३ मार्च २०१२ - मुंबई गटग - विनय देसाई

Submitted by नीलू on 24 February, 2012 - 06:56
ठिकाण/पत्ता: 
गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर

.
.
मंडळीनू,

आपले हे मा अर्थात विनय देसाई हे भारत दौर्‍यार ईलेत.
सध्या कुडाळाक आसत पण १ तारखेपर्यंत मुंबैत येतले. आणि पुन्हा चार तारखेक माघारा जातले तेव्हा ३ तारीख शनिवारचो मुहूर्त साधून त्येंच्या भेटीचो गटग संपन्न करुया. Happy

एक तर विनयदादांची रविवारी जावची लगबग आसतली आणि काही लोकांका रविवार असो 'फुकट' घालवूक आवाडणा नाय. Wink शिवाय रेल्वेचे मेगाब्लॉक वगैरे यामुळे येवचे वगीच वांदे नको म्हणून शनिवार मुद्दाम धरलो हा.

तेव्हा येवक लागा.
वायच तेव्हढी नोंदणी करा पयली Happy

त.टि. : क्षुधाशांतीसाठी पार्कातलो वड्याचो कट्टो फेमस आसाच पण याव्यतिरिक्त कोणाक काय सगळ्यांसाठी हाडुचा आसात तर सहर्ष स्वागत आसा Proud
________________________________________________________________________
स्थळः गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर
वेळ : संध्याकाळी ४.३०

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 3, 2012 - 06:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीलू, मी पन येतंलय.

प्रज्ञा, तु भेटलं आसतंस तर बरां वाटलां आसतां गो.

मी ९९.९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ जमवूचो प्रयत्न करतय हां. >>>
शैलजा, माका तुका भेटुची आस लागली हां. तु जर इलंस ना तर तु लिवलेल्या ९९.९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ ह्या संख्ये एवढी चाकलेटां मी माज्यातर्फे तुकां भ्येट म्हणुन देयन ह्या माजा वचन आसा. Wink पन तु जर नाय इलंस ना तर तु लिवलेल्या ९९.९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ ह्या संख्येतला दशांश चिन्ह काडुन टाकल्यानंतर जी संख्या व्होयत ना तेव्हढे फटके तुकां मी पुण्यात येवन देतंलय समजला मां ? ............... Wink Proud

अगो, परीक्षेच्या दिवशी मी मुंबैत येयन तर माका परत घरात घेवचे नायत. मगे? Proud
आणि अनुश्काक काय वाटात अगो! माझी परीक्षा आणि आवस मुंबैत फिरता! लेकरु माझा हिरमुसला जायत गो.. Sad फायनल मां हे.

नीलू, स्वारी गो. गटगच्ये दिवशीच लेकीक पाव्हणे बघुक येनार आसंत, असो आजच मेल्या मध्यस्थान निरोप धाडल्यानहां....... शीरा पडो मेल्याच्या तोंडार, त्येका पन तोच म्हुर्त गावलो........काय करु ? Uhoh

गटग यशस्वी पार पडलो.
उपस्थित : गुरुकाका, विनय देसाई, नीधप, आनंदमैत्री, जिप्सी, सतिश.., सुन्या, यो रॉक्स, स्मि रॉक्स, मुग्धानंद, सुवर्ना जोशि, जाई.साहित्ययात्री, नीलू आणि फोनवरसून मास्तर
हेमांका भेटून बरा वाटला. उपस्थित सर्वांचा मनापासून आभार Happy

हेमानु Proud
नाय गो नी त्या जा.सा. स्वतः भिरभिरला आणि माकाय भिरभिरल्यायन. बरा आसस मगो जा. सा. ?

वृ !!!! हम्म !!!! कोण लिवता हा? जा.सा. बोललेला लिवतलय म्हणान. Wink

येस्स नीलू आय एम बरा

वृत्तांत
आँफिसातून निघून शिवाजी पार्कात पोचल्यानंतर खरी गंमत सुरु झाली.
गजालीकर सापडतच नव्हते .पूर्ण पार्कात दोनतीन फेऱ्‍या मारल्या. नीलू आणि मी एकमेकाना फोन करुन दमलो. शेवटी मी पांढरे निशाण फडकवल्यावर नीलूला दया येऊन सुन्याला घेउन यायला पाठवलं. त्यातही ग्रीन टाँपचा गोंधळ उडून पिँक अस नीलूने ऐकल्यामुळे सुन्या कन्फूज झाला. मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ शेवटी आम्ही सापडलो. त्यातही सुवर्णा जोशीना जासा समजण्यात आल्याचे कळले.
पोचेपर्यत उशीर झाल्याने नीधप आणि मंडळी निघण्याच्या तयारीत होती. मात्र सुवर्णा जोशीँचा उत्साह कायम होता पण नीलू आणि मुग्धा ताईनी निघण्याची तयारी केल्यानं त्यानाही कदमसाथ म्हणाव लागलं आणि पुढे टँक्सी पकडून मुलुंडच्या दिशेने मार्गक्रमणा केली.

आता ऊरले मी ,योराँक्स, स्मिराँक्स, जिप्सी, आनंद आणि सतीश
दादर स्टेशनावर पोचेपर्यत धमाल केली.
मधेच एका टपरीवर चहाचा आस्वाद घेतला.
तिथे सतिश यानी आपल्या चारोळीचे रहस्य सांगितलँ जिज्ञासूनी त्याना विपू करावा.
तिथून शिवाजी मंदिरात मँजेस्टिकत मधे गैलो. जिप्सीला पुस्तक घ्यायच होतं.
नंतर आनंदची फ्राँक घेण्यावरुन गंमत आली.
शेवटी दादरला पोचलो एकदाचे.
तिथे योराँक्स आणि जिप्सीची एलिफँटावरुन जुगलबंदी झाली.
शेवटी एकदाच निघालो.

मंडळी खरोखर बरं वाटलं सगळ्याना भेटून.
असेच गटग वारंवार होवोत ही प्रार्थना.

@नीलू हँहँहँ

@नीधप माझा कुर्ता ग्रीन होता ग ब्लू आणि पिँक नव्हता
तो सुन्या बिचारा पुतळ्याजवळ पिँक कुर्ती शोधत होता

ता क = या पुढचं गटग मुलुंड येथे योजलं आहे अस आमचा मु पो गजालीवरचा वार्ताहर कळवतो अँडमिननी यावर टिप्पणी करावी

अजून एक ता क = हेम आणि पुल देशपांडे यांच्या चेहऱ्‍यात बरेचसे साम्य मला आढळले

.

अजून एक ता क = हेम आणि पुल देशपांडे यांच्या चेहऱ्‍यात बरेचसे साम्य मला आढळले,
जा. सा., तुमका हे.मा. म्हणूचाहां कांय??

ग्रीन?? मला रंगांधळेपण आलं की काय? मला तरी स्काय ब्लू दिसला होता Happy

नंतर आनंदची फ्राँक घेण्यावरुन गंमत आली.<<<
याचे जरा संस्प द्याच्च. आनंद चव्हाण यांनी दिले तरी चालेल Wink

मंडळी, तुम्हाला भेटुन लैच मजा आली. सगळ्यांचे आभार. विशेषतः, सुवर्णा आणि जाई चा गोंधळ अवर्णनिय.
पुढचे गटग मुलुंड मुक्कामी.

<मला रंगांधळेपण आलं की काय? मला तरी स्काय ब्लू दिसला होता > १०० % अनुमोदन. कंसातील वाक्ये कुठेतरी बोलले नाही, तर अजीर्ण होइल मला आता.

कालचो गटग मस्तच... आधी थोडा शिस्तीत नि मग संपता संपता नेहमीच्या बेशिस्तीत गटग पार पडला ! पार्कात सगळ्यांना भेटून आनंद झाला.. खासकरुन विनय देसाई व गुरुकाका ! सतिशदांचे आभार फॉर बेबिंका ! मस्त चव ! नविन मंडळीची छान ओळख नि मग पार्क ते दादर स्टेशन चलते चलते एन्जॉय किया ! Happy

जा. सा. वा सांगल्याप्रमाणे लिवलस मस्त!! Happy

>> मग संपता संपता नेहमीच्या बेशिस्तीत गटग पार पडला >> म्हणजे रे काय योग्या? Uhoh
>>मला तरी स्काय ब्लू दिसला होता >> माकाय.

म्हणजे रे काय योग्या? >> बेशिस्तीत म्हणजे गटगाक नेहमीचो चालणारो मायबोलीकरांचो दहिकालो..गोंधळ..धुमाकूळ गे.. Happy

धयकालो करूक तितक्या लोकां जमूक व्हयो. ४:३० च्या गटगक ६:१५ वाजता लोक इले तर खयचो धयकालो रे? Happy

(भाषेच्या चुका सुधारा!)

(भाषेच्या चुका सुधारा!) >> नक्की कोणाक.. कारण माझाच मालवणी कच्चा ! धयकालो शब्द बरोबर आसा गे !

ए पण ४.३० टू मच ! हाल्फडे काम करुन इल्यानंतर वायच जेवण नि वामकुक्षी महत्त्वाची.. Proud बाकी टांगारुंना कुठलाही टाईम दिला तरी टू मच च ! Wink बाकी पुढचा गटग बोरिवलीच्या नॅशनल पार्कात ना.. मुलुंड, ठाणे परिसरात नको.. जुने झालेय.. चेंज हवा.. मेजोरीटी नको Lol

नीधप ने चक्क धयकालो लिवल्यान आणि योग्या तू दहिकालो लिवतस.. तू बायलेची शिकवणी लावच हा आता Proud

धयकालो करूक तितक्या लोकां जमूक व्हयो. ४:३० च्या गटगक ६:१५ वाजता लोक इले तर खयचो धयकालो रे?>>>धयकालो करूक तितकी लोकां तरी जमूक व्हयी मा. ४:३० च्या गटगक ६:१५ वाजता लोक येतत तर खयचो धयकालो रे? >> एक्झॅक्टली Wink

आसो एकूण धयकालो नी शिमग्याशिवाय गजाली गटगक मजा कसली ?

यावेळेचो पुढचो वृतांत स्मि बाय कडसून येवक होयो.

>>बाकी पुढचा गटग बोरिवलीच्या नॅशनल पार्कात ना.. मुलुंड, ठाणे परिसरात नको.. जुने झालेय.. चेंज हवा.. मेजोरीटी नको >> यावर तुम्ही येवच्या आधी आमचो बरोच खल झालो. सेंट्रलाक ठेवलो तर वेस्टर्न वाले आराडतत आणि वेस्टर्नाक ठेवलो तर सेंट्रलवाले. यावर गुरुकाकांनी नामी उपाय सांगलो की भाईंदरपासून ( होया तरभाईंदर) ते कल्याण/ कर्जत्/आसनगाव व्हाय व्हीटी / चर्चगट असो रेल्वेने प्रवास करुचो रेल्वेच्या डब्यात जो काय होयत तो गट्ग म्हणजे कोणाक पार्शलिटी झाल्यासारखी वाटूक नको आणि परत येताना आपापली स्टेशना ईली उतरुन घरी जावचा Proud

Pages