संस्कृतमधील सुभाषिते मराठीत - ६

Submitted by एम.कर्णिक on 6 February, 2012 - 05:21

सुभाषितांचा हा सहावा भाग सादर करतो आहे. आशा आहे की या भागाबरोबरच यापूर्वीचे भागही पुनः पुनः वाचले जातील. कारण अशा वाचण्याने त्यांतली सुभाषिते पाठ होतील आणि लेखनात किंवा संभाषणातही योग्य वेळी त्यांचा उपयोग करून घेतला तर आपले लेखन वा बोलणे जास्त आकर्षक होईल.

२८.
गौरवं प्राप्यते दानात् न तु वित्तस्य संचयात् |
स्थिति: उच्चै: पयोदानां पयोधीनां अध: स्थिति: ||

देण्याने सन्मान लाभतो, ना साठवुनी संपत्ती |
म्हणुनि मेघ वर आकाशी अन् सागर खाली भूवरती ||

२९.
विद्या विवादाय धनं मदाय शक्ति: परेषां परिपीडनाय |
खलस्य साधोर्विपरीतमेतज्ज्ञानाय दानाय च रक्षणाय ||

वादासि विद्या, गर्वासि लक्ष्मी, शक्ती कराया पीडा जनांसी |
या दुष्टवृत्ती, परी सज्जनांच्या - ज्ञानासि, दानासि, अन रक्षणासी ||

३०.
उष्ट्राणां लग्नवेलायां गर्दभा: मंत्रपाठका: |
परस्परं प्रशंसन्ति अहो रुपमहो ध्वनि: ||

उंटांच्या लग्नात गाढवे रेकुन मंत्रपठण करती |
"सुरेल तुम्ही", "तुम्हीही सुंदर" एकामेका प्रशंसती ||

३१.
अपूर्व: कोपि कोशोयं विद्यते तव भारति |
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात् ||

कोषागार तुझा अद्भुत, विद्येचा, हे सरस्वती |
खर्चता वाहतो भरुनी, साठपाने आकुंचतो ||

३२.
पिबन्ति नद्य: स्वयमेव नाम्भ: स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा: |
नादन्ति सस्यं खलु वारिवाहा परोपकाराय सतां विभूतय: ||

स्वत:चेच पाणी न पितात सरिता, तसे वृक्ष अपुलीच फळे न खाती |
न मान्य मेघांसही धान्य खाणे, सुजन सर्व परोपकारीच व्यक्ती ||

दुवे:
सुभाषिते १ ते ५ - http://www.maayboli.com/node/32066
सुभाषिते ६ ते ११ - http://www.maayboli.com/node/32119
सुभाषिते १२ ते १६ - http://www.maayboli.com/node/32218
सुभाषिते १७ ते २२ - http://www.maayboli.com/node/32230
सुभाषिते २३ ते २७ - http://www.maayboli.com/node/32376
सुभाषिते ३३ ते ३७ - http://www.maayboli.com/node/32590
सुभाषिते ३८ ते ४५ - http://www.maayboli.com/node/32633
सुभाषिते ४६ ते ५१ - http://www.maayboli.com/node/32873

गुलमोहर: 

वा, सुभाषितांची निवड उत्कृष्ट. अनुवाद एकाहून एक सरस. सहावा भाग सुलभ, सुंदर, सुरेख.