अंडे व्हेज की नॉन-व्हेज.........?

Submitted by उदयन. on 28 January, 2012 - 02:27

अंडे व्हेज की नॉन-व्हेज.........?

हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे........

काही शाकाहारींच्या मते अंडे नॉन-व्हेज आहे......कारण त्यासाठी आपल्याला अंड फोडावे लागते त्यामुळे येणार्या जिवाची हत्या होते.... एकाला मारुन खाणे हे चुकीचे असल्याने अंड नॉन-व्हेज आहे........

परंतु काही अशे ही लोक आहेत जे अंडे व्हेज मानतात....त्यांच्या मते अंडे हे व्हेज आहे........जीव जन्माला यायच्या आधीच अंडे फोडल्याने काहीही चुकीचे नाही आहे...........जसे पाण्यातले जिव पिताना जिव जंतु पोटात जातात तसेच ही प्रक्रिया आहे..........

आपणास काय वाटते............????????

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>गाय दुध देते - दुध - शाकाहार
नाही दुध शाकाहार नाहीये. कारण ते गाय/म्हैस/बकरी/इ. च्या पोटातुन आलेले आहे आणि त्यामधे फॅटस असतात.

अंडे व्हेज की नॉन-व्हेज.........?

हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे........ >>>>>>> Proud Proud

कोणाला कोणता प्रश्न महत्वाचा वाटतो याबद्दल मी पामर काय बोलणार. कोणाला कोणता प्रश्न महत्वाचा वाटतो यावरुन शिविगाळ देखील करण्याची वेळ येउन गेली आहे माबोवर Proud Wink

अंडे व्हेज की नॉन-व्हेज.........?
हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे........ >>>>> आमिर खान ला सांगायला हव, सत्यमेव जयतेच्या फोरम वर चर्चा व्हायला हवी इतक्या गहन विषयावर Wink

पोटात गेल्यानंतर ."शाकाहारी " काय आणि " मांसाहारी " काय

कोण सांगू शकेल .शेवटी शाकाहारी खा किंवा मांसाहारी खा ...जे आपण खातो त्यातील घटक कोणते हे महत्त्वाचे

महेश चिमणपुरे,
गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ इ. ज्या बिया आपण खातो, ती त्या झाडांची अंडीच असतात की नाहीत? त्याला पन आपन बाहेर येन्या पुर्विच खातो. Happy :दिवे:

Pages