मराठी भाषा दिवस २०१२ - संयोजक पाहिजेत

Submitted by admin on 19 January, 2012 - 01:19

२०१२चा मराठी भाषा दिवस दिड महिन्यावर आला आहे. गेली २ वर्षे संयुक्ता सदस्यांनी उत्कृष्टपणे ह्या उपक्रमाचे संयोजन केले. दोनही वर्षे संयुक्ताबाहेरील मायबोली सदस्यांनी या उपक्रमाच्या संयोजनात भाग घेण्याची उत्सुकता दाखवली.

त्यानुसार यंदाचे मराठी भाषा दिवस संयोजन सर्वांसाठी खुले केले आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.

मागील मराठी भाषा दिवस कार्यक्रमः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वेळ द्यायला तयार आहे. २०१० मध्ये होते या उपक्रमात. त्यामुळे नियमांत बसत नसेल तर काही हरकत नाही, दुसर्‍या कोणातरी घ्या.

अ‍ॅडमिन / माजी संयोजक
काय प्रकारची मदत लागेल, वेळेची कमिटमेंट किती असू शकते, इंटरनेट सुविधा ./मायबोली अ‍ॅक्सेस किमान किती असावा , साधारण किती लोक एका संयोजक समितीत असावेत, त्यांना कशा प्रकारचा अनुभव असावा हे सर्व विस्ताराने लिहाल का ?

त्यांनी पूर्वी असे काम केले नाही त्यांना नीट अंदाज येईल.

मायबोलीच्या वाढत्या उपक्रमांमधे आणि विशेषतः मराठी भाषा उपक्रमांमधे लहान मुलांचा सहभाग असल्याने, या संयोजक समितीवर इतर समित्यांपेक्षा जास्त जबाबदारी असते. त्यामुळे या समितीत सहभागी होणार्‍यांना व्यक्ती इतर सभासदांना माहिती हव्या, भेटलेल्या हव्या (आयडीमागची व्यक्ती). याच कारणामुळे पहिले दोन वर्षे संयुक्ता सभासदांनी हे काम पाहिले. नवीन समितीवर ईच्छूक असणार्‍या व्यक्तींनी या अतिशय महत्वाच्या गोष्टीची तयारी ठेवावी अन्यथा हा चांगला उपक्रम वादाच्या भोवर्‍यात सापडून बंद होऊ शकतो.

कामाचे स्वरूप आणि द्यावा लागणारा वेळ मायबोलीवरच्या इतर उपक्रमांसारखाच असतो. गणेशोत्सवापेक्षा कमी असतो कारण दहा दिवस कार्यक्रम सुरु नसतात. पण एकाच दिवशी अनेक स्पर्धा असल्याने अगदी नगण्यही नसतो.
जुने मराठी भाषा दिवसाचे कार्यक्रम पाहिले तर कामाचा अंदाज येउ शकतो. जुन्या स्वयंसेवकांकडून जास्त चांगला अंदाज मिळू शकेल.

माहिती बद्दल धन्यवाद वेबमास्टर. गेले काही वर्ष बर्‍याचशा उपक्रमांसाठी हा नियम दिसतो तेव्हा नेहमी होणारे जे कार्यक्रम आहेत (दिवाळी अंक, गणेशोत्सव, मराठी भाषा दिवस ई.ई.) त्यांची एक यादी करून, या कार्यक्रमांसाठी कुणाला प्रत्यक्ष नं भेटलेले, माहिती नं सांगणारे आयडी भाग घेऊ शकणार नाहीत ही सुचना एक धागा उघडून कायमस्वरुपी करून टाकावी. मायबोलीच्या अशा कार्यक्रमातील संयोजनात नव नविन लोकांना प्राधान्य दिले जाते तेव्हा मायबोलीवर आलेल्या नविन सदस्यांना पण हे माहित होईल व ते त्या प्रमाणे सहभागी व्हायचे अथवा नाही हे ठरवू शकतील.

आणि हो वरच्या अ‍ॅडमिनच्या पोस्ट मधले हे वाक्य सुद्धा एडीट केल्यास बरे होईल >>>

>>>त्यानुसार यंदाचे मराठी भाषा दिवस संयोजन सर्वांसाठी खुले केले आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.

त्यामुळे या समितीत सहभागी होणार्‍यांना व्यक्ती इतर सभासदांना माहिती हव्या, भेटलेल्या हव्या (आयडीमागची व्यक्ती). >>> नाही पटलं . संयोजन जे होणार आहे ते इंटरनेटच्या माध्यमातुनच होणार आहे . माहीतीचा दुरुपयोग म्हणत असाल तर तो माहीती असलेली व्यक्तीही करु शकेल.

मराठी भाषा दिवसाच्या प्रोग्रॅमच काम हे इतर कुठल्याही संयोजनापेक्षा बरचस वेगळ आहे. पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. त्यामुळ हे काम खुप पेशन्स ने कराव लागत.
मनात असलेली कल्पना प्रत्यक्षात उतरेल असच नाही.
उदा. पहिल्या वेळी लहान मुलांच्याच हाताने लिहून जाहीराती लिहायच अस ठरलेल. ही आयडीया सर्वानाच पसंत पडलेली. पण प्रत्यक्ष कामाच्यावेळी लक्षात आल कि लहान मुलांच्या हाताने लिहिलेली अक्षर स्कॅनिंग केल कि स्पष्ट दिसायची नाहीत. वर खाली रेषा असल्यामुळं अलाइनमेंट व्यवस्थित व्ह्यायची नाही. बरच काम कराव लागलेल त्यावर.
दुसर म्हणजे जाहीराती लिहिताना , किंवा अन्य कुठलाही मजकुर लिहिताना लहान मुलांच्या समोर वाचला जात असल्यामुळ , मजकुर सुटसुटीत,सोपा ,आकर्षक असावा लागतो.स्पर्धाही तशाच आखाव्या लागतात.
याला एक मोठ कारण म्हणजे परदेशस्थ मुलांचा या स्पर्धेत असलेला सहभाग. (प्लिज नविन वाद सुरु करु नका. वस्तुस्थिती जी आहे ते लिहिलय.)

बरेच पालक , आपल्या मुलांच खर नाव देवू इच्छित नाहीत. तसच वरती वेबमास्तरांनी सुचना दिली आहे ती थोडी समजावून घेण्याचा प्रयत्न करा. शाळेसाठी काम करताना इथे बॅकग्राउंड चेकअप झाल्याशिवाय तुम्हाला मुलांबरोबर स्वयंसेवकाचा काम करता येत नाही. इथे तर कायद्यानेही ते मस्ट आहे. (ऑनलाईन वेबसाईट च काम असल तरी.) मायबोली दिवसेनदिवस वाढत चालली आहे. अशावेळी अशा टाईप्सच्या सुचनांची आपण सगळ्यानीच सवय करुन घ्यायला काय हरकत आहे? आत्ता तुम्हाला ते 'अति ' वाटु शकत. पण भविष्यकाळाच्या दृष्टीने ही चांगली सुरुवात होती आहे असा विचार करुन बघा.

सीमा किंवा वेबमास्तर.. तुमचे पोस्ट्स वाचून मी आधीच्या वर्षांचे मराठी भाषा दिनांचे कार्यक्रम परत एकदा जाऊन पाहिले. लहान मुलांसंबंधी पुढील कार्यक्रम होते : इवलेसे रोप, बोलगाणी (दोन्ही वर्ष), बालकवी. ह्या सर्व कार्यक्रमांचे स्वरूप साधारण पालकांनी मुलांकडून म्हणून, लिहून, काढून घेणे, स्वयंसेवक मंडळाने ते तपासणे (नियमांत बसतय ना? थीम नुसार आहे ना? वेळेत दिलय ना? वगैरे) आणि ठरलेल्या टाईमटेबल नुसार बाफवर अपलोड करणे अश्या स्वरूपाचं वाटयत. त्या शिवाय जर मुलांच्या हातून जाहिराती वगैरे बनवून घ्यायच्या असतील तरी त्या मुलांचे आई-वडिल त्या बनवून घेऊन मंडळाकडे पाठवत असतील किंवा मंडळातल्या व्यक्ती आपल्या मुलांकडून बनवून घेत असतील. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मुलांचा किंवा मुलांशी सबंधित कुठल्याही माहितीचा/गोष्टीचा मंडळातल्या स्वयंसेवकांशी प्रत्यक्ष संबंध खरच येतो का? मंडळ हे फक्त कार्यक्रम ठरवणे आणि ते नियमांनुसार राबवणे इतकच करत असेल ना?

सीमा, लहान मुलांबरोबर शाळेत वगैरे स्वयंसेवक म्हणून काम करताना बॅकग्राऊंड चेकची गरज असणं बरोबर आहे. पण तिथे स्वयंसेवकांचा मुलांशी डायरेक्ट संबंध येत असेल ना ? त्यामुळे इथे ही गोष्ट खरच लागू होते आहे का ते मला कळत नाहीये.
मला आठवतय HH च्या मुलीच्याही दोन्ही वर्षी प्रवेशिका होत्या. त्या घेत असताना मंडळाला HH शी इमेल व्यतिरिक्त्त इतर कोणत्याही माध्यमांतून किंवा प्रत्यक्ष संपर्क साधायची गरज पडली होती का? स्वत:ची किंवा मुलांची नावं जाहिर करायची नसतील तर तो प्रश्न मंडळात माहितीचे स्वयंसेवक असूनही येणारच की.. कारण शेवटी प्रवेशिका मायबोलीवर सार्वजनिक स्वरूपातच प्रसिद्ध होणार आहे.

मुलांबद्दल पालकांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे पण एकंदर ह्या व्हर्च्युअल कार्यक्रमात ओळखीचे स्वयंसेवक/असणे नसणे ह्याने त्यात खरच किती फरक पडेल ते मला कळत नाहीये. माजी संयोजकांनी, किंवा पालकांनी ह्यावर प्रकाश टाकला तर मला मुद्दा समजायला मदत होईल.

नमस्कार! मदत करायची तयारी माझीही आहे. Actually, I think we should select those people who are not only ready to help but they are creative/innovative by nature. They should think what we can do from literature point of view because people mostly write here. So, instead of chosing common/routine subject for writing, we should think entirly new. Other point is, the selected members should have marketing skill means they should know that advertizements play an important role in inspiring other members to participate in such kind of events. Thanks.

बी, या आधीही मायबोलीवर जेवढे उपक्रम झालेत त्यात जाहिराती नेहमीच चांगल्या होत्या आणि वेळेवरही येत होत्या की.मग वर जो मुद्दा मांडलास त्यात तुला वेगळं काही म्हणायचं आहे का?

सीमा तुझे पोस्ट >> तुम्हाला ते 'अति ' वाटु शकतं >> हे मला उद्देशून नाहीये असं समजते कारण या नियमाबद्दल मी वर कुठलाही आक्षेप नोंदवला नाहीये. उलट या साठी "स्वयंसेवक होण्यासाठी आवश्यक असलेले नियम एलिजिबिलिटी ई." टाईपचा एक धागा उघडावा असेच सुचवले आहे.

HH , कृपया गैरसमज करुन घेवू नको.' अति ' वाटते याचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा मलाच तस वाटतय खरतर. Happy
तुझ वरच पोस्ट मी वाचलय.
खरोखरच इथल्या स्कुलमधल्या प्रोसेसेस वगैरे बघितल्यावर वाटायच मला तस. सो मलाच ते 'अति 'वाटतय.
पण तस वाटुनही मी अ‍ॅक्सेप्ट करुन टाकलय कि , प्रोसेस आणि रुल्स तसे आहेत. आणि मला ते फॉलो करावे लागणार आहेत.
आणि वेबमास्तरांनीही त्याप्रमाणे काहीतरी विचार करुनच हा निर्णय घेतला असेल .

पराग , मी लिहिलेला पहिला पॅराग्राफ हा आम्ही केलेली चुक दाखविण्यासाठी लिहिला आहे. मुलांसाठी स्पर्धा आखताना अशा चुका होवू शकतात. आणि हे गणपती /दिवाळी अंकापेक्षा थोड वेगळ काम आहे. हे दाखविण्यासाठी लिहिल आहे.

सीमा, जाहिराती कितीही वेळेवर आणि जास्त प्रमाणात टाकल्यात तरी त्या कमीचं असतात. मी फक्त महत्त्वाचे काय ते सांगितले. तसे सांगितले म्हणून मागच्या जाहिरातीत काही कमी होते असे सांगणे नव्हते. वेगळेपणा हवाच हवा असतो. तोचतोचपणा आला की लोकांना उत्साह आणि ओढ कमी होते.

बी , अरे तुझ पोस्ट इंग्रजीमध्ये असल्याने मी ते वाचायला पण गेले नाहीये. Proud
तुला बहुदा सायोला उद्देशुन म्हणायचे आहे.

सीमा, हो मला सायोलाच म्हणायचे आहे. तुझे ईंग्रजी इतके कच्चे आहे हे मला माहिती नव्हते. तरी बर उसगावात राहते! कमीतकमी ईंग्रजी तरी शिकायचे असते ऐव्हना Happy

सीमा... मला नाही कळलं तू काय म्हणते आहेस ते.
मी तुझ्या पोस्टमधल्या
<<< बरेच पालक , आपल्या मुलांच खर नाव देवू इच्छित नाहीत. तसच वरती वेबमास्तरांनी सुचना दिली आहे ती थोडी समजावून घेण्याचा प्रयत्न करा. शाळेसाठी काम करताना इथे बॅकग्राउंड चेकअप झाल्याशिवाय तुम्हाला मुलांबरोबर स्वयंसेवकाचा काम करता येत नाही. इथे तर कायद्यानेही ते मस्ट आहे. (ऑनलाईन वेबसाईट च काम असल तरी.) मायबोली दिवसेनदिवस वाढत चालली आहे. अशावेळी अशा टाईप्सच्या सुचनांची आपण सगळ्यानीच सवय करुन घ्यायला काय हरकत आहे? आत्ता तुम्हाला ते 'अति ' वाटु शकत. पण भविष्यकाळाच्या दृष्टीने ही चांगली सुरुवात होती आहे असा विचार करुन बघा. >>>>
ह्या भागाबद्दल बोलतोय. ज्यात वेबमास्तरांच्या सुचनेला तू अनुमोदन दिलं आहेस (असं मला वाटतय) . वेबमास्तरांच्या त्या सुचनेमागचं नक्की कारण मला कळत नाहीये ज्याबद्दल मी डिटेल्स वर लिहिले आहेत. त्यामुळे ते समजून घ्यायला त्यांनी, तू, माजी संयोजकांनी किंवा इतर पालकांनी ज्यांचं ह्याला मदत करावी असं मला म्हणायचं आहे. Happy

कुठल्याही प्रकारचे संयोजनात भाग घ्यायचा असेल, तर आयडीमागच्या "व्यक्तिच्या प्रत्यक्ष ओळखीची" अट अत्यंत बरोबर आहे असे मला वाटते. Happy
(बायदिवे, संयोजकान्ना सुयोग्य सूचना करण्यासाठी मात्र ही ओळखीची अट नस्ते बर का पराग भाऊ! Proud )

विविध अडचणींमुळे मी संयोजनात येऊ शकत नसलो तरी शक्य तितक्या उपक्रम/स्पर्धांमधे भाग घेणारच.

Pages