भारत सरकारचा न्याय

Submitted by विवेक नाईक on 10 February, 2012 - 09:02

भारत सरकार, पंत प्रधानांच्या आदेशा नुसार सर शोभा सिंग यांचे नाव दिल्ली तील
विंडसर विला (केनाऊट प्लेस) या ऊच्चभ्रू वस्तीला देण्याचा घाट घालत आहेत.

कोण आहेत हे सर शोभा सींग . सर शोभा सिंग हे प्रख्यात
लेखक खुशवंत सींग यांचे वडील. त्यांचा जन्म सद्द्या पाकिस्तानात असलेल्या शाहपूर जिल्ह्यन्म१८९०
साली झाला.

ऐन स्वातंत्र संग्रामाच्या धका धकीच्या काळात, स्वातंत्र संग्रामाला मदत करण्या ऐवजी त्यांनी
आपल्या वडीलांच्या बांधकाम व्यवसायात त्यांनी प्रवेश करून वडीलांचा व्यवसाय वाढवला. आर्धी दिल्ली
अवघ्या २ रु प्रती वर्ग यार्ड ने विकत घेऊन ते दिल्लीचे मालक बनले.

एवढ सर शोभा सिंग यांच गुण गान का करतोय ?
कारण ह्याच सर शोभा सिंग नी शहीद भगत सींग विरूद्ध साक्ष दिली होती.
त्या साक्षी मूळेच भगत सींग, सहदेव व राजगुरु यांना मरे प्रयंत फाशी ची शिक्षा झाली. तत्कालीक
ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली.

ह्याच सर शोभा सिंग यांना भारत सरकारने देश सेवे साठी पद्मभुषण ही पदवी १९७४ ला दिली.

आणी आता भारत सरकार सर शोभा सिंग यांचे ना व दिल्लीतील एका विभागाला देणार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या साक्षी मूळेच भगत सींग, सहदेव व राजगुरु यांना मरे प्रयंत फाशी ची शिक्षा झाली.

सहदेव नाही , सुखदेव... Proud महाभारताच्या जखमाही अजुन ताज्याच आहेत की काय?

अशोक पाटील, उत्तम संदेश! असेच अभ्यासपूर्ण आणि वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारे लेख लिहीत जा. Happy
आ.न.,
-गा.पै.

सर्वश्री दिनेशदा, लिंबूटिंबू, सारिका, मोहनराव, उदय, फारएण्ड, रानडुक्कर, बाळू जोशी, गामा पैलवान आणि तसेच श्री.नाईक.

तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, मग तो सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्‍यांचा असो वा अहिंसा आणि शांततेच्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळविले पाहिजे या भूमिकेतूनच लढा देणारे असोत, या दोन्ही गटांबद्दल, त्यांच्या नायकांबद्दल, अनुयायांबद्दल त्याचप्रमाणे त्यानी हाताळलेले मार्ग या सर्वांच्या कामगिरीची नोंद केवळ भारतीय इतिहासकारांनीच घेतली आहे असे नसून युरोप आणि आशियातील अनेक नामवंतांनी त्याचा वेळोवेळी मागोवा घेऊन त्याबद्दल विपुल संशोधन केले आहे.

सुभाषबाबू आणि भगत सिंग यांचे मार्ग ज्याना योग्य वाटत होते त्याना गांधी तत्व भेकड आणि कचखावू वाटणे हे त्या काळातील युवकाला शोभेसेच होते. पण गांधी मार्गानेच या देशाला स्वातंत्र्य मिळेल आणि ते टिकेल असे समजणारी जनताही संख्येने काही कमी नव्हती. पण होते असे की, जहाल मार्गाचा मोह पडल्याने व त्याच रस्त्याने गेलेल्या आणि मग हौतात्म्य पत्करलेल्या त्या प्रिय व्यक्तीविषयी हजारो नव्हे तर लाखो हृदयात आदराचे स्थान निर्माण झालेले असते, मग इतिहासाच्या नजरेत अशा व्यक्तींनी चुकीची पाऊले उचलली होती असे पुढे जरी सिद्ध झाले तरी त्यांच्याविषयीचे आकर्षण लुप्त होत नाही.

पिढी दर पिढी देशात सत्ताबदल होत गेले तरी जुन्या आठवणीचे अंगार अजूनही धुगधुगत असतात. मग या ना त्या निमित्ताने त्यावर कधीतरी कुणीतरी फुंकर घातली [यात संधीसाधू राजकारण्यांचा मोठा हात असतो, पण हा विषय सर्वस्वी वेगळा असल्याने त्याची वाच्यता आता इथे करीत नाही] म्हणजे रक्तातून तो 'जीन्स क्राय' आक्रंदतो आणि श्री.विवेक नाईक सारख्या तरुणांच्या मनी देशासाठी अशा बळी गेलेल्या 'नायकां" च्या प्रती असलेला आदर एखाद्या निमित्ताने त्वेषाने उफाळून येतो, जो त्यानी इथे संयत भाषेत इथे प्रकट केलेला आढळतो.

विवेकसारख्या सदस्यांना माझी विनंती राहील की, ज्यावेळी त्याना अशा संदर्भात मत प्रकट करावे असे वाटते [इथेच नव्हे तर अन्यत्रही] त्यावेळी ते करताना अगदी सखोल नसला तरी सकस म्हटला जाणारा अभ्यास केल्यास आणि तोही पूर्वग्रहदूषीतपणा सोडून, त्याना उलटपक्षी इतिहासाची गोडीच लागेल.

सर शोभा सिंग यांचे नाव दिल्लीतील एका रस्त्याला देण्याचा प्रस्ताव तर आता बासनात गुंडाळून ठेवला गेला आहेच, त्यामुळे खरे तर या विषयाचे आता प्रयोजनच उरलेले नाही. तरीही या कारणास्तव का होईना मी इथे असेही सांगू शकेन की शोभा सिंग यानी केवळ "त्या" खटल्यात साक्ष दिली म्हणून दिल्ली आणि परिसर या ठिकाणी एक यशस्वी आणि कल्पन वास्तुतज्ज्ञ म्हणून त्यांचे त्या क्षेत्रातील कर्तृत्व बिलकुल कमी लेखू नये.

१. राष्ट्रपती भवन, २. विजय चौक, ३. इंडिया गेट, ४. दिल्ली आकाशवाणी केन्द्र, ५. नॅशनल म्युझियम, ६. क्षयरोग इस्पितळ, ७. मूकबधीर विद्यालय, ८. दिल्ली रेड क्रॉस बिल्डिंग, ९. बडोदा हाऊस, १०. दयालसिंग कॉलेज ही दहा नावे आज केवळ नवी दिल्लीतील लोकांच्याच नव्हे तर दिल्लीला भेट देणार्‍या प्रत्येक पर्यटकासाठी 'मस्ट सी' स्थाने झाली आहेत. या सर्वांचे बांधकाम सर शोभा सिंग यांच्या कंपनीने पूर्ण केली आहेत. आज बाकीचे राहोत पण महाराष्ट्रातून दिल्लीत कोणत्याही कारणास्तव जाणारी व्यक्ती 'इंडिया गेट' समोर नतमस्तक होतेच होते ही बाब इथले सदस्य नाकबूल करू शकणार नाहीत. अगदी श्री.विवेक नाईकसुद्धा. मग आता उद्या हेच विवेक "मी इंडिया गेटला भेट देणार नाही कारण त्याचे बांधकाम भगत सिंगविरूद्ध साक्ष देणार्‍या शोभा सिंग या कॉन्ट्रॅक्टरने केले आहे' असे म्हणू लागले तर ती मग आत्मवंचना ठरेल.

पुढचा मुद्दा. शोभा सिंग याना ब्रिटिश सरकारने 'सर' पदवी दिली. 'सर = ओ.बी.ई. = ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर'. हा मान 'पद्मश्री' च्या बरोबरीने होता आणि ब्रिटिश राणीतर्फे इंग्लंड आणि त्यावेळी त्या साम्राज्यात असलेल्या कॉलनीतील लेखक, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक, डॉक्टर्स, कलावंत, क्रिडापटू, उद्योगधंदे आदी अनेकाना प्रतिवर्षी मिळत असे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच्या काळात त्या त्या क्षेत्रातील शेकडो भारतीय लोकांना ब्रिटीश सरकारने 'सर' पदवीने गौरविले होते. त्यापैकी बांधकाम क्षेत्रात आपल्या कामाच्या दर्जाने सर्वांचा आदर प्राप्त केलेले शोभा सिंग हे एक असणे आश्चर्याची बाब नव्हती.

एक लक्षात घ्या. दिल्ली असेम्ब्लीकांड घडले सन १९२९ च्या एप्रिलमध्ये आणि सिंग यांची साक्षही त्या महिन्यातीलच. भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त याना दिल्ली कोर्टाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आणि ती केस फाईल झाली. नंतर सॉण्डर्स मर्डर केस लाहोरमध्ये सुनावणीस आली, केस चालली, निकाल लागला, ते तीन वीर फाशी गेले. ही घटना १९३१ ची. त्यानंतर वर्ष-दीड वर्ष देशात ज्या काही त्यामुळे विविध भागात निदर्शने झाली, चर्चा झडल्या त्या होऊन गेल्यावर १९३४-३५ पासून नित्याचे व्यवहारही सुरू झाले [काळ जालीम औषध म्हणतात ते यासाठीच]. १९३६ नंतर तर सार्‍या जगालाच दुसर्‍या महायुद्धाच्या संभाव्य धोक्याने ग्रासले. हिटलर सत्तेवर आला होता आणि ब्रिटिश साम्राज्य युद्धतयारीत गुंतले गेले. दिल्ली कलकत्ता सिमला या ठिकाणी सैनिकांसाठी ट्रेनिंग सेन्टर्स, रिक्रुट्मेन्ट सेन्टर्स तसेच युद्धसामुग्रीची गोडावून्स आदीची बांधकामे निघाली, आणि योग्य त्या रितिरिवाजानुसार त्यातील काही कामे शोभा सिंग यांच्या कंपनीलाही मिळाली होती, ती त्यानी नेमकेपणाने पूर्णही केली. आजही सिमल्यात त्या कंपनीच्या कामाची निशाणी जिवंत आहे. युद्धाचा भडका जरी त्यानंतर उडाला असला तरी ब्रिटिश राजघराण्याच्या पद्धतीनुसार त्यांच्या 'सब्जेक्ट्स' ना वार्षिक सन्मान देणे खंडित झाले नव्हते. १९४५ साली युद्ध संपुष्टात आले आणि १९४६ च्या मानकर्‍यांच्या यादीत ब्रिटिश सरकारने 'शोभा सिंग' हे नाव 'सर' पदवीसाठी घेतले. म्हणजे भगत सिंग शहीद झालेल्या दिवसापासून हिशोब केला तर तब्बल १५ वर्षांनी सरकारने शोभा सिंग याना ती पदवी दिली होती. याचाच अर्थ तो सन्मान सिंग यानी युद्ध काळात बांधकाम क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल होता की १५ वर्षापूर्वी एका खटल्यात त्यानी दिलेल्या साक्षीबद्दल होता यावर थोडासा जरी विचार केला तरी संयमी मनाला त्याचे व्यवहारी उत्तर मिळेल.

१९५४ पासून आपण 'पद्म' किताब सुरू केले पण ब्रिटिश सरकारने त्यानंतरही सन्माननीय भारतीयांना आणि पाकिस्तानी नागरिकांना 'ओ.बी.ई.' चे किताब बहाल केलेले आहेतच, जे स्वीकारलेही गेले होते. अगदी परवापरवा ओम पुरी या भारतीय अभिनेत्याचाही लंडनमध्ये राणीच्या हस्ते असा 'ओबीई' सन्मान केला गेला आहे. सुनील गावस्कर यानाही हा किताब देण्याचे घाटत होते, पण तो किस्सा वेगळा.

असो. वर एका प्रतिसादात श्री.दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे अशा प्रकरणात 'विवेक आणि भावना' समजून घेऊन कटुता टाळूनच पुढे जाणे अंती हितकारक ठरणार आहे.

धन्यवाद
अशोक पाटील

छान.

अशोक पाटील,

अगदी माझ्या मनातल बोललात.

इतिहास = वस्तुखंड (facts) + दृष्टीकोन (perspective)

इतिहासाचं यथायोग्य आकलन होण्यासाठी वस्तुखंड योग्य रीतीने हाताळले पाहिजेत. अन्यथा विपरीत माहितीवर आधारलेल्या दृष्टीकोनाने हानी होण्याचा संभव अधिक.

आ.न.,
-गा.पै.

अशोक पाटील जी,

आपण दिलेल्या विस्त्रूत माहीती बद्द्ल धन्यवाद !!

मवाळ मत वाद्यांनी अहिंसेच्या चळवळी द्वारे देशाला स्वांतंत्र मिळवून दिले असे आताचा ईतिहास सांगतो.

याचा अर्थ असा धरावा का की शस्त्र क्रांती करणार्याचा यात काहीच हातभार लागला नसावा.

<<<<इतिहासाच्या नजरेत अशा व्यक्तींनी चुकीची पाऊले उचलली होती असे पुढे जरी सिद्ध झाले तरी त्यांच्याविषयीचे आकर्षण लुप्त होत नाही.>>>

कोणी अशी चुकीची पाऊले उचलली असे तुम्हाला वाटते ?

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल.

हाच इतिहास आहे.. पटत नसेल तर तुम्ही नव्याने इतिहास लिहायला मोकळे आहात.. लिहा नव्याने... दर दोन चार दिवसानी एखादा जहाल रडत असतोच खरा इतिहास लिहिलाच नाही म्हणून... आळशी कामचोर कुठले! .. साठ वर्षे झाली.. अजुन तुम्हाला खरा इतिहास लिहिता आला नाही ? ... त्यापेक्षा काँग्रेसवाले परवडले की... निदान खोटा का असेना पण एक इतिहास तरी लिहिला... जहाली लोकांसारखं नाही.. स्वतःही बोटभर इतिहास लिहिला नाही.. आणि वर शतकानुशतके हा इतिहास खराच नाही, हेही म्हणून रडायला मोकळे!

फाशीच्या केस्मध्ये त्यांची साक्षच नव्हती तर बिन दिक्कत त्यांच्यामुळे तीघाना फाशी झाली असे तुम्ही लिहिलेत... सुखदेवाना सहदेव करुन महाभारतात ढकललेत... भारतसरकारने त्यान्ना कधी कुठला पद्म पुरस्कार दिलाच नाही.. तरीही तुम्ही बिनदिक्कतपणे लिहिलेत.. तेही अगदी इसवीसनासकट ! आणि आता इतरान्नी लिहिलेला इतिहास तुम्हाला पटत नाही, हेही बोल्ताय!

रानातल्या डुकरा. गोबेल्स मरा नही , गोबेल्स मरते नहीं...

पिस्तुलातून गोळ्या झाडूनही 'तो' अजून जिवन्तच आहे. 'त्या'चे भूत ६०-६५ वर्षांनन्तरही 'यां'च्या मानगुटीवरून उतरायला काही तयार नाही. दुसर्‍याचे तळपट होईल असे बडबडणार्‍या वेड्यापिशा म्हातारीसारखे पुन्हा त्याच त्याच विषयाकडे आल्याशिवाय चैनच पडत नाहीये. जनता तर जवळ करीत नाही मग हेच आपापसात त्याना आवडणारे किस्से एकमेकाला ऐकवताहेत. Happy

धन्यवाद मित्रांनो !

वर श्री.गामा पैलवान यानी अत्यंत अचूकपणे इतिहासाकडे पाहण्याचे सूत्र दिले आहे. एखाद्याला पूजेसाठी व्यक्ती हवी असेल तर ती निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्या घटनेने बहाल केलेलेच आहे. पण त्याच्या गळ्यात माळ घालताना बाजूच्या व्यक्तीला लाथ मारण्याचा अधिकार त्याच घटनेने कुणालाच दिलेला नाही.

मी ज्यावेळी "अखेरीस गांधीजींचा मार्ग बरोबर होता" असे म्हणतो याचा कृपया अर्थ कधीच होत नाही की त्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी ज्यानी 'शस्त्र' ही एकच पुंगी त्या ब्रिटिश नागाला समजेल हे मत व्यक्त करून त्या मार्गानेच त्याला ठेचण्याचे प्रयत्न केले त्यांच्याबद्दल अनादर दाखवित आहे. नाही, येथील कुणीच सदस्य तसे म्हणणार नाही. ज्याना 'क्रांतिकारी' म्हणून इतिहासाने नोंदविले त्यांच्या बलिदानाचीही आठवण १५ ऑगस्टला आपण करतोच ना ? मग त्यांच्यामुळेही स्वातंत्र्य मिळाले ही भावना देखील हृदयी वसलेलेच असते. पण त्यांचा उठसूट जप करताना शांततेच्या मार्गाने गेलेल्यांकडे तुच्छतेने जर कुणी पाहात असेल तर मग त्याना इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा माध्यमाद्वारे दिला पाहिजे यात शंका नाही.

इतिहास "फॅक्ट्स" असतो, त्याच्यावर आपल्या झारीतून पाणी घालून आपल्याला हवा तो सुगंध त्यातून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करणे म्हणजे तुम्ही आपले Perspectives अगोदरच तयार ठेवले आहेत असे म्हणावे लागेल. मग ती भूमिका एकदा का पक्की मेन्दूत विसावली की मग त्यापुढे त्या 'फॅक्ट्स' चे ढीग समोर आणून ओतले तरी 'रातभर अंडा पकाया लेकिन फिर भी कच्चा रह गया |" असे म्हणावे लागेल.

मागील एका प्रतिसादात श्री.विवेक नाईक यानी "ब्रिटिशांनी निर्लज्जपणे कोहिनूर तुम्हाला देणार नाही' असे सांगितले. मला प्लीज सांगा की त्या नकारात कसला 'निर्लज्जपणा' आहे ? अहो ते जेते होते, त्यानी जिंकले, नेले राणीच्या खजिन्यात जमा करायला. आपण जर इतके शूरवीर असू तर सांगावे का मिलिटरीला चला बकिंगहॅम पॅलेसवर हल्ला करायला आणि कोहिनूर व भवानी तलवार आणू ?

कुणाचा होता हा 'कोहिनूर' हिरा ? याचा इतिहास तपासला आहे तुम्ही ? बहुधा नसणार. फक्त ब्रिटिश राणीच्या मुकुटात आहे इतपतच माहिती असते बर्‍याच जणांना. आंध्रच्या ज्या गुंटूर प्रांताच्या काकतिया राजाकडे तो होता त्याच्यावर हल्ला करून तुर्की वंशाच्या उगलखानाने आपल्या लुटीत दिल्लीत आणला, तिथून बाबर वंशाकडे तो वर्ग झाला. शहाजहानने तो आपल्या प्रसिद्ध अशा 'मयूर सिंहासना'त बसविला. पुढे अहमदशहा अबदालीने दिल्लीची लूट केली त्यावेळी कोहिनूरची रवानगी अफगाणीस्थानात झाली. तिथून महाराजा रणजित सिंग समवेत झालेल्या मैत्रीपूर्ण तहाचा एक भाग म्हणून अबदालीने कोहिनूर रणजितसिंग याना लाहोर इथे प्रदान केला. रणजितसिंहाचे राज्य डलहौसीने खालसा केल्यावर साहजिकच 'कोहिनूर हिरा' ब्रिटिश साम्राज्याच्या संपत्तीचा भाग झाला....तो कायमचा.

इतक्या इतिहासावर श्री.नाईक यानी इथे सांगावे की 'कोहिनूर कधी भारताचा होता ?" ज्या आंध्राच्या खाणीत तो सापडला, काकतीयांनी त्यावर पैलू पाडले, ते आंध्र केरळ आणि तमीळनाडू यानी 'आम्ही भारताचे भाग नाही' अशी १९४५-४६ साली घोषणा केली होती हे माहीत आहे तुम्हाला ?

"आम्ही द्रविड आहोत, आमच्यावर १९४७ नंतर हिंदूनी राज्य करणे मान्य नाही" अशी मागणी दक्षिणेकडील राज्यांनी केली होती. इतकेच काय तर आजही चेन्नईच्या अंगणार विकलांग अवस्थेत का होईना राजकारण करीत असलेल्या करुणानिधीसारख्या नेत्यांने व त्याच्या गुरू अन्नादुराईने 'तिरंगा' आमचा नव्हे, असे म्हटले होते, याचा इतिहास सांगू ?

फार विचित्र आहे हा भारत देश, विवेक. ज्या कोहिनूरसाठी तुम्ही लिहिले त्या कोहिनूरला एकाही 'हिंदू' राजाचा वा व्यक्तीचा हात लागलेला नाही ही गोष्ट माहीत आहे तुम्हाला ? काकतीया द्रविड, घियास तुर्की, बाबर ते शहाजहान मुघल, अहमदशाह अबदाली अफगाणी, रणजितसिंग पंजाबी, डलहौसी ख्रिश्चन. असा सरळसोट इतिहास असताना 'कोहिनूर' या भारताचा वा हिंदूंचा कसा म्हणावा ?

अशोक पाटील

छान

अशोक राव,

मी कोहिनूर भारताच्या मालकीचा म्हंणालो, हिंदुचा होता असे कधी ही म्हंणालो नाही.

२ मार्च २००९ साली महात्मा गांधीचे वंशज तुषार गांधी यांनीच जाहीर पणे कोहिनूर मागीतला होता,

त्यांच्या म्हणण्या नुसार कोहिनुर हा भारताच्या मालकीचाच आहे व तो ब्रिटीश सरकारने / म् हा राणी ने परत

करावा.

जर तुम्ही कोहिनूर हिरा हा भारतचा कधीही नव्हताच अस म्हणत असाल तर प्रश्नच मिट्ला.

लंडनच्या म्युझियममधे Crown Jewels ठेवलेले आहेत त्यात तो कोहिनूर हिरा आहे. तेथील माहिती वाचली तर पंजाब च्या संस्थानिकांपैकी कोणीतरी तो इंग्लंडच्या राज्याला (किंवा व्हिक्टोरिया राणीला असेल, कारण १९०१ नंतर की पूर्वी माहीत नाही) भेट दिला आहे. अर्थात ही तेथील माहिती आहे, ती भारताच्या दृष्टीने खरी असेलच असे नाही.

सध्याच्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारत कोणत्या कारणाने तो परत मागू शकतो? तो भारतात असायला हवा याबाबत मी सहमत आहे, पण अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टी कोणत्यातरी कायद्यानुसार होतात, त्यातील कोणता कायदा भारताला उपयुक्त ठरू शकेल?

अशोक पाटील - आपली शोभा सिंगांबद्दलची माहिती आवडली. पण त्यावर थोडा आणखी विचार केला तर असे जाणवते की त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांचे जे धोरण होते (युद्धात सामील व्हायचे नाही, ब्रिटिशांना मदत करायची नाही) त्याविरूद्धच ते तेव्हा वागले - म्हणजे एका अर्थाने देशहितासाठी जे योग्य होते ते करत नव्हते. याबद्दल तुमचे काय मत आहे?

ओबीई सध्याच्या काळात भारतीयांना सुद्धा दिले जातात (आणि कदाचित स्वीकारले जातात) हे अजिबात माहीत नव्हते. सचिन ला 'सर' किताब द्यावा ही मागणी मला नेहमीच त्यामुळे हास्यास्पद वाटायची. अजूनही वाटते.

कोहिनूर हिरा हा महाराज रणजीत्सिंहांच्या मुलाने इंग्रजाना भेट दिला आहे. त्यामुळे तो हिरा परत मागायचा प्रश्न्च नाही.. शिवाय इंग्रजानी तो एक प्रकारे जिंकून नेलेला आहे.. जिंकलेली वस्तु परत करायला हे काही महाभारतात्ले द्युत नव्हे.

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोहिनूर हिरा हा शापीत आहे.. तो ज्याच्या ज्याच्या कडे गेला त्याच्या राज्याचं वाटोळं झालं.. फक्त देव किंवा स्त्री यानाच तो हिरा लाभतो आणि इंग्लंडच्या राणीने तो घेतला त्यामुळे संपूर्ण इतिहासात फक्त इंग्रजानाच तो लाभला, पण त्यानंतर त्यांचंही साम्राज्य बुडालंच.

The possibility of a curse pertaining to ownership of the diamond dates back to a Hindu text relating to the first authenticated appearance of the diamond in 1306: "He who owns this diamond will own the world, but will also know all its misfortunes. Only God, or a woman, can wear it with impunity."

http://en.wikipedia.org/wiki/Koh-i-Noor

काही लोकांच्या मते महाभारतात वर्ण्न केलेला स्यमंतक मणी म्हणजे कोहिनुर.. या मण्यामुळे साक्षात श्रीकृष्ण अडचणीत सापडले आणि त्याची महती जाणुनच की काय अखेर कृष्णानेही हा मणी स्वीकारला नव्हता. त्यामुळं असला अभद्र हिरा भारतात आणू नये किंवा भारतात जरी तो हिरा आणला तरी तो मलिका ए हिंदोस्तान सोनिया गांधीनाच द्यावा लागणार ! Proud Biggrin

प्रकरण कधीच संपले आहे. स्मित
अहो, अस्सं कस्सं? अजून 'चर्चा' संपली नाही. अजून बर्‍याच शिव्या द्यायच्या आहेत एकमेकांना. अजून काँग्रेस वि. भाजप. हिंदूंची अंधश्रद्धा, ब्राह्मणांनी कसे नुकसान केले, हज्जारो वर्षे इतरांवर अन्याय केले (आणि ते लोक हज्जारो वर्षे मुकाट्याने सहन करत बसले!) हे सगळे यायलाच पाहिजे, विषय काही का असेना!
Proud

अजून बराच प्रवास आहे बीबी चा. कॉन्ग्रेस , नेहरू, गांधी, सोनिया, राहुल, दिग्विजय, प्रियंका, रॉबर्ट वधेरा, लदाख, ५५ कोटी, राहुल गांधीची वंशावळ, सोनिया गांधींचा सोनिया माईनो व राहुलचा'राऊल' असा उद्धार्,नेहरू आणि लेडी माउन्टब्याटन , झालेच तर लेडी साहेबांची सिगरेट नेहरू पेटवताना फोटो, राहुल गांधीचे मार्क शीट, सोनिया वायुदलाच्या हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा फोटोशॉपमधला फोटो,मनमोहन सिन्ग , एवढ्या सगळ्या ऐवजावर पाचशे जिलबी पडलीच पाहिजे नाही का? Proud

बीबीच्या मालकान्नीच बीबीची 'गोळाबेरीज' केली आहे. मूळ विषयाचा जीव संपला आता धाग्याचं करायचं काय असा त्यन्ना बहुदा प्रश्न पडलेला दिस्तोय. शोभासिंग-भगतसिंग-जालियनवाला-डायर-कोहिनूर-खरा इतिहास..... त्यान्नी खरे तर 'भारताचा अर्वाचीन इतिहास' असा एक जनरल धागा काढावा. तिथे रोज अशा गप्पागोष्टी घडत रहातील.

भारताचा अर्वाचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि पुराणकाल असे तीन धागे सुरु करावेत, अशी मी सर्वान्ना विनंती करत आहे. Happy

१. फारएण्ड ~ नाही, कोणत्याही कारणास्तव वा कोणत्याही तत्वासाठी इंग्लंड आपणास 'कोहिनूर' परत देणार नाही ही अगदी दगडावरची रेघ समजा. शेवटी जिसके हाथ मे लाठी उसीकी भैस | हे तत्वज्ञान जेत्याच्या बाबतीत हमेशा घडलेले आहे. इथेही काही निराळे नाही. आज कोहिनूर मागितला तो दिला, तर या देशात असा काय मोठा फरक दिसून येणार आहे की लोक रस्त्यारस्त्याने वेड्यासारखे नाचत सुटतील ? वर श्री.नाईक म्हणतात तुषार गांधी यानी तो मागितला होता. आता तुषारच काय पण विजय मल्ल्या आणि कलमाडीही मागतील. मागणार्‍या व्यक्तीचे तोंड कोण धरणार ? शिवाय अ याने मागणी केली म्हणून ब याला रात्रभर झोप येणार नाही असेही काही नसते. हा कुठल्याही एका पक्षाचा प्रश्न नसून त्याला आंतरराष्ट्रीय नियमावलीनेही बंधीत केलेले नाही. अबदालीने तो अफगाणीस्तानात नेला, तिथून लाहोरमध्ये [त्यावेळी लाहोर पंजाबमध्ये होते] तो हिरा आला आणि पुढे तिथूनच इंग्रजांनी लंडनला नेला. बस्स, इतकी त्या ८००-९०० वर्षे वयाच्या हिर्‍याची कहाणी.

वरच्या प्रतिसादात मी 'तो हिरा भारताचा नाही' असे एवढ्यासाठीच म्हटले होते की तांत्रिकदृष्ट्या तो हिंदुस्थानात सापडला असला तरी तो आपला कधीच झाला नव्हता. एकाही हिंदू राजाने तो आपल्या खजिन्यात यावा यासाठी कसले प्रयत्न त्या त्या शतकात केल्याचा पुरावा इतिहासात आढळून येत नाही. मग असे असेल तर इंग्लंडच्या राणीच्या मुकूटातून काढून आणून [जरी तिने दिला तरी] इथे कुणाच्या माथी बसवायचा झाल्यास त्या हिर्‍याभोवती असलेल्या नसलेल्या शापाच्या कथीत कहाण्यांनी कुणी ते धाडस करेल याचीही शक्यता नाही.

त्यामुळे मुळात ज्या घटनेची शक्यता दूरान्वयेही प्रत्यक्षात येऊ शकणार नाही, त्याबद्दल आपल्या डोक्यावरील केस कमी करण्यात कसलेही शहाणपण नाही. देशासाठी विचार करण्यासाठी अन्य डझनावरी गुंतागुंतीचे मामले आहेतच.

२. एक लक्षात घ्या फारएण्ड ~ शोभा सिंग यानी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता बांधणी, रेल्वे पूल बांधणी, गोडावून्स, शिक्षणसंस्था, गृहनिर्माण संस्था आदी क्षेत्रात काम करायला सुरूवात केली ते सन १९०८ मध्ये, त्यावेळी त्यांचे वय अवघे २० होते. पुढे काल्का-सिमला रेल्वे लाईन्सचे त्यानी केलेले काम पाहून त्यावेळेच्या व्हाईसरॉय यानी त्यांच्याकडे [म्हणजे त्यांच्या कंपनीकडे] दिल्लीतील मोठमोठाल्या शासकीय इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी सोपविली. "नवी दिल्ली" च्या वसाहतींची सुरुवात त्यांच्या बांधकामानेच सुरू झाली असे म्हटले जाते त्यात अतिशयोक्ती नाही. त्यानी बांधायला सुरुवात केलेल्या प्रथम इमारतीची पायाभरणी किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी यानी केली म्हणजे त्यावेळी तो बहुमान वाटणे साहजिकच आहे. ही गोष्ट १९११ मधील. म्हणजे त्या साली 'भारताचे स्वातंत्र्य' हा विषयही दिल्लीकरांच्या मनात असणे शक्य नव्हते.

महात्मा गांधी तर त्या काळात साऊथ आफ्रिकेत होते. तेथील कार्य आटोपून ते आले सन १९१५ मध्ये भारतात. तिथून त्यानी कार्याला सुरुवात केली असे म्हटले तरी प्रत्यक्ष देशभरात 'स्वातंत्र्य चळवळीचे' वारे वाहायला फार वर्षे जावी लागली हा इतिहास सांगतो.

त्यामुळे शोभा सिंग असोत वा त्यांच्यासारखे अन्य कॉन्ट्रॅक्टर्स असोत, ती मंडळी एक व्यवसाय म्हणून ब्रिटिश सरकारची कामे [जी स्वातंत्र्यानंतर भारत सरकारच्याच ताब्यात जाणार होती] करीत राहिले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जरूर काँग्रेसने 'वॉर पिरिअड दरम्यान ब्रिटिश सरकारला मदत करू नये' अशी घोषणा केली होती. पण ती प्रामुख्याने सैन्यभरतीस विरोध इतक्यापुरती लोकानी मर्यादित अर्थाने घेतली. शोभा सिंग यांच्या कंपनीकडे त्यावेळी एकत्रित सहा हजारापेक्षा जास्त कामगार वर्ग होता, जो उत्तर आणि ईशान्य भारतातील अनेक ठिकाणी कार्यरत होता. शोभा सिंग गांधीचे अनुयायी होते की नाही याचा विदा माझ्याकडे नाही, पण ज्याअर्थी त्यांच्या कंपनीची कामे अव्याहतपणे चालू होती त्या अर्थी त्यानी 'नॉन-कोऑपरेशन' कडे लक्ष दिले नाही हे स्पष्टच आहे. शिवाय 'काम बंद' म्हणजे त्या सहा हजार लोकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न समोर उभा ठाकला असता. त्यामुळे त्यानी व्यावहारिक दृष्टीकोन ठेवून ती युद्धकालीन कामेही पूर्ण केली. हा इतिहास आहे. त्यांचे तसे करणे वा न करणे ते कृत्य देशहितासाठी होते वा नाही हा प्रश्न खरे तर उभा राहू नये, कारण त्याकाळात त्यानी केलेल्या कामाचा [विशेषतः सिमला, डेहराडून येथील] फायदा स्वतंत्र भारताला मिळाला आहेच.

अशोक पाटील

अशोकजी,

छान माहिती. कोहिनूर परत द्यायला ब्रिटन कायद्यने बांधील नाही हे मान्य, पण समजा डिप्लोमसी वापरली किंवा युरो फायटर्स खरेदी करायची लालूच दाखवली तर ?

हाच इतिहास आहे.. पटत नसेल तर तुम्ही नव्याने इतिहास लिहायला मोकळे आहात.. लिहा नव्याने... दर दोन चार दिवसानी एखादा जहाल रडत असतोच खरा इतिहास लिहिलाच नाही म्हणून... आळशी कामचोर कुठले! .. साठ वर्षे झाली.. अजुन तुम्हाला खरा इतिहास लिहिता आला नाही ? ... त्यापेक्षा काँग्रेसवाले परवडले की... निदान खोटा का असेना पण एक इतिहास तरी लिहिला... जहाली लोकांसारखं नाही.. स्वतःही बोटभर इतिहास लिहिला नाही.. आणि वर शतकानुशतके हा इतिहास खराच नाही, हेही म्हणून रडायला मोकळे!

वरील विधानांत काँग्रेस ऐवजी ब्राह्मण व जहाल ऐवजी ब्राह्मणेतर असे केले तर हेच विधान भांडारकर इन्स्टिट्यूट जाळण्याबद्दलच्या चर्चेत वापरले तेंव्हा काही लोक चिडले होते!!
थोडक्यात, विषय कुठलाहि असो, सगळे तेच मुद्दे!

अशोकजी, दोन्ही उत्तरे पटली आणि आवडली. धन्यवाद!

उद्योगपतींचा असा एक समूह प्रत्येक देशात असणार की जो कोणतीही राजवट असली तरी - त्या राजवटीविरोधात असलेल्या चळवळींना फारसा पाठिंबा न देता आपले काम करत राहतो. पण त्याचबरोबर स्वातंत्र्य मिळाले/राजवट बदलली की नवीन नेत्यांनाही हे लोक हवे असतात. त्यामुळे या लोकांचे हितसंबंध अबाधित राहतात. पण देशाच्या उभारणीत यांचा महत्त्वाचा वाटा असतो हे ही खरे (ही टीका नव्हे, फक्त एक लक्षात आलेले लिहीले).

अशोकजी, चांगली माहिती दिलीत.

विवेक, तुमच्या भावना समजू शकतो. इतिहासाबद्दल वेगळा दृष्टिकोन असणे गैर नाही. पण तो व्यवस्थित मांडताही आला पाहिजे. तुम्ही थोडी शहानिशा करून धागा उघडायला हवा होता, ह्या अशोक ह्यांच्या मताशी सहमत आहे. नाहीतर चेष्टा करणार्‍यांच्या हातात आयते कोलीत मिळते.

कोहिनूर परत द्यायला ब्रिटन कायद्यने बांधील नाही हे मान्य, पण समजा डिप्लोमसी वापरली तर
>>
मागे सुब्रम्हण्यम् स्वामींनी एका नटराज मूर्तीविषयी सांगितले होते. भारत सरकारने ती मूर्ती परत मिळविली होती. आंतरजालावर शोधल्यावर त्यांचा 'हिंदू'मधील खालील लेख मिळाला. त्यात त्या नटराज मूर्तीची कथा सांगितली आहे. थोडक्यात, भारतात सापडलेली एक पुरातन नटराजाजी मूर्ती कोणीतरी स्मगलिंग करून बाहेर नेली आणि विकली. ती मूर्ती नंतर लंडन म्युजियमकडे विकायला आली. ते कळल्यावर भारत सरकारने लंडन कोर्टात केस टाकून ती मूर्ती परत मिळविली.

हिंदूमधला लेखः http://www.thehindu.com/opinion/op-ed/article818314.ece?css=print
पूर्ण कथा इथे आहे: http://webster-smalley.co.uk/ArchyWiki/London_Nataraja

तर मूर्ती आणि त्यासंबंधित मंदिर असेल तर ती परत मिळू शकते. हिरा मिळू शकतो का ते माहीत नाही.

रस्त्याच्या कडेने, ह्याच सुब्रम्हण्यम् स्वामींचा असा आरोप आहे की सोनिया गांधी आणि त्यांची बहीण अनुष्का ह्यांनी भारतातल्या अनेक अ‍ॅन्टिक गोष्टी स्मगलिंग करून बाहेर नेल्या आहेत आणि विकल्या आहेत. त्यांनी दिल्ली हायकोर्टात केस टाकली होती. तेव्हा सीबीआयला इटालिअन सरकारकडून माहिती मिळवायला भारतीय कोर्टाकडून लेटरॉगेटरी पाहिजे होती आणि कोर्टाने ती द्यायला आधी FIR दर्ज असावी लागते. तत्कालीन भारत सरकारने FIR करायला नकार दिला आणि त्यामुळे केस थंड पडली. (हे सगळे स्वामींच्या सांगण्यानुसार)

बाजो, घ्या आल्या तुमच्या सोनिया गांधी-माइनो चर्चेमध्ये Proud

>> ज्याना 'क्रांतिकारी' म्हणून इतिहासाने नोंदविले त्यांच्या बलिदानाचीही आठवण १५ ऑगस्टला आपण करतोच >>ना ? मग त्यांच्यामुळेही स्वातंत्र्य मिळाले ही भावना देखील हृदयी वसलेलेच असते. पण त्यांचा उठसूट जप >>करताना शांततेच्या मार्गाने गेलेल्यांकडे तुच्छतेने जर कुणी पाहात असेल तर मग त्याना इतिहासाकडे पाहण्याचा >>दृष्टिकोन अशा माध्यमाद्वारे दिला पाहिजे यात शंका नाही.

हे उलटे आहे शांततेच्या मार्गाने गेलेलेच क्रांतिकारी मार्गाने गेलेल्यांकडे तुच्छतेने पहात होते आणि अजुनही पहातात. Angry

"शांततेच्या मार्गाने गेलेलेच क्रांतिकारी मार्गाने गेलेल्यांकडे तुच्छतेने पहात होते आणि अजुनही पहातात."

~ महेश जी. एखादे उदाहरण देऊ शकाल मला या संदर्भात ?

२९ मार्च १९३१ च्या "यंग इंडिया" च्या अंकात म.गांधींनी या तीन शूरवीरांना भावांजली अर्पण करताना लिहिले होते :

These heroes had conquered the fear of death. Let us bow to them a thousand times for their heroism.

But we should not imitate their act. In our land of millions of destitute and crippled people, if we take to the practice of seeking justice through murder, there will be a terrifying situation. Our poor people will become victims of our atrocities. By making a dharma of violence, we shall be reaping the fruit of our own actions.

Hence, though we praise the courage of these brave men, we should never countenance their activities. Our dharma is to swallow our anger, abide by the discipline of non-violence and carry out our duty."

"हिंसा आपल्या धर्मशिकवणीविरूद्ध आहे" असे जर गांधीजी मानत असतील तर त्याना चुकीचे कसे म्हणता येईल ? "मी या तरुणांच्या धैर्याची स्तुती करतो, पण म्हणून त्यांच्या कृत्याचे समर्थन करू नये." असे त्यानी जे म्हटले आहे त्यात इतरांसाठी एक संदेश आहे. ज्याला तो पाळावासा वाटला तो त्यानी पाळला, ज्याना नको होता तो नाकारण्याचे स्वातंत्र्य त्या काळातही होतेच.

अहिंसेच्या तत्वावर आपली कार्यक्रमण करणार्‍या त्या महात्म्याचे मत म्हणजे "क्रांतिकारी लोकांच्या वर्तनाकडे तुच्छतापूर्ण' पाहणे असे होत नाही, महेश.

[प्रतिसादात 'अजूनही पाहतात' या प्रेझेन्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर आहे. त्यावर मी मत प्रदर्शित करत नाही. आपला विषय हा भगतसिंग दरम्यानच्या घटनांविषयी असल्याने तो भाग आजच्या हवेतील घटनांशी जोडणे ठीक नाही.]

अशोक पाटील

Pages