ओनियन रिंग्ज

Submitted by स्वाती२ on 5 February, 2012 - 20:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ कप लो फॅट दही
१/२ कप ब्रेड क्रंब्ज
१/२ कप कॉर्न मिल
२ यलो ओनियन ( स्वीट ओनियन मिळाल्यास उत्तम)
१/४ चमचा मीठ
१/२ चमचा तिखट
थोडे तेल
तेलाचा स्प्रे

क्रमवार पाककृती: 

ओवन ४०० फॅ. ला तापत ठेवावा. कुकी ट्रेला फॉइल लावून घ्यावी.फॉइलला तेलाचा हात लावावा.
कांद्याचे साल काढून त्याच्या साधारण १/४ इंचाच्या चकत्या कापाव्यात. या चकत्या हाताने वेगळ्या करुन त्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या रिंग्ज घ्याव्यात.एका बोल मधे १/२ कप दही काट्याने फेटून घ्यावे. दुसर्‍या बोलमधे कॉर्नमिल, ब्रेडक्रंब्ज, तिखट, मीठ एकत्र करावे. यातील निम्मे मिश्रण बाजूला ठेवावे.
कांद्याची रिंग दह्यात बुडवावी. सगळ्या बाजूने दही लागले की काट्याने उचलून ब्रेडक्रंब्जच्या मिश्रणात टाकावी. बोल हलवून मिश्रण रिंगला लावून घ्यावे. दुसर्‍या कोरड्या काट्याने रिंग उचलून तयार ट्रेवर ठेवावी.
अशा सगळ्या रिंग्ज ट्रेवर लावाव्या. साधारण एका कांद्यानंतर मिश्रणात गुठळ्या होतात. असे गुठल्या झालेले मिश्रण टाकून द्यावे आणि बाजूला ठेवलेले मिश्रण वापरायला घ्यावे. रिंग्जवर तेलाचा स्प्रे मारून ट्रे तापलेल्या ओवनमधे १५-१७ मिनिटे ठेवावा. गरम गरम रिंग्ज सर्व कराव्या.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद!
@अनघा_मीरा
अ‍ॅक्टिव टाइम २०-२२ मिनिटांचाच आहे. त्यातही टीनएजर मूले, नवरा हे असेंबल करायला उभे राहिले तर काम अजूनच सोपे होते हा माझा अनुभव. Happy

आयडीया छान आहे, पण मी कान्दा कापायचे तन्त्र तेवढे वापरणार वरचे रिन्गान्करता,
अन कॉर्न फ्लॉवर/दही तिखट मीथ वगैरे मिक्स करुन नेहेमीसारखी "भज्जे" फक्त रिन्गभज्जे तळून काढणार! दह्याऐवजी टोमॅटो सॉस घातले तरी मला (अन पोरान्नाही) चालून जाईल.