इच्छा !

Submitted by चैतन्य दीक्षित on 7 February, 2012 - 05:32

कोणते शब्द वापरू तुझे गुण गाण्या,
तू स्फूर्तीचीही मूळ प्रेरणा असशी,
मी इच्छा करतो आणि कौतुके तूही
लेखणीतून या सारे लिहवुन घेशी |

मग शब्दांना त्या लाभे अमृत-उपमा,
अर्थाला द्याया उपमा न चले बुद्धी,
हे मी नच केले, घडले तुझ्या कृपेने,
ही जाणिव होता मनास लाभे शुद्धी |

हे सगळे तरिही शब्दरूप, बाह्यांगी,
तू निसटुन जाशी मना मोहवुन माझ्या
अन् पुन्हा एकदा तुझे रूप-गुण गाण्या,
अन् तुला पकडण्याची मज होते इच्छा |

- चैतन्य दीक्षित

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान !