सिरकेवाली मिर्च

Submitted by अल्पना on 28 December, 2011 - 03:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, जीर्‍याची पुड, ओव्याची पुड, ब्लॅक व्हिनेगर

क्रमवार पाककृती: 

मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या कराव्यात. या मिरच्यांना उभी चीर द्यावी. एका भांड्यात चीर दिलेल्या मिरच्यांमध्ये हळद, मीठ व बाकी मसाला भरावा /मिक्स करावा. मिरच्या व उरलेला मसाला बरणीत घालून त्यात मिरच्या बुडतिल इतपत ब्लॅक व्हिनेगर घालावे. मिरच्या जसजश्या व्हिनेगरमध्ये बुडतिल तसतश्या चवीला छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
बरेच दिवस पुरतिल.
अधिक टिपा: 

व्हिनेगर मध्ये घातलेल्या असल्याने या मिरच्या वर्षभर टिकतात.

माहितीचा स्रोत: 
जाऊ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

हा पण प्रकार करुन बघता येईल.
अल्पना, मिरच्या कश्या प्रकारच्या असतात ? (जाड, बारिक, लांब, आखुड ???)

लांब आणि बारिक, नेहेमीच्या खाण्यातल्या (जरा तिखट). लगेचच खाल्ली मिरची तर भयानक तिखट लागेल. मुरल्यावर तिखटपणा नाही जाणवत.

त्या मिरच्या एवढी आणायचे धाडस होत नाही मला, आता आणीन.
(आढ्याला मिरची टांगून, भाजी तिखट झाली असे म्हणणार्‍या जमातीतला आहे मी.)

मग तुम्ही थोड्या कमी तिखट मिरच्या वापरून करा. फक्त त्या अगदी जाड पोपटी लोणच्याच्या मिरच्या नको.

अल्पना,व्हाईट विनेगर अन ब्लअ‍ॅक विनेगर च्या चवी मधे फरक असतो का?व्हाईट विनेगर मधे केल्या तर...पंजाबी शलगम-गोभि-मटर-गाजर च्या अचार साठी आपण व्हाईट विनेगर च वापरतो ना?त्यात गुळ विनेगर मधे उकळवतो व सब्जी-मसाल्यावर घालतो..

मेधा, कसं बनवतात ब्लॅक व्हिनेगर ते माहित नाही. नेटवर तर तांदुळ आणि अजून बर्‍याच पदार्थांपासून फर्मंटेशन प्रक्रिया करुन बनवतात असं वाचलंय.

सुलेखा, व्हाईट व्हिनेगर आणि ब्लॅक च्या चवीत फरक असतोच. ब्लॅक व्हिनेगर कमी आंबट असतं, आणि चव वेगळीच असते.

आणि हो जर या मिरच्यांचा आंबटपणा वाढवायचा असेल तर यात थोडी आमचूर पावडर पण घालतात.