खजुराचे पौष्टिक लाडु.

Submitted by प्रिति १ on 13 February, 2012 - 10:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/४ किलो खजुर,
१ चमचा तुप,
१०-१२ काजु, १०-१२ बदाम,
लहान अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा किस.

क्रमवार पाककृती: 

१/४ किलो खजुर घ्यावा. त्यातील बिया काढुन तो स्वच्छ घुवावा. मग कोरड्या कापडाने पुसुन घ्यावा.
पुर्ण कोरडे झाल्यावर त्यात लहान चमचा तुप घालुन तो मिक्सर मधुन थोडा बारीक करुन घ्यावा. अगदी
बारीक नको.

नंतर सुके खोबर्‍याचा किस एका कढईत थोडासा परतुन त्याचा चुरा करावा. मग काजु आणि बदामाचे काप किंवा हवे त्या आकाराचे तुकडे करावेत. हे सगळे जिन्नस त्या खजुराच्या मिश्रणात घालुन चांगले
मिक्स करुन त्याचे छोटे छोटे लाडु वळावेत. ज्यांना खुप गोड पाहिजे आहे, त्यांनी थोडा गुळ किंवा साखर घालायला हरकत नाही. नाही तर खजुर तसा गोडच असल्यामुळे तशी गरज नाही. मी साखर किंवा गुळ घातला नाही.
मग झाले लाडु तयार. Happy

वाढणी/प्रमाण: 
आवडेल त्या प्रमाणात. एका वेळी १ च खाणे...यात १२-१३ लाडु होतात. :)
अधिक टिपा: 

थंडीत खायला मस्त आणि करायला सोपा असा हा पौष्टिक पदार्थ आहे.

माहितीचा स्रोत: 
माझी मैत्रिण प्रज्ञा १२३
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिती, मस्त लाडू! खरंच बाई तू सुगरण!
<<<<त्यातील बिया काढुन तो स्वच्छ घुवावा. मग कोरड्या कापडाने पुसुन घ्यावा.>>>>
ही आयडिया फारच छान! Happy

बी धन्स..
प्रज्ञा, तुझ्यामुळेच मी हे लाडु करु शकले. म्हणुन तुला डबल धन्स..:)
ती आयडिया पण तुझीच.. तुझे नाव घातलेले पाहिलेस कि नाही ?

उद्या येणार असशील तर आणते चवीला...

प्रीती, थँक्स ! इतके जास्त आणले होते खजुर, कि फ्रीजमधले खजुर संपता संपत नव्हते. ही मस्त रेसिपी आहे. सकाळी दुधाबरोबर/नंतर एक खाल्ला कि मस्त हेल्दी आणि टेस्टी दोन्ही पर्याय झाले. Happy

तु आणि प्रज्ञा ऑफिसात बसुन निग आणि रेसिपीजच्या गप्पा मारता का गं? किती लकी ! Happy

मनिमाऊ, आंम्ही लंच च्या वेळेत कधी कधी मारतो गप्पा नि.ग. आणि रेसिपि वर. ( वेळा उरला तर बाकीच्या विषयातुन ) Happy

खरचं लाडु सोपे आहेत. करुन बघ. नक्की आवडतील.

छान लाडू. गल्फमधे खजूराची बी काढून त्यात बदाम भरुन ठेवतात. तसेच ते विकायलाही असतात.
पण तिथले खजूर एका वेळी जास्तीत जास्त तीन खाऊ शकतो मी, इतके गोडमिट्ट असतात.
बिनसाखरेची, बिनदूधाची पण भरपूर वेलची घातलेली कॉफी (काहवा) आणि हा खजूर असे खायची पद्धत आहे.

दिनेशदा, धन्स... नवीन माहिती समजली. तिकडच्या खजुर आणि कॉफीबद्द्ल...:)

कांचन व दक्षिणा धन्स... तुम्ही पण लगेच करुन मला कसे झालेत ते नक्क्की कळवा. Happy
कांचन, कुरियर ने पाठवुन देऊ का ? Happy

सवी २०१०, ते खजुर कसले म्हणालीस? कळले नाही. खजुर कधी कधी स्वच्छ नसतो ना. म्हणुन धुवुन
घ्यायचा. ईतकेच.. चांगला स्वच्छ असेल तर धुवायची गरज नाही . Happy