चविष्ट पावभाजी कशी जमवावी?

Submitted by सायो on 15 March, 2012 - 12:53

पावभाजी करताना उत्तम जमण्याकरताा टिप्स, कोणते मसाले वापरावेत ह्याबद्दल चर्चा करा. जर पावाभाजी करण्याची मुख्य पाककृती हवी असेल तर ती पावभाजी रेसिपी इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी_चिउ .....रॉयल नाही ग....साईमिलन....रॉयल्ची पण आवडते मला फार..पण या टिप्स साईमिलन वाल्यने दिल्या...तु पण कराड ची क?

येस्स.. आठवल साईमिलनच Happy

साईमिलनची पावभाजी आणि व्यंकटेश ची पाणिपुरी/भेळ ... यम्मी

अग बराच वेळ नाव आठवत होते, पण साईमिलन ऐवजी स्वस्तिकच येत होत डोक्यात. Wink

हो.. मी कराड्ची..

माझे एक काका पण कांदा फक्त वरून घालतात आणि लोखंडी कढईत करतात पा भा.
जाम मस्त होते त्यांची पा भा

मस्त विषय..
जर चटपटीत आवडत असेल तर चिंचेचे अगदी पातळ पाणी करून ते घालत रहायचे अधूनमधून शिजताना.. (रुचिरा मधली टिप) मस्त लागते. (चिंच अगदी थोडीशी)
शिवाय, लहान मुले खाणार असतील तर थोडी कमी तिखट करायची आणि थोडेसे बटर वेगळे तापवून त्यात लाल तिखट, मीठ घालून ठेवायचे. हवे त्यांना वरून घेता येईल.

मला असे वाटते की काही काही पदार्थ असेही असतात की ते कोठे खाल्ले जातात यावरही थोडे अवलंबून असावे

पाणीपुरी, भेळ, पावभाजी इत्यादी

अर्थात, कोठेही खाल्ली तरी आवडतेच Happy

व्हईत टिपा नोंदवून ठेवाव्या. काही पध्दती पूर्णतः वेगळ्या आहे.

मी बटाट्याखेरीज कुठलीही भाजी आधी शिजवून घेत नाही.

सगळ्या फोडण्या, आलं- लसूण- मिर्चीवाटण, टोमॅटो पेस्ट परतणे प्रकार झाले की एकेक चिरलेली भाजी फोडणीत आणि त्यात परतलेल्या मसाल्यात घालून शिजवते. सगळ्या भाज्या अगदी मेण शिजल्या की शेवटी बटाटा आणि मीठ.

भाजी पूर्ण तयार झाली की बटरमधे काश्मिरी तिखट पोळवून भाजीत ओतायचं.

मी देखील बटाट्या शिवाय काहीही शिजवून घेत नाही. उकडलेल्या बटाट्याच्या किसात तेवढ्या पुरतं मीठ आणी मसाला घालून घेते. फ्लॉवर किसून घेते. भोपळी मिरची,कांदा,टोमॅटो बारीक चिरून घेते. वर मंजूडीने सांगितलेली पेस्ट पण वापरते. थोडी टोमॅटो प्युरी वापरते. आणी भाजी अर्थात बटर मधे. बटर मधे मसाला आणी तिखटाची फोडणी ट्राय करीन पुढच्या वेळी.

वा !! मस्त धागा !! मस्तच टिप्स आहेत सगळ्यांच्या !! मंजूडीची रेसिपी वापरून पावभाजी व्हेरिएशन्सना सुरवात करणार Happy

बाहेर मिळते त्या पावभाजीत फ्लॉवर नसतो ना ? ते लोक बटाट्याऐवजी सर्रास भोपळा घालतात असं ऐकून आहे.

अंजली, माझीही आज पावभाजी. नवर्‍याने तो जुहूचा विडीओ बघून केली. पूर्ण बटरमध्ये आणि भाज्या कुकरमध्ये न शिजवता (बटाटा सोडून). आवडली.

वर्‍याने तो जुहूचा विडीओ बघून केली. पूर्ण बटरमध्ये आणि भाज्या कुकरमध्ये न शिजवता (बटाटा सोडून). आवडली. >> अगदी अगदी.. मला शुक्रवारीच मोह आवरला नाही.. पण बटरचं एकंदर प्रमाण आणि भाज्यांचं अती शिजवणं ह्यामुळे अगदीच थोडी (दोघात एक प्लेट वगैरे) केली..
काय सही झालेली पण! जुहूचा पाभा वाला जिंदाबाद!

अनिताताई, या खायला Happy

मी त्या व्हिडीओत दाखवलेल्या पद्धतीनं करते नेहमी. फक्त बटर थोडं जपून आणि वरून घालते. तरीही चव मस्त येते. कांदा आधी न घालण्याची टीप योग्य. मला चवीत फरक जाणवला.

अग आधी चिरुन दिला नाही. बाकी सासू चालूच होत्या बाजूला उभं राहून. त्याने कधी रेस्टॉ. काढलं तर कस्टमर्सचे भूकबळी जातील. १ तास पावभाजी मॅश करत होता.

म्या पामराची टीप अशी नाही पण परवा ४ दिवस गावाला जायचे व फ्रीजात बर्‍याच भाज्या शिल्लक.

काय करु कळेना मग सर्व एकत्र केल्या मोठेमोठे तुकडे टाकुन व एक शिट्टी काढली व सरळ मिक्सरमधे फीरवुन फ्रीज केल्या. भाज्या अशा होत्या - कोबी, फ्लावर, भरताचे भलेमोठे वांगे, गाजर, भोपळा, पिवळा स्क्वॉश, हिरव्या बीन्स, रंगीत भोपळी मिरच्या वगैरे. अक्षरशः सगळ्या वापरल्या.

मग काल ६ जणांना एकदा पुरेल इतकी भाजी केली त्यात फक्त एक मध्य बटाटा घातला. मटर नाही घातले. थोडी हरभरा डाळ भिजवुन शिजवुन घातली व बाकी कांदा-टो-लसुण-मसाले नेहमीच्या पध्धतीने परतुन मिश्रण व बटाटे घातले. चांगले झाले.. फक्त वेगळेपण म्हणाल तर बटाटा एकुन भाजीच्या तुलनेत अगदी थोडा, मटार अजिबात नाही, बटर अगदी कमी. (डायबिटीस दुर रहावा म्हणुन काळजी)..

कोणी म्हणेल, ' छ्या, मग ह्याला पा.भा. का म्हणावे?' Happy . पण तरी चांगली झाली होती. आणि हो, ब्रेड घरी मशिनमधे केला तो पण छान लागतो. कधीकधी मी चक्क पोळ्या करते पा.भा. बरोबर आणि ते ही गरमगरम पोळ्याबरोबर छान लागते. बन ची सर नाही पण आता संयम करावा लागतो. Happy

बाकी इथल्या टीपा लिहुन ठेवल्यात

Pages