मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन....

शुभेच्छा तर आहेतच माझ्या तुमच्या पाठीशी....पण मागे एकदा कुणीतरी तुम्ही मुंबई (किंवा अन्य ठिकाण असेल) येथील मॅरेथॉन अनवाणी केली असे काहीसे वाचले होते....तसे केले नसेल तर प्रश्न नाही; पण केले असेल वा करणार असाल तर कृपया तसला विचार मनातही आणू नका. पाहाणारे पाहतात....दोनेक मिनिटे करतात कौतुक, जातात विसरून...पण मॅरेथॉनपटूचे पुढे आठवडाभर काय हाल होतात ते मी पाहिले आहे.

असो...वृत्तांताची अर्थातच प्रतिक्षा असेल.

धन्यवाद मामा,

किती काळजी करता! अनवाणी पळणारा, तो मी नव्हेच Happy

मी जे बूट घालतो ते अगदी सपाट तळव्याचे असतात, पण मी बूट घालूनच पळतो.

अनवाणी देखिल नीट तयारीनिशी पळले तर काही त्रास होत नाही. माझा एक मित्र अनवाणीच पळणारे हैदराबादला... त्याची तशी तयारी केली आहे त्याने.

हुर्रेर्रे.... मी हैदराबादची पुर्ण मॅरॅथॉन साडेपाच तास लावून पुर्ण केली...

काही क्षणचित्रे-

मुंबई नंतर दुसरी फुल मॅरॅथॉन,

मुंबईच्या तोडीस तोड उत्कृष्ट आयोजन,

पहाटे ५ वाजता, अगदी क्षितिजावर दोन चांदण्यांसकट दिसणार्‍या (बहुदा द्वितीयेच्या) चंद्रकोरीच्या साक्षीने सुरु झाली फुल मॅरॅथॉन...

४२ किमी पैकी सुरुवातीचा सुमारे १०किमीचा मार्ग हुसेन-सागराच्या भोवताली परिक्रमा घडवणारा

हुसेनसागरातून वर येताना नेत्रसुखद भासणारा सुर्योदय

सुर्य हातभर देखिल वर आला असेल नसेल तोवर लगेच वाढलेली वातावरणातील आर्द्रता

दमसासाचा कस पाहणारे, बंजारा, ज्युबिली अशा टेकड्यांवरचे चढ-उतार,

नैसर्गिक टेकड्या कमी पडल्या म्हणून की काय पण स्पर्धा मार्गावर असलेले ऊड्डाणपूल,

ह्यावर मात करत मस्तपैकी गायलेली गाणी, कमर्शियल ब्रेक म्हणून गायलेल्या विको टर्मरिक, निरमा, ई. जाहीराती,

४२ पैकी साधारण ३० किमी झाल्यावर संपुर्ण बिनसावलीचा उजाड मार्ग,

उन्हाच्या तडाख्याने आणि खराब रस्त्यावरच्या चढामुळे लागलेली वाट,

चालत पार करावे लागलेले काही अंतर,

शेवट जवळ आला असताना थोड्यातरी प्रमाणावर सावलीचा सुखद शिडकावा करणारा विद्यापीठातला रस्ता,

मनापासून प्रोत्साहन देणारे हैदराबादी आणि संपुर्ण स्पर्धामार्गावर उपस्थित असलेले, नेमस्त काम तळमळीने करणारे स्वयंसेवक,

'गच्ची बावली' या भन्नाट नावाच्या स्टेडियम मधे अनेक जणांच्या उपस्थितीत, जोरजोरात आपल्या नावाचा गजर होत असल्यामुळे अचानक बळ प्राप्त होऊन, जोरात धावून झालेला शेवट.

आमच्या गृपच्या सर्वच्या सर्व सहभागी सदस्यांनी निर्धारित वेळेच्या आत संपवलेली स्पर्धा..

बाकी हैदराबादी बिर्याणी, इतर जेवण-खाण, चारमिनार, खरेदी या तत्सम गोष्टींमुळे सोन्याला लाभलेला सुगंध वेगळाच

धन्यवाद पौर्णिमा आणि मी नताशा,

पुण्याहून आमच्या क्लबचेच ३० जण एकत्र जात होतो आणि पुणे रनिंगचे देखिल तेव्हढेच लोकं असतील जाता येताना ट्रेनमधे पण खूप धमाल आली.

मस्त हर्पेन, क्षणचित्रे वाचूनच खूप भारी वाटले, तिथे तुम्हाला प्रत्यक्षात खूप मजा आली असणार एवढ्या लोकांसोबत. कीप इट अप.

धन्यवाद रूनी आणि पराग...

मुंबई मॅरॅथॉन २०१५ मधे कोणी भाग घेणारे का?

असे कळतंय की हाफ मॅरॅथॉनसाठीची रजिष्ट्रेशन्स संपली आहेत, फुल्लसाठी अजून करता येऊ शकताहेत.

सर्वांचे मनापासून धन्यवाद Happy

पुण्यात येत्या १२ ऑक्टोबर २०१४ ला 'रन बियाँड मायसेल्फ' नावाची 'पुणे रनिंग' तर्फे आयोजित केलेली 'चॅरिटी रन' होणार आहे. या वेळेस जमा झालेली रक्कम 'सोफोश' ह्या ससूनशी निगडीत असलेल्या अनाथालयाला दिली जाणार आहे.

अधिकाधिक लोकांनी ह्यात सहभागी व्हावे ही विनंती.

त्यांचे फेसबुक पान -
https://www.facebook.com/#!/events/267084230148621/
आणि नोंदणी करण्याकरता
To register goto: http://www.meraevents.com/event/prbm2014

मागच्या वेळेस ह्याच स्पर्धेत १५ किमीचे अंतर धावून मी लांब अंतरांच्या स्पर्धांमधे भाग घेण्याचा श्रीगणेशा केला असल्याकारणाने माझ्यासाठी ही स्पर्धा खूप महत्वाची आहे.

मी ०५ सप्टेंबर २०१३ रोजी पळायला सुरुवात केली. म्हणजेच उद्या बरोबर एक वर्ष पुर्ण होईल. आणि सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की मी आजवर धावलेले एकूण अंतर आजच्या दिवशी १५०० किमी.च्या पुढे गेले.

आता उद्या लडाखसाठी प्रस्थान ठेवत आहे. १४ तारखेला तिथे पुर्ण मॅरॅथॉनमधे भाग घेत आहे.

एका वर्षात १५०० किमी. तेही पहिल्यांदाच पळायला सुरूवात केल्यावर. माझ्याकडे शब्द नाहीत.
लडाखच्या मॅराथॉनला शुभेच्छा. आल्यावर वृत्तांत लिहा. विरळ हवा असल्याने पळतांना काय खबरदारी घेतली तेही सांगा नंतर.

१२ ऑक्टोबर २०१४ ला 'रन बियाँड मायसेल्फ' मधे धावणारे की नाही कोणी?

माझे लक्ष्य अर्ध-मॅरॅथॉन दोन तासाच्या आत पुर्ण करणे Happy

Pages