मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या पळायच्या सवयीनीच माझे बारा वाजवले खरं तर. कसं आहे, पळायची सवय असेल किंवा बाकी काही एलिप्टिकल वगैरेमुळे तुमच्या हार्टला जर कार्डियोची सवय असेल तर माणूस पळताना अगदी सहज माईल्स वाढवतो कारण त्रास असा होत नाही. ह्यात जर तुम्ही फूटस्ट्राईक किंवा पळायची gait बदलली मिनिमलिस्टला स्विच करुन तर ते आणखिन धोकादायक ठरतं. कार्डियोवास्क्युलर एंड्युरन्स आणि तुमच्या नवीनच इन्वॉल्व होणार्‍या मसल्स/टेंडन्स वगैरेचा ताळमेळ राहत नाही, तुम्ही बिन्धास्त पळत राहता अणि त्या मसल्सना इतक्या एग्जर्शनची सवय नसल्यामुळे इंजुरी होते.

एक वेगळं उदाहरण देतो. पायाची इंजुरी झाली की कधी कधी डॉक्टर लोकं क्रॉस ट्रेनिंग करु नका सांगतात. ते ह्याकरता की क्रोस ट्रेनिंग नी स्टॅमिना टिकून राहतो आणि इंजुरी बरी झाली की माणूस एंड्युरन्स असल्यामुळे लगेच मायलेज वाढवायला बघतो अन परत इंजुरी होते!

मधुरा, विब्रम म्हणजे अगदी मोजेच आहेत त्यामुळे ट्रान्जिशन करायचे असेल तर आधी न्यु बॅलन्स चे झिरो किंवा ब्रुक्सचे प्युअर सिरीज असे ही बरेच आहेत. त्यापेक्षा मी तर म्हणतो सरळ विब्रमच घ्या आणि हळू हळू मायलेज वाढवा.

धन्यवाद वैद्यबुवा एवढ्या तातडीने उत्तर दिल्याबद्दल! पळायला लागले की काव्स कडे लक्ष देईन. मी एक मैल ट्रेडमिलवर धावले तेव्हा माझे घोटे ज्याम दुखले होते Sad त्यानंतर परत पळाले नाहीये.

मिनिमलिस्ट शुज घालुन पळण्याने काय फायदा होतो??

बाय द वे,
मी एक दिवसाआड कार्डिओ व्यायाम करतो.
नेमक काय बिघडल ते कळाल नाहिये पण डाव्या पायाची पिन्ढरी (पोटरी म्हणतात का? मांसल भाग) थोडा दुखतोय.

भारी सानुली!!
मधुरा, मी पण चमन म्हणतोय तसचं केलयं. खुप वेळा स्पीड कमी जास्त करण्यापेक्षा, कमी पण सलग त्याच स्पीडने जास्त वेळ पळलं तर फायदा होतो. मग हळुहळु स्पीड वाढवत जायचं.
बुवा छान पोस्ट.

नात्या >> तुझ्या मित्राला ईथे आमंत्रण दे. मित्र अमराठी असेल तर तू भाषांतराची जबाबदारी घे Happy

सानुली >> बरे झाले तुम्ही ईथे लिहिले. आता जमल्यास तुम्ही ५ के ते हाफ मॅरॅथॉन प्रवासाचे अनुभव लिहिणार का? पल्ला वाढवू पहाणार्‍यांना फार ऊपयोग होईल आणि लेडीरनर लिहितेय म्हंटल्यावर बाकीच्यां नव्याने सुरूवात करणार्‍यांनाही प्रोत्साहन आणि मदत मिळेल. तेव्हा लिहाच.

प्रीति >> तुम्ही पुढची १० के टारगेट केली का? समोर लक्ष्य असल्यास सातत्य आणि योजना टिकवून ठेवायला सोपे जाते. फक्त त्याचे प्रेशर टाळता यायला हवे.

धन्स मधुरा आणि प्रीति!
प्रीति, तुझा ५केचा टाईम छानच आहे. जरूर १०के चा विचार कर. मधुरा -- नेटवर couch to 5k असा प्रोग्राम सापडेल, तो फॉलो कर. मी तरी तेच केले होते माझ्या पहील्या ५के ला.

चमन -- मी नक्की लिहीण्याचा प्रयत्न करेन. पण हाफ मॅरॅथॉन करून खुप दिवस (वर्षं? :)) झालीत, त्यानंतर मुल झाल्याने परत एवढा वेळ मिळाला नाही ट्रेनिंगला. त्यामुळे सध्या दरवर्षी एक १०के असा प्लॅन आहे. पण इन जनरल मी नेट्वरून मला झेपतील असे वाट्ले ते प्रोग्राम्स फॉलो केलेले. ५के साठी पण आणि हाफ मॅरॅथॉन साठीपण. म्हणजे novice साठी असलेले. त्यापलिकडे खुप काही वेगळे केले नव्हते. मला सापडले दोन्ही प्रोग्रम्स तर लिंक देईन.

नात्या.. बापरे ! ते कसले डेंजर वाटयायत शूज.. ! मला सांगा असं काहितरी घालून पळण्यानेक खरच काही फायदा होतो का? उलट शॉक अबसॉरबर्स वगैरे नसल्याने उलट गुडघ्यांची वाटच लागेल ना आणखीन ?

मधुरा., मी जनरली चालण्यानेच सुरुवात करतो. ट्रेलवर पळताना पण आणि ट्रेडमिलवर पण. हार्टरेट नॉर्मलपेक्षा जरासा वाढल्यावर आणि थोडासा घाम आल्यावर पळायला सुरुवात करतो. स्पर्धेत साधारणपणे आधी तिथले वॉलेंटीअर्स चांगला वॉर्मअप करून घेतात. त्यामुळे स्टार्ट लाईनपासूनच पळतो. पळायची सुरुवात असेल तर अधेमधे चाललं तर काही हरकत नाही. मी दोन्ही हाफ मॅराथॉन्समध्ये ६.५ मैल नंतर पाणी पीत पीत ५ मिनीटे चाललो होतो. बाकीचे बरेचसे अंतर पळालोच होतो.

सुरुवातीला स्टॅमिना वाढवण्यासाठी क्रॉस एग्जरसाईज करणं पण खूप फायद्याचं ठरतं. पोहणं, सायकलींग, खेळणं ह्यापैकी एक एक गोष्ट आठवड्यात २/३ वेळा करून इतर ३/४ दिवस पळायचं. म्हणजे फार मोनोटोनस होत नाही. पोहताना खरोखर लॅप्स मारायचे. तरच व्यायाम होतो. नुसते पाण्यात डुंबून काही होत नाही. Happy

चमन प्लिज अहो जाहो नको बोलु Happy
चमन छान प्रश्न Happy
सानुली नक्की करणार.
ऑगस्ट्मधली टारगेट करतेय, अजुन रजिस्टर नाही केलं. पुढच्या महिन्यात प्रगती बघुन करणार.
इथल्या पोस्ट बघुन अजुन उत्साह वाढतो Happy

छान टीप्स पराग!!

जेव्हा आपल्याला काही अंतर पळाल्यानंतर आता थांबणं भाग आहे असं वाटतं त्यावेळी कमीतकमी दहा सेकंद न थांबता.. नेमकी कुठली गोष्टं आपल्याला आता थांबण्यास भाग पाडत आहे त्या कारणाचा जरूर विचार करावा. प्रगती साधण्यासाठी आपण नेमके कुठे कमी पडतोय ह्याचा धांडोळा घेणं फार जरूरी आहे.

१) दम लागला आहे आणि श्वास घेणं खूप अवघड जातंय.
२) पाय प्रचंड दुखायला लागलेत.
३) केवळ मानसिक थकवा वाटतोय.
४) डोक्यात निगेटीव विचार असल्याने शरीराला मनाचा पुश मिळत नाहीये.

किंवा ह्या सगळ्याच गोष्टीं एकत्र येऊन थांबण्यास भाग पाडतायेत.

ह्या अडचणींसाठी काही साधे सोपे ऊपाय करता येऊ शकतात.

दम लागला आहे आणि श्वास घेणं खूप अवघड जातय. >> पळण्याच्या सुरूवातीपासूनच एका संथ लयीत नाकावाटेच श्वास आत बाहेर होतोय असे बघणे. श्वसनावर नियंत्रण आणण्याचा कटाक्षाने प्रयत्न करणे. श्वसनांसंबंधित व्यायामही खूप ऊपयोगी पडतील.

पाय प्रचंड दुखायला लागलेत. >> ह्यासाठी चांगला वार्मअप आणि नियमितपणे पायांचे इतर व्यायाम जसे स्क्वॅट्स, लंजेस वगैरे जरूरी आहेत. पायांचे स्नायू बळकट होत राहिले की ते जास्त अंतरापर्यंत आपली साथ देतील.

केवळ मानसिक थकवा वाटतोय. >> ज्यावेळी आपल्याला एकदम ताजेतवाने आणि ऊत्साहित वाटत असेल त्याचवेळेस पळणे.

डोक्यात निगेटीव विचार असल्याने शरीराला मनाचा पुश मिळत नाहीये. >> ह्यासाठी थोडे ध्यान, संगीत, मोटिवेटिंग विडीओज नक्की मदत करू शकतील. शक्यतो एकावेळी एकाच अडचणींसाठीच्या ऊपायासाठी प्रयत्न करावा. सगळे एकदमच करू गेलोत तर गोंधळ होण्याची शक्यता अधिक.

छान पोस्ट चमन! मला असं आपण नक्की काय विचार करतो पळताना ते लिहीणं कठिणच वाटतं Happy आणि प्लीज मला अहो जाहो नको रे करुस Happy

२७ मे ला TCS World 10K Bangalore पुर्ण केली. ६४ मिनिट्स Happy

धन्यवाद मायबोली!!! इथल्या टीप्स फारच कामी आल्यात.

धावता व्रुत्तांत:

रेस सकाळी ८ वाजेला सुरु झाली. पहिलीच लाँग रेस असल्याने फार उत्साह होता. पण काही वेळातच पोटात दुखु लागले. पहिल्यांदाच केळी खाउन धावत होतो. त्याचा परिणाम दिसायला लागला. हळुहळु धावणे/चालणे सुरु ठेवले. नेहमीची स्पीड येत नसल्याने चिडचिड वाढली. १०K धावुन होईल की नाही अशी भिती वाटु लागली. काही वेळाने पोटदुखी थांबली. मग फक्त धावणे. पण पाय दुखायला लागले. सहसा माझे पाय धावतांना दुखत नाहीत. सुरुवात व्यवस्थित न झाल्याने नेहमीचा rythm आला नाही. तरीसुद्धा फिनिश लाइन पार करुन लई आनंद झाला Happy

५ ते ६ DJ, Cheer Leaders आणि रस्त्याच्या कडेने चीअरींग करणारे लोक. एकुण वातावरण फारच उत्साहवर्धक होते.

मी केलेल्या चुका:
१) स्टॅमिना हवा म्हणुन आदल्या रात्री जास्त जेवण केले.
२) परत सकाळी ३ केळी, नारळ पाणि. पोट दुखेल नाही तर काय Sad
३) रेस सुरु झाल्यावर नेहमीच्या स्पीडने सुरु न करता जास्त जोरात धावायला लागलो (peer pressure Happy )
४) नेहमी मी खाली मान करुन धावत असतो. आजुबाजूला बघत (बघण्या सारखे बरेच काही होते:) ) धावल्यामुळे stepping बदलली आणि पाय दुखायला लागले.

दीड महिन्याआधी मी फक्त ०.५ KM धावु शकत होतो. हळुहळु सरावाने हे सगळ शक्य झालं.

पुढचा गोल: हाफ मॅरॅथॉन. ईथे अपडेट देईलच.

काही क्षणचित्रे :

अरे वा सऽहीच. अभिनंदन अजय. भाग घेणारे सगळे एकदम उत्साहात दिसताहेत.
असेच पळत रहा. तुमचे अनुभव वाचून अजून कोणाला तरी पळावेसे वाटेल. Happy

एक माहिती..

मॅरॅथॉन म्हणजे २६.२ मैल अंतराची रेस. हाफ मॅरॅथॉन म्हणजे १३.१ मैल अंतराची रेस.
५ K, 10 k ह्या "मॅरॅथॉन" नसतात. त्या "रन" असतात.. Happy

त्यामुळे तुम्हांला "मॅरॅथॉन रनर व्हायचं असेल तर पुढची रेस १३.१ मैल्सची रन पळा.. Wink

अभिनंदन अजय! पुढच्या इवेंट्स करता शुभेच्छा!

मी शेवटी काल पहिल्यांदा दुखापत मुक्त झालो! तब्बल २ महिने आणि काही दिवस लागले पुर्ण बरं व्हायला. थोडं सविस्तर लिहितो.
एप्रिल मध्ये चमन बरोबर हाफ मॅरॅथॉन च्या सरावाकरता साधारण १२ मैलाचा पल्ला गाठला आणि त्या नंतर दोन दिवसांनी दुखापत झाली. मनुष्यस्वभावानुसार गप्प न बसता पाय वेगवेगळ्या कोनातून हलवून नेमकं कुठे दुखतय ह्याच्या टेस्टिंग मध्येच कदाचित दुखापत वाढली की काय अशी शंका आता मला यायला लागलीये. Proud असो. साधारण ३-४ आठवड्यात कळून चुकलं की ही दुखापत काही साधी सुधी नाही आणि कदाचित हाफ मॅरॅथॉन सोडून द्यावी लागेल. तसच झालं.
खुप वाचन केलं ह्या दुखापतीबद्दल. नेट वर इतकी प्रचंड माहिती उपलब्ध आहे की गोंधळायला व्हायचं. आधी तर नेमकं काय दुखणं आहे हेच नक्की होईना. कधी वाटायचं रनर्स नी आहे तर कधी वाटायचं आय टी बँड सिंड्रोम आहे. कधी कधी खुपच दुखायला लागलं की वाटायचं मेनिस्कस किंवा खुप पळून इंपॅक्टमुळे कार्टिलेज टियर वगैरे झालय की काय.
मला उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजुला दुखायचं. पळणं तर शक्यच नव्हतं पण जोरात चाललं तरी दुखायला लागायचं. पायर्‍या उतरायला प्रचंड त्रास व्हायचा!
वाचन खरं खुप केलं पण थोडं शरिराचे ऐकून आणि कॉमन सेन्स वापरून मला गोष्टी कळायला हव्या होत्या. एकदा मी सहज इलिप्टिकल करुन बघायचा प्रयत्न केला तेव्हा अगदी १५ सेकंदातच पायातून कळ यायला लागली. जरा वैताग आला पण अचानक डोक्यात ट्युब पेटली. इलिप्टिकल मध्ये रनिंग सारखा इंपॅक्ट नाहीये त्यामुळे नक्की ही इंपॅक्ट इंजुरी नाहीये. मग जास्त वाचन आयटी बँड सिंड्रोमवरच करायचं ठरवलं. पायर्‍या चढणे, उतरणे बंदच केले.

खुप उपाय होते. आय टी बँड स्ट्रेचेस करणे, मसल इंबॅलन्स घालवणे, फोम रोलर वापरुन मसाज करणे. सगळेच करुन बघायचं ठरवलं. स्ट्रेचेस करुन आयटि बँड लांबवता येतो असं वाचनात आलं आणि त्यावर जास्त भर दिली पण इतकं काही तो उपाय काम करत नव्हता असं वाटत होतं. मग एक लेख वाचला आणि पटलं की सॉफ्ट स्टिल इतकी ताकद असलेला आयटी बँड काही स्ट्रेच वगैरे होणार नाही त्यामुळे स्ट्रेचेस हा उपाय असू नाही शकत.
आता मसल इंबॅलन्स घालवणे हा उपाय करुन बघू. हा उपाय खरं तर काय माहित का माझ्या लक्षातच यायचा नाही. लक्षात नाही म्हणजे त्याचा फंडा नेमका लक्षात यायचा नाही पण नंतर हळू हळू लक्षात आला. पळताना जर तुमचे हॅमस्ट्रिंग्स (मांड्यांची मागची बाजू), ग्लुट्स (तश्रिफ)चे मसल्स पुरेसे तयार नसतील तर सगळा स्ट्रेस क्वाड्स (मांड्या) आणि त्याच्या खाली असलेल्या आय टी बँड वर येतो. आय टि बँड म्हणजे आपल्या कमरेपासून गुड्घ्या पर्यंत जाणारा दाट फायबर्स पासून बनलेला एक पट्टा आहे. हा बँड जास्त टाईट झाला की तो गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला जिथे जुळतो त्या भागावर ताण द्यायला सुरवात करतो आणि आपल्याला दुखायला लागतं.
बँड वरचा ताण घालवायचा असेल तर क्वाड्स च्या विरुद्ध असलेले हिप अॅब्डक्टर्स (मांडीची आतली बाजू) आणि हॅमस्ट्रिंग्स, ग्लुट्स ह्या मसल्सची ताकद वाढली पाहिजे.
हे सगळे व्यायाम नियमीतपणे सुरु केले. आठवड्यातून २-३ वेळा. तरीही म्हणावं तसा फरक काही पडत नव्हता.
ह्या व्यायामाबरोबर फोम रोलिंग ही सुरु होते. बरोबर उजवी बाजू रोलर वरुन फिरताना प्रचंड दुखायचं, अर्थातच प्रॉबलेम तिथे होता. रोलिंग करुन दुखायचं पण नंतर आराम वगैरेही वाटला नाही त्यामुळे जरा निराशाच होत होती.
येवढं सगळं करुन मग शेवटी डॉक्टर कडे जायचं ठरवलं. काहीच उपाय काम करत नसल्यामुळे वाचनही जवळ जवळ थांबलच होतं. अधून मधून कधीतरी मधेच गूगल करायचो पन तेच तेच वाचलेले लेख बघून वैताग येऊन सोडून द्यायचो.
असच एकदा सहज म्हणून सर्च मारला तर कुठल्याशा ब्लॉग वर डीप टिश्यू मसाज बद्दल वाचलं. ह्यात म्हणे टाईट असलेले मसल टार्गेट करुन खोल वर मसाज करतात जेणे करुन मसल रिलॅक्स व्हायला मदत होते. माझे क्वाड मसलस निश्चितच टाईट होते. इतके की उजव्या आणि डाव्या पायाच्या मसल्स च्या टाईटनेस मध्ये फरक जाणवायचा.
म्हंटलं येवढं सगळं करुन पाहिलय, हे पण करुन बघू. अपॉईंटमेंट घेऊन एका शुक्रवारी गेलो.
ह्या पॉईंटला ते दुखणं वाढलं तर होतच थोडं पण पाय गुड्घ्यातून मुडपला की दुखर्‍या भागातून घर्षण होत असल्याचा आवाज यायचा! त्या थेरपिस्ट ला दाखवल्यावर तिला पण एक सेकंद भिती वाटली आणि ती म्हंटली की टिश्यु मसाज झाला तरी कृपया डॉक्टरकडे जा! Happy
मसाज खुपच वेदनादायी होता पण तो गुडघ्यातला आवाज काही थांबला नाही. अर्थातच इतक्या लवकर फरक पडणार नव्हता तरी थोडी निराशा वाटत होती. दुसर्या दिवशी थोडं दुखणं कमी झालं असं वाटत होतं पण कमी जास्त असं करत हे दुखणं अजून चालूच होतं त्यामुळे मी फारसं लक्ष दिलं नाही. वैताग आला तरी व्यायामाचा फंडा पटला होता म्हणून ते नियमीतपणे चालु ठेवलं होतं. आता डॉक्टर जे म्हणेल तसं करु आणि तो पर्यंत अजून दुखापत वाढायला नको ह्या दृष्टिनी प्रयत्न सुरु केले.
मला वाटतं मसाज करुन जवळ जवळ १० दिवस झाले असतील आणि अचानक दुखणं एकदम कमी झाल्यासारखं वाटायला लागलं! मी आणखिन जोमाने व्यायाम सुरु केले आणि शेवटी आज पहिल्यांदा पाय आजिबात दुखला नाही!
मी अजुनही पायर्‍या उतरायचं धाडस केलेलं नाही कारण एक महिन्यापुर्वी असच पाय बरा झाला असं वाटलं आणि नेहमीच्या सवयीनी ऑफिसमध्ये तीन फ्लोअर पायर्‍या उतरून गेलो. असला सणकून दुखायला लागला होता पाय की वाटलं नवीन दुखापत झाली असावी आतमध्ये!
असो.... शेवटी आज एकदमच बरा झाला पाय म्हणून म्हंटलं सविस्तर लिहू म्हणजे कोणाला परत तसले सिंप्टम्स दिसले तर कदाचित मदत होईल. Happy

रूनी +१ , मस्त वाटले वाचून अजय!

बुवा, फार जास्त कळालं नाही , पण दुखापत थांबली हे कळले. बरं झाले! Happy

बस्के, धन्यवाद!
खुपच कन्फ्युजिंग लिहीलय का? पाय बरा झाल्याच्या आनंदात तसं झालं असावं. Happy

काल २३ जूनला Susan Komen Race For Cure - 5K race पळाले. गेल्या दोन आठवड्यात सणसणीत फ्लूने आजारी होते, त्यामुळे कसं आणि कितपत जमेल याबाबत मनात शंका होती.
पण लोकं cancer सारख्या रोगाशी लढा देतात, आपल्याला 5K पळणं जमलंच पाहिजे, आपण ते जमवायलाच हवं इतक्या एका विचारावर पळायला सुरुवात केली.. आणि खूप तापमान आणि दमट हवेत पण काहीही त्रास होता सहज रेस पूर्ण केली Happy
एकूणच खूप समृद्ध करणारा अनुभव होता.. मजा आली खूप Happy

अरे वा!! रार, अभिनंदन Happy
मी सध्या कावेरी ट्रेल मॅरॅथॉनची (www.kaveritrailmarathon.com) तयारी करतोय. हा ट्रॅक मस्त कावेरी नदीच्या किनार्‍याने आहे.

पण हाफ मॅरॅथॉन पळावे की १० KM ??
चमन, बुवा: २ महिन्यात हाफ मॅरॅथॉनची तयारी होइल का?

पण लोकं cancer सारख्या रोगाशी लढा देतात, आपल्याला 5K पळणं जमलंच पाहिजे, >>>> Happy
अभिनंदन !

चमन, बुवा: २ महिन्यात हाफ मॅरॅथॉनची तयारी होइल का? >>>> मी चमन किंवा बुवा नाही तरी Proud जर वेळेच्या अपेक्षा फार नसतील आणि रेस पूर्ण करणे हे उद्दिष्ट असेल तर होऊ शकते २ महिन्यात तयारी...
१० किमीचा ऑप्शन असेल तर ती आधी पळा असं माझं वै.म. बाकी चमन किंवा बुवा सांगतीलच.. Happy

आपल्या शरिरारानी साथ दिली तर होऊ शकते. पराग नी लिहीलय तसं कमी वेळात पार करणं हे उद्दिष्ट नसेल तर काम अधिक सोपं होईल. ऑनलाईन ट्रेनिंग प्लॅन सापडतील, त्या प्लॅन्सनुसार उलट प्लॅनिंग करा.
प्लॅन आखणं एक गोष्ट आणि आपल्या शरिरानी त्या प्लॅन ला अडॅप्ट करणे हे दुसरी गोष्ट आहे.
प्लॅन जर सांगत असेल की आज २ मैल पळा आणि पोटर्‍यांमधून कळा येत असतील (आधीच्या ट्रेनिंगमुळे) तर आजिबात पळायची गरज नाही. आपल्या शरिराकडून मिळणार्‍या ह्या धडधडीत संकेतांकडे दुर्लक्ष करुन चालत नाही.
Happy
इथे वर आणि इतर बाफंवर मिनिमलिस्ट शूज बद्दल चर्चा झाली. त्यावर बाफं उघडायचा विचार आहे.

वैद्यबुवा -- मिनिमलिस्ट शूजचा बाफ प्लीज ऊघडा. सध्या ते घालून हाफचे ट्रेनिंग चालू केले आहे. काही माहिती शेअर करता येईल.

सानुली, वेळ मिळेल तसा उघडेन नक्की. तुम्हीही उघडू शकता हवं असेल तर. Happy मला फक्त माझा अनुभव आणि थोडीफार माहिती सांगायची होती. तुम्ही उघडलात तर मी तिथेच लिहीन.

मागे ईथे लिहले होते ती कलर रन काल होती. माझी पहिली ५के.! प्रचंड धमाल आली. फ्लो मध्ये कधी संपली कळालं पण नाही. मझी फीट्नेस लेव्हल बरी आहे पण पळण्याचा आजीबातच अनुभव नव्ह्ता, त्यामुळे आता थोडा आत्मविश्वास आलाय. आणि हो, मी सुरुवातच मिनिमलीस्ट शूज ने केलेली. तर ते अनुभव दुसर्या धाग्यावर लिहिनच.

Pages