जाती धर्म विषयक लेखन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गेले काही दिवस मायबोलीवर जाती धर्मविषयक लेख आणि त्यावरच्या प्रतिसादांमध्ये शिवराळ भाषा काही सदस्य वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यातले शक्य तेवढे प्रतिसाद अप्रकाशीत केले आहेत आणि ते काम चालूच असते. काही लेखांवर प्रतिसादाचे प्रमाण एवढे आहे की त्यामुळे मूळ लेखच नाईलाजाने अप्रकाशीत करावा लागला आहे.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल. तसेच राजकीय पक्ष आणि नेते यांच्यावरून इथे बाचाबाची करू नये. याबाबतीत कुठलीही समज किंवा दुसरी संधी मिळणार नाही. हीच पूर्वसूचना समजावी.

विषय: 
प्रकार: 

नर्मदा बारटक्के,

त्या लेखात अवमानकारक उल्लेख नाही आहेत त्यामुळे तो लेख संपादीत करण्याची आवश्यकता नाही. ती लेखकाची मते आहेत. योग्य त्या धाग्यावर, वाद न घालता, संयत भाषेत, अवमानकारक न लिहिता तुम्हाला चर्चा करता येईल.

Pages