कधी वाटतं तसं व्हावं!

Submitted by टोकूरिका on 21 December, 2011 - 23:25

अमितची कविता http://www.maayboli.com/node/19785

@मितवा! पैलेइच सॉरी बोलरेली हय! Wink

कधी वाटतं तसं व्हावं......

अमावस्येची ढगाळ रात्र असावी....
आणि
ढीगभर पसरलेल्या
उकिरड्यावरच्या कचर्‍यातल्या
ओल्या पिशव्या तुडवित
असंख्या ठिगळांचा
अंगरखा घालून
चहाच्या बशीखालची
ती काळी कटोरी
ओंजळीत घेऊन
तू यावीस......

मग गलका करून जमलेल्या
भिकारणींच्या कुजबुजण्यातही
तुझीच चर्चा व्हावी.....

कधी वाटतं तसं व्हावं......
..................................टोकू...;)

गुलमोहर: