भारत सरकारचा न्याय

Submitted by विवेक नाईक on 10 February, 2012 - 09:02

भारत सरकार, पंत प्रधानांच्या आदेशा नुसार सर शोभा सिंग यांचे नाव दिल्ली तील
विंडसर विला (केनाऊट प्लेस) या ऊच्चभ्रू वस्तीला देण्याचा घाट घालत आहेत.

कोण आहेत हे सर शोभा सींग . सर शोभा सिंग हे प्रख्यात
लेखक खुशवंत सींग यांचे वडील. त्यांचा जन्म सद्द्या पाकिस्तानात असलेल्या शाहपूर जिल्ह्यन्म१८९०
साली झाला.

ऐन स्वातंत्र संग्रामाच्या धका धकीच्या काळात, स्वातंत्र संग्रामाला मदत करण्या ऐवजी त्यांनी
आपल्या वडीलांच्या बांधकाम व्यवसायात त्यांनी प्रवेश करून वडीलांचा व्यवसाय वाढवला. आर्धी दिल्ली
अवघ्या २ रु प्रती वर्ग यार्ड ने विकत घेऊन ते दिल्लीचे मालक बनले.

एवढ सर शोभा सिंग यांच गुण गान का करतोय ?
कारण ह्याच सर शोभा सिंग नी शहीद भगत सींग विरूद्ध साक्ष दिली होती.
त्या साक्षी मूळेच भगत सींग, सहदेव व राजगुरु यांना मरे प्रयंत फाशी ची शिक्षा झाली. तत्कालीक
ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली.

ह्याच सर शोभा सिंग यांना भारत सरकारने देश सेवे साठी पद्मभुषण ही पदवी १९७४ ला दिली.

आणी आता भारत सरकार सर शोभा सिंग यांचे ना व दिल्लीतील एका विभागाला देणार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोकजी, तुम्ही जो संदर्भ दिला आहेत किंवा जे मत लिहिले आहे ते योग्य आहेच पण अशा काही गोष्टी आहेत की ज्यावरून लगेच कळून येते की अहिंसामार्गाच्या पुरस्कर्त्यांचा अतोनात उदोउदो आणि क्रांतिकारी मार्गाने गेलेल्यांची आठवण पण नाही. जास्त लिहित नाही कारण धाग्याला वेगळे वळण लागेल आणि तसेही या विषयांवर इतर धाग्यांवर चर्चा झालेल्या असणार आहेत आधीच. धन्यवाद !

अहिंसामार्गाच्या पुरस्कर्त्यांचा अतोनात उदोउदो आणि क्रांतिकारी मार्गाने गेलेल्यांची आठवण पण नाही.

कसला उदोउदो? सगळ्याच लोकांच्या नावाने रस्ते ( गांधी ते भगत्सिंग) , पुतळे , गावाची , गल्लीची नावे, पूल, रेल्वे टर्मिनस ( लोकमान्य टिळक टर्मिनस-टिळकनगर) , विमानतळे( सावरकर- अंदमान विमानतळ, नेताजी- कलकत्ता विमानतळ) ,बंदरे , विविध पुर्स्कार, टपाल तिकिटे, शाळेत फोटो, शाळेत लहान पोरांच्या भाषण स्पर्धा... ... सगळे आहे.. सगळ्यांच्या नावानं कथा दंतकथा आहेत.. ( टिळक- फोलपटे, सावरकर- एकनाथ-हिरवा यवन कथा) Proud

त्यांची आठवण ठेवायला अजुन काय करायला हवे? फार्फार तर सैन्यात त्यांच्या नावाने फलटणी काढव्यात.. कारण ते बाँब्/तलवार/शस्त्रवाले होते. तेच त्यांचे खरे स्मारक ठरेल... ( जाताय का सैन्यात, त्यांच्या नावाने फलटणी काढल्या तर.. ? Proud तुअमच्यासारख्या जहालगट्प्रेमीनी खरे तर हे आधीच करायला हवे होते...आता साठ वर्षे झाली देशाला.. )

फादर ऑफ नेशन ही पदवी आणि नोटेवर चित्र हे मात्र एकाचेच असणार.. कारण बाप एकच असतो. Proud
-जागो'मोहनदास'प्यारे Happy

महेश :

"अहिंसामार्गाच्या पुरस्कर्त्यांचा अतोनात उदोउदो आणि क्रांतिकारी मार्गाने गेलेल्यांची आठवण पण नाही."

~ तुमच्या या मताचा आदर करूनही मी असे म्हणेन की, असे जर झाले असेल वा होत असेल तर त्याला कारणीभूत त्या त्या काळात दिल्लीच्या पार्लमेन्टमध्ये येणारे पक्षीय सरकार आहे. शेवटी घटनेतील तरतुदींना अनुसरून तुम्ही आणि आम्ही काहीना तिथे निवडून पाठविले आहे. सत्ताधारी पक्ष ज्या विचारप्रणालीचा असेल त्या धारेत येऊ शकणार्‍या तत्वाला अनुसरूनच तो आपली कारकिर्द अधोरेखीत करेल.

वर श्री.मोहनराव म्हणतात त्याप्रमाणे कोणत्याही पक्षाच्या सरकारकडून वेळोवेळी स्मृतीचिन्हे प्रकाशित करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी तनमनधन अर्पण करून लढलेल्यांना विनम्र अभिवादन केलेले असतेच.

तुम्हाला भारतीय "जनसंघा"चे संस्थापक 'श्यामाप्रसाद मुखर्जी' यांच्याविषयी काही माहिती आहे ? कट्टर हिंदुत्ववादी नेता आणि तितकीच लोकप्रियता लाभलेल्या या नेत्याने स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात काश्मिर प्रश्नावरून पं.नेहरूंनाही कित्येकवेळा निरुत्तर केले होते. जनसंघाच्या स्थापनेमागील त्यांचा हेतू हा काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत 'अखंड हिंदुस्थान' हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे होते. मा.अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवानी, नानाजी देशमुख आदी नंतरच्या काळातील बडे नेते हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तालमीत तयार झालेले होत. अशा या एका लोकप्रिय नेत्याच्या गूढ मृत्यू झाला [त्यावर इथे चर्चा नको, फार सविस्तर लिहावे लागेल इतकी त्याचा व्याप्ती आहे]. त्यांच्या मृत्युनंतर तर खुद्द अटलबिहारी वाजपेयी यानी थेट पंडित नेहरू याना जबाबदार धरले होते.

पण जे व्हायचे ते होऊन गेले. असे असूनही सध्याच्या कॉन्ग्रेस सरकारने 'श्यामाप्रसाद मुखर्जी' यांचे भारतीय स्वातंत्र्यकाळातील योगदान विसरलेले नाही. पक्षभेद असूनही त्यांच्या कार्याची पावती म्हणून एकदोन वर्षापूर्वीच नवी दिल्लीत सुमारे ६०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महापालिकेच्या इमारतीला 'डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्मारकभवन" असेच नाव दिले, ज्याचे उदघाटन गृहमंत्री पी.चिदंबरम यानी केले होते. आपल्या मुंबईतदेखील त्यांच्या नावाने एक चौक आहेच.

महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून गौरविले जाणारे स्वा.सावरकर, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू यांचेही असे स्मरण केन्द्र आणि राज्य शासनातर्फे झाल्याची उदाहरणे आहेतच.

थोडक्यात अहिंसेच्या असो वा सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने असोत, देशासाठी कार्य केलेल्या प्रत्येकाचे स्मरण पक्षभेद बाजूला ठेवून अगत्याने केले जाते, हे कृपया लक्षात घ्यावे.

अशोक पाटील

अशोक तुमचा निषेध आहे.....:)

इतके लोक पेटवत आहे धागा आपापल्या परी ने पण आपल्या सुज्ञ आणि वैचारिक पोस्टींमुळे त्याच्या सगळ्या क्रियाकर्मावर पाणी पडत आहे................... Happy

उदय आणि मोहनराव ~

मग मी करू तरी काय ? केदार, फारएण्ड, सेनापती, विशाल कुलकर्णी प्रभृती इथली बडी मंडळी म्हणतात "लिहा". आता लिहायचेच तर मला अशाच पद्धतीने लिहिता येते मित्रानो.

बघू सदस्य मनोवृत्तीत किंचितसा फरक पडला तरी आनंदच होईल. अन्यथा तुम्ही म्हणता तसे कर्मावर पाणी पडण्याचे पाहणे आले तर मग आपण तरी काय करणार ? शांत राहायचे.

थॅन्क्स फॉर अप्रेसिएशन.

अशोक पाटील

तुम्ही लिहा. भरपूर लिहा.. पुराणकाल, मध्ययुग आणि अर्वाचीन इतिहस असे तीन स्वतंत्र धागे काढायला हवेत.. तिथे तुमच्यासारखे लोक शंकाना उत्तरे देतील.. ( तुम्ही कुठल्यातरी वेब साइटवर सास्त्रीय संगीतावर लिहिले आहे का? वाचल्यासारखे वाटते. तेही लिहा. )

होय, मोहनराव ~

"रागदारी सौंदर्य" अशा शीर्षकाने चार भाग लिहिले होते व त्यांची तुमच्यासारख्याच तेथील जाणकारांनी स्तुती केली होती. अर्थात मी आता नम्रपणे सांगू इच्छितो की, माझा शास्त्रीय संगीतावरील सखोल म्हणावा असा अभ्यास नाही. पण मी 'कानसेन' असल्याने हिंदी चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांचा फार चाहता झालो, त्यामुळे साहजिकच मग हिंदुस्थानी रागदारीकडेही [काही मित्रांच्या सक्रिय पुढाकाराने] वळलो आणि दिग्गजांच्या कारकिर्दीच्या थोडाफार अभ्यास केला.

बस्स, तितकेच. त्यामुळे त्या विषयावर लिहिलेले लेख आळीपाळीने कोल्हापुरातील त्या क्षेत्रातील काही माहितीच्या नामवंतांकडे अवलोकनार्थ प्रथम दिले, त्यांच्याकडून अप्रुव्हल घेऊन [तसेच त्यानी सुचविलेल्या दुरुस्त्याही करून] मग "मीमराठी' वर प्रसिद्ध केले होते.

पुराणकाळ, मध्ययुग, प्राचीन अर्वाचीन इतिहास यावरही लिहायला/प्रतिसाद द्यायला नक्की आवडेल मला. वेळ मिळेल तसा प्रयत्न करीन, नक्की.

अशोक पाटील

( डायरेक्टच लेख लिहा. कुणाचे अ‍ॅप्रुवल कशाला? इथे कुणाला माहीत असेल तर ते करेक्ट करतील की. )

हा लेख बुधवार् जुलै २७ २०११ ला प्रसिद्ध झाला.

WEDNESDAY, JULY 27, 2011
Bhagat Singh vs Sobha Singh
NEW DELHI: Prime Minister Manmohan Singh may have just wanted to reaffirm
his idea of 'nation building' when he asked Delhi Chief Minister Sheila
Dikshit to name a spot in the national capital after Sir Sobha Singh,
writer Khushwant Singh's father and the 'builder' of modern Delhi. But it
seems that he was rubbing some of his patriotic countrymen the wrong way.

The PM, citing a representation, had written to Dikshit on June 28 to name
an area after Sir Sobha Singh, who was a key contributor in the
construction of landmarks in the Capital, including Connaught Place. Acting
on the letter, the Delhi Government zeroed in on Windsor Place and has
moved the proposal to the Home Ministry seeking permission to rename the
area to mark the 100th anniversary of Delhi being declared the national
capital.

Freedom fighters and Left parties are up in arms against the PM's
name-changing move. They feel that Sir Sobha Singh had deposed against
Shaheed-e-Azam Bhagat Singh in a Lahore court which led to his martyrdom.
Upset with the decision, some of them have written to the PM urging him not
to go ahead with the plan while others have begun a massive letter campaign
representing the entire country. There are also plans to hold a dharna and
a candlelight march at Windsor Place.

Leading the pack is the Bhagat Singh Kranti Sena. It has written to the PM
reminding him that Sobha Singh was the person who gave a statement against
freedom fighters—Bhagat Singh and Batukeshwar Dutt—in the Lahore Bomb case
because of which they were hanged to death.

"Bhagat Singh is a source of inspiration for the youth of the country.
Whenever somebody talks about youth patriotism, Shaheed Bhagat Singh's name
comes up. This decision of the PM has hurt the sentiments of the entire
country," Bhagat Singh Kranti Sena has said in its letter.

Source :
http://expressbuzz.com/thesundaystandard/bhagat-singh-vs-sobha-singh/297...

जर सर शोभा सिंग जर दोषी नव्हते तर सरकार मागे सरण्याच कारण काय ?

अशोक राव तुमच्या ईतिहासाच्या माहितीला सलाम पण जर राष्ट्रिय पेपरात अस लिहुन आले तर लोकांना
चुकीची माहिती जाणार नाही का?

"सर शोभा सिंग" ह्यांचा बद्दल माहिती देणारा धागा नक्कीच चांगला आहे. माझ्यासारखे नक्कीच अजून काही असतील ज्यांना "सर शोभा सिंग" ह्यांच्या बद्दल काहीच माहिती नसणार. अशोकदाचे अभ्यासपूर्ण लेखन आणि घडून गेलेल्या घटनांच्या मुळाशी जाऊन सखोल अभ्यास करून दिलेले माहितीपूर्ण प्रतिसाद ह्यांच्या मुळे माझ्यासारख्या इतिहास मनापासून न आवडणाऱ्या व्यक्ती सुधा कित्ती मन लावून हा धागा वाचत आहेत. अशोकदानी दिलेला प्रत्येक प्रतिसाद हा खरच अभ्यासपूर्ण आणि जिज्ञासा उत्पन्न करणारा आहे.

अशोकदा तुमचे मनापासून धन्यवाद आत्ता तुमचे मायबोलीवरचे लिखाण मी नक्की follow करणार. पानिपत आणि सर शोभा सिंग या दोन्ही धाग्यावर तुम्ही दिलेले प्रतिसाद तुमच्या इतिहासाच्या माहितीपूर्ण अभ्यासाची साक्ष देतात.

~शाळेत असताना तुमच्यासारखी इतिहासाची आवड असणारी व्यक्ती शिक्षक म्हणून मिळाली असती तर.....कदाचित आज कॉम्पुटर इतकाच इतिहास सुधा आवडीचा विषय झाला असता~

श्री.विवेक ~

कृपया आता या विषयावर चर्चा नको कारण ज्या विचाराने हा धागा सुरू झाला होतो तो निर्णयच आता केन्द्र आणि दिल्ली राज्य सरकारने पूर्णतः बंद केला असल्याने त्यावर चर्चा करण्याचे कारणच उरलेले नाही.

तुम्ही भारताच्याच प्राचीन/अर्वाचीन इतिहासातील कोणत्याही पिरिअडविषयी नवीन धागा सुरू करा, तिथे मला भाग घेण्यास निश्चित्तच आनंद होईल. [फक्त काही पूर्वग्रह नक्की करून विषयाची मांडणी करू नका, कारण अशावेळी त्याच्या मागे इतिहासाचा अभ्यास नसून एक वेळ जाण्यासाठी निर्माण केलेली धुनी इतकेच रूप त्याला प्राप्त होते.]

धन्यवाद

अशोक पाटील

थॅन्क्स अनन्या ~

मी देखील इतिहासाकडे एक आवड म्हणूनच पाहतो [पदवीचा माझा तो विषय नव्हता. इंग्रजी होता]. जितका वैभवशाली इतिहास तितकाच मनी वैफल्य निर्माण करणाराही. इतके रंग भरले आहेत आपल्या हजारो वर्षाच्या इतिहासात की प्रत्येक शतकावर एक महाकाव्य निर्माण होईल. राग लोभ मद मोह माया मत्सर संताप आदी अनेक रसांची पानोपानी साक्ष त्याच्या अभ्यासातून वाचकाला मिळत जाते. फक्त खोट्या अभिमानाने "मी अमुक एका कुळाचाच इतिहास पाहाण्यासाठी त्याचा अभ्यास करीन' अशा आविर्भावाने या डोहात उतरल्यास नैराश्यच पदरी पडेल.

आणखीन् एक : इंग्रजांनी दीडशे वर्षापेक्षा जास्त काळ आपल्यावर राज्य केले. पण म्हणून ते सदोदित आपले शत्रूच होते आणि हिंदुस्थानाला पिळून काढण्यासाठीच इथे व्हॉईसरॉय येत असत असे चित्र नजरेसमोर आणून त्याच्या कालावधीकडे पाहिल्यास तो कॅनव्हास भडक रंगानीच चितारलेला दिसणार. इतकी वर्षे कोट्यावधी लोकांच्यावर ते अखंडपणे राज्य करीत होते म्हणजे नक्कीच त्यांच्यात काही क्वालिटीज् असणार हे ओघानेच आले. इतिहासाचे हे काम की मग त्या कोणत्या अशा क्वालिटी ज्यामुळे एवढ्या खंडप्राय देशाला त्यानी मुकाट बसविले ?

पण होते असे की त्यांच्यातील अशा काही चांगल्या व्यक्तीरेखांचा अभ्यास करून काही लिहायचे म्हणजे लिहिणारा देशद्रोही हे सहजपणे उपलब्ध असलेले उपरणे त्याच्यावर टाकून त्याला गप्प बसविणे. इतिहासाची पाने ही पुढील पिढीसाठी काहीतरी शिक्षण देण्यासाठी असतात त्याचे दहन म्हणजे येणार्‍या पिढीच्या बुद्धीमत्तेचे पंख आपण छाटून टाकतो याचा विवेक जनता दाखवत नाही.

असो. तुम्हास या विषयाची गोडी काही प्रमाणात लागली म्हणजे मलाही त्यामुळे आनंद झाला असेच मी मानेन.

अशोक पाटील

अशोककाका, शास्त्रीय संगीताबद्दलच्या तुमच्या लिखाणाबद्दल जामोप्यांच्या आवाहनाला माझेही अनुमोदन Happy
येवु द्यात.... (तिथेही तुम्ही ही लेख मालिका अर्धवटच सोडली आहे Angry ) Happy

अरे विशालबाबा ~ 'तिथे' ती मालिका अर्धवट सोडण्याचे कारण. पाचव्या आणि अंतीम भागाच्या समयीच राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आम्हाला त्या 'अत्यावश्यक ड्युटी' म्हणून क्रमप्राप्त असल्याने, त्यातच तब्बल तीन तालुके माझ्या नावावर आल्याने, त्या संदर्भातील भटकंती (दगदगीची नसली तरी सतत गर्दीतील असल्याने) सुरू झाल्याने तशा लेखनासाठी जो निवांतपणा लाभणे जरूरीचे असते तो मिळत नव्हता. आत्ताही बघ, मतदान झाले ७ फेब्रुवारीला, मोजणी होती ८ ला, पण नेमके त्याचवेळी मनसे आणि राष्ट्रवादी दोघांनी आयोगाकडे अर्ज दाखल करून महापालिकांच्या मतमोजणीवेळीच [म्हणजे १७ फेब्रुवारी] जि.प.ची मतमोजणी करावी असे म्हणणे मांडले [अर्थात ते योग्यच होते म्हणा]. अर्ज मंजूर झाला आणि आम्ही अधिकारी मंडळी त्या ७ तारखेपासून पेट्या घेऊन कलेक्टर व डीएसपी ऑफिस स्ट्राँग रूममध्ये 'पहार्‍या' वर बसलो आहे. सोबतीला पुस्तके आणि लॅपटॉप असल्याने निदान इथे प्रतिसादात तरी गुंतता येत आहे. पण "रागदारी' लिहून ते लिखाण संबंधिताला दाखविल्याशिवाय त्यावर निर्णय घेता येत नाही, म्हणून थांबलो आहे.

इथे ती मालिका "जशीच्या तशी' देऊ नये असे वाटते. पाचही भागाचा एकच लेख करावा असे मनात आले आहे. त्यानिमित्ताने आणखीन् काही नव्याने त्यात भर घालता येईलही. पाहतो.

अशोक पाटील

धन्यवाद अशोक जी,

ह्या धाग्याची समाप्तीची वेळ आलीय. आम्ही सर्व तुमच्या पुढच्या लेखाची आतुरतेने वाट पाहातो आहे.

विवेक नाईक.

ग्रेट एक्स्पिरियन्स..........अजून काय हवे इथे? .......................सर्वांना धन्यवाद................

एक सजेशन आहे..........अशोक पाटिल साहेबांना काहीतरी वेगळं द्यायला हवं....म्हणजे काही मानपत्रं किंवा असंच काहीबाही.......

विचार करा.........

अहो दीपकराव ~ तुमचे शब्दच इतके मोहक आणि म्हणून आनंददायी आहेत की त्यापुढे अन्य कसल्याच शिष्टाचाराची बिलकुल आवश्यकता खडी राहात नाही.

उलटपक्षी तुम्ही आणि इथल्या अन्य सुहृदांनी या निमित्ताने इतिहासाबद्दल दाखविलेल्या आपुलकीबद्दल मीच तुम्हा सर्वांचे आभार मानणे नितांत गरजेचे आहे.

धन्यवाद

अशोक पाटील

अशोक पाटिल साहेबांना काहीतरी वेगळं द्यायला हवं....म्हणजे काही मानपत्रं किंवा असंच काहीबाही.......
अनुमोदन.
मायबोलीरत्न? मायबोलीभूषण?
त्यांच्या लिखाणामुळे पुनः मायबोलीवरील चर्चा वाचनीय व उपयोगी होतात.
नाहीतर आहेतच इतर लोक - वाट्टेल ते खोटे नाटे, वेडेवाकडे, लिहून सगळा दोष ब्राह्मणांचा, नाहीतर हिंदूंचा, नाहीतर अमेरिकेत रहाणारे भारतीय यांचा, असे लिहीणारे.

अशोक यांच्या सर्व पोस्टी आज वाचल्या.... विचारांत/ लेखनांत अत्यंत समतोल राखत पुन्हा वाचाव्या अशा पोस्ट आहे. माझे खुप गैर-समज त्यांच्या लेखनामुळे दुर झाले.

उदय

१०० % अनुमोदन !!

आपले असेच बरेच समज गैर समज झालेले व करुन दिलेले असतात, जश्या नाण्याच्या दोन बाजुच.

अशोक रावांनी बरीच मेहेनत घेतली आहे. त्यांच्या पोष्टीत समतोल असतो.

भारत सरकारचा न्यायः
आजच्या टाईम्स ऑफ ईंडिया मधील बातमी:
NEW DELHI: A demand of illegal gratification of Rs 100 has landed two Delhi Police personnel behind bars with a Delhi court sentencing them to one-and-a-half years in jail and also slapping a fine hundred times the bribe amount.

Special Judge N K Sharma sentenced Traffic Zonal Officer, ASI Vikram Singh and a constable, also named Vikram Singh, to 18 months in jail and a fine of Rs 10,000 each, saying, "They by corrupt and illegal means abused their official position as public servants and obtained pecuniary advantage of Rs 100."
म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा घालायला सुरुवात झाली आहे.
आता एकदा लोकपाल आले की भारतातला भ्रष्टाचार खल्लास.
जसे मलेरिया, पोलियो कायमचे नष्ट झाले भारतातून, तसेच भ्रष्टाचार पण. मग तुमची मुले विचारतील, 'बाबा लाच म्हणजे काय हो? नि करप्शन म्हणजे?'

चला आता अधिकृतरीत्या भारत सरकारने शहीद भगत सिंग यांचे नाव भारत स्वातंत्र लढ्यातील शहिद
झालेल्या लोकांच्या नावांच्या लिस्ट मध्ये नसल्याच जाहीर केलय.

एकूणात भगत सिंग हे शहीद नव्हते असच !!

एका RTI ला लेखी उत्तरात हे समोर आले आहे.

शहीद लिस्टमध्ये कोणाची नावं आहेत हे सरकार ने जाहीर कराव म्हणजे जनतेला कळेल की लिस्ट कोणी
बनवली होती.

विपर्यास करणे म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण.
गृह खात्याचे उत्तर आहे की the ministry had no record to show whether the trio had been declared martyrs.
दिलेले स्पष्टीकरणThere is no system or policy in place to declare those who died in freedom struggle as martyrs. "No one has ever been declared a martyr by the home ministry. There is no such policy. Only defence ministry does so for armed forces men," said a home ministry official.

म.गांधींना राष्ट्रपिता हे संबोधन वापरण्यावरूनही गृह मंत्रालयाने असेच उत्तर दिले होते.
Mahatma Gandhi cannot be accorded the 'Father of the Nation' title by government as the Constitution does not permit any titles except educational and military ones, the Home Ministry has said.

ह धागा वर आल्याने श्री अशोक यांचे उत्तम प्रतिसाद वाचायला मिळाले, हे मात्र बरे झाले.
ज्यांना पद्म पुरस्कर(पद्मश्री) देऊन गौरवले ते शोभा सिंग चित्रकार होते.

Pages