मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टण्डड्र चाटर्ड मुंबई मॅरॅथॉन ला २० जानेवारी २०१३ येत्या रविवारी कोण मायबोलीकर धावणार आहे का?
मी धावणार आहे.

परत एकदा ५ के केली. यावेळी मुलाने पण १ माईल रनमधे भाग घेतलेला आणि त्याने ती ९ मि.पेक्षा कमी वेळात पुर्ण केली. मला मगच्या वेळ्पेक्षा ३ मि जास्त लागले म्हणुन जरा वाईट वाटले, बाकी फार मजा आली. रेस झाल्यावर फ्रि मसाजही मिळाला Happy

प्रिती अभिनंदन !!! मुलाचे विशेष अभिनंदन. किती वर्षांचा आहे? सहाच्या वर स्पीड म्हणजे मस्तच आहे. कीप ईट अप.
मी सुद्धा पळायला सुरूवात केली. मागच्या वर्षीपेक्षा वजन पाचेक किलोंनी वाढलेलं आहे पण दोन-तीन प्रॅक्टीस रन्स नंतर १३ मैलांचा रन पूर्ण करू शकलो. स्पीड थोडा कमी झाल्याने मागच्या वर्षीच्या मॅरेथॉनपेक्षा तब्बल १२ मिनिटे जास्त लागली. हळूहळू गाडी रूळावर येईल अशी आशा आहे. बघूयात.

चमन धन्यवाद आणि अभिनंदन!!! Happy
मुलगा साडे सात वर्षाचा आहे.
१०के करायची होती पण प्रॅक्टीस करता न आल्याने ५केच केली.

अभिनंदन प्रीति.
मी ही शनिवारी एक ५के केली.
इथे अ‍टलांटाला प्रत्येक मदर्स डे विकेंडला 'सुझन कोमेन - १ माईल/५के रन' असतो. सगळा जमलेला निधी ब्रेस्ट कॅन्सर उपचार आणी रिसर्च ह्याला डोनेट केला जातो. जवळपास १७ हजार रनर्स होते (त्यातले बरेच ब्रेस्ट कॅन्सर सरव्हायवर्स, आणि व्हिक्टीम्स चे नातेवाईक), आणि साधारण १.५ मिलियन डॉलर निधी जमला. ५के रन खूप छान झाला. अतिशय एनेर्जेटीक वातावरण होतं. अतिशय सुंदर अनुभव!

भारतातले पळण्याचे, त्याच्या तयारीचे अनुभव लिहा ना कोणी तरी, मी सध्या तयारीला सुरुवात केली आहे जानेवारी १४ मधे होणार्‍या मुंबई मॅरॅथॉन साठी. एकदम उच्च ध्येय Happy

पुण्यात ६ ऑक्टोबर २०१३ रोजी होणार्‍या 'रन बियाँड मायसेल्फ' ह्या 'चॅरिटी रन' मधे मी माझ्या आयुष्यातली पहिली वहिली लांब अंतराची (१५ किमी) शर्यत धावणार आहे.

ही शर्यत बीएमसीसी पासून चालू होउन बालभारती मार्गे, सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण रस्त्यावरून मागे फिरून परत बीएमसीसी येथे संपणार आहे.

ज्यांना कोणाला जमणार असेल त्यांनी स्पर्धामार्गावर धावपटूंना प्रोत्साहन देण्यास जरूर उपस्थित रहावे. अर्धमॅरॅथॉन स्पर्धा सकाळी ६ वाजता चालू होणार आहे. बाकी १५किमी, १० किमी, चालणे ई. स्पर्धा त्यानंतर दर १५ मि. च्या अंतराने चालू होतील.
अधिक माहीतीसाठी
http://www.punerunning.com/Running-Beyond-Myself-2013.html

ऑल द बेस्ट हर्पेन ! ओळखीच्या दोन तीन जणांनी मला विचारलं होतं ह्या रेसमध्ये भाग घेण्याबद्दल. ते पळणार आहेत. पण मला समहाऊ अजिबात उत्साहं वाटत नाहीये ह्या वेळी पळायचा.

सविस्तर अनुभव आणि शक्य असेल तर फोटो नक्की टाका इथे.

धन्यवाद पराग आणि मी नताशा,

पराग - सध्या मुक्काम पुण्यातच आहे का?
आणि पळायचा उत्साह नसला तरी चिअर करायला किंवा फोटो काढायला तरी उत्साह आणा की राव!

येस आणणार.. ! त्या दिवशी पुण्यात असेन तर येईन नक्की.. Happy
जर बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झाला तर मी वॉलेंटीयर म्हणून रजिस्टर करेन..

आज पुण्यात झालेल्या 'रन बियाँड मायसेल्फ' ह्या 'चॅरिटी रन' मधे मी माझ्या आयुष्यातली पहिली वहिली लांब अंतराची (१५ किमी) शर्यत धावलो. हे अंतर पार करायला मला १ तास ४० मिनिटे लागली.

पराग आपण आलेलात का?

हर्पेन,
अभिनंदन Happy

आज इतर काही धावपटूंप्रमाणे तूही अनवाणी धावलास का? आज सकाळी मी येणार होतो, पण जाग आली नाही.:(

धन्यवाद चिनूक्स, मी मिसो नाही, मी बूट घालूनच धावलो, तुला लवकर उठवण्याकरता मदत हवी असल्यास सांगत जा Happy

हर्पेन ....खुप खुप अभिनन्दन .....आपण बराच सराव करुन ह्या मँरेथॉन मधे उतरला होतात ....कसा वाटला अनुभव? वाचायला आवडेल.

१५ कीमी अन्तर १ तास ४० मि म्हणजे आपला स्टँमीना जबरदस्त आहे...

आणी चँरीटी रन असल्याने आनद वेगळाच ..

परत एकदा मनापासुन अभीनन्दन ...आणी आपल्याला सलाम...

अ‍ॅटलांटा ऑल स्टेट हाफ मॅरेथॉन आज झाली. १३.१ माइल्स (२०.९६ कि. मी.) २ तास १७ मिनिटे आणि २२ सेकंदात पूर्ण. नाद करायचा नाय :). वेळ मिळेल तसं अजून लिहेन. एक गोष्ट - चाललो कधीच नाही. सर्व अंतर पळत.

हर्पेन, राहुल अभिनंदन. खूप मस्त वाटले तुम्ही शर्यत पूर्ण केली हे वाचून.

(राहुल तुझा आयडी मराठीत लिहायचा म्हणजे ...)
बुवा दुसरे कुठले व्यायामप्रकार ट्राय केले, कुठले आवडले.
मला स्वतःला चालणे (हायकींग) सोडून अजून काय आवडते हे माहित नाही. पळणे, जीम, पिलाटीज, योगा हे प्रकार करून. बघितले पण खूप आवडले नाहीत त्यामुळे यात सातत्य आणू शकत नाही.

हार्पेन, राहुल, अभिनंदन!

आपआपले अनुभव लिहा. वाचून कमितकमी टर्की ट्रॉट धावायची हिंम्मत करता येईल. Happy

Pages