'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"

Submitted by जिप्सी on 28 February, 2012 - 00:27

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
=======================================================================
=======================================================================
एव्हाना सुधीरने (विवेकचा भाऊ) आम्हाला निवतीच्या समुद्रात नेण्यासाठी बोट तयार असल्याचे सांगितले आणि आम्ही "निवतीच्या समुद्रात"सफर करण्यास निघालो". या समुद्रसफरीचे वैशिष्ट्ये होते ते "निवती रॉक्स". निवती समुद्रकिनार्‍यापासुन काही अंतरावे मोठ मोठे खडक आहेत. या समूहालाच "निवती रॉक्स" म्हणतात. या खडकांभोवती समुद्रात अनेक ठिकाणी खडकांची टोके वर आलेली आहेत. रात्री हा परिसर बोटींसाठी धोकादायक तर आहेचः परंतु दिवसाही नेमकी माहिती असल्याशिवाय येथून बोटी नेणे धोक्याचे ठरते. जळून गेल्यानंतर खडक जसा काळा दिसतो तसेच दिसत असल्याने यास "बर्न्ट आयलंड" असेही म्हणतात. सुमारे दोन तासाच्या या समुद्रसफरीत आम्ही भोगवे बीच, देवबागचा किनारा आणि निवती किल्ल्याजवळुन फिरून आलो.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
निवती रॉक्स
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
निवती किल्ला
प्रचि १८
किल्ले निवती
प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
भोगवेचा समुद्रकिनारा

प्रचि २४
मेढा निवती गाव समुद्रातुन
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

सुमारे दोन तास समुद्रात मनसोक्त भटकुन आल्यावर आम्ही समुद्रस्नानाचा आनंद लुटला. Happy तोपर्यंत वैनींनी दुपारच्या जेवणात ताज्या फडफडीत माशांचा बेत केला होता. "कोकणात जाताना "कालनिर्णय" घरीच ठेवून जा" हा मायबोलीकर निलवेदचा सल्ला लक्षात ठेवून सौंदाळे, बांगडा फ्राय, तिखलं कालवं यावर सगळ्यांनीच यथेच्छ ताव मारला. Wink मीही यावेळी पहिल्यांदाच तळलेला संवदाळ आणि बांगडा मासा खाल्ला आणि आवडला Proud Happy
प्रचि २८

जेवणानंतर थोडावेळ आराम करून आम्ही वेंगुर्ल्याला निघालो.
(क्रमशः)

गुलमोहर: 

प्रतिसादाबद्दल आभार्स!!! Happy

ललिता, भाऊकाका, हेम >>>>:फिदी:
ती घरटी पक्षी आपल्या लाळेपासून करतात>>>>>हे वाचलं होतं Happy
अरे हातात काय जादू आहे तुझ्या....>>>>नाही रे. Happy जादू कोकणातल्या निसर्गातच आहे, मी आणि माझा कॅमेरा फक्त निमित्तमात्र. Happy

<<<जादू कोकणातल्या निसर्गातच आहे, मी आणि माझा कॅमेरा फक्त निमित्तमात्र. >>>>>
जिप्सी हा तुझा विनय आहे. नि:संशय कोकण सुंदर आहेच, पण ते कॅमेरात घेउन, आम्हाला त्याचे दर्शन घडवून आम्हा सर्वांना जे तू खुष करतोस ना ती कला तुझ्यात आहेच ना !

अ प्र ति म!!!!!! काय सुंदर समुद्र किनारे लाभलेत आपल्याला... ते असेच निर्मळ राहोत... रिसॉर्टस वगैरे झाले की सगळा चार्म निघुन जातो Sad

<<<जादू कोकणातल्या निसर्गातच आहे, मी आणि माझा कॅमेरा फक्त निमित्तमात्र. >>>>>
जिप्सी हा तुझा विनय आहे. नि:संशय कोकण सुंदर आहेच, पण ते कॅमेरात घेउन, आम्हाला त्याचे दर्शन घडवून आम्हा सर्वांना जे तू खुष करतोस ना ती कला तुझ्यात आहेच ना ! <<< ++१०० Happy

खूपच छान, अप्रतिम!!!! मस्त!!!! अगदी डोळ्यासागे पारणे फेडणारा.....

Pages