मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन – पूर्ण करणे हेच येकमेव टार्गेट आहे.
पुढचा महिना सराव चांगला राहिला, तर ४:२० मध्ये होऊ शकेल असं वाटतंय.
नक्की भेटूया संपल्यावर..

चिन्मय - तुझा सराव मी बघतोय. छानच सुरु आहे. ४:२० मधे नक्की होईल. फक्त दुखापत होऊ देऊ नकोस. ती खबरदारी मात्र नक्की घे.

नमस्कार मंडळी!

मी ह्या वर्षीची मुंबई मॅरॅथॉन मैत्रीच्या कार्याला समर्पित करत आहे.
मैत्री बद्दल मेळघाटातल्या कामाबद्दल इथे सर्वांना माहीत आहेच.

खालील लिंकवर क्लिक करून आपण आपली देणगी मैत्रीला देऊ शकता.
https://www.unitedwaymumbai.org/donation.php

इंस्टावरची आवाहने
https://www.instagram.com/reel/DSkLmqRkoAc/?utm_source=ig_web_copy_link&...
https://www.instagram.com/reel/DSucVWGkp3c/?utm_source=ig_web_copy_link&...

विविध वयोगटांतील मुले/ तरुण साधारणपणे ( कोणताही सराव न केलेले) किती किणीकर सहज धावू शकतात?
असा प्रश्न पडला कारण पोलीस दलातील भरतीच्या परीक्षेत अमुक एक उमेदवार पाच किमीटर धावतांना पडला/ दगावला अशा बातम्या येतात . प्रश्न विचित्र आहे मान्य.

चिन्मय_1 - हार्दीक अभिनंदन उत्तम वेळ साधली. (04:21:43)

मी पण मुंबई मॅरॅथॉन अकराव्यांदा चार तास पस्तीस मिनिटात संपवली. ह्यावेळी रूट मधे कोस्टलरस्त्याचा काही भाग घेतलेला होता. तो अगदी आयत्यावेळी जाहीर केलेला. कोस्टल रस्ता आणि त्यासोबत आलेले चढ - उतार ह्यामुळे मजा आली.

धन्यवाद मंडळी !
हल्ली नसतात इकडे पण हेम आणि सिम्बा यांनीही फुल मॅरॅथॉन पुर्ण केली.

टवणे सर, धनश्री., mandard - धन्यवाद !
हर्पेन – हार्दिक अभिनंदन आणि विशेष धन्यवाद. मी धावायला सुरुवात करण्यात तुमच्या लेखांचा मोठा वाटा आहे.

मी धावायला सुरुवात करण्यात तुमच्या लेखांचा मोठा वाटा आहे.
>>

चिन्मय असं काही वाचलं की उत्तर काय द्यायचं हे कळत नाही
आणि मी अजून जास्त लिहायला हवं असं वाटतं पण ते फार काळ टिकत नाही. Proud

Pages