मराठी भाषा दिवस २०१२ - संयोजक पाहिजेत

Submitted by admin on 19 January, 2012 - 01:19

२०१२चा मराठी भाषा दिवस दिड महिन्यावर आला आहे. गेली २ वर्षे संयुक्ता सदस्यांनी उत्कृष्टपणे ह्या उपक्रमाचे संयोजन केले. दोनही वर्षे संयुक्ताबाहेरील मायबोली सदस्यांनी या उपक्रमाच्या संयोजनात भाग घेण्याची उत्सुकता दाखवली.

त्यानुसार यंदाचे मराठी भाषा दिवस संयोजन सर्वांसाठी खुले केले आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.

मागील मराठी भाषा दिवस कार्यक्रमः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान मुलांनी पाठवलेल्या प्रवेशिकांचा (विशेषतः दृक्श्राव्य) गैरवापर होऊ नये - किंवा दुर्दैवाने तशी शंका आली तर त्यावर ताबडतोब कार्यवाही करता यावी यासाठी ती अट असावी. निदान पालक म्हणून मला ते महत्त्वाचं वाटतं.

मायबोली आपलं सर्वांचं विश्वासाचं ठिकाण आहे, घरासारखं आहे, इथे असे गैर प्रकार झालेले नाहीत, होणार नाहीत असं मलाही वाटतं, पण सावधगिरी बाळगलेली कधीही उत्तमच.

HH, 'सर्वांसाठी' याचा अर्थ 'संयुक्ताबाहेरीलही लोकांसाठी' असा अर्थ मी घेतला. (गेली २ वर्षे संयुक्ता सदस्यांनी उत्कृष्टपणे ह्या उपक्रमाचे संयोजन केले. दोनही वर्षे संयुक्ताबाहेरील मायबोली सदस्यांनी या उपक्रमाच्या संयोजनात भाग घेण्याची उत्सुकता दाखवली. त्यानुसार यंदाचे मराठी भाषा दिवस संयोजन सर्वांसाठी खुले केले आहे- असं अ‍ॅडमिननी लिहिलं आहे.)

webmaster यांच्या पोस्टमधले 'या समितीत सहभागी होणार्‍यांना व्यक्ती इतर सभासदांना माहिती हव्या, भेटलेल्या हव्या' हे मला बरोबर वाटते आहे. त्याव्यतिरिक्त संयोजकांना आपल्याकडून होईल तेवढी ऐच्छिक मदत देऊ करण्याचे काम सगळेच करू शकतात. Happy

>>"स्वयंसेवक होण्यासाठी आवश्यक असलेले नियम एलिजिबिलिटी ई." टाईपचा एक धागा उघडावा असेच सुचवले >>आहे.
अनुमोदन.

पग्याचे पहिले पोस्ट + १.

तरीही यातले कायदे/अडचणी काय ते वेमाच जाणे. तेव्हा 'आहे हे असे आहे' म्हणून स्वीकारावे आणि पुढे जावे.
मी डुप्लिकेट आयडी आहे. मी भाग घ्यायचा प्रयत्न करणार. Happy

वयानुसार (६०) झेपेल इतपत काम करायची माझी इच्छा आहे.
अ‍ॅडमिनकडून कामाचं स्वरूप स्पष्ट होईलच.
मी खर्‍या नांवानेच वावरतो.
त्यामुळे स्वत:बाबतची माहिती द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------
स्वातीजींनी वर मांडलेल्या मुद्यांशी सहमत.

तरीही यातले कायदे/अडचणी काय ते वेमाच जाणे. >>>> इतर कायदे/अडचणी असतील तर ठिक आहे. जसं, जर प्रत्यक्ष माहिती नसलेल्या आयडीला एखादं काम सांगितलं आहे अणि तो आयडी त्याच्या वैयक्तिक अडचणींमुळे गायब झाला तर मंडळाचं काम खोळंबून राहू शकतं. किंवा काही काही गोष्टी बाफवर लिहीत बसण्यापेक्षा बोलून (प्रत्यक्ष/फोन/चॅटवर/स्काईप इ. वर) पटकन सोडवता येऊ शकतात. पण मुलांच्या अ‍ॅक्टीव्हीटीज आहेत म्हणून माहिती नसलेले आयडी नको हे मला कळत नाहीये ज्याबद्दल मी वर लिहीलं आहे. जर नियम लावायची कारणं वेगळी असतील तर ती नमुद केली तर सगळ्यांना समजून घ्यायला सोप्प जाईल.

मुलांनी पाठवलेल्या प्रवेशिकांचा गैरवापर कार्यक्रमात प्रवेशिका प्रसिद्ध झाल्यावरही होऊ शकतोच. त्यामुळे हा एक नियम लावून त्याला पूर्ण आळा बसू शकेल असं वाटत नाही.

असो.

वेमांनी जे काही त्यांच्या प्रतिसादात म्हटलंय त्याचा अर्थ मला बराच वेळ विचार करूनही नेमका समजलेला नाहीये.
Sad
त्यानंतरची इतर सभासदांची त्यावरची मत-मतांतरे वाचूनही मला नेमका उलगडा होत नाहीये...

गणेशोत्सव २०११ च्या समितीत मी काम केलेलं आहे...त्यातही लहान मुलांसाठीच्या स्पर्धा भरवल्या गेल्या होत्या...समितीतले सभासद एकमेकांना वैयक्तिकपणे ओळखतही नव्हते...माझ्या व्यतिरिक्त इतर सभासद टोपण नावाचेच होते...तरीही आमच्यात कुठे विसंवाद निर्माण झाला नाही अथवा कामात टाळाटाळ झाली नाही...कुणाला झुकतं माप दिलं/कुणाकडे मुद्दामहून दूर्लक्ष केलं असंही काही घडलेलं नाहीये...अशा परिस्थितीत आता जे काही वेमा म्हणताहेत त्याचा संदर्भच मला लागत नाहीये..
..
असो...तरीही जे काही नियम असतील ते सगळ्यांना पाळावे तर लागणारच हे मान्य असूनही वर निर्माण झालेल्या शंकांचे निरसन होईल ही अपेक्षा....त्यामुळे कृपया हा प्रतिसाद म्हणजे खोडकरपणा समजू नये ही विनंती

मायबोलीवर लिहताना आपली काय वैयक्तिक माहिती उघड करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही वेळेस अशी माहिती न दिल्याने काही जणांना जास्त मोकळेपणाने लिहता आले आहे.
पण मायबोलीच्या उपक्रमाचे आयोजन करताना तुम्ही फक्त स्वतःचे नाही तर कुठल्यातरी पातळीवर मायबोली या वैश्विक कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असता. त्या भूमिकेत जर तुम्ही तुमचे खरे नाव, गाव, व्यक्तिमत्व दडवण्याचा प्रयत्न करणार असाल (आणि तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी) इतरांना (विशेषतः मायबोलीवर नवीन आलेल्याना, मायबोलीवर येऊ इच्छीणार्‍या), तुमच्या हेतूबद्दल शंका घेण्यास नक्की जागा आहे. आणि तुमचा हेतू चांगला असला तरी भविष्यात असे करू शकणार्‍या सगळ्यांचा असेलच नाही. खरे नाव देऊन कुणि वाईट वागणारच नाही असे सांगता येत नाही हे मान्य. पण खरे नाव,गाव इत्यादी न देता गायब होणे जास्त सोपे.

समजा तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या संस्थेच्या कार्यक्रमाला जात आहात. आणि तिथे गेल्या सगळे संयोजक मुखवटयामागे असतील तर तुम्हाला भाग घ्यावासा वाटेल का? मी मायबोलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करणार, मायबोलीचे प्रतिनिधित्व करणार, पण खरे व्यक्तीमत्व कुणालाही कळू देणार नाही ही भूमिका मला मायबोली या संस्थेच्या हितासाठी आणि विश्वासासाठी योग्य वाटत नाही.

काम करणार्‍या इतर सहकार्‍यानाही तुमची माहिती असली तर प्रत्येकावर एक प्रकारचे सामाजिक/मानसिक बंधनही राहते. जाहिर रित्या काय बोलावे आणि बोलू नये याचेही स्वनियंत्रण रहाते. एक सदस्य मधेच एका दिवाळी अंकाच्या समितीतून कायमचा गायब झाला आणि त्या व्यक्तिने नाव, फोन काहीच दिला नव्हता. त्यामुळे त्याचे काम अचानक इतरांना करावे लागले. (गायब न होता, काम टाळणारेही आहेत पण ते माहिती झाल्यावर आपोआपच इतर उपक्रमात त्या त्या व्यक्तीला घ्यायचे का नाही याची चर्चा होते). त्यामुळे गेली काही वर्षे आपण कुठल्याही उपक्रमाचे संयोजन करणार्‍या सगळ्यांनी एकमेकांना दूरध्वनी क्रमांक कळवलेच पाहिजे असेही करतो आहोत. फार पूर्वी केले नसेल, पण आता अनुभवातून शिकून करतो आहोत.

एकूणातच "मायबोली" या अनुभवात प्रत्यक्ष भेटणे, बोलणे आणि परस्पर विश्वास वाढणे या अतिशय जवळच्या गोष्टी आहेत. किंवा तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या गटगला गेला नसाल तर मायबोलीचा संपूर्ण अनुभवच तुम्ही घेतला नाही असे म्हणता येईल.

ज्यांना तो अनुभव घ्यायचा नाही ती त्यांची मर्जी आणि त्यांच्या त्या निर्णयाचा आदर आहे.

म्हणूनच मायबोलीच्या सर्व उपक्रमांच्या संयोजनात इतर मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटलेल्या, खरे नाव, फोन सहकार्‍याना सांगायची तयारी असणार्‍या मायबोलीकरांनाच संधी दिली जाईल.

मराठी भाषा दिवसाबद्दलः
मराठी भाषा दिवसाची व्याप्ती वाढावी म्हणून मायबोलीबाहेरील संस्थानाही यात सामील करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षे आहेत तशाच स्पर्धा न रहाता त्याचे स्वरूप दरवर्षी बदलू शकते. आणि त्यामुळे मुलांशी किंवा त्यांच्या माहितीशी थेट संपर्क होण्याचीही शक्यता वाढते. त्यामुळे या अगोदरच्या समितीत आला नाही म्हणून तो प्रश्न परत कधीच येणार नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. कायदा कुठे लागू होतो आणि कुठे नाही हे ही त्या त्या स्पर्धेवर , उपक्रमावर अवलंबून असते. पण आधि संयोजक ठरल्यावर एकदम शेवटच्या दिवशी आता कायदा आडवा आला तेंव्हा माहिती दे नाहितर सोडून जा असे करता येणार नाही (करता येईल पण स्ंयोजनात अडचण होऊ शकेल).

अशा वेळेस कुठलीही माहिती उघड न करणार्‍या व्यक्तीला , एक मायबोली बाहेरचा/बाहेरची पालक म्हणून, माझ्या मुलीची किंवा मुलाची प्रवेशिका आणि इतर माहीती मी पाठवीन का? मी तरी पाठवणार नाही. म्हणूनच एक पालक म्हणून आणि मायबोलीची काही जबाबदारी म्हणून हे नियंत्रण असणे मला महत्वाचे वाटते.

>>तिथे गेल्या सगळे संयोजक मुखवटयामागे असतील तर तुम्हाला भाग घ्यावासा वाटेल का?

मग (इथून पुढे) संयोजकांची खरी नावे सर्वांसाठी उघड करणार का? इथे सध्या असे काही उपक्रम चालू आहेत त्यांचे संयोजक कोण हे उघड केलेले नाही. दिवाळी अंकातल्या संपादक मंडळातल्या काही आयडींचीही खरी नावे माहीत नाहीत.

वेबमास्टर कोण ते पण माहीत नाही, 'मायबोली वेबमास्टर' असं नाव लिहिलंय प्रोफाईलमध्ये. Happy

खरंय आपलं म्हणणं...म्हणून त्याच न्यायाने ह्या संकेतस्थळाचे मालक,चालक आणि व्यवस्थापक ह्यांनीही त्यांच्या खर्‍या नावाने इथे वावरायला हवंय...तरच ते जास्त संयुक्तिक होईल आणि इतरांनाही तसे करा म्हणून अधिकारवाणीने सांगता येईल....अजून एक करता येईल..सदस्याच्या ओळख विभागात त्याचे एक खरे छायाचित्रही लावण्याचे ठरवले तर मग सहजा सहजी कुणी टोपण नावाने इथे वावरणार नाही आणि जे असे वावरू इच्छितात त्यांना माबोच्या कोणत्याही अधिकृत उपक्रमात सामील करून घेऊ नये.
इथे कुणीही आयडी असण्याऐवजी आपल्या खर्‍या नावाने
सदस्य असावा...आयडी म्हटले की कुणी काहीही नाव घेऊ शकतो...आयडीला कधीच चेहरा नसतो...हे आजवरच्या अनुभवावरून मी निश्चितपणाने सांगू शकतो.

पाहा पटतंय का ते!

अंS, नाही पटले.
वेबमास्तरांनी हे फक्त म.भा.दि उपक्रम संयोजकांबाबत लिहीले आहे ना? त्या पूर्ण टीमला त्या आयडीची माहिती असली की पुरे आहे. ते प्रोफाईलामध्येच असले पाहिजे असे नाही.
मालक, चालक, व्यवस्थापक, संयोजक यांची नावे वाचकाला माहित नसली तरी टीमला माहित असली तरी पुरे and vice versa हे मा.वै.म.

रैना, वेमा भाग घेणार्‍यांसाठीही माहिती हवी म्हणत आहेत असं वाटतंय.

>> >>तिथे गेल्या सगळे संयोजक मुखवटयामागे असतील तर तुम्हाला भाग घ्यावासा वाटेल का?
यामुळे तो प्रश्न उद्भवला आहे.

अन्कॅनी,प्रमोद देव
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या नावात बदल केला आहे.

कार्यक्रमात भाग घेणार्‍यांसाठी असा काही नियम नाही. संयोजनात भाग घेणार्‍यांसाठी हे सुचवले आहे. विशेषत: मराठी भाषा दिवसांसारख्या उपक्रमात जर बाहेरच्या संस्थांसोबत काही जमले तर हे जरूरी पडेल.

वेमा खूप छान पोस्ट. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार अगदी योग्य आहे.

वेमा, उत्तमपणे भूमिका समजावलीत, धन्यवाद.

मायबोली प्रशासनाचे हे आवडते- झालेल्या चुकांमधून ते शिकतात, त्यात सुधारणा करतात आणि पुढे त्यांची अंमलबजावणी करतात.

वेमा ... मला मुद्दा निट नाही कळाला.
मुलांचा सहभाग असल्यामुळे नेमक्या जास्तीच्या काय जबाबदार्‍या असतात?
मुखवट्या मागील संयोजकाबद्दल: ममंच्या कार्यक्रमाला जातो त्यावेळी त्या त्या कार्यक्रमाचे कोण कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे नाव-गाव-पत्ते मला माहिती असण्याची गरज नाही. मी ममंवर विश्वास ठेवुन जातो. तेथील कार्यकारणी मला माहीती आहे. तसेच मायबोलीवर विश्वास आहे आणि वेमा/अ‍ॅडमिन कोण हे माहिती आहे. अर्थात मायबोली प्रशासनाला ती व्यक्ती कोण हे माहिती असले म्हणजे झाले.
समजा एखाद्या व्यक्तीला संयोजनात भाग घ्यायचाच आहे आणि मायबोली प्रशासनाला ही ओळख दाखवायची नाही तर त्या सभासदाला इतर काही कामे पण देता येतीलच (जसे कार्यक्रमाची रुपरेषा आखणे, जाहिराती तयार करणे इ.)
लहान मुलांच्या प्रवेशिकाबद्दलः परत ममंचे उदाहरण. चित्रकलेच्या प्रवेशिका पाठवतो. त्याचे पुढे काय होते कोणालातरी माहिती असते का? तुम्ही किंवा मुले स्टेजवर कार्यक्रम करता आणि अनेक जण व्हिडीओ रेकॉर्डींग करत असते त्यावेळी हा मुद्दा लागु होत नसावा का? मला वाटते पब्लिक फोरम वर जर तुम्ही जात असाल तर ह्या गोष्टी गृहित धरुनच जावे लागेल. समजा पालकाने मुलाचे दृकश्राव्य माध्यमातील प्रवेशिका पाठवली. संयोजक समितिवर सगळे बॅकग्राउंड चेक केलेली मंडळी आहेत पण जेव्हा ते प्रसिद्ध होईल त्यावेळी ते सर्वांसाठीच उपलब्ध असेल. मग समितीवरील सभासदाला ओळख जाहीर करण्याचे बंधन का ते नाही कळले.

वेबमास्तर ,हे आंतरजालीय पब्लिक फोरमवरच्या वैयक्तीक स्वातंत्र्यावर अतिक्रमण असल्यासारखं वाटतंय.

महागुरुंच्या पोस्टला अनुमोदन. काही वैयक्तिक कारणं असतीलही. वृत्तमानपत्रांमधे सुद्धा अनामिक किंवा टोपण नावाने लेख ललित लिहिले जातातच कि.त्या लेखामागे लिहिलेली व्यक्ती नेमकी कोण? हे नीटसं समजत नाहीच. पण तो लेख किंवा ललित वाचनिय असेल तर हा मुद्दा तितकासा महत्वाचा वाटत नाही.
मुळात नियंत्रण वृत्तीवर असावं आणि वृत्तीवर नियंत्रण ठेवणं अवघड जातंय म्हणून व्यक्तीवर निर्बंध हा विचार माझ्या बुद्धीला न पटण्यासारखा आहे. इतरांना भेटून, फोनवर बोलून किंवा संपर्क वाढवूनच इथल्या उपक्रमात सहभागी होता येईल असं असेल तर कठीण आहे. कदाचित याने काही फरक पडणार नाही कारण मायबोली सदस्यसंख्या काही कमी नाही.

पण अश्या उपक्रमा अंतर्गतही आपण या सगळ्यावर नियंत्रण ठेवू शकतो. पण त्यासाठी वेळेची कमतरता हा मुद्दा आहेच.

- लेखांची निवड, त्यावर येणारे अवांतर प्रतिसाद या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे सहज सोपे आहे.

इथे यापुर्वी बर्‍याच उपक्रमांना बर्‍याच लोकांची मते मागवली गेली आहेत. त्यामधे सगळ्यांनीच आपली ओळख पटवून दिली आहे का?

हे म्हणजे आमचा कार्यक्रम चांगला आहे. त्यापासून बरंच काही शिकण्यासारखंही आहे. पण त्याच्या संयोजनात सहभागी व्हायचं असेल तर ओळख पटवून द्या नाहीतर तुम्हाला माहीत असलेल्या ज्ञानाला, चर्चेत सहभागी होण्याचा उत्साहाला आमच्याकडे बंदी आणि ते ही आंतरजालावरच्या पब्लिक फोरम्सवर.

मला वाटतंय, वेबमास्तर संयोजन समितीतील सदस्य एकमेकांना 'रीचेबल' असण्याबद्दल म्हणत आहेत.
<<त्यामुळे गेली काही वर्षे आपण कुठल्याही उपक्रमाचे संयोजन करणार्‍या सगळ्यांनी एकमेकांना दूरध्वनी क्रमांक कळवलेच पाहिजे असेही करतो आहोत.>> यातून ते पुरेसं स्पष्ट होतंय. आणि फोन नं कळवणे म्हणजे अर्थातच तुमची ओळख उघड करणे.
मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या विशिष्ट बाबतीत कमी महत्त्वाचा वाटला तरी,
<<अशा वेळेस कुठलीही माहिती उघड न करणार्‍या व्यक्तीला , एक मायबोली बाहेरचा/बाहेरची पालक म्हणून, माझ्या मुलीची किंवा मुलाची प्रवेशिका आणि इतर माहीती मी पाठवीन का? मी तरी पाठवणार नाही.>> यावरुन कळते की, समजा, मी उद्या माझ्या पाल्याची खूप सराव करुन तयारी करुन घेतली, माझा, त्याचा वेळ खर्ची घातला आणि प्रवेशिका पाठवली. एका संयोजकाला जे लागू होते ते सर्वांनाच, असे धरुन विचार केला, आणि सर्वच संयोजकांनी आपली ओळख लपवली आणि कुणी कुणालाच संपर्क करु शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर? काही कारणाने ती स्पर्धा, प्रवेशिका याचा काही थांगपत्ताच लागला नाही तर? कोण कुणाला विचारणार? म्हणजे सारे कष्ट वाया. म्हणून निदान मी या विश्वासार्हतेची खात्री झाल्याशिवाय भाग घेणार नाही असे वेबमास्तरांना सुचवायचे असावे.
वेबमास्तर, अगदी पटले. Happy

माझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही - मग (इथून पुढे) संयोजकांची खरी नावे सर्वांसाठी उघड करणार का?

आशूडी, प्रवेशिका ज्या इमेल पत्त्यावर येतात त्या अ‍ॅड्मिन, वेमांनाही पाहता येतात.
त्यामुळे बाकी संयोजकांचे राहूदे, आधी अ‍ॅड्मिन, अ‍ॅड्मिन टीम, वेमांवर विश्वास असणे जरुरी आहे. Lol

>>जर बाहेरच्या संस्थांसोबत काही जमले तर हे जरूरी पडेल.
हे 'बाहेरचे' जिथे कुठे येणार असेल तिथे नाही चालणार पण एरवी चालेल काय?

बाहेरच्या संस्थांसोबत काही जमले >>
इथल्या लोकांना मायबोलीच्या प्रशासनाची माहिती आहे, त्यांच्यावर विश्वास आहे. बाहेरच्या संस्थांबरोबर काही जमले तर तिथल्या प्रशासकांबद्दल मायबोली प्रशासनाला, सर्वसामान्य मायबोलीकरांना काय माहिती मिळेल, त्यांच्या आयडी बद्द्ल, सत्यासत्यतेबद्दल काय पुरावे मिळतील ?

नॉट ट्रायिंग टू चॅलेंज यू , मिअर्ली क्वेश्चनिंग द लॉजिक .

प्रवेशिका ज्या इमेल पत्त्यावर येतात त्या अ‍ॅड्मिन, वेमांनाही पाहता येतात.
>> तेच तर. सगळे काम शेवटी त्यांनाच करावे लागले तर समितीचा काय उपयोग? Lol

फार जर तर झालं.
सगळेच ओळख न देणारे असले तर, सगळेच पळून गेले तर..
ओळख देणारेही पळून जाऊ शकतात. नाही फोन उचलला, नाही मेलला उत्तर दिले तर?
फारच जर तर..

आणि भेटलेले असले पाहिजे तर नक्की कोणाकोणाला तोंड दाखवायचे ते पण कळायला पाहिजे. Lol

<<(गायब न होता, काम टाळणारेही आहेत पण ते माहिती झाल्यावर आपोआपच इतर उपक्रमात त्या त्या व्यक्तीला घ्यायचे का नाही याची चर्चा होते). त्यामुळे गेली काही वर्षे आपण कुठल्याही उपक्रमाचे संयोजन करणार्‍या सगळ्यांनी एकमेकांना दूरध्वनी क्रमांक कळवलेच पाहिजे असेही करतो आहोत. फार पूर्वी केले नसेल, पण आता अनुभवातून शिकून करतो आहोत.
>>
जर तरच्या आधीच उत्तर दिलेले आहे.

आशूडी, Uhoh
>>दूरध्वनी क्रमांक कळवलेच पाहिजे असेही करतो आहोत
नाही उचलला फोन, तर??

कृपया आता वेमा/अ‍ॅड्मिननाच (लिहायचं असेल तर) उत्तरं लिहूदे. बाकीच्यांनी अर्थ काढत बसण्यापेक्षा.
नियम/निर्णय काय तो कळलाच आहे. हह म्हटल्याप्रमाणे कुठेतरी हे लिहून स्वयंसेवक मागवताना लिंक द्यावी.
धन्यवाद.

नॉट ट्रायिंग टू चॅलेंज यू , मिअर्ली क्वेश्चनिंग द लॉजिक . >>> शोनू... अगदी अगदी.

नियम करायचा असेल तर "आहे हे असं आहे आणि पाळायला लागेलच" अश्या स्वरूपात केलेला जास्त बरा.. लहान मुलांचा प्रत्यक्ष संबंध येणार असेल तर नियम हवा हे आणि बाकी मंडळाच्या सोईसाठी वगैरे असेल तर ते ही पटतय. पण ही कारणं ने देता बाकी सगळं लॉजिक ओढूण ताणून आणल्यासारखं वाटतय.

महागुरूंच्या पोस्टला अनुमोदन.

स्वाती +१

लॉजिक ओढून ताणून लावण्यामागे वेबमास्टरांचा हेतू काय असेल असा विचार केला तर मग ते ओढून ताणून आणल्यासारखे वाटत नाही.
जशी समितीत असणार्‍या सगळ्यांची माहिती असायला पाहिजे ही एक विचारधारा आहे तसच माहिती नसली तरी काही फरक पडत नाही ही सुद्धा एक विचारधारा आहे.
वेमा म्हणतायत तसं बाहेरच्या संस्थांचा कार्यक्रमात सहभाग असताना, समितीतल्या सगळ्या लोकांची माहिती उपलब्ध नाही ह्या मुद्द्यावरुन पुढे काही अडचणी निर्माण होऊ शकतात हे पटतं. खरं तर बाहेरच्या संस्थांचा सहभाग नसला तरी "सेफटी" म्हणून माहिती असलेली बरी हा मुद्दा पटतो.
समिती मधल्या कोणाला काहीच माहिती नसलेला सदस्य असेल आणि त्यानी जर कुठल्या प्रवेशकांच्या माहितीचा गैरवापर केला तर निश्चितच अडचण होईल.
समितीतल्या सदस्याची जर माहिती उपलब्ध असेल तर गैरवापर कोणी केला ह्याचा शोध लावून कोणीतरी सापडेल ह्याची शक्यता तरी आहे पण उद्या महितीच नाही म्हंटल्यावर ती शक्यता ही गृहित धरता येत नाही आणि मुख्य म्हणजे सगळ्यांची माहिती का नव्हती ह्याची नैतिक जवाबदारी मायबोली प्रशासनावर येऊ शकते किंवा येइलच कारण कार्यक्रम मायबोलीचा आहे. (इथे बाहेरच्या संस्थेचा सहभाग असला की गोष्टी थोड्या आणखिन किचकट होऊ शकतात.)

त्यात एकदा माहिती दिलेली आहे म्हंटल्यावर कुठलीही व्यक्ती माहितीचा गैरवापर करण्याआधी दोनदा विचार करेल आणि त्यामुळे अगदी आळा बसला नाही तरी गैरवापर होण्याची शक्यता बरीच कमी होते. गैरवापर केल्याच्या घटना अगदी सर्रास होतात आणि त्यामुळे माहिती हवी हा मुद्दा मलातरी आजिबात ओढून ताणून आणल्यासारखा वाटत नाही. शेवटी कार्यक्रम नीट पार पडणे हे महत्वाचे. Happy

मी नंतर पुन्हा लिहतो. वेळेअभावी वर काहीजणांच्या प्रश्नांची उत्तरे

@महागुरू
> ममंच्या कार्यक्रमाला जातो त्यावेळी त्या त्या कार्यक्रमाचे कोण कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे नाव-गाव-पत्ते मला माहिती असण्याची गरज नाही.
पण ममं ला तरी त्यांची माहिती असते, त्यांची वर्गणी घेतली जाते. पण एक जण एकदम बाहेरचा माणूस (सभासद न होता, नुसत्या ममं च्या मेलींग लिस्टवर मी आहे , तुम्हाला माझा ईमेल माहिती आहे की, बाकी माहिती कशाला) एकदम मी तिकीटे फाडायला बसतो असे म्हणाला आणि ईमेल शिवाय काहीही माहिती नसताना ममं ने त्याला असे करू दिले हे तुम्हाला कळाल्यावर तुमचा ममं वरचा विश्वास तसाच राहील का (भले त्या माणसाचा हेतू कितिही चांगला असेल)?
@रायबा
>वृत्तमानपत्रांमधे सुद्धा अनामिक किंवा टोपण नावाने लेख ललित लिहिले जातातच कि.त्या लेखामागे लिहिलेली व्यक्ती नेमकी कोण?
मग मायबोलीवरही तसे लेखन करता येईलच. त्यात बदल कुठे आहे? पण वर्तमानपत्र कुणाचे, संपादक कोण हे तरी लिहले असते नाही. आपण संयोजकांबद्दल बोलतो आहोत.

@अन्कॅनी
>मग (इथून पुढे) संयोजकांची खरी नावे सर्वांसाठी उघड करणार का?
होय. इथून पुढे होणार्‍या उपक्रमात. आधी होऊन गेलेल्या नाही.

वेळेअभावी अपूर्ण

Pages