मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ हर्पेन, आपले अभिनंदन!!! धावपटूंचे फोटो बाकी लई भारी आलेत.

@ विद्या भुतकर, हाफ मॅरेथॉन धावल्याकरीता आपलेही अभिनंदन!!! मेडल्ससुद्धा लई भारी!!!

मी काल oxford resort marathon मधे धावलो. tough terrain....मजा आली...१०० किमि, १०० miles, ७५, ५०, ३५, २१, १०, ५, ३ किमि असे options होते. मी २१ किमि केले.
मिलिन्द सोमण पण होता. १०० miles मधे....

अरे वा अभिनंदन !!

अरे हो इथे सांगायचेच राहिले २० नोव्हेंबर ला माझी ६ वी हाफ पूर्ण केली. या वेळेस अगदीच तयारी नव्हती पण मेडल पाहिजे या इच्छेने पूर्ण केलीच Lol ते लोकं म्हणतात आय रन फॉर बियर / वाईन तसे बहुदा मी म्हणत असतो आय रन फॉर द ब्लिंग Proud

अनेक मॅरेथॉन पूर्ण करणारे एक प्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. राकेश सिन्हा गेले परवा. सकाळी तयारिसाठी पळतानाच अ‍ॅटॅक येऊन गेले.

त्या निमित्ताने, हृदयाच्या आरोग्यसंदर्भाने एक्स्ट्रीम स्पोर्ट्स व अती व्यायाम, यासोबत स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, याबद्दल डॉक्टरांच्या विविध ग्रूप्समधे चर्चा सुरू आहेत. जस्ट नोंद.

त्या निमित्ताने, हृदयाच्या आरोग्यसंदर्भाने एक्स्ट्रीम स्पोर्ट्स व अती व्यायाम, यासोबत स्ट्रेसफुल लाईफस्टाईल, याबद्दल डॉक्टरांच्या विविध ग्रूप्समधे चर्चा सुरू आहेत.
झाडू, त्या चर्चांचं सार काय हे पण लिहाल का?

अशा प्रकारच्या अजूनही काही घटना तुरळक प्रमाणात का होईना पण याआधीही ऐकायला आलेल्या आहेत.

माझ्यामते रेस्ट आणि रिकव्हरीकडे केले जाणारे दुर्लक्ष हा एक मोठाच कन्सर्न आहे. खरेतर रेस्ट आणि रिकव्हरीला पक्षी भरपूर झोपेला प्राधान्य द्यायला हवं. आठ तास झोप ही लक्झरी मानली जाते पण निदान ७ तास तरी झोप घ्यायलाच हवी. तरच रिकव्हरी नीट होऊ शकेल. म्हणजे विकडे मधे ट्रेनिंग सकाळी ६ वा. चालू करणार ( व त्या करता साडेपाचला उठ्णार असू) तर रात्री निदान साडेदहाला झोपायला हवे.

जो माझा प्रयत्न असतो पण होतेच असे नाही मग न पळायच्या वारी अधिक झोप घेऊन आणि रविवारी दिवसा झोप घेऊन भरपाई करतो.

बाकीच्यांनी पण लिहा रेस्ट आणि रिकव्हरी करता काय करता, किती झोपता ते Happy

धन्यवाद हर्पेन !

तू म्हणतोस ते बरोबर वाटते. तसे मी झोपाळू माणूस आहे त्यामुळे माझी ७ तास झोप होत असतेच नॉर्मली. शनिवारी लाँग रन असते ती सकाळी लवकर असते तर शुक्रवारी लवकर झोपायचा प्रयत्न असतो. आमच्या रनर्स ग्रुप मध्ये नेहमी "रनर्स ना फ्रायडे नाईट म्हणजे लवकर खाऊन लवकर झोपायची नाईट " असे असते. नाही तर आमचा एक कोच सल्ला द्यायचा की मोठ्या रेस आधीची रात्र अँक्झायटी मुळे किंवा इतर कारणाने झोप पूर्ण नाही होऊ शकत काही वेळा, मग त्या आधी एक दोन रात्री नीट रेस्ट घ्या म्हणजे त्या झोपेचे काही वाटणार नाही.

मला असेही वाटते की काही लोक स्वतःला खुप पुश करायला बघतात. माझ्याच बघण्यात आजारी आहे तरी गोळ्या घेऊन अथवा इंजेक्शन घेऊन पळणारे लोक आहेत. मी स्वतः खुप घाबरतो. त्यामुळे मी एक आठवडा रेस्ट घेईल पण असे काही करणार नाही.

मला वाटते हे सर्व पूर्ण रेस्ट घेऊनच केले पाहीजे. माझे आज पर्यन्त्त ४ हाफ झाल्या आहेत. पण नेहमी लक्ष असते की पाय ठीक आहेत् ना, गुढगे, इ. आणि रोजची ७ तास झोप अस्तेच. पळ्तानाही, एक्दम निवान्त पळते. घरी मुले, नवरा, नोकरि हे सर्व असताना उगाच स्वतःला ताणून व्यायाम करण्यात काही पॉइन्ट नाही असे मला वाटते. उत्तम प्रक्रुती आणि काही ध्येय असणे हे चान्ग्लेच आहे पण गोळ्या, इन्जेक्शन घेऊन का पळाय्चे?
माझा भाऊ आणि एक मैत्रिण मुम्बईला हाफ ला जात आहेत. काही टिप्स असतील तर सान्गा प्लीज. मी मुम्बईची केली नाहीये. हवामान कसे अस्ते, टेरेन कसा असतो, रेसच्या दरम्यान रोड-सपोर्ट कसा आहे? पाणी, इ किती स्टेशन्स आहेत? तुमचे अनुभव सान्गा प्लीज. त्यान्ची पहिली हाफ आहे. त्यामूले बाकी काही सूच्ना असतील त्या पण सान्गा.
Good luck to all Mumbai Marathon runners. Happy

या वर्षी पुन्हा बॉस्ट्न मेडले ला रजिस्तर करायचे आहे, ५के(एप्रिल) , १० के(जून) आणि हाफ(ऑक्टोबर) . Happy सध्या थन्डि आहे त्यामुळे हायबर्नेशन मधे आहे. Happy नविन वर्षात सुरु करणार.

नमस्कार !

१५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मुंबई मॅरॅथॉनमधे सलग चौथ्या वर्षी भाग घेत असताना, पुर्ण मॅरॅथॉन अंतर ४ तास १२ मिनिटे २५ सेकंद वेळ घेऊन, धावून पुर्ण केले ही माझी (#आजवरची) सर्वोत्तम वेळ आहे.

तळटीप -
# सबफोर अभी बाकी है दोस्तो Wink

वा !! हर्पेन अभिनंदन. ४ तास १२ मिनीटे म्हणजे खुपच मस्त वेळ आहे. पूर्ण मॅरॅथॉन भर इतका पेस टिकवून ठेवणे खरंच अवघड असते.

#सबफोरलाशुभेच्छा !

अरे वाह मस्त हर्पेन. अभिनंदन ! मुम्बईला खूप गरम आणि दमट होते असे कळले रेस्च्या दिवशी. तरीही इत्का छान वेग म्हणजे उत्तमच. Happy माझा भाऊ आणि मैत्रिनीने हाफ केली त्या दिवशी. खूप गर्दी होती म्हणे.

धन्यवाद आडो, धनि आणि विद्या

धनि मला आता कुठे वाटतंय की पुर्ण मॅरॅथॉन कशी पळायची ते मला जरा जरा वळायला लागले आहे. (कळतं पण वळत नाही म्हणतात त्यातलं वळणं )

सॉरी धनि, विद्या तुमचे आधीचे प्रतिसाद वाचले गेले नव्हते.

धनि झोपाळू तर मी पण आहे. पण मी घाबरट नाहीये त्यामुळे बरेचदा विचारांचा रोख काही होत नाही असा होण्याकडे कल असतो. (याची मात्र मला भिती वाटते)

विद्या, हो. मुंबईत हवामान खूपच दमट होते आणि पुण्यातल्या थंडीत सराव केल्यानंतर तर ते दामट्य Proud फारच जाणवणारे होते. पण मला जमलं बुवा कसंतरी आणि हाता-पायात काहीही गोळे पेटके वगैरे न येता (ट्चवूड) Happy

बारिशकर , धनि, हर्पेन, ... ग्रेट अचिव्हमेंट...... Happy

मी "दम्यामुळे" पळण्याचा विचारही करू शकत नाही Sad
सायकलिंगचा विचार केलाय, पण अजुनही हातापायात पुरेशी ताकद नाही.
त्यातुन मी मुलखाचा झोपाळू, केव्हाही कुठेही कसेही झोपु शकतो, झोप लागते, झोप येते.
रात्रीतुन कशीबशी पाच ते सहा तासांची झोप (झोपमोड होत होत) होते.
पण असले काहीही करायचे तर पुरेशी झोप हविच हवि.

दात/पाईल्स्/पाठदुखी व दमा या करता कोणत्या ना कोणत्या गोळ्या चालूच असतात, पेनकीलर म्हणा वा दम्यावरच्या. पण त्यामुळे मला अधिकच सावध रहावे लागते, की आत्ता आणलेले/आलेले "अवसान" गोळीमुळे आहे की मुळचे शारिरीक क्षमतेतील आहे. ज्या क्षणी जराही शंका येईल, की हे गोळीमुळे आहे, शारिरीक क्षमता संपलेली आहे व मी ताण देतोय, तर मी लगेच थांबतो. घाबरत नाही, पण उगाच जास्त हव्यासही करायचा नाही.
शारिरीक अक्षमतेची जाण ठेऊन वागणे म्हणजे घाबरटपणा होत नाही.
अन तरीही, तशी जाण असल्यामुळे "प्रयत्नच न करणे" हे देखिल पटत नाही.
अजुनपर्यंत म्हणावे असे यश कुठल्याच प्रकारात मिळाले नाहीये. पण प्रयत्न जोरात सुरू आहेत. आणि माझी "पंचवार्षिक योजना" आहे. काही घाइगडबड नाही. Proud

धन्यवाद बारिशकर,
"एकदा तुमच्याबरोबर पळायचे आहे...." हे अगदी 'तुमच्याशी या विषयावर एकदा चर्चा करायची आहे' च्या धर्तीवर वाचलं गेलं. Proud

मला कधीही चालेल. तुम्ही पुण्यात कुठे असता? मला विपु / संपर्कातून तुमचा फोन नंबर कळवा मग ठरवू पुढचे.

धन्यवाद मंजूताई

हर्पेन.. मस्त... एकदम मस्त वेळ .
मी हाफ धावले. उजवा पाय दुखत होता १० दिवस आधी पासून, त्याची काळजी घेत हळू हळू पूर्ण केली २.२९ मध्ये ( ऑफीशीयल २.३३).
शेवटचे ३ के त्रासदायक होत आहेत. स्टॅमिना पूर्ण संपतोय.. काय कराव हे टाळायला ?

धनश्री, आधीचे ट्रेनिंग नीट झाले असेल तर नाही होणार. रेस च्या आधी एकदा तरी पूर्ण अंतर धावलेलं असेल तर नक्कीच फरक पडतो

धनश्री सर्वप्रथम हार्दीक अभिनंदन
पायदुखीसकट अडीच तासात हाफ करणे म्हणजे खूप भार्री आहे.

स्टॅमिना टिकवण्याबाबत - धनि +१
अधिक मी म्हणेन श्वासावर लक्ष ठेवायला हवं म्हणजे पळता पळताच अधून मधून जाणीवपुर्वक दीर्घश्वसन केलं तर त्याचाही दमसास टिकायला उपयोग होतो/होईल.

हर्पेन आणि धनि... धन्यवाद.
रेस च्या आधीचे ट्रेनिंग म्हणजे रेग्युलर व्यायाम, हिल/ टेम्पो रन्सच ना ? ते होतात नियमित .
ड्रिल समहाऊ मला फार आवडत नाही आणि जमत पण नाही. ड्रिलचा सराव करायला हवा का ?
दम अजिबात लागत नाही. दिर्घ श्वास मी घेत असतेच पण हे शेवटचे २/३ कि त्रास देतात .

Pages