मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुरु केलय पळणं. आठवड्यातुन तीनदा जातो. सध्या ५ KM पळायला अर्धा तास लागतोय. sinus मुळे होणारा त्रास पण जवळपास बंद झालायं. २७ मे ला १० KM मॅरॅथॉन पळायची आहे.

पराग >>> अरे पुन्हा १०-१५ मिनिटांपासून सुरूवात झाली तरी काही हरकत नाही. सुरूवात करणे महत्त्वाचे.
तू तर मॅरॅथॉन पळाला आहेस त्यामुळे अजून काही सांगण्याची गरजच नाही.

आपण पूर्वी २-२ तास पळत असू आणि आता १०-१५ मिनिटं पळणही जड जात आहे हे सत्य फार वैताग देणारे असतेच पण १०० वे शतकही ० व्या धावेपासूनच सुरूवात करावे लागते तसे आहे हे.

अजय >>> सही !!
सध्या वेळेवर लक्ष्य नाही दिले तरी चालेल, अंतरासाठी लागणारा वेळ कमी करण्यापेक्षा अंतर वाढवणे चांगले असे मला वाटते. तुम्ही नक्की १० किमी ची मॅरॅथॉन पूर्ण करणार ह्यात मला काहीच अडचण दिसत नाही.
ह्या बाफवर वर दिलेल्या पळण्याच्या आधीच्या टीप्स/पथ्य वाचल्यास आणि जमत असल्यास ते पाळल्यास झाला तर फायदाच होईल.
पळत रहा!!! मग तुम्हाला सायनसच काय कुठलीही डोकेदुखी म्हणून काय नि डोकं म्हणून काय काही राहणार नाही Proud
मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा!!! कळवत रहा ईथे.

वाट्लं नव्हतं ह्या धाग्यावर कधी लिहिन Happy
वैद्यबुवा धाग्याबद्दल धन्यवाद!!
वैद्यबुवा, चमन तुमच्या पोस्टी मस्त आहेत.
शनिवारी 5k रेस ३४:४९ मि. पुर्ण केली Happy हि माझी पहिलीच वेळ होती. जानेवारीतच एप्रिलच्या रेसमधे भाग घ्यायचं ठरवलं(३वर्षांपासुन विचार करतेय). पहिल्यांदा, एक महिना आठवड्यातले किमान ३ दिवस व्यायाम करणं होतय का बघुन मग रजिस्टर करायचं ठरवलं. एक महिना सातत्य आल्यावर रजिस्टर केले आणि पळायची तयारी सुरु केली. ट्रेडमील मला खुप बोर होते म्हणुन ईलिप्टिकल, स्टेप क्लास आणि वेटस असं काही करायचे. ह्यामुळे स्टामिना बराच वाढला. पहिल्यांदा १ माईल कसे बसे पुर्ण करायचे. हळुहळु स्पिड आणि अंतर वाढवत एप्रिलच्या सुरवातिला ३ माईल पळु शकत होते. 10K पळावी का? असं वाटु लागलं पण नंतर काहि कारणाने अंतर वाढवणं झालं नाही आणि शेवटी 5K पळु असं ठरवलं. ज्या दिवशी पळणार त्या दिवशी ४३फॅ तापमान Happy नवरा मुले सोबत चिअरींगसाठी येणार होते ते रद्द झाले. थोडी नर्व्हस झाले पण तिथे गेल्यावर सगळ्यांना पाहुन जोश आला. खुप मजा आली.

पळताना लाईट जॅकेट घातले ते अगदी बरे झाले. सोबत गाण्यासाठी खिशात आयफोन घेतलेला, पण वाटलं शफल किंवा नॅनो घ्यायला पाहिजे होता. दुसर्‍या खिशात किल्ल्यांचा गुच्छ!! लक्षात आले कि एकच गाडीची किल्ली घेतलि असती तर झाले असते.

नक्की धावा, सुरवातिला नक्कीच दमछाक होईल पण स्वतःला थोडं ताणाच!!

शाब्बास प्रिती ! अभिनंदन! अनुभव थोडक्यात पण मस्त सांगितलास.
५किमीचं मेडल शोकेसमध्ये ठेऊन आता १० किमीसाठीच्या तयारीला लागा.
ह्यालाच म्हणतात हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणे. Proud
सीझनतर आताश्या सुरू झालाय संपेस्तोवर १० किमी पूर्ण करणे आजिबात अवघड नाही.
सातत्य टिकवून ठेवल्याबद्दल अजून एकदा अभिनंदन.

खालच्या लिंकवर तुमच्या राज्यातल्या/कौंटीतल्या सगळ्या रेसेसचे डीटेल्स मिळतील.

http://www.runningintheusa.com/race/List.aspx?Rank=Upcoming&State=NJ&Page=1

बुवा धाग्याच्या वरच्या दोन ओळींमध्ये तुमच्या, समीर आणि परागच्या मॅरॅथॉनबद्दलच्या धाग्यांचे दुवे देता का? नव्यानं वाचणार्‍यांना अजून माहिती आणि स्फूर्ती मिळेल.

धन्यवाद सगळ्यांना Happy
नक्की प्रयत्न करणार 10k चा!!
मला www.mapmyrun.com/ साईटहि खुप आवडली. इथे पाहिजे तेवढ्या अंतराचे, difficulty चे आणि पाहिजे त्या गावातले ट्रॅक शोधता येतात.

सध्या भारत परतीच्या मार्गावर आहे त्यामुळे व्यायामाला फार वेळ मिळत नाहीये... मी स्पॉट जॉगिंग वाढवलं होतं मध्ये..५ मीन मध्ये हाश हुष वरून १२ मीन पर्यत गेलं.. . मिनेसोटा तला स्प्रिन्ग/उन्हाळा परत मिळणार नाही म्हणून सध्या पळतेय/ब्रिस्क वाकिंग.. तिथे हि लक्षात आलं कि फार दम लागत नाहीये.. १५ मीन गोल ठेवला होता ..तो पूर्ण झाला ..फास्ट वाकिंग ३०-३५ मीन वर गेलं.. आता पूर्ण विराम ..हे इतकं किरकोळ आहे कि लिहावं कि नाही... म्हणून लिहिलं नव्हतं Happy

सध्या इकडे जबरी उन्हाळा सुरु असल्याने धावण्यापेक्षा अस्वलासारखं निपचित लोळत पडावसं वाटतं. पण हा धागा परत परत चाळला तर अस्वलही धावणं सुरु करेल..असो!
सध्या एकूण कांय तर ५k = ३० मि. असे आठवड्यातून ३ वेळा सुरु ठेवलेय. एक दिवसाआड. आता पावसाळा सुरु झाल्यावर सायकलिंग सुरु होईल. पावसात धावण्यापेक्षा भिजत सायकल चालवायला मज्जा येते. आता अंतर वाढवणे वगैरे आता पावसानंतरच...

बुवा ह्या घ्या लिंका. कुठल्या क्रमाने द्यायच्या आहेत ते ही ठरवा.

बुवा http://www.maayboli.com/node/15839
पराग १ http://www.maayboli.com/node/14908
पराग २ http://www.maayboli.com/node/20192
समीर http://www.maayboli.com/node/13901

हेम, प्रित >>चांगली प्रगती आहे.. धावत रहा.
स्पॉट जॉगिंग वार्मअपसाठीच ५-७ मिनिटे ठीक आहे. व्यायाम म्हणून जास्त वेळ करण्यासारखे ते नाही.
तुम्ही तासभर ब्रिस्क वॉकिंग करण्याईतपत जमवलं की अर्धा तास तरी जॉग नक्की करू शकाल.

या विषयावर स्त्रियांसाठी
The complete book of Running for women
........ Claire Kowalchik (लेखिका)
हे खूप छान मार्गदर्शक पुस्तक आहे. यामध्ये Training, Nutrition, Injury prevention, Motivation , Racing अश्या अनेक गोष्टींवर छान मार्गदर्शन आहे.

प्रिती, अभिनंदन !!!
पुढच्या स्पर्धा निवडताना वेळ कमी करण्यापेक्षा अंतर वाढवण्यावर भर दे.. खूप भारी वाटतं.. Happy

प्रीती मस्त Happy
चमन, बुवा, शुम्पी सगळ्यांना धन्स. मस्त माहीती देताय आणि मोटीवेट करताय.
मी माझ्या पहिल्या ५के ला साईन अप केले!
http://thecolorrun.com/
ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात आहे.
तसा स्टॅमीना बरा आहे पण आधी कधीही पळालेली नैय्ये.
तर आता मला पण तुमच्यात घ्या. शुज घेण्यापासून तयारी आहे.

सही मधुरा.! Happy
स्टॅमिना वगैरे नंतर येतो. सुरवात करणे महत्वाचे! अभिनंदन. रेस ट्रेनिंग आणि नंतर रेस बद्दल नक्की लिहा.

मधुरा सही थीम आहे त्या ५के रेसची... रंगपंचमी हेच केवढं मोटिवेशन आहे पळायला.
सॉलीड मजा येणार. जुनेच शूज घालावे लागणार दिसतंय म्हणजे रेस झाल्यावर नवे घेता येतील. Proud
ऑगस्ट म्हणजे भरपूर वेळ आहे तयारीला. एका मैलने सुरूवात करून अर्धा-पाव, अर्धा-पाव करत वाढवत नेलं तरी आरामात ऑगस्टपर्यंत ३ क्रॉस होतील. शुभेच्छा!! कळवत रहा ईथे.

चमन, मोठा वृत्तांत लिहीणार असशील तर उत्तमच पण नसशील लिहीणार तर जरा डिटेल माहिती टाक इथे रेस बद्दल. Happy

मी नाही जाऊ शकलो रुनी. ३ आठवड्यांपुर्वी चमन बरोबर पळालो त्या नंतर एक दोन दिवसांनी पळायला गेल्यावर उजवा पाय दुखावला गेला तो लवकर बरा होत नव्हता. अजूनही दुखतो. ओवर ट्रेनिंग नडलं. आय टी बँड सिंड्रोम किंवा टेन्डनायटिस असायची शक्यता आहे. असो... आता बरा झाला पाय की परत सुरवात! Happy
चमननी केली पुर्ण, सकाळी फोन आला होता त्याचा पण बाकी आता त्याच्या कडूनच ऐकूयात म्हणून मुद्दाम काही लिहीलं नाही.

पराग, श्री >>> सही!! आता चालू केलं आहे तर चालूच ठेवा. वेळापत्रक आखून, आपल्या शरीराचा अंदाज घेऊन प्रत्येक रनची झेप ठरवत रहा.

आठवड्यातून ३० मिनिटांपेक्षा जास्तीचे ३ रन्स, ६० मिनिटांपेक्षा जास्तीचे २ रन्स आणि ९० मिनिटांपेक्षा जास्तीचा १ च रन, असे गणित ठेवल्यास शरीराला आराम मिळून मसल रिकवरी व्यवस्थित होईल.
१० मैलांपेक्षा जास्तीचा रन केल्यास...पुढचे २ आठवडे तरी पायांना रोजच्या चालण्यापेक्षा वेगळे काम आजिबात देऊ नये.

बुवा, मला खरंच खूप वाईट वाटतंय की तुम्हाला दुखर्‍या पायामुळे कालची हाफ मॅरॅथॉन धावणे जमवता आले नाही. त्यासाठी खरंतर कुठेतरी मी सुद्धा कारणीभूत आहे की काय असं वाटून गेलं. पण ठीक आहे, पायांना थोडा आराम देऊन पुन्हा 'अटलांटिक सिटी फुल' साठीच्या तयारीला लागा.

कालची हाफ मॅरॅथॉन छानच झाली. १३.१ मैल २ तास ६ मिनिटात पूर्ण करता आले. खरंतर फिनिश लाईनला माझं स्टॉप वॉच २ तास २ मिनिटे दाखवत होतं पण चिप टायमिंग जास्त बरोबर असावे.
धावणार्‍यांचे आणि त्यांना प्रोत्साहन देणार्‍यांचे स्पिरिट खरोखर अवर्णनीय होते. एकंदर वातावरण फार आनंददायी आणि उत्साहवर्धक होते. अनेक जण साईडला फलकं घेऊन ऊभे होते किंवा पाठीवर काहीतरी लिहून धावत होते.

त्यातल्या मला आवडलेल्या काही कॉमेंट्स,

I am running away from my wife, Please help me.

Run Pepper run, You have trained harder than that bitch, Amanda

I am running for my kids, Look you coward moron. (हे कदाचित तिच्या पळून गेलेल्या नवर्‍याला किंवा मित्राला ऊद्देशून असेल)

Mike, Don't come home, if you don't finish it.

The prettiest girl in my class promised me a date, if I kiss her at the finish line.

My daughter is waiting for me at the finish line.

कॅन्सर ट्रीटमेंट, ग्लोबल वॉर्मिंग, हंगर वगैरे नोबल कॉजसाठी पळणारेही खूप होते.

शेवटच्या १-२ मैलांत जेव्हा बरेच जण ढेपाळायला लागले तेव्हा ह्रितिकसारखा दिसणारा एक हीरो लिंगेरीजमधे पुढे मागे पळत थकलेल्यांना प्रोत्साहित करत होता. Happy

पण ह्या सगळ्यांपेक्षा चटकन नजरेत भरून येणारी कुठली गोष्टं असेल तर ती म्हणजे खालची आकडेवारी.

6234 Finishers - 2388 M / 3846 F

माबोवरच्याही सगळ्याजणींसाठी ही आकडेवारी निश्चितच प्रेरणादायी असेल.

त्यासाठी खरंतर कुठेतरी मी सुद्धा कारणीभूत आहे की काय असं वाटून गेलं>>>>> बस का चमन!!!
इतकं पळाल्यावर मी खरं तर गप घरी बसून आराम करायला हवा होता. एक दिवस ब्रेक घेऊन ५ मैल पळायला गेलो तेव्हाच दुखापत झाली.
मलाही जरा बोअर झालं काल पण रनिंग काय, पाय बरा झाला की सुरु! २ तास ६ मिनिट म्हणजे भारीच!
आता पुढच्या वेळी दोन तासाच्या आत आरामात पुर्ण करशील!

स्लोगन्स भारी आहेत! Lol

लिंगेरीजमधे>>>>> Lol

स्लोगन्स फार फार आवडले Lol
निदान हे सगळे बघायला आणि लोकांना प्रोत्साहन द्यायला (व्यवस्थित कपडे घालून हो :फिदी:) तरी मॅराथॉन होते तेव्हा जायला हवे.
मॅराथॉन संपवणार्‍यांचा आकडा खूपच प्रेरणादायी आहे.

बुवा, दोष तुमचा नाही उत्क्रांतीचा आहे असं दिसतंय Happy
तुमचा पाय लवकर बरा होवो.

बाकी ते रनर्स हाय वगैरे काही फार जाणवत नाही अजून तरी Sad म्हणजे पळून झाल्यावर छान, एकदम हलकं वाटतं पण पळत असताना वाटच लागत असते. सध्या मजल दोन मैल. मध्ये थोडंसं चाललं तर अडीच मैल. मागे लिंक दिली होती तो काउच-टू-५के प्रोग्रॅम बर्‍यापैकी फॉलो करणं चालूए.

सप्रि Happy
एकदा सलग अर्धा तास पळायला लागलीस की येइल. पळताना आपण फॉरेवर पळू शकतो असं वाटायला लागला की हाय आला समजून घ्या. Happy

Pages