मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन , म भा दि. निमित्त लिही की. तो उपक्रम आहे. स्पर्धा नव्हे. त्यामुळे संयोजकानी लिहायला कैच हरकत नाही.

हर्पेन, भारीच आहे एकंदरीत. अभिनंदनच.

रन द रण म्हणजे कच्छच्या रणमध्ये होती कां? नक्की येऊ देत डिटेलवार सगळा अनुभव.

धन्यवाद मंडळी पण ते ५० किमी अनऑफिशियल आहे. अर्थात अल्ट्रा करण्याचा आत्मविश्वास मोठ्याच प्रमाणावर वाढला आहे.

आपण इथे निकाल पाहू शकता.

http://www.runtherann.com/pages/result-2016

आज आय आय टी बॉम्बे ११ किमी होतं. ते पळालो. अंदाजे दीड तासात पूर्ण झाले असावे. माझे अ‍ॅप मध्येच गंडले.
आठवडाभरात नक्की रिझल्ट पब्लिश होईल. अगदीच तीन दिवसांपूर्वी या रनची भसकन बातमी आली आणि माझी यावर्षीची पवई रन हुकली होती म्हणून पटकन नोंदणी करून टाकली.

मुंबई मॅरेथॉन २०१७ क्रायटेरिया ओपन झालाय. एका मि नी मी सेकंड प्रेफरन्स मध्ये गेले. कितपत चान्स असतो सिलेक्ट होण्याचा ?

अजुन एक, ह्या वर्षी ए. तरी हाफ धावायची आहे, तर आधी स्टॅमिना वाढवावा की स्पीड की दोन्ही वर एकत्र काम करावे ?

धनश्री, नॉट टू वरी. आरामात मिळेल एन्ट्री फक्त रजिस्ट्रेशन ओपन झाल्या झाल्या लगेच कर कारण जास्त दिवस ओपन नसतं.

माझ्या मताने आधी स्टॅमिन्याकडे लक्ष दे, स्पीड नंतर.

पुण्यात महिनाअखेरीस औंधमधे एक स्पर्धा आहे

एल्सॉम म्हणजेच लास्त्ट संडे ऑफ द मंथ
ही पळणार्‍या लोकांच्या गटातर्फे आयोजित केली जाते. स्वयंसेवक पण धावणारेच असतात. फी फक्त १०० रुपये.
नाव नोंदणी करता दुवा

https://www.townscript.com/e/last-sunday-run-lsom-western-pune

एप्रिल महिना अखेरची एल्सॉम २४ तारखेला खास 'ऑटीसम अवेअरनेस' साठी म्हणून होती.
आपल्या माबोकर सुपर मॉम / बस्केची आठवण झाली.

मी १५ किमी पळालो.

स्पर्धामार्ग असा होता - प्रभात रस्त्यावरील लॉ कॉलेज बाजूच्या पहिल्या गल्लीपासून सुरु होऊन पुर्ण प्रभात रस्ता आणि यु टर्न घेऊन परत, मग लॉ कॉलेज रस्त्यावरून डावीकडे नळस्टोप पासून डावीकडे कर्वे रस्ता आणि डेक्कन वरून गूडलक चौक आणि पुढे बी एम सी सी कॉलेज रस्त्याने परत प्रभात रस्त्यावर असे दोन वेळा करायचे होते.

माझा सराव मागचे १५ एक दिवस खंडीत झाल्याकारणाने (नेहेमीचा रस्ता असून) जरा अवघड गेले.

पण पुणे रनिंगने नेहेमीप्रमाणे केलेले सुंदर आयोजन, स्वयंसेवकांची सुयोग्य साथ व धावपटूंना मिळालेले प्रोत्साहन यामुळे एकंदरीत मजा आली.

पुढचा एल्सॉम (मे मधला) 'ए आर ए आय' टेकडीवर असणारे !

सीझन सुरु केला. एक १० किमी पळालो. या वर्षी १ हाफ आणि १ पूर्ण मॅराथॉन करण्याचा मनसुबा आहे. देखते है क्या होता है!

हे वाचा: http://www.nytimes.com/2016/05/15/sports/two-hour-marathon-yannis-pitsil...

१४ ऑगस्ट रोजी लोणार येथे पार पडलेल्या अल्ट्रा मॅरॅथॉन मधे ५० किमी अंतर ७ तास १५ मि. लावून पुर्ण केले. माझी पहिलीवहिली दीर्घ पल्ला (अल्ट्रा) अंतराची स्पर्धा आणि पहिला आलेला आमच्या गृपमधला मुलगा यामुळे
ही स्पर्धा एकदम संस्मरणीय ठरली.

काही शब्दचित्रे-
आठवडाभर आधी आलेला ताप त्याआधी झालेली सर्दी खोकला व या कारणाने दोन आठवडे, जवळ जवळ न केलेला सराव.
जावे की न जावे असा तरळून गेलेला विचार.
मनात धाकधूक असतानाच जाऊन तर बघू जे होईल ते होईल अशा विचाराने लोणारला जायचा घेतलेला निर्णय
आदल्या दिवशी पुणे ते (औरंगाबाद जालना मार्गे) लोणार असा कारने केलेला प्रवास...
पोचल्यावर संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरून सरोवराच्या काठावर जाऊन येण्यासाठी केलेला मिनी ट्रेक Happy

दुसर्‍या दिवशी स्पर्धा सुरु करण्याची वेळ ७:३० (एरवी सकाळी ६ वा चालू होतात)
स्पर्धेचा मार्ग सुरुवातीस लोणार सरोवराच्या काठावरून आणि नंतर मग पुढे गावा-शेतामधून जाणारा.
२५ किमी अंतर दोनदा करायचे असा १२.५ किमीचा मार्ग
हवा ढगाळ असली तरी जाणववारी वातावरणातली गरमी.
अर्धा रस्ता ट्रेल तर उरलेल्यातला बराच खडबडीत.
भरपूर दमवणारे चढ-उतार

याचबरोबर...
पावसामुळे हिरवीगार झालेली शेत वावरे (हिरवा शालू ल्यालेली धरती वगैरे) Wink
मनापासून मदत करणारे स्थानिक कॉलेजातले स्वयंसेवक.
बरेचदा ऐकू आलेला केकारव
एकदाच दिसलेला मोर

आणि आठ तासाचा कट ऑफ टाईम असताना पाऊण तास आधीच संपवलेली स्पर्धा...
निर्मळ आनंद आणि अतीव समाधान Happy

अभिनंदन हर्पेन. थोडक्यात पण छान आढावा घेतला आहे. फुल मॅरॅथॉन पेक्षा फक्त ८ च किमी जास्त अंतर असून याला अल्ट्रा का म्हणतात? वेळ पण बराच लागला म्हणजे ट्रेल रनिंग सारखा काही प्रकार होता का?

धन्यवाद एम्बी, शब्दाली, गजानन Happy

एम्बी , ४२.१९५ किमी पेक्षा जास्त अंतर म्हणजे अल्ट्रा ४३किमी देखिल अल्ट्रा म्हणता येईल Proud

https://en.wikipedia.org/wiki/Ultramarathon

वेळेचं म्हटलं तर
हवा ढगाळ असली तरी जाणववारी वातावरणातली गरमी.
अर्धा रस्ता ट्रेल तर उरलेल्यातला बराच खडबडीत.
भरपूर दमवणारे चढ-उतार

यामुळे जरा वेळ लागला. २-३ जणांनी स्पर्धा अर्धवट सोडून दिली. (DNF)
माझ्यामते मला लागलेला वेळ बराच कमी लागला Happy

इन्ना - 'रन द रण' अल्ट्रापण होती (१०० आणी १६१ किमी) आणि त्याचबरोबर हाफ आणि फुल (२१ आणी ४२) पण होती. मी फुल मॅरॅथॉन मधेच भाग घेतला होता. पुर्णतः ट्रेल किंवा रादर वाटा देखिल नसलेल्या काटेरी रानातून असलेले स्पर्धा अंतर जिपीएस च्या सहाय्याने पार करायचे होते. माझा डिस्प्ले मधेच गंडल्याने मी १०० किमी च्या रूट्वर गेलो होतो आणि मग करायचे नसतानाही माझे ५० किमी झालेले Proud

Pages