लोकेशन रे लोकेशन !

Submitted by मनीषा- on 15 February, 2012 - 11:32

लोकेशन रे लोकेशन !
हिंदी सिनेमा मधली गाणी म्हणजे आवडीची गोष्ट एकदम . त्यातून ती ५०-६०-७० च्या दशकातली म्हणजे तर गाणे दहा वेळा बघितले असले तरी नजर जराही हटायला तयार होत नाही .
स्टुडीओच्याबाहेर चित्रण झालेली , काही गाणी बघताना एकदम जाणवले की अरे हे मागे दिसते आहे ते तर आपण पाहिलं आहे . आणि मग सुरु झाला एक वेडगळ छंद , ज्यात गाण्यापेक्षा, हिरो आणि हिरविणीपेक्षा, मागच्या इमारती , बागा वगैरे निरखून बघण्याचा .

अशीच काही नमुने दाखल गाणी तुमच्या साठी . आपल्या ओळखीच्या ऐतिहासिक स्थळा ची एक चक्कर घडवून आणणारी ..
1. तुमने किसीकी जान को जाते हुवे देखा ही – राजकुमार – शम्मी कपूर आणि साधना हे ज्या शिल्पांनी नटलेल्या प्रांगणमधून फिरतात ते महाबलीपुरम इथले पंच रथ हे ठिकाण . तिथल्या एकपाषाणी हत्तीवर बसून शम्मी साधनाला विनवतोय हे दृश्य बघून अंमळ मजा वाटली . पंच रथ हा एकपाषाणी मंदीर व शिल्पांचा एक मोठा समूह आहे . हा अजुन एका मनोजकुमार च्या गाण्यात आहे. गाणे सापडले की लिहिते.

2. मै तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने – सुनील दत्त व आशा पारेख – उदयपूरच्या सहेलीयोकी बाडी मध्ये बागडत आहेत

3. चला भी आ आजा रसिया - मन की आंखे - वहिदा रेहमान – काश्मीर मधले मार्तंड मंदीर/ अवंतीस्वामी मंदीर ( जाणकारांनी खुलासा करावा) . तिथल्या हिरवळीवरून दुख्खी चेहर्याने फिरणाऱ्या वहिदा रेहमान मुळे निदान तो प्राकार तरी आपल्याला नीट दिसतो.

४. ओ मेरे राजा - जॉनी मेरा नाम मध्ये - नालंदा विद्यापीठाचे भग्नावशेष दिसतात. देव आनंद, हेमा आणि जगदीश राज ह्यांच्या मधुन विद्यापीठीय आवारामधले विहार आणि स्तूप डोकावत आहेत.

५. काटोंसे खीचके ये आंचल - गाईड - चित्तौरगडाचे व त्यात ही विजय स्तंभांचे दर्शन घडते आहे. आणि त्यानंतर राणी पद्मिनी च्या महालाचे

काश्मीर मधील निशांत, शालिमार व चष्मे-शाही बागा तर अनंतवेळा पार्श्वभूमी म्हणुन वापरल्या गेल्या आहेत.
तुम्हाला आठवताहेत का अशा काही जागा आणि अशी काही गाणी?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान धागा... हम है राही प्यार के.. घुअ‍ॅघट की आड से दिलबर का... कुठला राजवाडा आहे की तो सेट आहे?

मैसूरचं वृंदावन गार्डनही बर्‍याच गाण्यांत दिसलं आहे. झनक झनक, पडोसन ही पटकन आठवणारी नावं.
मुंबईचं बाबुलनाथ मंदिर परिंदामधल्या 'तुम से मिलके' गाण्यात आहे.

सुंदर धागा...

रेश्मा और शेरा मधलं हे एक सुंदर काव्य. लताबाईंचा सुर, जयदेव यांचं संगीत आणि वाळ्वंटातील डुन्सच्या सौंदर्याचा अनोखा मिलाप!

http://www.youtube.com/watch?v=s3W8UyFR0hQ

हे काय, कुणाला गाणी आठवतच नाहीयेत वाटतं !

जागोमोहन, त्य गाण्यात राजस्थान मधले हेरिटेज हॉटेल असावे असे वाटते.
स्वाती, बाबुलनाथ मंदीर दिसलेच नाही ग...

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या बर्‍याच चित्रपटात दिसणारी छोटा काश्मीर बाग, मला वाटत धर्मेंद्र, अमिताभ, शर्मिला टागोर यांच्या चुपके चुपके मधे पण दिसली आहे Happy Happy Happy

देव आनंदचं " तु कहां ये बता, इस नशिली रात में" हे मसुरीच्या रस्त्यांवर चित्रीत झालय.
शम्मी कपुरच्या बर्‍याचशा गाण्यात गुलमर्ग, नैनिताल, शिमला चं शुटींग आहे.

पुण्यातले बंडगार्डन.. शम्मी कपूरचं एक गाणं...

टेबललॅण्डवरपण बरीच गाणी झालीयेत... राजा हिंदुस्थानी मधलं एक गाणं...

विजयपथ मधलं गाणं भंडारदर्‍याच्या रंधा फॉल्स च्या इथे...

हम है राही प्यार के.. घुअ‍ॅघट की आड से दिलबर का... कुठला राजवाडा आहे की तो सेट आहे?- उदयपूरचा सिटी पॅलेस.

जागो, तो जैसलमेरचा पॅलेस आहे.
अजून एक फेमस राजस्थानी लोकेशन, गाईड मधला चित्तोडगड.
भालजींच्या अनेक सिनेमांचे शुटींग पन्हाळ्याला झाले आहे उदा. 'मराठी पाउल पडते पुढे' हे गाणे पन्हाळ्याच्या तीन दरवाजा भागाचे आहे. महेश कोठारेच्या सिनेमातही पन्हाळा डोकावतो.
बनवाबनवी मधले 'विश्वास सरपोतदारांचे' घर नक्की कुठे आहे? तो सेट वाटत नाही.

बांग्लादेशातील चितगाव येथिल स्वातंत्र्य पुर्व काळातील घटनेवर आधारीत आशुतोश गोवारीकरचा 'खेले हम जी जान से' चे पुर्ण शुटिंग हे सावंतवाडीचा राजवाडा आणि आजुबाजुच्या परिसरात झाले आहे.. Happy

सरफरोश मधले 'जो हाल दिल का' का काय ते गाणे पन्हाळ्याच्या आसपास चित्रित केले गेले आहे.

बनवाबनवी मधले 'विश्वास सरपोतदारांचे' घर नक्की कुठे आहे? >>> त्या चित्रपटाच बरचसं शुटींग पुण्यात झाल होत ना?

महेश कोठारेच्या सिनेमातही पन्हाळा डोकावतो.>> विशेषतः पॅरेडी गाण्यात.
आम्ही मावशीच्या गावाला जाताना मग एकमेकाना सांगत असायचो हे बघ त्या गाण्यातली छत्री... Happy

'स्वदेस' मधलं 'यूंही चलाचल' गाणं सुद्धा वाई मध्ये चित्रीत झालंय. गाण्यामध्ये कमळगड एक-दोनदा दर्शन देऊन जातो.

तरकीब चित्रपटातलं तब्बू आणि मिलिंद सोमणचं ' किसका चेहरा अब मै देखू' हे नितांत सुंदर गाणं मध्यप्रदेशातील पंचमढीत शूट केलय... सुंदर जागा आहे ती पण फेमस नाहीय.

अशोका चित्रपटातलं 'सन सनन सन सनन' सुद्धा पंचमढीतील एका धबधब्यात शूट केलय.

देख एक ख्वाब तो ... हे हॉलंडच्या कुकेन्हॉफ ट्युलिपच्या मळ्यात चित्रीत केले आहे.