सुकी कोंबडी काजु सहीत किवा काजु घातलेले सुके चिकन

Submitted by मयुरी. on 11 March, 2012 - 01:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन मॅरीनेशन साठी :-
चिकन (अर्धा किलो)
आल्-लसुन पेस्ट
हळद
मिठ
चिकन मसाला किवा एवरेस्ट चिकन मसाला ( मला एवरेस्ट मसाला आवडतो म्हनुन)
लिंबु

वाटण :-
ओले खोबरे साधारण १ लहाण वाटी
सुके खोबरे साधारण अर्धी वाटी
कांदा १ मध्यम
धणे २-३ चमचे
बडीशोप २-३ चमचे
आलं लसुण
कोथिंबीर

(सर्व मिश्रण तेलावर सोनेरी भाजुन्...वाटुन घ्यावे.)

फोडणी :-

दालचिणी चे तुकडे २-३
तमालपत्र
काजुचे काप
तेल

क्रमवार पाककृती: 

१.सर्व प्रथम चिकन धुवुन त्याला हळद, मीठ, चिकन मसाला, आलं-लसुण पेस्ट, लिम्बु लावुन मॅरीनेट करुन ठेवावे (साधारण अर्धातास).

२.कढई मधे तेल घ्यावे.तेल थोडेसे तापल्यावर त्यात लाल तिखट्,हळद,चिकन मसाला ( अगोदर चिकनला लावल्यामुळे तेलावर कमी घालावा),धणे-जिरे पावडर (ऑप्शनल) घालावे व पटकन परतुन घ्यावे (तेलावर जर तिखट घालायचा नसेल तर वाटण घातल्यावर तिखट घातले तरी चालेल)

३.मग त्यात दालचिनी, तमालपत्र आणि काजुचे काप घालावे आणि परतुन घावे.

४. आता त्यात वरील वाटण घालावे व चांगले परतुन घ्यावे.

५. आता ह्यात वरील मॅरीनेट केलेले चिकन घालावे वरुन थोडेसे मीठ ( मॅरीनेट करताना मीठ लावल्यामुळे वरुन मीठ कमी घालावे) टाकुन. मंदअग्निवर शिजु द्यावे.

६. शिजलेल्या चिकनवर कोथिंबीर पेरुन गरमागरम सर्व करावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

माझा रेसिपी टाकायचा पहिलाच प्रयत्न आहे...अजुन काही माहीती असेल तर नक्कि विचारा किवा अजुन काही टीप असेल तर नक्कि सांगा Happy

माहितीचा स्रोत: 
स्वत:
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोत जितका दिस्तोय ,खरा तितका काळपट नाहीये बर्का..
नेक्स्ट टायमाला सोनेरीच होईल नक्की!!! Happy

मी_मयुरी, तुम्हाला एक टीप देवु का? (तुम्हीच विचारली म्हणून)..

ह्याच्यात 'फक्त' एक चमचा वरून शुद्ध तूप घातलं की सात्विक चिकन होइल मग हिच रेसीपी दुसर्‍या नावाने लिहु शकतो. ... Happy
(ह. घ्या)

'शुद्ध तूपाची जादू.. सात्विक चिकन पोटात'.
(फक्त एक चमचा घाला, चिकन, मासे कशातही घाला.. सात्विक पदार्थ बनवा असे तूप मिळते... अशी जाहिरात सुद्धा होइल). Proud

झंपी, मला वाटटे की तुम्ही ती रेसीपी बनवुन फोटो सकट शेअर करावी ज्यामुळे तुमच्याकडुन योग्यप्रकारे जाहीरात होईल ( तुम्हीपण ह.घ्या) Happy

>>ह्याच्यात 'फक्त' एक चमचा वरून शुद्ध तूप घातलं की सात्विक चिकन होइल मग हिच रेसीपी दुसर्‍या नावाने लिहु शकतो

तुमच्या बाकीच्या रेसिप्या तपासल्या पाहीजेत. मयु, चेक कर गो तुझ्याच रेसिप्यांचं वेगळं वर्जन असायचं - इन्स्पिरेशन यु नो Wink Light 1

चिकन आणि सात्विक Rofl हे म्हणजे अ‍ॅर्नॉल्ड शिवाजीनगरला मवाळ म्हटल्यासारखे आहे. Proud

>>ह्याच्यात 'फक्त' एक चमचा वरून शुद्ध तूप घातलं की सात्विक चिकन होइल मग हिच रेसीपी दुसर्‍या नावाने लिहु शकतो
कहि लोक नावाप्रमाने झंपट अस्तात. मयु दुर्लक्श्य कर गो.
झंपी तुमच्या सात्विकतेचे तारे तुम्ही खिचडीवर उडवलेलेच आहे तेव्हा सुज्ञास सांगने न लागे Wink Light 1

योग्स, धन्यवाद तुमचे तारे तोडायला मिळाले ना अशी पोस्ट लिहून. छान.

मंदार, तूप घातल्याने कुठलाही पदार्थ सात्विक होतो हा शोध इथे मायबोलीवरच लागला एका (अति)हुशार सुग्रणीकडून. Proud

मी_मयुरी, अहो हे तुम्हाला उद्देशून वा तुमच्या रेसीपीवर न्हवते हो. आणि मी इतकी स्वंयपाकात हुशार नाही हो. मी इथे एका मायबोली वर लिहिलेल्या एकीचे तारे.. सॉरी रेसीपी वाचल्यावर सुचलेली टीप होती हो. खिचडी वर शोधा. एवढे मनावर घेवु नका.. योग्सचा सल्ला घ्या मनावर. ते खुष आहेत कुणाचे तरी तारे शोधल्याबद्दल.

Pages