चिकन मॅरीनेशन साठी :-
चिकन (अर्धा किलो)
आल्-लसुन पेस्ट
हळद
मिठ
चिकन मसाला किवा एवरेस्ट चिकन मसाला ( मला एवरेस्ट मसाला आवडतो म्हनुन)
लिंबु
वाटण :-
ओले खोबरे साधारण १ लहाण वाटी
सुके खोबरे साधारण अर्धी वाटी
कांदा १ मध्यम
धणे २-३ चमचे
बडीशोप २-३ चमचे
आलं लसुण
कोथिंबीर
(सर्व मिश्रण तेलावर सोनेरी भाजुन्...वाटुन घ्यावे.)
फोडणी :-
दालचिणी चे तुकडे २-३
तमालपत्र
काजुचे काप
तेल
१.सर्व प्रथम चिकन धुवुन त्याला हळद, मीठ, चिकन मसाला, आलं-लसुण पेस्ट, लिम्बु लावुन मॅरीनेट करुन ठेवावे (साधारण अर्धातास).
२.कढई मधे तेल घ्यावे.तेल थोडेसे तापल्यावर त्यात लाल तिखट्,हळद,चिकन मसाला ( अगोदर चिकनला लावल्यामुळे तेलावर कमी घालावा),धणे-जिरे पावडर (ऑप्शनल) घालावे व पटकन परतुन घ्यावे (तेलावर जर तिखट घालायचा नसेल तर वाटण घातल्यावर तिखट घातले तरी चालेल)
३.मग त्यात दालचिनी, तमालपत्र आणि काजुचे काप घालावे आणि परतुन घावे.
४. आता त्यात वरील वाटण घालावे व चांगले परतुन घ्यावे.
५. आता ह्यात वरील मॅरीनेट केलेले चिकन घालावे वरुन थोडेसे मीठ ( मॅरीनेट करताना मीठ लावल्यामुळे वरुन मीठ कमी घालावे) टाकुन. मंदअग्निवर शिजु द्यावे.
६. शिजलेल्या चिकनवर कोथिंबीर पेरुन गरमागरम सर्व करावे.
माझा रेसिपी टाकायचा पहिलाच प्रयत्न आहे...अजुन काही माहीती असेल तर नक्कि विचारा किवा अजुन काही टीप असेल तर नक्कि सांगा
वॉव्..खूपच टेस्टी वाटतीये..
वॉव्..खूपच टेस्टी वाटतीये..
ओलं खोबरं मिळण्याचे वांधे आहेत..
डेसिकेटेड खोबरं पाण्यात भिजवून वाटलेलं चालेल का???
वर्षु अग नुसते सुके खोबरे
वर्षु अग नुसते सुके खोबरे वापरले तरी चालेल.
डेसिकेटेड खोबरयाची चव कशी लागेल माहीत नाही.
बरं नक्की करून पाहीन.. गरम
बरं नक्की करून पाहीन.. गरम रोटी बरोबर मस्त लागेल.. स्लर्प!!!!
अग नक्किच आम्ही तर नुसतेच
अग नक्किच आम्ही तर नुसतेच आडवा हाथ मारतो रोटीची पण गरज पडत नाही
आज संकष्टी आहे
आज संकष्टी आहे
(No subject)
उदय, रेसिपी नोट करुन ठेव.
उदय, रेसिपी नोट करुन ठेव. त्याने उपास मोडणार नाही तुझा.
दिग्विजय सिंगची शप्पथ, पुढच्या जन्मी मी नक्की नॉनव्हेज खाणार. या जन्मी व्हेजवर पोसलेलं पोट याची परवानगी देणार नाही
उदय मग उद्या बनव
उदय मग उद्या बनव
मंदार
मंदार
अहो चिकण एवजी चिकन लिहता का?
अहो चिकण एवजी चिकन लिहता का?
मला वाचताना , अशी माती चिकण माती.. असे मनात येत होते.
छान आणि सोपी आहे रेसीपी.
छान आणि सोपी आहे रेसीपी. प्रयत्न करायला हरकत नाही.
झंपी धन्स बदल केला आहे
झंपी धन्स बदल केला आहे
@वर्षू नील डेसिकेटेड
@वर्षू नील डेसिकेटेड कोकोनट्/सुके खोबरे दुधात भिजवल्यास ओल्या नारळासारखे लागते.
मस्त रेसिपी मयु, कधी करतेयस?
मस्त रेसिपी
मयु, कधी करतेयस? वाटल्यास मी अरेबिक रोटी घेउन येतो,
जरा फोटो असत तर बरं झालं
जरा फोटो असत तर बरं झालं असतं.
सुचरीता आशुतोष, नक्की या,
सुचरीता
आशुतोष, नक्की या, स्वागतच आहे
मयुरी: मस्त रेसिपी. मुलांना
मयुरी:
मस्त रेसिपी. मुलांना आवडेल अशी वाटतेय.
ओ थांकु सुचरिता...
ओ थांकु सुचरिता...
छान आहे रेसिपी. पण चिकन कसे
छान आहे रेसिपी. पण चिकन कसे घ्यावे? ब्रेस्ट पार्ट, थाय, कि कसेही ?
मयुडे सो नाऊ यू आर ऑन दी सेम
मयुडे सो नाऊ यू आर ऑन दी सेम ट्रॅक हम्म???
मस्त वाटतीय ग रेसिपी...फोटू टाक की एखादा...मी सुके चिकन असेच बनवते...फक्त ओले खोबरे अन काजु नै घालत...त्याऐवजी सुके खोबरे वापरते आणि किचन किंग मसाला+गरम मसाला घालते....शुक्रवारीच कर साजरी केली अश्या चिकन ने हॉटेलातल्या चिकनची चव आलेली... नवरा बोटं चाटून पुसून, मिटक्या मारत खात होता
आशु२९ ह्यासाठी चिकन कसेही
आशु२९ ह्यासाठी चिकन कसेही वापरू शकता, शक्यतो थाय्+ब्रेस्ट पीसेस... तसेही हडकं असली की चिकनची चव नक्की वाढते...
नीलु, कल्पु लवकरच फोटो अपलोड
नीलु, कल्पु लवकरच फोटो अपलोड करेन
टोक्स अग मी पण सुके चिकन तु बनवते तसेच करते पण एकदा असे ट्राय केले मस्त झालेले.
मी_मयुरी, मस्त आहे रेसिपी..
मी_मयुरी, मस्त आहे रेसिपी.. करून बघेन.
धन्स गोगो
धन्स गोगो
लय भारी..
लय भारी..
मयुरी..करायला ठेवलंय
मयुरी..करायला ठेवलंय चिकन..
मंदाग्नी वर.. पाणी अजिबात घालायचं नाहीये???
आणी मसाल्यात मेड ने कोथिंबीर ही वाटून टाकलीये.. त्यामुळे तुझ्या रेसिपीने हिरवं सुकं चिकन बनतंय..
हिरव सुकं चिकन चला आता लवकरच
हिरव सुकं चिकन
चला आता लवकरच एक फोटो येईल
वर्षु अग पाणि घातलेस तर ते सुके कसे होईल
बर्बरं.न्हाय घालत पाणी...
बर्बरं.न्हाय घालत पाणी... फोटू डकवेनच झालं रे झालं की.. तो तेव्हढा रंग खपवून घे बाई!!!
वर्षू अग आता तुझ्यापेक्षा मीच
वर्षू अग आता तुझ्यापेक्षा मीच चिकन तयार व्हायची वाट बघतेय
बनत असताना सुके (हिरवं) चिकन
बनत असताना
सुके (हिरवं) चिकन तयार झाल्यावर.. वाटलेल्या कोथिंबिरीमुळे ,रंग तुझ्या रेसिपी सारखा ओरिजिनल नसेल आला.. पण यम्मी झालंय
Pages