अंडे व्हेज की नॉन-व्हेज.........?

Submitted by उदयन. on 28 January, 2012 - 02:27

अंडे व्हेज की नॉन-व्हेज.........?

हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे........

काही शाकाहारींच्या मते अंडे नॉन-व्हेज आहे......कारण त्यासाठी आपल्याला अंड फोडावे लागते त्यामुळे येणार्या जिवाची हत्या होते.... एकाला मारुन खाणे हे चुकीचे असल्याने अंड नॉन-व्हेज आहे........

परंतु काही अशे ही लोक आहेत जे अंडे व्हेज मानतात....त्यांच्या मते अंडे हे व्हेज आहे........जीव जन्माला यायच्या आधीच अंडे फोडल्याने काहीही चुकीचे नाही आहे...........जसे पाण्यातले जिव पिताना जिव जंतु पोटात जातात तसेच ही प्रक्रिया आहे..........

आपणास काय वाटते............????????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शास्त्रीय दृष्ट्या पांढरा भाग हा प्रोटीन युक्त मानला जातो... पिवळा हा जास्ती कोले स्टेरॉल युक्त असतो. शक्यतो तो वगळावा.. असे केल्याने एखाद्याला अंडे शाकाहारी वाटू शकेल.

???????

शाकाहार आणि मांसाहार हे शब्द बर्‍यापैकी सैलपणे वापरले जातात.
'शाक' म्हणजे पालेभाज्या/वनस्पती. त्यामुळे अंडे शाकाहार (शाकाहारी म्हणू नये) नाही. तो प्राणिजन्य पदार्थ असल्यामुळे त्यास मांसाहार समजणे जास्त योग्य आहे. पण या तर्काने 'दूध' देखील शाकाहार म्हणता येत नाही.

या बाबतीत वेल-डिफाईन्ड अशी विभागणी नाही. काहींच्या मते शाकाहारात दूधसुद्धा येत नाही, काहींच्या मते अंडेसुद्धा येते ! शेवटी आपण काय खावे आणि काय नाही हा निर्णय ज्याचा त्याने करावा. कारण खाण्यात जी मजा आहे, ती तो पदार्थ कुठल्या गटात येतो, याचा काथ्याकूट करण्यात नाही. Happy

"जो जे वांछील तो ते खावो"

>>"जो जे वांछील तो ते खावो>><< Biggrin
या विषयावर माबो वर मागे बरीच 'हाणामारी' वाचल्याचे आठवते.... वनस्पती पण सजीव अन मग पिकांच्या कापणीमूळे ते सूद्धा नॉनव्हेज ई.ई.

दोनशेच्या आत मान टाकली तर समथिंग इज राँग..

>>> व्हेरीवेल सेड संध्या... Wink

अजून काय बोलावे... जो जे वांछील तो ते खावो............ हेच खरे...

********************************************** आपली तर लेखनसीमा.... Happy

आता बाजारात जी अंडी मिळतात त्यांच्या निर्मितीत कोंबडा सहभागी नसतो. त्यात जीव नसतो, त्यामुळे तशी अंडी शाकाहारीच समजावी लागतील.

>>> आता बाजारात जी अंडी मिळतात त्यांच्या निर्मितीत कोंबडा सहभागी नसतो. त्यात जीव नसतो, त्यामुळे तशी अंडी शाकाहारीच समजावी लागतील.

पुण्यातले प्रसिद्ध डॉ. कल्याण गंगवाल यांनी अशी अंडी मांसाहारीच असतात हे सिद्ध करणारे बरेच लेख लिहिले आहेत. लेखांची कुठे लिंक मिळाल्यास टाकीन.

अवांतर- पं.बंगालमध्ये मासा शाकाहारी समजला जातो, मासे गंगेचे फळ आहे असे मानतात, रोज सकाळ संध्याकाळ संध्या करणारा ब्राह्मणही तिथे मासे खातो...
कुठेतरी वाचले होते, अंडे हे कोंबडी नामक झाडाने दिलेले कुक्कुट्फळ आहे.. Lol

आधी अंडं की आधी कोंबडी याचं उत्तर मिळालं का?

>>>>>>>>>

हो,कोम्बडी आधी असे त्याचे उत्तर आहे कारण अंडे आधी असते तर ते उबवायला देवाला त्यावर बसावे लागले असते म्हणून देवाने आधी कोम्बडी निर्माण केली नन्तर अन्डे Proud

म्हणून देवाने आधी कोम्बडी निर्माण केली नन्तर अन्डे >>>

देवाने आधी कोंबडी आणी कोंबडा निर्माण केले. अंड आपोआप तयार झाले. मग देवाला चुक कळुन आली! Proud

शाकाहार - मांसाहार

By Shrikant Pujari, Vikrant Phadke and मंदार संत in कोब्रा Vs देब्रा ...फक्त टोमणेगिरी

आपला सगळ्या सर्वसामान्य हिंदू आणि शहरी ब्राह्मणांप्रमाणे शाकाहारी आणि मांसाहारी यात चांगलाच गोंधळ उडालेला दिसतोय. कृपया मी जे खालीलीहीत आहे ते विद्वान लोकांना विचारून त्याचे सार सांगतो आहे. ते कृपया लक्षात ठेवावे व त्याचा प्रसार करा...वा हि विनंती .
[१] रस [ Glandular Secretions etc , ]
[2] रक्त [ Blood ]
[3] मेद [ Animal Fat ]
[4] मांस [ Muscles ]
[5] अस्थी [ Bones ]
[6] मज्जा [ Nerves, Bone Marrow ]
[7] शुक्र [ Reproductive and power Mgmt ]

हे ७ पैकी रस सोडून इतर एक जरी धातू जागृत किंवा सुप्त अवस्थेत असतात त्या सर्व वस्तू मांसाहारी .

वस्तू मध्ये फक्त रस असणे हे शाकाहारी.

साखर जर बोन अश वापरून तयार केली जात असेल तर ते योग्य नाही. भारतामध्ये अश्या प्रकारे साखर तयार करण्यावर बंदी आहे.

दुध पूर्णत: शाकाहारी आहे. हे वरील गोष्टीवरून लक्षात येईल.

धन्यवाद !

अंडे मांसाहारी आहे. जे अंडे खातात/ज्याना अंडे आवडते त्या वेजिटेरीयन लोकानी स्वतःला फार तर एगेटेरीयन म्हणावे. उगाच अंडे हे शाकाहारी कसे आहे हे सिद्ध करण्यात वेळ घालवु नये. इट इज नॉट!!! Happy
ज्ञानेश + १

Pages