परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 January, 2012 - 22:50

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही दुसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

Quiz_2a.jpgquiz_2b.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! मस्त होतं हे. अभिनंदन हह आणि मामी. (मामींची काही वाक्य टिपिकल मामी होतीच! :हाहा:)

केश्वि, पुढचं कोडं तू जिंकणार नक्की! Happy

हह आणि मामी, अभिनंदन Happy एकदाचं हुश्श झालं Proud

पूनम, बक्षिसाचं जाऊदे, मी खूप एन्जॉय केलं यात. मला माप्रांची खरोखरच दया यायला लागली होती Biggrin

मी खूप एन्जॉय केलं यात>>>>> अगदी ग अश्वे, अजून अकलेचे तारे नकोत म्हणून त्यांनी उत्तर सांगूनच टाकलं शेवटी Lol

माप्रा, पुढचं कोडं येऊद्या ! यावेळेस जग फिरायला लावलंत आता विश्व फिरायला लावा म्हणजे आम्हीही खगोलशास्त्रीय सटरफटर शोधत बसू. अस्चिगला यात घेऊ नये.

धन्यवाद माध्यम प्रायोजक Happy अश्विनीने खरे म्हणजे सर्वात पहिले गणवेश चा गेस केला होता.... मग मामींनी सी मायनस क्युनीफॉर्म शोधले म्हणून मला पुढचा संबन्ध लावता आला. अन्यथा मुळात युनिफॉर्म पर्यंत मला काही पोहोचता आले नसते. पण एकूण खेळायला मजा आली हे खरे.

धन्यवाद माप्र आणि सगळेच. पण मलाही वाटतं यात अश्विनीने बर्‍याच गोष्टी माझ्याही आधी ओळखल्या होत्या. माझ्यापेक्षाही बक्षिसावर तिचा हक्क आहे असं मला मनापासून वाटतं. माप्र कृपया फेरविचार व्हावा.

बाकी डोक्याला भरपूर शॉट होता पण मज्जाही आली. (आणि डोंपोउं निघाला.) Proud

भन्नाट! मामी आणि हह तसेच अश्विनी-के आणि इतर उत्साही सहभागींचे अभिनंदन. खरंच डोकॅला शॉट होता. अगदी डोंपोउ.............!!!

मजा आली सर्व प्रतिसाद आणि बादरायण संबंध वाचताना. बाकी मामी, बदामाच्या दुधाच्या ग्लासच्या आयडीयाची कल्पना मस्तच.

HH आणि मामी, अभिनंदन. क्युनिफॉर्म मधून सी उडवण्याची कल्पना भन्नाट होती. मी उगीच (रिक्षा फिरवीत) सोव्हियेत ब्लॉकमध्ये गेलो! Proud

मात्र पांढर्‍या रंगाचा शाळेशी कसा संबंध येतोय देव जाणे! आमचा सदरा सदैव मळलेला असे! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

अर्रे मामी आणि हह ! माझा हक्क बिक्क काही नाही. तुम्ही दोघीच उत्तराच्या जास्त जवळपास पोहोचलात Happy आपल्याला खूप मजा आली हेच माझं (आणि बर्‍याच जणांचंही) बक्षिस. मी तर बराच वेळे शांतीनिकेतनमध्ये घुसून बसले होते ती बाहेरच येऊ शकत नव्हते Proud

Pages