फुलपाखरु

Submitted by मोहना on 27 January, 2012 - 11:49

रोज एकेक स्वप्न
विसावतय मनाच्या कोपर्‍यात
म्हटलं, सवडीनं हाताळेन एकेक
पण तसं कधी घडलंच नाही
वाटतं, देवून टाकावीत सारी स्वप्न
जश्शीच्या तश्शी दुसर्‍याला
पण नकोच, मी हल्ली
एकेक स्वप्न निळ्याशार आभाळात सोडते
जसं,
खूप आवडीने धरलेल्या फुलपाखराला
मुक्त श्वास घेण्यासाठी सोडतो
तसं!

गुलमोहर: 

मनाच्या कोप-यात विसावणारी स्वप्नं गोडच असणार. त्याना निळ्या आभाळात सोडण्याची कल्पना नाजुक व सुंदर. माझ्या मते थ्री स्टार कविता