ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल बद्दल माहिती हवी आहे

Submitted by निंबुडा on 29 February, 2012 - 05:19

राजस सध्या प्लेग्रूप (प्रायव्हेट प्लेग्रूप) मध्ये आहे. सध्या तरी ज्या प्लेग्रूप मध्ये आहे तिथेच नर्सरीसाठी कंटिन्यू करूया असे ठरवितो आहोत. साईड बाय साईड कल्याणमधल्या शाळांची माहिती काढणे चालू केले आहे (बोर्ड कुठले, फी स्ट्रक्चर काय, स्कूल बस ची फॅसिलिटी वै. वै.).

ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल च्या प्रीस्कूल्स ची चेन खूप फेमस आहे असे ऐकले आहे. प्रीस्कूल च्या यशानंतर त्यांनी आता प्रायमरी आणि हायस्कूल या प्रांतातही शाळांचा विस्तार करायला सुरुवात केल्याचे दिसते.

कल्याण मध्ये त्यांनी नुकतेच नवीन बिल्डिंगचे बांधकाम चालू केले आहे. अर्धी शाळा बनून तयार आहे. आम्ही स्वतः जाऊन शाळा बघून आलो. आम्हाला एरीया + क्लासरूम्स + लॉकॅलिटी इ. च्या अनुषंगाने शाळा बरी वाटली. पण त्यांच्या एकंदरीत शिक्षण पद्धतीचा कुणाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष (नातेवाईकांत) काही अनुभव आहे का?

शाळेमध्ये ICSE & IGCSE असे दोन्ही बोर्ड आहेत. पैकी IGCSE ला 7th standard (grade) पर्यंत व ICSE ला 2nd standard (grade) पर्यंत अफिलिएशन मिळाले आहे असे तिथल्या एका मॅडमनी सांगितले. सरकार एकाच वर्षी सगळ्या इयत्तांना अफिलिएशन देत नाही. टप्प्याटप्य्याने देते असे त्या म्हणाल्या. याबाबतीत कुणाला काही माहिती आहे का? मला ICSE बोर्ड मध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी येत्या २-३ वर्षांत ह्या शाळेच्या २री नंतरच्या इयत्तांना ग्रांट मिळेल ना या विषयी साशंक आहे. मी मागे कुठतरी असे ऐकले किंवा वाचले होते की ICSE बोर्ड च्या एका शाळेने एका इयत्तेनंतरचे अफिलिएशन न मिळाल्याने त्या इयत्तेच्या मुलांना त्यांच्याच SSC बोर्डाच्या पुढील इयत्तांमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी पालकांना भाग पाडले. Uhoh

KG च्या अ‍ॅडमिशन्स साठी लहान मुलांचे व पालकांचे इंटरव्ह्यूज सगळ्याच शाळा घेत आहेत असे दिसले. मी तर ऐकले होते की कोर्टाने दिलेल्या निकालाप्रमाणे असे इंटरव्ह्यूज घेणे अवैध आहे. Uhoh मी स्वतः या इंटरव्ह्यू नामक अग्निदिव्याला घाबरले आहे. इतक्या लहान मुलाला इंटरव्ह्यू साठी कसे तयार करून घ्यायचे हा मला पडलेला प्रश्न आहे. ते टाळायचे असेल तर नर्सरी पासूनच स्कूलिंग चालू करण्याचा ऑप्शन आहे. तसे करावे का? राजस भारी चंचल आहे. त्याला येत सर्व असते पण आपण विचारू तेव्हा उत्तरे देईलच, पोएट्री म्हणून दाखवेलच याची खात्री नाही. शिवाय इंटरव्ह्यू वै. प्रकाराला त्याला सामोरे जावू द्यायलाही मन तयार होत नाही. Sad नर्सरी च्या अ‍ॅडमिशन साठी इंटरव्ह्यू ची भानगड नाहीये आणि नर्सरीनंतर तीच मुले KG ला ट्रान्स्फर केली जातात. त्यांचा नर्सरीचा वर्षभराच्या डेव्हलपमेंट्स चा आढावा शाळा घेत राहणार आणि त्या रेकॉर्ड्स च्या आधारे KG ची अ‍ॅडमिशन पक्की होणार असे ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल मध्ये कळले. म्हणजे निदान एकाच दिवशीच्या फक्त १०-१५ मिनिटांच्या इंटरव्ह्यू वर KG ची अ‍ॅडमिशन होणार नाही हा मला दिलासा वाटतोय.

कल्याण मध्ये ICSE बोर्डाचे पोदार इंटरनॅशनल स्कूल सुद्धा आहे. एका मैत्रिणीचा भाचा तिथे शिकतोय. आता ७ व्या ग्रेड मध्ये आहे. तिच्याकडून असे कळले की शिक्षक अजिबात चांगले नाहीत. इंग्रजी माध्यमाचे शिक्षक असून त्यांची स्वतःची इंग्रजीची बोंब आहे. Uhoh शिवाय फी ही अव्वाच्या सव्वा आहे. मॅनेजमेंट बरे नाही. त्यामुळे तिच्या भाच्याला तिथून काढून SSC बोर्डाच्या दुसर्‍या एका शाळेत घालण्याचा त्यांचा विचार आहे. ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल च्या शिक्षकांविषयी कुणाचा अनुभव काय आहे? मी तर पोदार इंटरनॅशनल स्कूल मुंबईमध्ये बर्‍यापैकी चर्चेत आहे असे ऐकले होते. मग मुंबईच्या बाहेर (कल्याण इ. ठिकाणी) त्यांच्या शाळांच्या ब्रांचेस काढताना फक्त शाळेचा विस्तार हेच एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत असतील का? बाकी शाळेचे शिक्षक, मॅनेजमेंट इ. गेले तेल लावत! Sad असे असेल तर "ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल च्या मुंबई ब्रांचेस मधले अनुभव कल्याण ब्रांच साठी कंपेरेबल आणि कंसिडरेबल असतील का?" हा ही एक प्रश्न आहेच. Uhoh

असो. तुमचे views, अनुभव, info शेअर करा प्लीज.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निंबे, शाळा निवडताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात
१. शाळेचा इतिहास
२. तिला आवश्यक असलेल्या सर्व मान्यता मिळाल्यात की नाही
३. शिक्षणाचा आणि शिक्षकांचा दर्जा- त्यांच्याकडे आवश्यक ती डिग्री आहे की नाही इ.
४. मैदान
५. घरापासूनचं अंतर
६. आपल्या मुलासाठी आवश्य त्या सर्व सुविधा आहेत का? म्हणजे खेळाची सोय वगैरे
७. स्कूलबसचा दर्जा, लायसन्स इ.
८. शाळा अनुदानप्राप्त आहे की नाही. किंवा शाळेतली ती विशिष्ट तुकडी अनुदानप्राप्त आहे की नाही. हे फी कमी करण्यासाठी नाही तर शाळेवर सरकारचा कंट्रोल आहे की नाही हे बघण्यासाठी
मला स्वत:ला इंटरनॅशनल स्कूल्सचा फारसा अनुभव नाही. पण या शाळांपेक्षा आपल्या सर्वसाधारण एसएससी बोर्डाच्या शाळा कित्येक पटीने बर्‍या असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण या शाळांमध्ये काही अडचणी आल्या तर राज्य सरकारकडे दाद मागता येते. पण इंटरनॅशनल स्कूल्सवर सरकारचा थेट कंट्रोल नसतो. त्यामुळे त्यांची मनमानी चालवून घ्यावी लागते. या शाळांची फीसुद्धा भरमसाट असते. तुमच्याकडे खूप पैसे असतील तर मग ते योग्य ठिकाणी गुंतवा. पण अशा शाळांची तुंबडी भरू नका. समजा आयसीएसई बोर्डाची मान्यता मिळाली नाही तर मुलं वार्‍यावर पडतात.
आपल्याला आपलं मूल चांगल्या शाळेत शिकावं असं वाटत असतं. पण चांगल्या शाळेचे निकष नुसती चकचकीत बिल्डिंग, हायफाय बोलणारे लोक अशा वरवरच्या गोष्टी नसाव्यात.
इंटरव्ह्यूच्या बाबतीत म्हणशील तर सगळीच मुलं या वयात नखरे करतात. त्यामुळे त्याची फार काळजी करायचं कारण नसतं. मुलाने इंटरव्ह्यूमध्ये चांगलं काम केलं नाही म्हणून त्याला प्रवेश मिळाला नाही असं होत नाही. तो लोकांसमोर दोन वाक्यं बोलला तरी पुरेसं असतं. नाही बोलला तरी हरकत नसते. मुलाखत त्याच्यापेक्षा तुमची असेल. तुमची पदवीची कागदपत्रं तपासतील, तुम्ही फी भरायला लायक आहात की नाही हे पाहतील. मुलगा शाळ्ळेच्या वातावरणात रमेल का नाही, त्याला काही मानसिक, शारीरिक आजार आहे का हे पाहतील. बस्स. यापेक्षा जास्त काही तपासलं जात नाही.
मुलाला नर्सरीला घालच. कारण मग त्याला शाळेच्या वातावरणाची सवय होईल. तो इतर मुलांमध्ये रमायला शिकेल. शेअरिंग शिकेल.

+१

+ २ Happy

निंबुडा ट्री हाऊसबद्दल काही माहित नाही. पण पोदार इंटरनॅशनल स्कूल म्हणजे सांताक्रूजला आहे त्यांची ब्रँच ना? अगदी उत्तम शाळा आहे. त्यांचं कॉलेज वगैरे पण आहे. आणि एस्टॅब्लिश्ड आहे. इथे मिळाली तर नक्कीच अ‍ॅडमिशन घे.

मागच्याच वर्षीपासून इंटरव्हूचा बडगा बराच कमी करण्यात आला आहे. तुम्ही जर शाळेच्या जवळ रहात असाल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल. पण तरीही इंटरव्हू करता मुलाला स्वतःचं नाव, आईवडिलांचं नाव, फोन नंबर, देशाचं नाव हे असे साधारण माहित करून दे. कधीकधी चित्रं रंगवायला सांगतात, जिगसॉ पझल्स करायला सांगतात. त्यांची प्रॅक्टिस करून घे. पण फार ताण घेऊ अथवा देऊ नकोस. कारण शेवटी आपलं रत्नं आतमध्ये जाऊन काय करणार आहे ते सांगणं कठीणच असतं. Happy

पण पोदार इंटरनॅशनल स्कूल म्हणजे सांताक्रूजला आहे त्यांची ब्रँच ना?>> फक्त सांताक्रूजचीच चांगली आहे.. बाकी सगळीकडे Franchises आहे...फक्त Brand Name आहे... बाकी सगळं सुमार आहे...

अशी शाळा बघा जी घरापासून जवळ आहे आणि प्रत्येक वर्गात २०-२५ मुले असतील...

त्या ट्री-हाऊस नामक शाळेबद्दल काहीही माहिती नाही. पण,
घरापासून जवळ असलेली शाळा - याला आधी प्राधान्य दे. (थंबरूल) कारण कितीही आरामशीर स्कूल-बस इ. सुविधा असल्या तरी इतकी लहान मुलं प्रवासाने फार शिणतात.

माझं वैयक्तिक मत विचारशील तर इण्टरनॅशनल स्कूलच्या नादी लागू नकोस. त्यात पुन्हा आत्ता मर्यादित इयत्तांनाच मान्यता मिळाली आहे असं तू लिहिलंयस.
तुमची महाराष्ट्राबाहेर बदली होण्याची शक्यता असेल तर सी.बी.एस.सी / आय.सी.एस.सी बोर्ड निवड, अन्यथा एस.एस.सी.बोर्डच्या प्रस्थापित इंग्रजी/मराठी शाळेत मुलाला घालणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.

निंबे, एकतर ही नवीन शाळा आहे, १०वीची एकही बॅच बाहेर पडलेली नाहीये, (जरी सगळं १०वीच्याच अनुषंगाने बघायचं नाही असं ठरवलं तरी सुद्धा एकंदर शाळेचा अनुभव काहीच नाही.) आता राजस १०वी होईपर्यंत भरपूर बॅचेस बाहेर पडल्या असतील असं जरी असलं तरी नवीन शाळांची बैठक जमेपर्यंत ट्रायल अ‍ॅन्ड एरर पद्धतच सुरू असते आणि फुकट आपल्या मुलांच्या डोक्याला ताप होतो.

बेस्ट ऑप्शन सध्याचं एकच, एसेस्सी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे... निवांत Happy

ठमा, तुझा प्रतिसाद आवडलाय. पण माझा प्रश्न समजताना गल्लत होतेय का? Uhoh

शाळा निवड ही प्राथमिक फेरी आहे. ती पार पाडून काही शाळा शॉर्ट लिस्ट केल्या आहेत. मागे अमोल कुलकर्णीने "शाळा कशी निवडावी?" नावाचा धागा उघडला होता. त्याचे वाचन आधीच करून झाले आहे. त्यात दिलेले बरेचसे निकष (अंतर, स्कूलबस , वर्गातील मुलांची संख्या वै. वै.) लावून ही लिस्ट बनवली आहे. (एक CBSE बोर्डाची शाळा आहे. खूप नावाजलेली डे बोर्डींग शाळा आहे. आमच्याच एका ओळखीच्यांतल्यांचा मुलगा आता तिथे ६व्या ग्रेड ला आहे. पण एका वेळचा प्रवास १७ किलोमीटर्स चा! त्यामुळे ती शाळा लिस्ट मध्ये धरली नाहीये.)

इंटरनॅशनल स्कूल नाव असले म्हणजे शाळा इंटरनॅशनलच असते असे काही नाहीये, असे मी नोटीस केले आहे. बर्याच जणांचा असा गैरसमज आहे ISCE हा इंटरनॅशनल पोर्शन (अभ्यासक्रम) आहे. पण तसे नाहीये. इंटरनॅशनल अभ्यासक्रमाच्या पॅटर्न वर भारतीय संस्कार करून ISCE
(Indian Secondary Certificate of Eduation) हा अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे. त्यामुळे शाळेच्या नावात "इंटरनॅशनल" शब्द आहे म्हणून ती शाळा हवी आहे असे नाही. शाळेच्या निवडीसाठी ठरवलेले बरेचसे निकष त्या शाळेच्या बाबतीत समाधानकारक आहेत म्हणून त्या शाळेचा विचार करतोय. पण कल्याण मध्ये नवीन असल्याने थोडं बिचकायला होतंय. म्हणून मुंबईमध्ये याच शाळेत कुणाचे (किंवा ओळखीच्यांत कुणाचे) पाल्य असेल तर अनुभव काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा धागा उघडला आहे.

एक केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल म्हणून नवीन शाळाही घरापासून अगदी जवळ (चालत १५-२० मिनिटे व वाहनाने ५ मिनिटे) चालू झाली आहे. पन IGCSE बोर्ड आहे. हे प्रॉपर इंटरनॅशनल बोर्ड आहे (८ + ४ चा पॅटर्न). त्यामुळे तिला ही शॉर्टलिस्ट केलेले नाही.

आम्ही कल्याण वेस्ट ला राहतो. त्यामुळे कल्याण पूर्वेकडच्या शाळाही बाद आहेत. अंतर हाच पहिला व महत्त्वाचा निकष लावला तर चॉइस साठी आधीच कमी पर्याय आहेत.

बोर्ड / शाळा निवडीचे निकष या विषयावर बरीच साधक - बाधक चर्चा आधीच अमोलच्या धाग्यावर झाली असल्याकारणाने ती इथे टाळूया. Happy

मुलाला नर्सरीला घालच. कारण मग त्याला शाळेच्या वातावरणाची सवय होईल. तो इतर मुलांमध्ये रमायला शिकेल. शेअरिंग शिकेल.
>>>
अगं, तो ऑलरेडी प्लेग्रूपला जातो आहेच. नर्सरीला जाईलच तो. पण नर्सरी साठी तिथेच कंटिन्यू करावे किंवा शाळेच्या नर्सरीत घालावे असा प्रश्न आहे. (अर्थात शाळेमध्ये KG च्या अ‍ॅडमिशनच्या वेळी इंटरव्यू ला सामोरे जावे लागू नये असा एक उद्देश त्यामागे आहे.)

इंटरनॅशनल स्कूलची फी म्हणजे पालकांचं दिवाळं >>>
मंदार अगदीच असं काही नाही. ते IB किंवा IGCSE बोर्ड च्या शाळांच्या बाबतीत लागू होते. आमच्या इथे बिर्ला स्कूल म्हणून एक प्रसिद्ध प्रस्थापित शाळा आहे. इंटरनॅशनल वै. नाहीये. CBSE बोर्ड आहे. पण बाकी सर्व शाळांपेक्षा फी जबरदस्त आहे. कारण प्रस्थापित असल्याकारणाने पालकांची आपल्या पाल्यांना तिथे घालण्यासाठी चुरस आहे. आधी या शाळेत KG पासून स्कूलिंग होते. येत्या शैक्शणिक वर्षापासूनच नर्सरी पण चालू करणार आहेत. पण आम्हाला ही इन्फो लेट मिळाल्यामुळे नर्सरीच्या अ‍ॅडमिशन्स चालू होऊन संपल्या कधी तेच कळले नाही.

पण पोदार इंटरनॅशनल स्कूल म्हणजे सांताक्रूजला आहे त्यांची ब्रँच ना?>> फक्त सांताक्रूजचीच चांगली आहे.. बाकी सगळीकडे Franchises आहे...फक्त Brand Name आहे... बाकी सगळं सुमार आहे...
>>>>

मी पोदारच्या बाबतीत exactly असंच काहीसं ऐकलं आहे. तसाच सेम ट्री हाऊस चाही कित्ता असेल तर याची भीती वाटतेय. इथे एक चांगला मुद्दा कळलाय. कल्याण मध्ये ट्री हाऊस ची जी शाळा आहे ती फ्रँचाईझी आहे की त्यांची स्वतःची आहे ते माहीत करून घेते. Happy

इंटरव्हू करता मुलाला स्वतःचं नाव, आईवडिलांचं नाव, फोन नंबर, देशाचं नाव हे असे साधारण माहित करून दे. कधीकधी चित्रं रंगवायला सांगतात, जिगसॉ पझल्स करायला सांगतात. त्यांची प्रॅक्टिस करून घे. >>> ओके. ठांकु. Happy


मुलाने इंटरव्ह्यूमध्ये चांगलं काम केलं नाही म्हणून त्याला प्रवेश मिळाला नाही असं होत नाही. तो लोकांसमोर दोन वाक्यं बोलला तरी पुरेसं असतं. नाही बोलला तरी हरकत नसते. मुलाखत त्याच्यापेक्षा तुमची असेल. तुमची पदवीची कागदपत्रं तपासतील, तुम्ही फी भरायला लायक आहात की नाही हे पाहतील. मुलगा शाळ्ळेच्या वातावरणात रमेल का नाही, त्याला काही मानसिक, शारीरिक आजार आहे का हे पाहतील. बस्स. यापेक्षा जास्त काही तपासलं जात नाही.>>>
ठमे, ठांकु गं. मला हे माहीत नव्ह्तं. Happy

असल्या कसल्या या शाळा? आमचं गाववाल्यांचं बरं आहे... मुलांची शाळा म्हणजे कुमार विद्या मंदिर ( नंबर १,२ वगैरे) मुलींची असेल तर कन्या विद्या मंदीर ( नंबर १,२ वगैरे.. ) शहरातून असलं सगळं बंद पडलं का? Sad

इंटरनॅशनल स्कूल नाव असले म्हणजे शाळा इंटरनॅशनलच असते असे काही नाहीये, असे मी नोटीस केले आहे. बर्याच जणांचा असा गैरसमज आहे ISCE हा इंटरनॅशनल पोर्शन (अभ्यासक्रम) आहे. पण तसे नाहीये. >>> अचूक निरिक्षण. भारतात असलेले खरे 'इंटरनॅशनल' सिलॅबस दोनच- आयबी आणि आयजीसिएस्सी.

शाळेला सर्व तुकड्यांसाठी मान्यता मिळालेली नाही हा मोठाच प्रॉब्लेम आहे, हे रिस्की आहे.

एक केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल म्हणून नवीन शाळाही घरापासून अगदी जवळ (आहे. पन IGCSE बोर्ड आहे. हे प्रॉपर इंटरनॅशनल बोर्ड आहे (८ + ४ चा पॅटर्न). त्यामुळे तिला ही शॉर्टलिस्ट केलेले नाही.>>> तुला हे बोर्ड का नको आहे?

IGCSE बोर्ड आहे. हे प्रॉपर इंटरनॅशनल बोर्ड आहे (८ + ४ चा पॅटर्न). >>>
तुला हे बोर्ड का नको आहे?
>>>
इंटरनॅशनल बोर्ड असल्याने ७व्या का ८व्या ग्रेड नंतर uk चलनात पैसे भरावे लागणार आहेत. कल्याण मध्ये ही शाळा नवीन असल्याने सध्या तरी इतर शाळांच्या तुलनेत त्यांनी प्रीस्कूलच्या फीज् कमी ठेवल्या आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या तिकडे वळवून घेता येईल. नंतर मात्र अशा शाळांच्या फीज् भरमसाठ वाढीव असतात. कारण एकदा सर्व प्रोसीजर करून मुलांची अ‍ॅडमिशन घेतली की पालक शक्यतो फक्त फीच्या कारणास्तव पाल्याला शाळेतून काढत नाहेत असे लॉजिक असावे यामागे. (ही ऐकीव माहिती).

शिवाय ८ + ४ + २ चा पॅटर्न चे आपल्याकडे भविष्य कितपत आहे याची काहीच आयडीया नाही. या पॅटर्न ची मला मिळालेली माहिती अशी की
१) जसे इतर भारतीय बोर्डांमध्ये १० वी ची परीक्षा ही बोर्डाची परीक्षा असते तशी या बोर्डात ती ८व्या ग्रेड ला होते.
२) इतर बोर्डांमध्ये १० वी नंतर कॉमर्स, सायन्स व आर्टस् हे तिन (त्यांच्या मते तिनच!) पर्याय उपलब्ध असतात परंतु IGCSE च्या केस मध्ये ८व्या ग्रेड नंतर घेण्यासाठी ६३ (का ६४) वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतील (लॉ, म्यूझिक, लिटरेचर, मॅनेजमेंट etc etc - तिथल्या मॅडमनी बरेचसे सांगितले होते. आता लक्षात नाहीत. ) त्यामुळे ग्रेड ८ ते ग्रेड १२ पर्यंत (४ वर्षे) पाल्याने जो कुठला विषय निवडला असेल त्यामध्ये त्याचे स्पेशलायझेशन होऊन जाते.
३) १२व्या ग्रेड नंतर कुठल्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयात इतर बोर्डांच्या मुलांप्रमाणेच अ‍ॅडमिशन घेता येते.

पण इथे एक मुद्दा सांगणे त्यांनी टाळले की १२ वी नंतर रेग्युलर कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन घेताना कॉमर्स, सायन्स व आर्टस् हे तीनच ऑप्शन्स पुन्हा डोळ्यांसमोर असणार. तर तिथे नक्की अ‍ॅडमिशन कोणत्या साईडला घ्यायची व त्याचे निकष काय असणार? तसेच मी असे ऐकले आहे की आपल्याकडे जास्तीत जास्त जनता ही प्रस्थापित बोर्डांमधून येणारी असल्याने महाविद्यालयांमध्ये जास्तीचा कोटा अशा बोर्डांसाठी रीझर्व्ड असतो तर बाकीच्या बोर्डांना ठराविक टक्केच कोटा असतो. असे असेल तर IGCSE च्या मुलांमध्ये तेव्हा अ‍ॅडमिशनसाठी चुरसच असणार.

८वी झालेल्या मुलांना स्वतःच्या करीयरच्या दृष्टीने एखादा विषय (किंवा अभ्यासक्रमाची साईड) सीलेक्ट करण्याचा खरोखरीच गंध असतो का? हा ही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. (अर्थात १० + २ + ३ च्या पॅटर्न साठी ही हा मुद्दा लागू होतोच. मला स्वतःला १० वी नंतर काय करायचे याचा कसलाही सेन्स नव्हता. कॉमर्स, सायन्स व आर्टस् पैकी सायन्स मध्ये गणित आणि सायन्स वर भर असतो, आर्ट्स मध्ये इतिहास , भाषा व कॉमर्स मध्ये अर्थशास्त्र शिकावे लागते. अशीच जुजबी माहिती होती. आई-बाबांनी चौकशी करून डिप्लोमाची फॉर्म आणले , अस्मादिकांनी ते भरले आणि १० + ३ + ३ चा पॅटर्न पूर्ण करून मोकळे झालो Proud डिप्लोमा व इंजिनीयरींग काय असते ते त्या त्या साईडला गेल्यावरच कळले. असो.)

आगाऊ, प्लीज जरा वेगवेगळे अभ्यासक्रम आणि त्यातील फरक यावर जरा व्यवस्थित लिहिशील का?

जे लोक वेगवेगळ्या राज्यामधे अथवा देशात जाऊ शकतात त्यानी कुठला अभ्यासक्रम घ्यावा याबद्दल पण लिही. लोकल लँग्वेज हे फार डेंजर काम बनते. त्यावर पण लिही.

माझ्या बहिणीची मुलगी ऐरोली च्या ट्री हाउस मधे जाते. नर्सरी मध्ये आहे ती.
तिचा अनुभव तरी चान्गला आहे.
काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर इथे लिही. मी तिला विचारुन सान्गते.
- सुरुचि

आगाऊ, प्लीज जरा वेगवेगळे अभ्यासक्रम आणि त्यातील फरक यावर जरा व्यवस्थित लिहिशील का?
>>>
यावर एखादा स्वतंत्र धागा सुरु करता येईल का? त्यावर फक्त वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती, फायदे-तोटे, अनुभव यावर चर्चा करता येईल. त्याची लिंक इकडे मेंशन करून ठेवता येईल. कारण माझा धागा मी फक्त ट्री हाऊस बद्दलच्या माहिती साठी काढला होता.

काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर इथे लिही. मी तिला विचारुन सान्गते.
>>>
सुरुचि,
ट्री हाऊस वाल्याचे नुसते प्रीस्कूल्स सुद्धा आहेत की जिथे फक्त प्लेग्रूप आणि नर्सरी पर्यंतचेच शिक्षण अवेलेबल आहे. तुझी भाची जिथे जाते तिथे प्रीस्कूल नंतरचे स्कूलिंगही आहे का याची तुझ्या बहिणीकडे चौकशी कर. कारण ट्री हाऊस च्या प्रीस्कूल चांगलेच आहेत याविषयी शंका नाही. मला त्यांच्या स्कूलिंगचा (म्हणजे प्री-प्रायमरी + प्रायमरी + हायस्कूल) अनुभव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कुणाला असेल तर ते हवे आहे.

http://www.treehousehighschool.com/

ही साईट आहे ट्री हाऊस हायस्कूल्स ची. होमपेज वर एक "Our Schools" नावाचा ड्रॉपडाऊन आहे. त्यात त्यांच्या भारतातील ब्रांचेस मेंशन केल्या आहेत. पुण्यात कर्वे नगर आणि कोंधवा अशा २ आणि मुंबईत ठाणे, कल्याण, विरार आणि नवी मुंबई अशा ४ ब्रांचेस आहेत.

पैकी नवी मुंबईच्या ब्रांच चा अ‍ॅड्रेस असा आहे:
Tree House High School Navi Mumbai

244, Sectov IV, Near Palm Beach Rd.
Koparkhairane Ghansoli Extn.
Ghansoli, Navi Mumbai – 400 701
Ph – 64 64 88 99

सुरुची, तुझी भाची इथेच जाते का कंन्फर्म करतेस का प्लीज?

आगाऊ, प्लीज जरा वेगवेगळे अभ्यासक्रम आणि त्यातील फरक यावर जरा व्यवस्थित लिहिशील का?
>>>
यावर एखादा स्वतंत्र धागा सुरु करता येईल का?>>> जरुर, भारतातील दोन्ही इंटरनॅशनल सिलॅबसवर लिहायचे कितीतरी दिवस मनात आहे, थोडा वेळ द्या नक्की लिहीन.

भारतातील दोन्ही इंटरनॅशनल सिलॅबसवर लिहायचे कितीतरी दिवस मनात आहे, >>> अरे, भारतीय सिलॅबसवर पन लिहि. आणि अर्थातच भारतीय व इंटरनॅशनल सिलॅबस यांची कंपॅरिझन हा ही एक मुद्दा असू दे लेखा मध्ये. Happy

माझि भाची फक्त प्रिस्कुल वाल्या ट्री हाउस मधे जाते सध्या ऐरोलीत.
तु वर दिलेला घनसोली चा जो पत्ता आहे, तिथे ती या जुलै पासुन सुरु होणार्या सेशन पासुन जाणार आहे.
- सुरुचि

आगाऊ म्हणतो ते बरोबर आहे. आपल्याकडे आयबी आणि आयजीएससी ही दोनच इंटरनॅशनल बोर्डस आहेत. आणि ही विशेषत: भारतीय तसेच भारताबाहेरील, परदेशी राजदूत, वकिलातीतील अधिकारी यांच्यासाठी उपयोगाची आहेत. त्यामुळे त्याचा फारसा फायदा आपल्याला होत नाही.

केंब्रिजबद्दल खूप जास्त तक्रारी आहेत. पैसे, दर्जा आणि एखाद्या ठिकाणची शाळा अचानक बंद करणं यासाठी ते माहीर आहेत. आगाऊ तू कोर्सेसबद्दल लिही. मला जमेल तेव्हा मी त्यात अ‍ॅडिशन करेन.

मला आणि माझ्या एका मैत्रिणीला नर्सरी स्कूल्स आणि तिथली परिस्थिती, इंटरनॅशनल स्कूल्स, खासगी तुकड्या, शाळा, फी, परीक्षापद्धती आणि त्यातल्या गरजा यांवर एक प्रेझेंटेशन द्यायला राज्य सरकारने सांगितलं होतं दोनेक वर्षांपूर्वी. आम्ही राज्यातल्या सुमारे ३०० शाळांचा अभ्यास करून ते दिलं. आणि त्यातले जवळपास ६० टक्के निकष आता राज्य सरकारच्या येऊ घातलेल्या कायद्यात घेतले जात आहेत. असो.

आपल्याकडे जास्तीत जास्त जनता ही प्रस्थापित बोर्डांमधून येणारी असल्याने महाविद्यालयांमध्ये जास्तीचा कोटा अशा बोर्डांसाठी रीझर्व्ड असतो तर बाकीच्या बोर्डांना ठराविक टक्केच कोटा असतो.

>>>

याला तत्त्वतः अनुमोदन.
म्हणजे कोटा असा नसतो, पण इतर बोर्डांचे इव्हॅल्युएशन पॅटर्न्स निराळे असल्यामुळे मुलांना त्याचा फटका बसू शकतो. आदित्यला सी.बी.एस.सी. इव्हॅल्युएशनप्रमाणे (CCE -Continuous and Comprihensive Evaluation) ९३% मिळाले. पण हा त्यांचा ९वी-१०वी संयुक्त निकाल होता. (९वीला पण त्यांना बोर्डाची परिक्षा होती.) निव्वळ १०वीच्या मार्च महिन्यातल्या फायनलमधे त्याला ९०% होते. SSC बोर्डाच्या कॉलेजमधे ११वीची अ‍ॅडमिशन आम्हाला या ९०% टक्क्यांच्या आधारावर घ्यावी लागली. तेव्हा सुरूवातीला काही दिवस तो जरा खट्टू झाला होता.
बोर्ड चेंज-ओव्हरच्या वेळेस असल्या प्रकारांची तयारी ठेवावी लागते.

९वी-१०वी संयुक्त निकाल होता. (९वीला पण त्यांना बोर्डाची परिक्षा होती.) >>>
म्हणजे? सी.बी.एस.सी. मध्ये ९वी आणि १०वी दोन्ही इयत्तांना बोर्डाची परीक्षा असते का? What abt ICSE then?

आणि ही विशेषत: भारतीय तसेच भारताबाहेरील, परदेशी राजदूत, वकिलातीतील अधिकारी यांच्यासाठी उपयोगाची आहेत. त्यामुळे त्याचा फारसा फायदा आपल्याला होत नाही.>>> एकदम अमान्य, या लोकांना त्याचा फायदा आहे हे खरेच, पण म्हणजे त्यांचा इतरांना उपयोग नाही किंवा बाकीच्यांनी त्यांचा विचारच करु नये हे चूक आहे.

आगाऊ, मागे तू आयबी अब्यासक्रमाचा उल्लेख केला होतास. ते वाचून पोराच्या शाळाप्रवेशाच्या वेळी आयबी अभ्यासक्रम असलेली शाळा बघणार होतो. इथे त्यातल्या त्यात जवळची आयबी शाळा ब्रिटिश काउंसलेटची आहे. ती सुद्धा ५-६ किमीवर आहे. आम्हाला तरी प्रवेश मिळू शकला नाही. मिळाला असता तरी फी परवडली नसतीच बहूदा.

अभ्यासक्रम चांगला असेल, शाळा चांगल्या असतिल. त्यांचा फायदा हावू शकतो. पण तिथे प्रवेश मिळू शकेल का आणि फी सर्वसामान्यांच्या आवाक्यातली आहे का हे पण बघावं लागेल ना?

सीबीएस सीत नववीची बोर्डाची परीक्षा असणार का?
मी यावेळची सीबीएस सी ची शाळाप्रवेश प्रक्रिया पाहिली. डीएव्ही ऐरोली मध्ये त्यांनी सर्व इयत्तांची परीक्षा घेतली. जास्त उमेदवार एल केजी व युकेजी , पहिलीचे होते.
एलकेजीच्या बाळांना ए टू झेड लिहायला १ ते ३० लिहायला व गाणी आणि काही असा अभ्यासक्रम होता. एक बाई म्ह्टल्या त्यांचा मुलगा आत गेला आणि रडतच बसला त्याला सर्व येत होते पण त्याने काहीच लिहीले नाही. तेव्हा तुमच्या मुलाची एल केजीची वेळ येइल तेव्हा त्याला एकट्याने बसून ए बीसी, १ ३- लिहायची, दुसर्‍या कोणी सांगितल्यास र्‍हाइम्स म्हणायची सवय करून घ्या म्हनजे प्रवेश सोपा पडेल. त्या शाळेत प्रवेशास फार गर्दी होती.

Pages