धत वापरून. फ्रीजात ३ उकदलेले बटाटे सापडले म्हणून बाकीच्या गोष्टी न उकडता कच्यच फु. प्रो मधून फिरवल्या आणि सर्व एकत्र शिजवलं. २० मिनिटात भाजी शिजत पडलेली
आधी कांदा + लसूण फिरवला फु प्रो वर. तो १२ इंची पसरट भांड्यात बटर्वर टाकला आणि मग सिम्ला मिरची मग टोमॅटो कॉ फ्लॉ फिरवलं आणि ते टाकलं. बा. प भा मसाला आणी कश्मिरी तिखट टाकलं. पाणी आणि झाकण टाकलं. तेवढ्यात क्लासला सोडायची वेळ झाली म्हणून गॅस बंद केला क्लासला सोडून आले तोवर तो मसाला मुरला(बिल्वाच्या युक्तीप्रमाणे पण दॅट वॉज नॉट प्लॅन्ड). घरी येवून परत गॅस ऑन केला. आता नेहेमीच हा सोपा प्रकार करणार
चव मस्त आली अगदी नेहेमीप्रमाणे. आणि हो मध्येच कधीतरी ते फ्रीजातले उ. बटाटे मॅश करून घातले आणि शेवटच्या १५ मिनिटात फ्रोजन पीज.

सुनिधी | 7 September, 2012 - 23:02
हो, ब्रेड घरी मशिनमधे केला तो पण छान लागतो...>>>
हे कोणते मशिन आहे ?

अविनाश,
असे मशिन आहे .
http://www.kohls.com/product/prd-734839/zojirushi-supreme-breadmaker.jsp

ह्यात पीठ व इतर सर्व एकदा टाकले व मशिन सुरु केले की आपले काम झाले. भिजवणे वगैरे सर त्यात आपोआप होते. एकदम ब्रेड झाल्यावरच उघडायचे. फक्त हे अतीमहाग आहे, माझे स्वस्तातले आहे. जुने आहे म्हणुन आता ते मॉडेल दिसत नाहिये.

पोर्णिमा, वांगे >>> एकदा का सर्व भाज्या मिळुन आल्या, आले-लसुण, पाभा मसाला पडला व छान रंग आला की आता वांगे आहे असे कळत नाही. मी गाजर टाकणे बंद केले आहे कारण गोड होते भाजी. मटारपण तेच कारण. गोड चव नई मंगताय.

पावभाजी बनवण्याच्या त्या प्रसिद्ध व्हिडीओ प्रमाणे केलेली पावभाजी.
एका मोठ्या पसरट पॅनमधे सिमला मिरची थोडं पाणी घालून शिजवून घेतली. थोडी मऊ झाल्यावर मॅश करत करत पूर्ण शिजवली.

मटार मायक्रोवेवमधे शिजवून घेतले. तेही मॅश करत करत एकजीव केले.
(*टीपः मटार शक्यतो इंडिअन स्टोअर मधले घ्यावेत. नेहमीच्या ग्रोसरीमधले गोडसर असतात).

टोमॅटो घालून परत नीट मॅश करून एकजीव केले.

बटाटा, आलं लसूण पेस्ट, पावभाजी मसाला*, रंगासाठी ब्याडगी मिरचीचे तिखट*, हळद, हिंग, धणे जीरे पूड, कोथिंबीर, आणि आवश्यक तेव्हढे पाणी घालून मॅश करत करत एकजीव केले.
(*टीप १: बादशहा, एवरेस्ट आणि MDH हे तिन्ही मसाले वापरून बघितले. बादशहा मसाला सर्वात चांगला वाटला.
*टीप २: उपलब्ध असल्यास तिखटा ऐवजी वर्‍हाडी ठेचा वापरल्यास चव मस्त येईल).

*टीप ३: पार्टीसाठी करायची झाल्यास इथपर्यंतची कृती वापरून भाजी ४- ५ तास आधी किंवा सकाळी वा आदल्या रात्री बनवून ठेवावी म्हणजे मसाला भाजीत छान मुरतो . सर्व्ह करण्यआधी खाली दिलेल्या स्टेप्स वापरून उरलेली भाजी बनवावी.

नीट एकजीव झाल्यावर कांदा, बटर, अजून थोडी कोथिंबीर व पावभाजी मसाला, लिंबू रस घालून परत मॅश करत एकजीव केले. हे सगळे जिन्नस घातलेला फोटो काढायचा राहिला. सढळ हस्ते बटरचा वापर केल्यास अगदी विकतच्या पावभाजीची चव येते. कांदा घातल्यावर जास्त मॅश करू नये, नाहीतर कांद्यामुळे थोडी गोडसर चव येते.

Enjoy!

वॉव काय तोंपासू फोटो आहेत..शेवटचा तर फारच छळवादी फोटो आहे!

मी सिमला मिरची नाही घालत कधीच. पण फ्लॉवर नेहमीच असतो.

बाहेरच्या पदार्थात अनेक chemical additives असतात, अगदी स्ट्रीट व्हेँडरकडे ही अनेक Chemicalsअसतात, बहुतांश पाणीपुरीपासुन ते पावभाजीपर्यंत प्रत्येक पदार्थांत हे केअमिकल्स व addetives असतात, त्यांचे कसलेही सीक्रेट्स वगैरे नसते. अशी aromatic chemicals आपण वापरत नाही, त्यामुळे बाहेरच्या पदार्थासारखी चव घरच्या पदार्थांना येत नाही.

नॉनव्हेज खाणा-यांसाठि टिप.:-
पाव भाजी करताना सुक्कटाचे (जवळा चटणी) पाणी टाकून पहा काय चव येते.

हळद आणि हिंग मीही सुरवातीला वापरत नव्हते. त्या व्हिडीओप्रमाणे करायची म्हणून एकदा वापरून बघितली. चवीत फार काही फरक पडला असं वाटलं नाही. त्यामुळे तुम्हाला हवं असल्यास वगळू शकता. तसंही अगदी कमी प्रमाणात असल्याने (घालून / न घालून ) रंगात, चवीत फारसा फरक पडत नाही. तसंच मी कसूरी मेथी आणि खाण्याचा रंग वापरला नाही. कसूरी मेथी एकदा वापरून बघितली होती पण चवीत फार काही फरक पडला नाही म्हणून परत कधी घातली नाही. रंग मात्र कधीच वापरला नाही.

मामी, फायनल प्रॉडक्टचा रंग खरं तर मस्त लाल आला होता. रात्री दिव्याच्या प्रकाशात थोडा पिवळसर वाटतोय.

बरीच वर्ष याच पद्धतीनं पावभाजी करत आहे. आता बाहेरची पावभाजी आवडत नाही Proud

मी ऑल्मोस्ट अशीच करते पावभाजी. सिमला मिरची घातल्याने अमेझिंग चव येते. मात्र हिंग हळद तसेच आले लसूण पेस्ट न घालताही मस्त चव येते.

मस्तच .असे तोपांसु फोटोज पाहुन भुक लागली Happy .
मी एव्हरेस्ट पावभाजी मसाल्यावर दिलेल्या रेसिपी प्रमाणे पावभाजी करते.आणि लाल तिखट पण एव्हरेस्ट चे कश्मिरी लाल पावडर(जास्त तिखट नसते पण रंग मस्त लाल येतो) घालते. अगदी बाहेरच्या सारखी मस्त चव लागते. दुसरया दिवशी पावभाजी छान लागते.,जर शिल्लक राहीली तर Happy असं माझं मत आहे हं .

Pages