जाती धर्म विषयक लेखन

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

गेले काही दिवस मायबोलीवर जाती धर्मविषयक लेख आणि त्यावरच्या प्रतिसादांमध्ये शिवराळ भाषा काही सदस्य वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यातले शक्य तेवढे प्रतिसाद अप्रकाशीत केले आहेत आणि ते काम चालूच असते. काही लेखांवर प्रतिसादाचे प्रमाण एवढे आहे की त्यामुळे मूळ लेखच नाईलाजाने अप्रकाशीत करावा लागला आहे.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल. तसेच राजकीय पक्ष आणि नेते यांच्यावरून इथे बाचाबाची करू नये. याबाबतीत कुठलीही समज किंवा दुसरी संधी मिळणार नाही. हीच पूर्वसूचना समजावी.

विषय: 
प्रकार: 

वा मस्त! दुर्दैवाने असे मॉडरेशन करावे लागत आहे. पण सारखे जातपात निघण्यापेक्षा हे बरे.

छान

निर्णय चांगलाच आहे अ‍ॅडमिन. पण तेच सदस्य नवीन आयडी/डुआयडीने लेखन करत राहू शकतात नां?

>>> देर आये दुरुस्त आये.. <<<
रामभौ, "देर आये" अस काहून? मायबोलीचे हे तन्दुरुस्त धोरण पूर्वापारच चालत आलय, Happy
फक्त "देरसे" आये लोकान्ना किन्वा "बहोत देरसे इथे असुनही भुलेबिछडेपिछडे" लोकान्ना ते पुन्हा माहित पडावे म्हणून जरा स्पष्टच मान्डलय इतकच! Proud

अ‍ॅडमिन,

कृपया खालील धाग्यांवरील जातीद्वेषमूलक (ब्राह्मण या शब्दाचा उल्लेख मुद्दाम हेटाळणीपूर्वक बामण, बामन, बामणं असा असणारे), संदर्भहीन आणि असभ्य भाषेत लिहिलेले प्रतिसाद काढून टाकावेत ही नम्र विनंती.

http://www.maayboli.com/node/30868?page=1
http://www.maayboli.com/node/30868?page=2
http://www.maayboli.com/node/30868?page=3
http://www.maayboli.com/node/30868?page=4

@ मास्तुरे ~ सहमत
@ मोहनराव ~ हे मान्यच की बामन, बामण हे बोलीभाषेतील शब्द आहेत, पण वापरण्यार्‍याच्या मनी त्या भावनेऐवजी जाणीवपूर्वक वापरायची हेटाळणीची भाषा जर प्रतिसादात स्पष्टपणे अवतरली असेल तर बोलीभाषा दुय्यम ठरून हेतुपुरस्सर केलेला तो प्रयोग ठरतो; म्हणून श्री.मास्तुरे यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे मी म्हणेन.

अ‍ॅडमिन टीमला असे पाऊल उचलावे लागत आहे यावरून हे सिद्धच होते की काही "सेन्सिटिव्ह" म्हटल्या जाणार्‍या धाग्यावरील भाषा वापराची पातळी द्वेषमूलक बनत चालली आहे. (आता 'चालली होती' असे म्हणू या.)

अशोक पाटील

अ‍ॅडमिन यांस

निर्णय आवडला पण काही प्रश्न मनात उपस्थित करुन गेला.

आक्षेप शिवराळ भाषेला आहे का ? तसे असल्यास इतर साहित्यप्रकारात शिव्या असल्यास त्यांनाही तोच नियम लागू करावा का ?

या नियमामुळे, शिव्या / हेटाळणीयुक्त भाषेत लिहू नये हा पायंडा पडावा. पण मनातल्या द्वेष व विखाराच काय ? तो तसाच राहील.

असो, हे पोस्ट नवीन वाद सुरु करण्यासाठी नसून निव्वळ मनात आलेले प्रश्न मांडलेत इतकेच.

धन्यवाद अ‍ॅडमीन. पण हे पुन्हापुन्हा सांगावे लागणे, किंबहुना सांगावे लागणे हे कधी बंद होईल तो सुदिन.

या नियमामुळे, शिव्या / हेटाळणीयुक्त भाषेत लिहू नये हा पायंडा पडावा. पण मनातल्या द्वेष व विखाराच काय ? तो तसाच राहील. >> बाबु तुझ्या या वाक्याला अनुमोदन, पण त्यासाठी प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. अ‍ॅडमिन त्यांच्या मर्यादेत असलेल्या (फक्त टेक्निकल) गोष्टी कंट्रोल करू शकतात. त्याने खरतर मदतच होतेय हा विखार आपल्यापर्यंत न पोहोचण्यासाठी.

तु म्हणतोस तो खरं तर स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो.

७०% मान्य आहे ३० % नाही ...(नविन आयडी काढुन जर परत तसेच लिहिले गेले तर) त्याच बरोबर कोणाच्या बोलण्याचा विपर्यास केला जाउन प्रतिसाद मिळायला लागले तर तो आयडी दोषी कसा ठरवला जाईल ?

कारण इथे असे अनेक आयडी आहेत जे पराचा कावळा करण्यात वेळ लावत नाहीत...
ज्या प्रतिसादात काहीच नाही आहे अश्या प्रतिसादातुन सुध्दा वाद काढले जातात.. त्याचे काय ?

चांगला निर्णय.
भाषेच्या वापराबद्दलही (अश्लाघ्य शब्द) हेच नियम लागू समजावेत काय?

अ‍ॅडमिन, खुपच आनंद झाला. असे कठोर पाऊल उचलायची निकड होतीच.

अनेकदा अनुमोदन.

तसे असल्यास इतर साहित्यप्रकारात शिव्या असल्यास त्यांनाही तोच नियम लागू करावा का ?
येथे जे लिहिण्यात आले होते, ब्राह्मणांविरुद्ध नि ब्राह्मणांच्या बाजूने (मुख्यतः मी), ते दोन्हीहि अत्यंत निंद्य होते, बरेचसे खरे पण नव्हते, म्हणजे उगाच द्वेषभावना वाढावी याच वाईट हेतूने लिहीले होते. म्हणून त्याला बंदी!!

इतर साहित्यातल्या शिव्या या त्या साहित्यातील संदर्भावर, त्याच्या उद्दिष्टावर अवलंबून असतात. मुळात असले शिव्यांनी भरलेले साहित्य लोकप्रिय होऊन लेखकूस चार पैसे मिळतात एव्हढाच त्याचा उपयोग. काही लोकांना त्यात साहित्यमूल्ये दिसतात (असे सांगायची फॅशन आहे, म्हणजे आपण किती 'थोर' असे लोकांना वाटावे)
(तुम्ही का येथील एका प्रसिद्ध साहित्यिकाच्या, ज्यांना मराठीपेक्षा उर्दू आवडते, त्यांच्या चरितार्थावर उठला आहात?! त्यांच्या लिखाणातील 'सहित्यमूल्ये, वास्तवता' बघा! आता त्यांना इतर काही चांगले दिसतच नाही त्याला आपण काय करणार? :दिवा:)

पण मनातल्या द्वेष व विखाराच काय ? तो तसाच राहील.
कदाचित. पण त्याला दुसरे कुणीच, अगदी अ‍ॅडमिनच काय, पंतप्रधान, सोनिया, इतकेच काय रजनीकांतहि काही करू शकणार नाही हो!!

Pages