पेसरेट्टू आणि पंपकिन सूप (मायबोलीवरुन) फोटोसह

Submitted by दिनेश. on 4 March, 2012 - 13:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मायबोली.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंपकीन सूप माझं फेव्हरेट!
सूपचा रंग मस्तच दिसतोय... एकदम तोंपासु Happy

मी पेसरट्टू करता नेहमी हिरवी सालासकट मूगडाळ वापरते. अर्धा पाऊण तास भिजत घालूनही चालते.
पंपकीन सूप कधीतरी करुन बघेन. रंग छान दिसतोय.

हे काय इथलीच रेसिपी वापरुन पदार्थ केलेत तर त्या रेसिपीचा नोड नंबर द्यायचा नुसतं मायबोली लिहुन काय होतय ? स्वतः केलेल्या पदार्थांचे फोटो टाकायची इतकीच हौस आहे तर स्वतःच्या रंगिबेरंगी पानावर टाकायचा. नवीन पाककृती लिहुन काय व्हॅल्यु अ‍ॅडिशन होणार आहे ? फुकट जागा मिळतेय तर काहीही उद्योग करतोस का ? महिला मंडळ उर्फ फॅन क्लब आहेच लघळपणा करायला 'दा, कित्ती हो तुम्ही थोर'. कहर आहे !

दिनेशदा, दोन्ही माझे आवडते पदार्थ - सगळे साहित्य अनायासे घरात आहे - आज मूग भिजवून उद्या लंचला हाच मेन्यु. तुमच्या टिप्स नेहमी लक्षात ठेवण्याजोग्या असतात. अजून पदार्थ कराल ते येउ द्या. अमी

दिनेश,
तुमच्या पदार्थांची खासियत माहिताय? चविचा विचार सोडून लोक ती डिश पाहण्यातच गुंग होऊन जातात. Happy

दिनेश दा.. धन्स!!दोन्ही पदार्थ आणी फोटोज एकदम तोंपासु दिसतायेत..
हेल्पफुल टिप्स +खूपच छान ,सोपा आणी हेल्दी नाश्ता

सापळा तुमचे विधान वाचून वाईट वाटले!अशीच विखारी टिका करून मिनोतीलाही आम्ही मुकलो.आता दिनेशदाच्या मागे लागताय की काय?ह्या पेक्शा काहीतरी चांगले काम करा न!

सापळा | 5 March, 2012 - 01:29
हे काय इथलीच रेसिपी वापरुन पदार्थ केलेत तर त्या रेसिपीचा नोड नंबर द्यायचा नुसतं मायबोली लिहुन काय होतय ? स्वतः केलेल्या पदार्थांचे फोटो टाकायची इतकीच हौस आहे तर स्वतःच्या रंगिबेरंगी पानावर टाकायचा. नवीन पाककृती लिहुन काय व्हॅल्यु अ‍ॅडिशन होणार आहे ? फुकट जागा मिळतेय तर काहीही उद्योग करतोस का ? महिला मंडळ उर्फ फॅन क्लब आहेच लघळपणा करायला 'दा, कित्ती हो तुम्ही थोर'. कहर आहे !>>

सापळा, कहर आहात, कैच्याकै लिहिताय

मी पेसरट्टू करता नेहमी हिरवी सालासकट मूगडाळ वापरते. अर्धा पाऊण तास भिजत घालूनही चालते<<< सायो, मी उगाच इतके दिवस तीन चार तास भिजवून ठेवत होते. Happy

काय तोंपासू फोटो आहे!! पेसरट्टू खूप पोटभरीचे होतात. तांबड्या भोपळ्याचे नुसते असे सूप कधी ट्राय केले नव्हते. इतर भाज्यांबरोबर तांबडा भोपळा ढकलून द्यायचे सुपात. मला वाटतं हे सूप गार / चिल्ड प्रकारातही छान लागेल.

दिनेशजी अशा मायबोलीकरांकडे ( सापळा ) लक्ष देवु नका, दुधात मीठ टाकणारे इथे खूप आहेत. स्वतःचे काहीच योगदान द्यायचे नाही, पण इतर लोकांना त्रास कसा होईल एवढेच बघायचे, आणी मजा लुटायची, बस्स !

बरेच जण मायबोली सोडुन गेले ते याच अशा छिद्रांवेशी शुक्राचार्यांमुळे.

पसरट्टु खुपच छान लागते, बर्‍याच दिवसात केले नव्हते, आता करणार. विशेषतः माझ्या लहानगी साठी. कारण ती डोसे, धिरडे असे पदार्थ अजीबात पसंत करत नाही.

नंदिनी +१. सालासकट मूगडाळ वापरायची युक्ती मस्तंय. डोक्यातच आलं नव्हतं. उग्गाच आधीपासून प्लॅनिंग नसलं तरी चालेल Happy

दिनेशदा | 5 March, 2012 - 13:56
बेफि, मला वाटलं तूम्हाला काव्य सूचेल.. खरंच हा विषय तूमच्या काव्यात कधी
दिसत नाही. का बरं ?>>>

कोणता विषय?

मस्त दिसतोय हा पदार्थ Happy

दिनेशदा... ही घ्या तरही..
करावे अता हे पेसरेट्टू किती दिसांत खाल्लेच नाही (वृत्तः लगाबगा लगाबगा) Light 1

पेसरट्टु खरंतर नुसत्या मुगाचे करतात ना? म्हणजे तांदूळ अजिबात न घालता?>>>>>
पण तांदूळ घातल्याने कुरकुरीत होतात.>>>>>> दिनेशदा बरोबर ..नाही तर नरम बनतो...

फोटोज आणि सजावट एकदम मस्त!

दिनेशदा, फारच सुरेख दिसतायत दोन्ही पदार्थ. सूपाचा रंग तर अतिशय मस्त. कधी केलं नाहीये हे सूप आता करून बघेन. आणि पेसरट्टू फक्त हिरव्या मुगाच्या डाळीचंच करतात (तांदूळ न वापरता) असं मलाही वाटतं.

सापळा, दिनेशदांनी काही स्वतःच्या नावावर यातली कोणतीही पाककृती खपवलेली नाही. फक्त दोन पाककृती वापरून त्यांनी हे त्यांचं आवडतं कॉम्बिनेशन केलंय. ज्या व्यक्तीनं असंख्य पाककृती स्वत: शोधून, प्रयोग करून मायबोलीवर लिहिल्या आहेत त्या व्यक्तीबद्दल इतक्या टोकाला जाऊन बोलायची गरज नाही. बरं, ठीक आहे तुमचंही एक मत आहे. पण मग जरा स्वतःच्या आयडीनं येऊन मांडणार का? अर्थात कोणी अशी ड्युआयडीच्या मागे लपून विखारी मतं मांडल्यामुळे दिनेशदांना काही फरक पडणार नाहीये.

हैद्राबाद आणि विशाखापट्टणमला खाल्ला होता पेसरट्टू पण तिकडे मुग किंवा मुगडाळ वापरली नव्हती.
एकदा ह्या प्रकारे करुन बघणार, हिरवा रंग मस्त दिसतोय.

फोटो मस्तच! सादरिकरणाने पदार्थ एक्दम करावासा (आणि आयता मिळाला तर लगेच) खावासाही वाटतो.

दिनेशदा, मला पण हा पदार्थ फार आवडतो. एक दिवाळी अंकात ह्याचे नाव 'ऋतू हिरवा धिरडे' असे होते, म्हणून मी ही तेच म्हणते Happy
सूप पण छान आहे.

चविचा विचार सोडून लोक ती डिश पाहण्यातच गुंग होऊन जातात. >>>> +१
मुगाची डाळ वापरण्याची आयडिआ चांगली आहे. त्याबरोबर तांदूळही तासभर भिजवलेले पुरेसे होतील ना?

Pages