टोपलीत चविष्ट दिसला

Submitted by फकिर बेचारा on 13 January, 2012 - 09:30

किरण.... यांची माफ़ी मागुन. (दिवे घ्या)

टोपलीत चविष्ट दिसला, चिंबोर खेकडा होता
पहाताच मज आवडला, पण खिसा तोकडा होता....

खंत ना त्याची त्याला बांधील नाहीच कुणाचा
त्यालाच घेऊन होईल बाजार शेजा-याचा
कोळणीचा गर्जला सूर, ’झे..झे..ने दाटला उर *
रश्याला चविष्ठ छान, काहीतरीच सांगे दाम
नकळत पडली भूल आणि खेकडा फ़क्कड होता
पहाताच मज आवडला, पण खिसा तोकडा होता....

चवदार बिचारा सौदा पण पटता पटता हुकला
आवंढा दाटलेला मी अबोल होऊन गिळला
मी सुटलो आहे तोंडी सांगत हे पाणी मजला
पण महाग होता इतका घेण्याचा विचार थिजला
तो हालत होता तेंव्हा नांगीत वाकडा होता
पहाताच मज आवडला, पण खिसा तोकडा होता....

मलाच जाणीव झाली कुणीतरी घेतला होता
टोपलीत असुन देखील माझा राहिला नव्हता
तो पिशवीत गेला तेंव्हा मत्सर दाटला होता
पहाताच मज आवडला, पण खिसा तोकडा होता....

आवांतरः
किरण यांच्या मुळ काव्याची ही घ्या लिंक http://www.maayboli.com/node/31883
मुंबईच्या मासळीबाजारात मासे खरेदीसाठी जाणा-या मा. बो. करांना "झे झे सस्ता लाईला" अशी
कोळणीची हाक परिचयाची असणारच.

-फ़किर बेचारा

गुलमोहर: 

यावर मी शब्दहीन झालोय.....
मूळ कवितेहून छान लिहिलंय.....खूप आवडलं..
"जिंकलत राव..."