कधी वाटतं असं व्हावं...

Submitted by A M I T on 17 September, 2010 - 02:49

कधी वाटतं असं व्हावं...

पौर्णिमेची दुधाळ रात्र असावी...
आणि
दुरवर पसरलेल्या
किनार्‍यावरच्या वाळूंची
ओली हृदये तुडवित
रूपेरी चांदण्याचा
अंगरखा घालून
चंद्राच्या उशीखालची
काही गुलाबी स्वप्ने
ओंजळीत घेवून
तू यावीस...

मग गलका करून जमलेल्या
पर्‍यांच्या कुजबुजण्यातही
तुझीच चर्चा व्हावी...

कधी वाटतं असं व्हावं...!!!

गुलमोहर: 

अमित

तुझ्या हल्लीच्या कविता पाहिल्या... किती सुंदर आहेत रे या कविता !!!
नक्की काय झालंय तुला ?? Wink

येईल रे ती... Happy

मग गलका करून जमलेल्या
पर्‍यांच्या कुजबुजण्यातही
तुझीच चर्चा व्हावी...>>..लवकरच होउ दे बाबा.