अमेरिकन वॅफल्स

Submitted by अव्यक्त on 26 January, 2012 - 23:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मैदा - १ कप( ४.७५ औस)
कणिक - १ कप( ४.७५ औस)
बेकिंग पावडर - १ टी स्पून
बेकिंग सोडा - अर्धा टी स्पून
मीठ - १ टी स्पून
साखर - ३ टेबलस्पून
अंडी - ३ नग
बटर - ४ टेबलस्पून
ताक - २ कप
व्हेजिटेबल स्प्रे व वॅफल मेकर

क्रमवार पाककृती: 

१. वॅफल मेकर प्रथम गरम करावा.
Waffle-4.JPG

२. सर्व कोरडे पदार्थ(मैदा, कणिक, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ व साखर) एका भांड्यात एकत्र करुन मिसळावे.
Waffle-1.JPG

३. अंडी व बटर दुसर्‍या भांड्यात एकत्र करुन फेटून घ्यावीत व नंतर त्यात ताक घालून थोडेसे घुसळावे.
Waffle-3.JPG

४. वरील म्हणजे क्र. ३ मधल्या द्रव पदार्थांचे मिश्रण क्र. २ मधल्या कोरड्या पदार्थांच्या मिश्रणावर ओतावे(असे का? त्यामुळे सगळे पदार्थ एकत्र करताना आजुबाजूला सांडत/पडत नाहित) आणि अगदी थोडेसे(१०-१२ वेळा फिरवा)/थोडा वेळच(१-२ मि.) मिक्स करा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यानंतर ५ मिनिटे तसेच ठेऊन द्या(त्यात थोड्या गुठळ्या, कोरड्या कणकेची पावडर दिसली तरी चालेल, ते ५ मि. ठेवणे महत्वाचे आहे).
Waffle-2.JPG

५. आता वॅफल मेकरवर व्हेजिटेबल स्प्रे चा एक हलकासा थर द्या आणि त्यानंतर मध्यम आकाराच्या डावाने क्र. ४ मधले मिश्रण त्यावर टाका(हे बरेचसे वॅफल मेकरच्या साईजवर पण अवलंबून असेल). वॅफल मेकरचे वरचे झाकण बंद करुन ते तांबूस होईपर्यंत शिजू द्यावेत(२-४ मि.)
Waffle-5.JPG

व नंतर लगेच मेपल सिरप बरोबर वाढावेत.
Waffle-6.JPG

वाढणी/प्रमाण: 
८ इंच व्यासाचे ६ नग - प्रामुख्याने वॅफल मेकरच्या आकारावर ठरते.
अधिक टिपा: 

हे वॅफल्स जर गार झाल्यावर फ्रीजर बॅगमधे घालून जर फ्रीजरमधे ठेवले तर ३ आठवडे आरामात टिकतात. हि रेसिपी जमल्यापासून गेली २ वर्षे आम्ही दुकानातून Frozen वॅफल्स आणलेले नाहित.

माहितीचा स्रोत: 
http://www.foodnetwork.com/recipes/alton-brown/basic-waffle-recipe/index.html
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच दिसताहेत. मला वाटतं उच्चार वॉफल्स असा आहे.

माझ्या घरी वॉफल मेकर नसल्याने मी पॅनकेक्स बनवते. पॅनकेक्सचा फायदा हा की पूर्णपणे कणकेचे बनतात. मैद्याची गरज नाही. आणि एकदम सोपे.

एका पातेल्यात एक अंडं फोडून त्यात एक डाव कणिक आणि पॅनकेक्स करता येतील इतपत दुध, एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ घालून छानपैकी एकत्र करा. गुठळ्या काढून टाका. तव्यावर तेल सोसून हे पीठ पसरा. झाकण ठेवा. एक मिनिटाने उलथा. पुन्हा एक मिनिट ठेऊन मग काढा. गरमागरम पॅनकेक्स आणि मध किंवा मेपल सिरप. मुलं एकदम खुष.

त्यातच हळद, तिखट टाकून तिखट पॅनकेक्स बनवता येतील.

आज केले वॉफल्स या पद्धतीने. मी निम्मे प्रमाण घेतले. १ अंडे वापरले. ताकाऐवजी २/३ कप दही आणि योग्य कंसिस्टंन्सी येइल इतपत दूध वापरले. चॉकलेट चिप्स घातल्या. छान झाले. किपर रेसिपी! Happy

ह्या पाककृतीत थोडे प्रयोग केल्यावर असे लक्शात आले कि कणकेचे प्रमाण ८०% पर्यंत वाढवले तरी क्वालिटीमधे अजिबात फरक पडत नाही.
संपुर्णपणे कणिक वापरून मात्र अजून करून बघितलेले नाहीत.