मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चमन, आपला प्रॉब्लेम सुटायला माझी पावलीची जरी मदत झाली असेल तरी भरून पावले.

पराग - चमन ने लिहिल्याप्रमाणे फॉर्म करेक्शन हाच मिनिमल किंवा अनवाणी पळण्यामागचा मुख्य हेतू.

आणि दुखापतींचे म्हणशील तर त्या अगदी दहा हजाराचे बूट घातलेस तरी पळण्याचा फॉर्म नीट नसेल तरी होतातच. नीट फॉर्म नसताना देखिल एखादी पुर्ण मॅरॅथॉन पळणारा माणूस असेल पण लाँग-टर्म मधे फॉर्म नीट नसल्यामुळे होणारे नुकसान टाळायचे असले तर अनवाणी पळण्यानी नक्कीच फरक पडतो.
आणि वर लिहिलेल्या दुखापतींचे म्हणशील तर त्याला रूळ बदलताना होणारा खडखडाट म्हणता येईल. नैसर्गिक रित्या आपण जसे पळायला हवे तसे मधल्या काही वर्षांमधे पळत काय चालत देखिल नसल्या कारणाने काही विशिष्ट तर्‍हेने पळण्याची सवय परत होईपर्यंत तसेच त्या स्नायूंची ताकद (ज्यांचा वापरच नसल्याने गेलेली असते) परत येई पर्यंतच हा त्रास होतो. व्ह्यायला हवा अन्यथा परत एकदा फॉर्म तपासायला हवा.

अनवाणी धावण्याचे सुख केवळ अवर्णनीय.... मी तर म्हणेन प्रत्येकाने एकदा तरी अनवाणी धावून बघावे. आपल्या पायाला होणारा जमीनीचा स्पर्श मला इतका आधारदायक जाणवला की ज्याचे नाव ते... असो आता पुरे Happy

आणि दुखापतींचे म्हणशील तर त्या अगदी दहा हजाराचे बूट घातलेस तरी पळण्याचा फॉर्म नीट नसेल तरी होतातच >>>> ब्रँड किंवा किमतीबद्दल काही म्हणणच नाहीये.. Happy ह्या बुटांचे नक्की फायदे काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो...

मी सध्या अर्ध मॅराथॉनसाठी तयारी करतोय.. मी नेहेमीचे पळण्याचे शूज वापरून टाच-आघात ते चवडा-आघात इतपत तरी प्रगती केली आहे.. मिनिमल्स वापरावे की जे करतो आहे तेच चालू ठेवावे हे नक्की होत नाहिये. सध्या तरी गाडी १ तासावर अडकली आहे. एक तासापेक्षा जास्त पळायला जमत नाहिये. फेब्रुवारीमध्ये मी ५ मिनिटापासून सुरुवात केली त्यामुळे एक तासावर आलोय हे बरेच बरे वाटतेय Happy

अरे वा टण्या!! प्रगती सॉलिडच आहे.
एक तास पळाल्यानंतर पायांमधले मसल्स (खास करून थाईज, काल्व्ज) सोअर राहतात का? सोअरनेसमुळे पळण्याच्या कंटिन्युटीवर फरक पडतोय का? ऊदा. एक तास म्हणजे तू ५ ते ६ मैल पळत असणार. तर तू असे आठवड्यातून तीनवेळा पळू शकतोस का?

जर मसल्समध्ये सोअरनेस रहात नसेल आणि तू आठवड्यातून १५-२० मैल पळू शकत असशील तर मला नाही वाटत मिनिमस किंवा मिनिमलिस्ट ला स्विच करण्याची गरज आहे.
एका तासावर गाडी अडकलीये म्हणजे तासभरानंतर दमसास रहात नाही की पाय रेटत नाहीत? दमसास चा प्रॉब्लेम असेल तर योगा, म्युझिक, पळण्यासाठी चांगली जागा आणि कंपनी ह्याने बर्‍यापैकी फरक पडेल. डाएटमध्ये भरपूर लिक्विड ही आवश्यक.
पाय रेटत नसल्यास मात्र सरावाशिवाय पर्याय नाही. मसल मेमरी डेवलप व्हायला वेळ लागतो. दर वेळी मागच्या पेक्षा पाच मिनिटे (अर्धा मैल) जास्त पळायचं असा प्रयत्न केल्यास जमेल हळूहळू. पायांचे बाकी व्यायामही ऊपयोगी पडतील.

रनकीपर आणि एडोमोंडो सारखे स्मार्टफोन अ‍ॅप्स पळण्याचे स्टॅटस ठेवण्याबरोबरच तुझ्या ट्रेनिंग प्लान बर हुकूम तुला पळतांना सुचना देतात. तीन महिन्यांनंतर मला हाफ पळायची आहे असा गोल सिलेक्ट केल्यास ती अ‍ॅप तुझे सध्याचा स्टॅमिना आणि स्पीड बघून तुला बरोबर ट्रेनिंग प्लान बनवून देईल. नुसता बनवूनच नाही तर तुला वेळोवेळी आज काय करायचे आहे ऊद्या काय आहे त्याचे रिमाईंडर्स पण देईल. पळतांना तुला वेग मेंटेन करण्यासाठीही आठवण करत राहील. कधी कधी मात्र फार त्रास देते. तिला चढ वगैरे आलेला कळत नाही त्यामुळे आपण आधीच वैतागलेले असतांना हिची नाहक बडबड फार संतापजनक असते. Lol

आठवड्यातले तीन दिवस मी न चुकता पळतोय.. फार काय पाय सुजलेले, दुखत राहतात वगैरे नाहिये. मजाच येते, नाही गेलं पळायला तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. इथे आल्यापासून जरा क्रॉस होत नाहिये, किमान तासभर चाललं तरी पाहिजे. रोज दोन तास ऑफिसला येण्या जाण्यात जातात Sad

मला क्लायंट टिममधल्या एकाने - जो लांब पल्ल्याच्या शर्यतींचा ट्रेनर होता - पूर्ण प्लॅन दिलेला आहे. त्या बरहुकुम जातो आहे. हाफ मॅराथॉन ऑक्टोबरमध्ये आहे त्यामुळे वेळ आहे.

पहिले ६-८ आठवडे थोडे थोडे वाढवत नेले पळणे. सुरुवात चार मिनिटे पळणे-दोन मिनिटे चालणे असे तीन सेट ह्याने केली. ते १२ मिनिटे पळणे - दोन मिनिटे चालणे तीन सेट वर पोचलो. गेले दोन आठवडे ४० मिनिट - ४५ मिनिट आठवड्यातले तीन दिवस असे सुरु केले. रविवारी १ तास ०५ मिनिटे पळायचे होते ते ५५ मिनिट झाल्यावर थांबलो. अर्थात तो रस्ता घेतोय तो चढ उताराचा आहे. मॅराथॉन रस्ता मुळीच चढ उताराचा नाहिये. दम जातोय की पाय थकतात ते कळत नाहिये Happy

गाणी ऐकत पळत नाही, ती सवय सोडवली. स्मार्ट फोन नाहिये आणि बायकोने ६-८ महिने सलग पळल्याशिवाय गार्मिनचे नाव पण काढायचे नाही अशी तंबी दिली आहे. वेगाचे सातत्य बर्‍यापैकी जमतय. चढ-उतार सुरुवात शेवट वेग तितकाच राहतोय. एका तासात ८ किमीने पळतोय मी सध्यातरी. बघू ह्या रविवारी एक तासाचा बॅरिअर मोडतोय का, सपाट ट्रॅकवर पळायला जातो.

हा प्रश्न बहुतेक आधी कोणितरी विचारला असेल तरी परत विचारतोय Happy स्वतःच्या पळण्याचा फॉर्म/टेक्निक कसं ओळखायचं आणि बरोबर फॉर्म कुठला. मी ऑक्टोबर मधे १० माइल्स चा प्लॅन करतोय.

टण्या,
मला असं वाटतंय की तुला तुला कळतंय तू काय करत आहेस ते. सो कीप ईट अप. आप्ल्या प्रश्नांची ऊत्तरं मिळतात आपल्याला हळूहळू

दम जातोय की पाय थकतात ते कळत नाहिये > मला वाटतंय की तू खूप डीहायड्रेट होतो आहेस आणि तासाभराच्या पळण्यानंतर एनर्जी लेवल खूप कमी झाल्यामुळे तुला फटिग वाटून थांबावे लागत आहे.
पाण्याचे, गेटोरेडचे सिप किंवा जेल, च्यूज अशी काही सोय झाली तर बघ. गेटोरेडच्या ऑरेंज/लेमन च्यूजच्या गमी गोळ्या मिळतात. चव एकदम आपल्या एसटीमध्ये मिळणार्‍या संत्रा/लेमन सारखी. पण त्यातून तुला थोडं फ्युएल नक्की मिळेल. चार गोळ्या खिश्यात घेऊ पळालास (एक गोळी ५०-६० कॅलरीज) आणि दर २० मिनिटांनी एक चघळायला घेऊन बघ एनर्जीमध्ये काही फरक पडतोय का?

मनीष, ट्रायपॉड किंवा स्टूल किंवा अगदी काहीही ज्यावर फोन किंवा कॅमेरा बसेल अशी अ‍ॅडजस्टमेंट करून ट्रेडमीलवर पळतांनाचे एकदा मागून आणि एकदा साईडला जमिनीवर ट्रायपॉडवर कॅमेरा लाऊन असे २-२ मिनिटांचे विडीओ काढ. विडीओ स्लो मोशमध्ये पळवण्याचे एखादे सॉफ्टवेअर डाऊनलोड कर आणि नंतर यूट्यूबर लाँग रनसाठी पळायचे करेक्ट पोश्चर सापडून तुझा विडीओ कंपेअर कर.
बर्‍याचश्या स्पोर्टस शॉपमध्ये, किंवा स्पोर्ट्स शूज शॉपमध्ये फ्री मध्ये किंवा नॉमिनल फी घेऊन गेट अ‍ॅनालिसिस करून मिळते.

मला वाटतंय की तू खूप डीहायड्रेट होतो आहेस आणि तासाभराच्या पळण्यानंतर एनर्जी लेवल खूप कमी झाल्यामुळे तुला फटिग वाटून थांबावे लागत आहे
>>>
shakya aahe.. mi pani barobar ghet nahiye paltana

वा वा टण्या भारीच !! तू आणि मनीष कीप इट अप.. !
तयारीचे अपडेट्स टाकत रहा इथे..

हर्पेन.. इतक्यात तरी नाही प्लॅन.. सध्या पळण बंदच आहे.. अजिबात उत्साह वाटत नाही पळापळी करायचा.. परत मूड येईल तेव्हा बघू..

ह्या बाफवर बर्‍याच दिवसांनी उद्बोधक चर्चा झालेली बघून छान वाटलं. Happy

धन्यवाद टण्या, चमन. व्हिडीओ काढणं जरा मुश्कील आहे कारण ट्रेड मील नाही (जिम मेंबरशीप घ्यावी लागेल). आधी तो टण्याचा व्हिडिओ बघून मग स्पोर्ट शॉपचा ऑप्शन बघतो (डेकॅथलॉन मधे विचारिन).

तू आणि मनीष कीप इट अप.. >> धन्यवाद पराग. सुरूवात म्हणून मागच्या महिन्यात अँटवर्प ५ किमी पळालोय (३५ मिनीटस). कॉन्फिडन्स बूस्टर प्रयत्न होता. आता वाटतय की इतकी वर्षं वाया घालवली Happy पण 'देर आये दुरुस्त आये'. मुलीला पण अँटवर्प १ किमीमधे पळवलंय Wink

वा वा टण्या भारीच !! तू आणि मनीष कीप इट अप.. !>> + १
ह्या बाफवर बर्‍याच दिवसांनी उद्बोधक चर्चा झालेली बघून छान वाटलं. >> + १
पोस्टी वाचुन जोष येतोय! Happy

मिडफुट स्ट्राईक करतांना किंवा त्यासाठी कॉशसली प्रयत्न करतांना पहिल्याने बर्‍याचवेळा फोरफुट स्ट्राईकही होत राहतो, आणि मग मस्तपैकी काल्व पेन जन्म घेते. ही वेदना व त्याबरोबर बाकीचे प्रॉब्लेम्स वाढू नयेत आणि काल्व मसल्स स्ट्रॉंग व्हावे म्हणून करावयाचे काही व्यायामप्रकार

http://www.kinetic-revolution.com/forefoot-running-and-calf-pain/

हर्पेन माफ कर आधी ऊल्लेख करायचाच राहिला पण अनवाणी हाफ मॅराथॉन म्हणजे जबरदस्तच. तेही भारतातल्या रस्त्यांवर, मानलं पाहिजे तुला. टायमिंग ही मस्त होता. माझ्या पहिल्या हाफ मॅरेथॉनचाही टायमिंग तेवढाच २:०६.
आता होते आरामात दोन तासांच्या आत पूर्ण.
मी सध्या तरी अनवाणी पळायची कल्पना नाही करू शकत. पण फ्रिक्शन, खडे, वाळू ह्यांचा त्रास होत नाही का? तळव्यांची कातडी सोलणे. ठेच लागून जखमा वगैरे नाही होत? कसं मॅनेज केलंस ते लिहिई ना जरा. लहानपणी अनवाणी भरपूर क्रिकेट वगैरे खेळलोये पण आता सवय नाही राहिली.

अरे चमन, अनवाणी नाही रे! मी लिहिलेत ते डिकॅथचे न्युफील बूट वापरून धावलो. माझ्या काही मित्रांनी मात्र ती स्पर्धा प्रॉपर अनवाणी पायांनी पुर्ण केली, त्यांना तसा त्रास झाला. मोठे खडे, टाळता येतात, पण चांदणी चौकातून बावधन वरून पाषाण कडे जाताना नवीनच केलेल्या रस्त्याची ती बारीक खडी होती तिचा फार त्रास झाला. थोडे डांबर चिकटले पण पायाला Sad

आणि टण्या, कधीही पाणी न पिता / कमी पिऊन पळू नकोस, स्नायू आखडणे, पायात गोळे येणे अशी दुखणी फार त्रास देऊ शकतात. पाणी बरोबर घेऊन पळायचे किंवा कुणाला तरी सायकलवर वॉटर सपोर्ट साठी घेऊन जायचे, आम्ही इकडे एकदा असे कोणी न मिळाल्याने चक्क वाटेतल्या चहाच्या टपरीवर वगैरे थांबून पाणी प्यायले आहे. तसेच दहा किमी पेक्षा जास्त अंतर पळायचे असल्यास, पळण्यापुर्वी तास भर आधी काहीतरी खा, एखादे केळे, राजगिरा वडी, असे हलके फुलके Happy

पराग, मूड वगैरे काय असतो? असेलच तर तुला आमच्या ग्रुप सोबत पळायचे उभे आमंत्रण. आम्ही प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, ई. परिसरात पळतो.

पाण्याची बाटली कमरेला लावून जायचा उगाचच आळस, पण आता आज आणि रविवारी पाणी घेउनच पळेन. आज ५० मिनिटे आणि रविवारी १:०५ मिनिटे पळायचे आहे

मी आज १ तासाच बॅरिअर तोडला, म्हणजे त्यापेक्षा जास्त नाही पण १ तास तरी धावलो. गंमत म्हणजे शेवटचा किलोमीटर सगळ्यात वेगाने धावलो. ९ किमीचा वेग राहिला. पाणी बरोबर घेतले होते आणि ७५० मिली पाणी संपवले १ तासात. पुढल्या वेळी बेदाणे किंवा लिमलेटच्या गोळ्यांसारखे काहितरी बरोबर ठेवतो.

आता ह्या आठवड्यात तीन दिवसः ४०, ५० आणि ६५ मिनिटे धावायचे आहे.

सही रे टण्या. वेल डन!!! कीप ईट अप.
पाऊण लिटर पाण्याची बाटली हातात घेऊन पळतांना हात अवघडून आले नाहीत का?

पळतांना फ्युएल म्हणून बेदाण्यांसारखेच खजूरही चालतील,

http://greatist.com/fitness/run-snacks-improve-marathon

तुला माहितच असेल म्हणा, तरी असे स्नॅक दम लागल्यानंतर खाल्ले तर त्यांतील पोषणद्रव्ये रक्तात शोषली जाऊन मसल एनर्जीमध्ये रुपांतरित होण्यास ८ ते २० मिनिटांचा कालावधी लागू शकतो. म्हणून अगदीच फार दम लागेपर्यंत वाट बघितली तर कदाचित त्यांचा पूर्ण फायदा मिळाणार नाही

बुवांनी धावण्याचा वसा टाकला का? बुवा ऊतू नका मातू नका धावण्याला थर्ड देऊन नका. Lol
निदान मार्गदर्शनासाठी का होईना दर्शन तर द्या आम्हाला.

हर्पेनच्या धाग्याची लिंक ही टाका जमलं तर वरती हेडर मध्ये.

त्या 'अराऊंड द वर्ल्ड फॉलो द सन' धावणार्‍या महिला मंडळातले कोणी मेंबर ह्या धाग्यावर येत नाहीत का? की तो वन टाईम ईवेंट होता.

चमन, तो वन टाईम इव्हेंट होता. काही जणी रेग्युलर धावतही असतील पण इथे लिहीत नसतील. माझी मजल अजून १० के च्या पुढे गेली नाहीये.

जपानच्या 'एनएचके वर्ल्ड' ह्या चॅनलवर आज ही मॅरेथॉन बघितली. फारच भारी.

'अल्ट्रा ट्रेल माऊंट फुजी' नावाची स्पर्धा जपानमध्ये दरवर्षी असते. धावणार्यांनी नक्की बघाच.

NHK World he app download karun pan baghata yeil

The ULTRA-TRAIL Mt.Fuji 2014, the toughest 100-mile trail running race in Asia. Reports on the fierce competition and introduces the beautiful views of the World Heritage, Mt. Fuji, through the race.

ULTRA-TRAIL Mt.Fuji 2014
June 28, Sat. 9:10 / 15:10 / 21:10 (JST)
June 29, Sun. 3:10
or

http://www3.nhk.or.jp/nhkworld/english/tv/special/201406.html#pId2014062...

JST IST chya 3hr 30 min pudhe

रवीवारी गोरेगावला असलेल्या 'मुंबई मॉन्सून मॅडनेस' नावाच्या मॅरेथॉन स्पर्धेत मी पळून आलो.

पाऊस नव्हता मॅडनेस होता मात्र....

माझा निकाल
Harshad Pendse
Bib No.: 333
Gender: M
City: Pune
Age category: 41 - 50
Event: 2nd Mumbai Running And Living Monsoon Madness XC Half Marathon
Chip time: 2:12:34
Overall Rank: 52/641 Average Speed: 9.55Km/hr
Gender Rank: 49/571 Age Category Rank: 5/38

धन्यवाद आडो,

संपुर्णपणे आरे कॉलनीच्या आतच पळायचे होते. गावदेवी मंदीरापासून सुरुवात होती.
पाच सव्वापाच किमी जाऊन त्याच रस्त्याने परत यायचे आणि अर्ध्-मॅरॅथॉन करायसाठी असे दोनवेळा करायचे.

आधी तसे सुचित केलेले होते पण वाईट्ट प्रकार होता, चढ-उतार, वळणं, अरुन्द रस्ता, म्हशी, सगळ्यात कहर म्हणजे मॉन्सूनचा पत्ताच नाही, त्यामुळे हालत खराब... नाही म्हणायला दोन चार शिंतोडे पडले मधेच पण त्यामुळे तर अजूनच गरम झाले. दोनेक धावक, चक्कर येऊन पडले, अशा एकाला सावरायला मी आणि माझा मित्र राम, असे आम्ही दोघेही गेलो असता, (तो इतका मोठा आणि जड होता की) मीच त्याच्याखाली चेपला जातोय की काय अशी वेळ आली होती, पण अजून काही स्वयंसेवक लगेच आल्याने वाचलो....

पाण्याचे नियोजन जरा फसले कारण एक तर पाऊसच नसल्याने पण वातावरणात दमटपणा खूप असल्याने, पाणी खूप लागत होते, वर ते पाणी ग्लास मधून देत होते त्यामुळे बरोबर घेऊन पळताही येत नव्हते आणि पाणी मिळायला पण खूप वेळ लागत होता.

मला लागलेला वेळ बघता हे काही माझे सर्वोत्तम धावणे नाही पण माझ्यासाठी ही वेळ हा परफॉर्मन्स सर्वोत्तमच आहे.

हर्पेन, ही वरची जी हाफ मॅरेथॉन धावलास ती 'रनिंग अ‍ॅन्ड लिव्हिंग' अश्या कोणीतरी ठरवलेली होती कां?

हर्पेन, मगाशी फेसबुकवर वाचलं त्याबद्दल म्हणून विचारलं. भरपूर लोकांनी शिव्या घातल्या आहेत. त्यांचं हे वॉटर मॅनेजमेंट प्रत्येक मॅरेथॉनलाच गडबडलेलं असतं असं म्हणतायत लोकं.

खरं तर नाहीये तसे, माझ्या मित्रांनी घेतलेला, त्यांच्या या आधीच्या दोन स्पर्धांचा अनुभव तरी चांगलाच होता. अर्थात या स्पर्ध्रेचा अनुभव नक्कीच वाईट होता. त्या दिवशी पाऊस पडेल असे गृहित धरल्यामुळे गडबड झाली असावी आणि पेपर ग्लास मधे पाणी दिल्याने बरोबर घेऊन पळता देखिल येत नव्ह्ते. पाणी व्यवस्था बाहेरच्या हॉटेल वाल्या कुणाला तरी उक्ती अंगावर दिली होती. त्यांनी पाणी ग्लासात भरून ठेवले नव्ह्ते आणि मग ही मोठी रांग पाणी प्यायला माझी पण कमीत कमी ५ मिनिटे वाया गेली असतील पाण्यापोटी Sad

Pages