Submitted by चैतन्य दीक्षित on 7 February, 2012 - 05:32
कोणते शब्द वापरू तुझे गुण गाण्या,
तू स्फूर्तीचीही मूळ प्रेरणा असशी,
मी इच्छा करतो आणि कौतुके तूही
लेखणीतून या सारे लिहवुन घेशी |
मग शब्दांना त्या लाभे अमृत-उपमा,
अर्थाला द्याया उपमा न चले बुद्धी,
हे मी नच केले, घडले तुझ्या कृपेने,
ही जाणिव होता मनास लाभे शुद्धी |
हे सगळे तरिही शब्दरूप, बाह्यांगी,
तू निसटुन जाशी मना मोहवुन माझ्या
अन् पुन्हा एकदा तुझे रूप-गुण गाण्या,
अन् तुला पकडण्याची मज होते इच्छा |
- चैतन्य दीक्षित
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
छान !
छान !
छानच
छानच
फार छान.
फार छान.
छान छान.
छान छान.
सुंदर
सुंदर
छान, सुंदरच
छान, सुंदरच
वा चैतन्या, अतिशय
वा चैतन्या, अतिशय सुंदर.........
धन्यवाद! सर्वांचे मनःपूर्वक
धन्यवाद!
सर्वांचे मनःपूर्वक आभार.