सुकी कोंबडी काजु सहीत किवा काजु घातलेले सुके चिकन

Submitted by मयुरी. on 11 March, 2012 - 01:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन मॅरीनेशन साठी :-
चिकन (अर्धा किलो)
आल्-लसुन पेस्ट
हळद
मिठ
चिकन मसाला किवा एवरेस्ट चिकन मसाला ( मला एवरेस्ट मसाला आवडतो म्हनुन)
लिंबु

वाटण :-
ओले खोबरे साधारण १ लहाण वाटी
सुके खोबरे साधारण अर्धी वाटी
कांदा १ मध्यम
धणे २-३ चमचे
बडीशोप २-३ चमचे
आलं लसुण
कोथिंबीर

(सर्व मिश्रण तेलावर सोनेरी भाजुन्...वाटुन घ्यावे.)

फोडणी :-

दालचिणी चे तुकडे २-३
तमालपत्र
काजुचे काप
तेल

क्रमवार पाककृती: 

१.सर्व प्रथम चिकन धुवुन त्याला हळद, मीठ, चिकन मसाला, आलं-लसुण पेस्ट, लिम्बु लावुन मॅरीनेट करुन ठेवावे (साधारण अर्धातास).

२.कढई मधे तेल घ्यावे.तेल थोडेसे तापल्यावर त्यात लाल तिखट्,हळद,चिकन मसाला ( अगोदर चिकनला लावल्यामुळे तेलावर कमी घालावा),धणे-जिरे पावडर (ऑप्शनल) घालावे व पटकन परतुन घ्यावे (तेलावर जर तिखट घालायचा नसेल तर वाटण घातल्यावर तिखट घातले तरी चालेल)

३.मग त्यात दालचिनी, तमालपत्र आणि काजुचे काप घालावे आणि परतुन घावे.

४. आता त्यात वरील वाटण घालावे व चांगले परतुन घ्यावे.

५. आता ह्यात वरील मॅरीनेट केलेले चिकन घालावे वरुन थोडेसे मीठ ( मॅरीनेट करताना मीठ लावल्यामुळे वरुन मीठ कमी घालावे) टाकुन. मंदअग्निवर शिजु द्यावे.

६. शिजलेल्या चिकनवर कोथिंबीर पेरुन गरमागरम सर्व करावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

माझा रेसिपी टाकायचा पहिलाच प्रयत्न आहे...अजुन काही माहीती असेल तर नक्कि विचारा किवा अजुन काही टीप असेल तर नक्कि सांगा Happy

माहितीचा स्रोत: 
स्वत:
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव्..खूपच टेस्टी वाटतीये.. Happy
ओलं खोबरं मिळण्याचे वांधे आहेत..
डेसिकेटेड खोबरं पाण्यात भिजवून वाटलेलं चालेल का???

उदय, रेसिपी नोट करुन ठेव. त्याने उपास मोडणार नाही तुझा.
दिग्विजय सिंगची शप्पथ, पुढच्या जन्मी मी नक्की नॉनव्हेज खाणार. या जन्मी व्हेजवर पोसलेलं पोट याची परवानगी देणार नाही Sad

@वर्षू नील डेसिकेटेड कोकोनट्/सुके खोबरे दुधात भिजवल्यास ओल्या नारळासारखे लागते.

मयुडे सो नाऊ यू आर ऑन दी सेम ट्रॅक हम्म??? Happy
मस्त वाटतीय ग रेसिपी...फोटू टाक की एखादा...मी सुके चिकन असेच बनवते...फक्त ओले खोबरे अन काजु नै घालत...त्याऐवजी सुके खोबरे वापरते आणि किचन किंग मसाला+गरम मसाला घालते....शुक्रवारीच कर साजरी केली अश्या चिकन ने Happy हॉटेलातल्या चिकनची चव आलेली... नवरा बोटं चाटून पुसून, मिटक्या मारत खात होता Proud

आशु२९ ह्यासाठी चिकन कसेही वापरू शकता, शक्यतो थाय्+ब्रेस्ट पीसेस... तसेही हडकं असली की चिकनची चव नक्की वाढते... Happy

नीलु, कल्पु लवकरच फोटो अपलोड करेन Happy

टोक्स अग मी पण सुके चिकन तु बनवते तसेच करते पण एकदा असे ट्राय केले मस्त झालेले. Happy

मयुरी..करायला ठेवलंय चिकन..
मंदाग्नी वर.. पाणी अजिबात घालायचं नाहीये???
आणी मसाल्यात मेड ने कोथिंबीर ही वाटून टाकलीये.. त्यामुळे तुझ्या रेसिपीने हिरवं सुकं चिकन बनतंय.. Lol

बनत असताना

सुके (हिरवं) चिकन तयार झाल्यावर.. वाटलेल्या कोथिंबिरीमुळे ,रंग तुझ्या रेसिपी सारखा ओरिजिनल नसेल आला.. पण यम्मी झालंय Wink

Pages