मराठी भाषा दिवस २०१२ - संयोजक पाहिजेत

Submitted by admin on 19 January, 2012 - 01:19

२०१२चा मराठी भाषा दिवस दिड महिन्यावर आला आहे. गेली २ वर्षे संयुक्ता सदस्यांनी उत्कृष्टपणे ह्या उपक्रमाचे संयोजन केले. दोनही वर्षे संयुक्ताबाहेरील मायबोली सदस्यांनी या उपक्रमाच्या संयोजनात भाग घेण्याची उत्सुकता दाखवली.

त्यानुसार यंदाचे मराठी भाषा दिवस संयोजन सर्वांसाठी खुले केले आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.

मागील मराठी भाषा दिवस कार्यक्रमः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ममं ला तरी त्यांची माहिती असते>> तसेच... समजा त्या सभासदाने फक्त मायबोली प्रशासनाला संपूर्ण ओळख आणि संपर्क दिला तर पुरेसे नाही का? इतरांना त्या सभासदाने सगळी माहिती द्यायची काय गरज आहे? मी ममंच्या कार्यक्रमाला जातो त्यावेळी पावत्या फाडणारा कोण आहे वगैरे विचारत नाही त्यावेळी मी ममंच्या कार्यकारिणीवर विश्वास टाकलेला असतो. (इथे मायबोली प्रशासनावर).
काहीही माहिती नसताना ममं तिकीटे फाडायला बसु देणार नाही पण शेवटी खुर्च्या उचलायला लावते त्यावेळी इमेल वगैरे माहिती नसली तरी चालते ना? मग एखाद्या सभासदाला भाग घ्यायचाच आहे पण स्वत:बद्दल संपूर्ण माहिती द्यायची नाही अशा व्यक्तिला इतर कामे (उदा. जाहिराती करणे, टेम्प्लेट बनवणे, रुपरेषा ठरवणे इ.) पण देता येतीलच ना?

कोणाला संयोजक समितीत घ्यायचे आणि त्याचे काय निकष असावेत हा सर्वस्वी मायबोली प्रशासनाचा निर्णय आहे आणि कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही पण संयोजक समिती मधे भाग घेणार्‍याने स्वतःची माहिती सार्वजनिक करायलाच हवी हा नियम आणि त्यामागची कारणमिमांसा अजुन फारशी नाही कळाली.

आपण यापुढच्या उपक्रमांसाठी , संयोजनात भाग घेण्यासाठी खालील धोरण ठरवले आहे.

संयोजकांना त्यांचे खरे नाव जाहीर करावे लागेल. हे उपक्रमाच्या पानावर किंवा सगळ्यात सोपे म्हणजे त्यांच्या व्यक्तिरेखेत दाखवलेले पुरेसे असेल.

याशिवाय त्या उपक्रमाचे आयोजन करणार्‍या सहकारी संयोजकांना फोन आणि कुठली वेळ सोयिची आहे हे सांगावे लागेल. ते इतरांना सांगायची गरज नाही.

सहसा कार्यक्रमात ५-६ संयोजक असतात. त्यांना जसे पडेल तसे काम वाटून घ्यावे लागते. त्यामुळे सगळ्यांना सारख्याच परवानग्या असतात. प्रत्यक्ष जगात वेगवेगळ्या पातळीवरची कामे, परवानग्या देता येतात. पण ऑनलाईन काम करताना फक्त ५-६ जणात कुणाला कुठल्या माहितीला परवानगी आहे कुणाला नाही हे लक्षात ठेवत बसले तर मूळात कार्यक्रमाकडे लक्ष द्यायला वेळ राहणार नाही आणि संयोजकांचे प्रशासन हेच एक अजून काम होऊन बसेल. ज्या व्यक्तीला मदत करण्याची इच्छा आहे पण नाव द्यायचे नाही अशी व्यक्ती काही कामे, बाहेरून ईमेलने मदत करू शकते (उदा जाहिरात तयार करणे, चित्रे काढणे) पण कुठली कामे अशी बाहेर देता येतील हे त्या त्या कामावर, उपलब्ध असणार्‍या वेळावर, संयोजकांच्या मतावर अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असल्याने एक सरसकट नियम करता येणार नाहि. पण त्या व्यक्ती संयोजक ग्रूप मधे नसतील हे नक्की.

वर लिहलेल्या बर्‍याच प्रतिक्रियांमधे संयोजक, स्वयंसेवक, सहभागी मायबोलीकर यांची सरमिसळ होते आहे. हे गट वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले तर गोष्टी जास्त स्पष्ट होतील असे वाटते. प्रत्येक संयोजक हा स्वयंसेवक असेल पण प्रत्येक स्वयंसेवक संयोजक असलाच पाहिजे असे नाही.

तसेच "माहिती" द्यावी लागणार आहे या शब्दांमुळे जर खूप काही प्रकाशीत करावे लागणार असे वाटले असेल तर ते तसे नाही आणि नक्की काय जाहिर करावे लागणार आणि कुणाला हे वर स्पष्ट केले आहे.

वेबमास्तर , तुमच्या निर्णयाशी मी सहमत आहे हे पुर्वीच्या माझ्या पोस्ट मध्येच मी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यावर काही लिहित नाही.
पण ज्या प्रकारे आपण(म्हणजे आपली मायबोली या अर्थाने) हा निर्णय जाहीर करतोय ती पद्धत नाही आवडली.
हा निर्णय अशाप्रकारे एखादा कार्यक्रम जाहीर करायचा आणि मग एकदम अचानक लोकांनी नाव द्यायला सुरुवात केल्यावर सांगायचे ते ठिक नाही वाटले. या पुढे भविष्यात 'असे महत्वाचे निर्णय्/पॉलिसी चेंजेस' व्यवस्थित घोषणा करुन लोकांपर्यंता जावुदेत. आणि मग स्पर्धेच्या घोषणा वगैरे करण योग्य ठरेल.
हे यासाठी म्हटल कि त्यामुळे मुळ विषय (इथे 'मभादी') वरील लाईमलाईट कमी झाल्यासारखे झाले. Happy
थोडक्यात मायबोलीला PR टिमची गरज आहे आता. Happy

वैद्यबुवा..
बाहेरच्या संस्थांचा मभादि मधला सहभाग हे बाफच्या वरच्या घोषणेत किंवा वेबमास्तरांच्या पहिल्या पोस्टमध्ये कुठेही आलेलं नव्हतं. तसेच त्यांच्या पहिल्या पोस्टमध्ये 'लहान मुलांची सुरक्षितता' ह्या एकाच मुद्द्यावर जोर होता. तसेच व्यक्त्ती प्रत्यक्ष भेटलेली हवी हे ज्यांनी पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं ते आता अनीवार्य नाही असं दिसतय. संयोजक मंडळात प्रत्येकाने फोन नंबर देणे आणि स्वतःचे खरे नाव जाहीर करणे हे निकष असतील तर ठिक आहे.

माहिती हवी हा मुद्दा मलातरी आजिबात ओढून ताणून आणल्यासारखा वाटत नाही. >>>> ह्या मुद्द्याला मी ओढूतताणून आणलेला म्हणतच नाहीये ! त्यासाठी दिलेली कारणे ह्याबद्दल ते होतं. आणि ते तसं का वाटलं हे वर लिहिलेलं आहे! सीमा म्हणते तसं हे सगळं सगळे मुद्दे एका पोस्टीत/घोषणेत लिहून मांडलं असतं तर इतकी चर्चा (आणि लॉजिक बाबतचे गोंधळ) झाली नसती.

म्हणजे ते भेटले असले पाहिजे इ. नाही तर. ओके. आणि माहिती द्यायची नसेल तरी काही कामे करता येतील. >>> शेवटी सार हे आहे तर Happy

या धाग्याचा विषय नाहीये, पण, ओघात आलाय विषय म्हणून....

>>>> अंS, नाही पटले.
वेबमास्तरांनी हे फक्त म.भा.दि उपक्रम संयोजकांबाबत लिहीले आहे ना? त्या पूर्ण टीमला त्या आयडीची माहिती असली की पुरे आहे. ते प्रोफाईलामध्येच असले पाहिजे असे नाही.
मालक, चालक, व्यवस्थापक, संयोजक यांची नावे वाचकाला माहित नसली तरी टीमला माहित असली तरी पुरे and vice versa हे मा.वै.म. <<<<

रैना, नेमका हाच स्टॅण्ड मी "उद्योजकांचे" ग्रुप मधिल सहभागाबद्दल घेतला होता, की प्रोफाइल मधे देखिल नावगावपत्ता जाहीर करायचा असेल तर मला ते तात्विकदृष्ट्या मान्य होत नाही.
अर्थात नेहेमी प्रमाणेच, नेहेमीच्याच यशस्वी आयडीज कडून, "लिम्ब्याच्या" मुद्याला अन आयडीला वाटाण्याच्या अक्षता लावून झाल्या. Proud असो.

मी बाबा उपक्रमात भागच घेणार, ते संयोजन वगैरे अवघड आहे मला!

त्यात काय लिंबु.
मीही तोच मुद्दा मांडला होता. पण त्यांना तो मान्य नाही. मी उद्योजक ग्रुपची सभासद होऊ शकलेले नाही.
ठिकाय की. माझ्या काही अडचणी आहेत, त्यांच्याही असतील. मला हाणून वगैरे पाडण्याइतकी मी कोणी महत्त्वाची व्यक्ती नाही. Happy

Pages