झटपट चुर्मा लाडु ( माय्क्रोवेव मधले)

Submitted by मोहन की मीरा on 13 December, 2011 - 00:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. २ कप गव्हाचे पिठ ( कणिक)
२. १/२ वाटी तुप
३. दीड कप चिरलेला गुळ
४. १/२ कप सुके खोबरे ( डेसिकेटेड)
५. १/२ कप कोमट पाणी
६. वेलची पावडर , थोडे बदामाचे काप

क्रमवार पाककृती: 

१. एका मावे च्या भांड्यात कणिक भाजुन घ्या. १००% पॉवर वर ५ मिनिटे. मधे मधे हलवावे.
२. भाजलेले पिठ एका ताटात काढावे. त्यात १/४ तुप आणि कोमट पाणी घालुन चांगले मिक्स करावे.
३. हे पिठ मग परत मावे च्या भांड्यात घालुन ६०% पॉवर ला ५ मिनिटे ठेवावे. मधुनच हलवावे. खमंग वास येवु लागतो.
४. आता हे तसेच गरम असताना मिक्सर मधुन दोनदा टर्र करावे.
५. मावे च्या भांड्यात गुळ आणि उरलेले तुप घालुन १ मिनिट ठेवावे. गुळ पातळ झाला पाहिजे.
६. आता पातळ गुळ+तुप्+मिक्सर मधले पिठ+वेलची+बदाम+ सुके खोबरे सगळे एकत्र करावे.
७. हाताला थोडे तुप लावुन लाडु वळावे. निवल्यावर गट्ट्म करावे.

अतिशय खमंग लागतात. ह्यात कणके बरोबरीने नाचणी पीठ ही घेता येते. माझा लॅपटॉप सध्ध्या माझ्या मोबाईल च्या सोफ्टवेअर वर रुसला आहे. त्या मुळे फोटो टाकता येत नाहीत.

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराचे साधारण १५-१७ लाडु होतात.
अधिक टिपा: 

पहीले जी कणिक भाजणार तेंव्हा अजिबात तुप घालु नये. नंतरच घालावे. मधे मधे नक्कि हलवावे, नाहीतर पिठ जळण्याचा संभव असतो.

माहितीचा स्रोत: 
अंतरजाल
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहन कि मीरा, कृपया 'आहारशास्त्र आणि पाककृती' विभागात जाऊन नवीन पाककृती लिहा, म्हणजे सर्व पाककृती एकाच ठिकाणी राहतील, आणि पाककृती शोधणार्‍यांनाही ते सोपं पडेल.

हो. खरेतर तसेच करतात. पण ह्या झट्पट पद्धतीने पण तीच चव येते. परत तुप पण कमी लागते. मस्त लागतात. आठवुन पण तों.पा.सु.

आर्च...
धन्स !! विसरुनच गेले होते. अत्ता बदल केला. पॉईंट ६ पहा.
खोबर्‍याने छान स्वाद येतो.