संस्कृतमधील सुभाषिते मराठीत - ४

Submitted by एम.कर्णिक on 26 January, 2012 - 05:16

सुभाषितांचा हा चौथा भाग रसिक वाचकांसाठी सादर. दुसर्‍या भागात विनार्च यांच्या पसंतीची दोन सुभाषिते दिली होती. या चौथ्या भागात प्रद्युम्नसंतु आणि उल्हास भिडे याना हव्या असलेल्या दोन सुभाषितांचा समावेश केला आहे. त्या दोघांनाही आवडतील अशी आशा करतो. सर्व रसिकांचा, त्यांच्या उत्तेजनपर प्रतिसादांबद्दल, मी खूप ऋणी आहे.

१७.
नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते मृगैः |
विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता ||

विधिवत अभिषेकाने सिंह वनराज ना बने
स्वबळावरती केवळ प्राणिसम्राट होइ तो

१८.
सत्यं ब्रुयात् प्रियम् ब्रुयात न ब्रुयात् सत्यमप्रियम् |
प्रियम् च नानॄतम् ब्रुयादेष: धर्म: सनातन: ||

गोड बोला, खरे बोला, नका बोलू कडू खरे |
आणि खोटे जरी गोड, कधी बोलू नयेच ते ||

१९.
वरं एको गुणी पुत्रो न च मूर्खशतान्यपि |
एकश्ंचद्रस्तमो हन्ति न च तारागणोऽपि च ||

पुत्र व्हावा गुणी एक, शेकडो मूर्ख ना बरे |
चांदणे एक शशि देतो, न देती कोटि तारका

२०.
न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारि |
व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानं ||

न चोर नेती, नच राज्यकर्ते, वाटे न बंधूंत, वा ते न ओझे|
परी वापराने सदा वाढते जे असे ज्ञानधन सर्व धनात मोठे ||

२१.
अतिपरिचयादवज्ञा संतत गमनादना दरो भवति |
मलये भिल्ल पुरंध्री चंदनतरुकाष्ठमिंधनम् कुरुते ||

अति सलगीत न किंमत, सततभेटिने अनादरचि वाढे |
भिल्लिण मलयगिरीतिल सर्पण जाळी चंदन तरुखोडे ||

२२.
यत्र विद्वज्जनो नास्ति, श्लाघस्तत्राल्पधिरपि
निरस्तपादपे देशे एरण्डोपि द्रुमायते
विद्वान् न मिळे तेव्हा अर्धज्ञान्यास मान्यता
झाडांची वानवा जेथे, एरंडा वृक्ष मानती

दुवे:
सुभाषिते १ ते ५ - http://www.maayboli.com/node/32066
सुभाषिते ६ ते ११ - http://www.maayboli.com/node/32119
सुभाषिते १२ ते १६ - http://www.maayboli.com/node/32218
सुभाषिते २३ ते २७ - http://www.maayboli.com/node/32376
सुभाषिते २८ ते ३२ - http://www.maayboli.com/node/32490
सुभाषिते ३३ ते ३७ - http://www.maayboli.com/node/32590
सुभाषिते ३८ ते ४५ - http://www.maayboli.com/node/32633
सुभाषिते ४६ ते ५१ - http://www.maayboli.com/node/32873

गुलमोहर: 

तुमच्यामुळे नविन नविन सुभाषितं वाचायला मिळत आहेत व विस्मृतीत गेलेली सुभाषितं नव्यानं आठवत आहेत, त्याबद्द्ल तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. Happy

तुमच्यामुळे नविन नविन सुभाषितं वाचायला मिळत आहेत व विस्मृतीत गेलेली सुभाषितं नव्यानं आठवत आहेत, त्याबद्द्ल तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत >>> +१ खुप छान Happy

तुमच्यामुळे नविन नविन सुभाषितं वाचायला मिळत आहेत व विस्मृतीत गेलेली सुभाषितं नव्यानं आठवत आहेत, त्याबद्द्ल तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत.>>> अनुमोदन. Happy

सुंदर!