जाती धर्म विषयक लेखन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गेले काही दिवस मायबोलीवर जाती धर्मविषयक लेख आणि त्यावरच्या प्रतिसादांमध्ये शिवराळ भाषा काही सदस्य वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यातले शक्य तेवढे प्रतिसाद अप्रकाशीत केले आहेत आणि ते काम चालूच असते. काही लेखांवर प्रतिसादाचे प्रमाण एवढे आहे की त्यामुळे मूळ लेखच नाईलाजाने अप्रकाशीत करावा लागला आहे.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल. तसेच राजकीय पक्ष आणि नेते यांच्यावरून इथे बाचाबाची करू नये. याबाबतीत कुठलीही समज किंवा दुसरी संधी मिळणार नाही. हीच पूर्वसूचना समजावी.

विषय: 
प्रकार: 

उत्तम निर्णय...तुम्हाला अशी पावले उचलावी लागता आहेत हे दुर्दैव पण इथल्याच लोकांनी ती वेळ आणली आहे....:(
खूप धन्यवाद

असं पाउल उचलावं लागणं दुर्दैवी आहे खर पण हे व्हायलाच हवं होतं.
योग्य निर्णय अ‍ॅडमिन टीम.

एक विनंती.
ज्या सदस्याने येथील नियमांनुसार चूक केली, त्यास वैयक्तिक समज देण्यात यावी. तसेच, अमुक सद्स्यास समज दिली, हे चव्हाट्यावर मांडण्यात यावे. येथे 'बूच मारण्याची' सोय नाही. त्यामुळे काही लोक येऊन प्रक्षोभक प्रतिसाद टाईप करतात. त्यांस मी दिलेली उत्तरे मी तशीच ठेवली आहेत. प्रक्षोभक प्रतिसादांचे स्क्रीन्कॅप्स ही आहेत.
मॉड्स ना प्रत्येक शब्द वाचता/मॉनिटर करता येत नाही हे मला ठाऊक आहे.
तरीही
माझे चुकले असेल तर व्यवस्थापनाने मला दोन शब्द सुनावले, अथवा नियमाने काही कारवाई केली तर ती योग्यच आहे हे माझे मनापासून मत.

ता.क.: मी लै अ‍ॅग्रेसिव्हली लिहितो. म्हणून वरचे टाईपले आहे.

निर्णय चांगला आहेच.
अ‍ॅडमिनची खरी कसोटी आहे.
यामूळे लिखान तरी वाचेल
आतापर्यंत संपुर्ण लिखानच उडविले जात होते.

मास्तुरेंची सूचना चांगल्या हेतूनेच केलेली आहे यात शंका नाही. पण ती व्यवहार्य नाही. अ‍ॅडमिन ना ते एक जास्तीचे काम होउन बसेल. शिवाय अगदीच रिकामटेकडे लोक गूगल व्हॉइस वापरून काही मिनिटातच नवा नंबर मिळवतील. शिवाय ज्यांच्याकडे मोबाईल नसेल त्यांना गैरसोय होईल ती वेगळी.

नवे उडूपी हॉटेल उघडताना इडली सांबार चे दर ठरवताना इतर गोष्टींबरोबरच दरमहा काही लोक फुकट खाऊन जाणार हे ही हिशेबात धरले असते तसेच माबोवर अधून मधून काही लोक येऊन गोंधळ घालणार हे गृहितच धरावे झाले.

या कुत्र्यामांजर्‍यांच्या छ्त्र्यांप्रमाणे उगवणार्‍या ड्युआयडीजनी आणि त्यांच्या फालतू प्रतिसादांनी हल्ली कुठलाही चर्चेचा धागा वाचू नये असं वाटतं. माबोवर नेहेमीच विरुद्ध तट आहेत, त्यांचे नेहेमीचे यशस्वी वाद घालणारे कट्टर समर्थक आहेत. पण इतके दिवस कुठल्यातरी मुद्यावरून तरी वाद व्हायचे. सध्या शिवराळपणा, अत्यंत खालच्या दर्जाची भाषा, अपमानास्पद जातीय/धर्मीय लिखाण हे फार वाढलंय. कुठलाही सरळसाधा विषय चर्चेला घेतला तरी ही मंडळी उच्छाद घालणारच... प्रत्येक वेळी अ‍ॅडमिनकडे तक्रार करायला जमतंच असं नाही आणि अ‍ॅडमिननाही स्वतःची कामंधामं आहेतच की...
यावर निर्णायक उपाय येण्याआधी एक सुचवावसं वाटतं - की कुणाही आयडीने शिवराळ भाषा, उचकवणारे प्रतिसाद लिहिले तरी रीअ‍ॅक्ट व्हायचं नाही. अ‍ॅडमिनकडे स्क्रीनशॉटनिशी तक्रार करा, पण धाग्यावर अनुल्लेख करा. जर सगळ्यांनीच अनुल्लेख केला तर कदाचित असल्या विघ्नसंतोषी लोकांचा उत्साह जरा कमी होईल

वरदा +१

ऐका हो ऐका... सर्वानी सभ्यपणे लिहावे... सभ्यपणाची उदाहरणे खालीलप्रमाणे... ( या लोकांवर प्रशासनाने कारवाई केलेली नाही, याचा अर्थ हे मायबोलिला मंजूर असावे असे वाटते.. )

1.jpg2.jpg3.jpg4.jpg5.jpgमायबोलि अ‍ॅडमिनचे नियम सर्वाना सारखेच आहेत का? सभासदाना काय वाटते? अ‍ॅडमिन खरोखरच नि:पक्षपणे निर्ण्यय करते का?

गलिच्छ शब्द वापरणे कुठल्या आय डी नी वापरणे अलाउड आहे, कुणी नाही, त्याचीही यादी द्यावी, म्हणजे एखादा वावगा शब्द वापरल्यामुळे अचानक आय डी बंद झाल्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. लोकाना काळजी घेता येईल.

मायबोलि अ‍ॅडमिनचे नियम सर्वाना सारखेच आहेत का? सभासदाना काय वाटते? अ‍ॅडमिन खरोखरच नि:पक्षपणे निर्ण्यय करते का?

प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे असेल तर या ठिकाणी नाहीच म्हणावे लागेल. Sad
एका बाजूला अ‍ॅडमीनचे पुढे पुढे कराय्चे आणि दुसर्‍या बाजूला काही सदस्यांना टार्गेट करायचे असा उद्योग या सदस्यांचा नेहमी चालू असतो. अ‍ॅडमीनसमोर लाचारपणे वावरणार्‍य ह्या ठगांना त्यामुळेच कदचीत अ‍ॅडमीन बक्षत असतील असे वाटते.

नर्मदाबाई,

आपल्या उदाहरणांत "गामा पैलवान" याचा प्रतिसाद का आला आहे ते कळेल का?

आ.न.,
-गा.पै.

Happy

<< तसेच राजकीय पक्ष आणि नेते यांच्यावरून इथे बाचाबाची करू नये. >>

हे वाक्य प्रशासनाने आज टाकले आहे Light 1

याबाबतीत कुठलीही समज किंवा दुसरी संधी मिळणार नाही. हीच पूर्वसूचना समजावी.


दिन्या हे वाचले नाही का?

वाचले की. पण काल राजकीय चर्चेवरुन कारवाई केल्यानंतर ती करु नये अशा प्रकारचे वाक्य आज टाकणे हे तर चुकीचेच ना?

'मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल."

वर दिलेला हा इशारा एखाद्या मेम्बरच्या आयडी म्हणुन घेतलेल्या नावाला लागु नाहि का?एका मेम्बरने 'बाटेल बामन' असे उघडउघड जातियवादि आयडि घेतला आहे.हे नाव एडमिनना योग्य वाटते का?आयडि म्हणुन घेतलेल्या नावाच्या बाबतीत काहि नियम आहे का?

घबाड यानीच ते चित्र टाकले होते/ असावे . कारण अ‍ॅडमिनने त्यांचे वाक्य आधी काढून टाकले होते. आताही तिथे फक्त मास्तुरेंचे वाक्य आहे... http://www.maayboli.com/node/35601?page=3 Proud

मी त्या चित्रावरुन कॉपी केले आहे.. Happy

त्याच्यावरच्या चित्रातीलही आनखी एक चित्र आणखी कुणीतरी इथे टाकले होते. मी त्यावरुन कॉपी केले आहे. Proud सगळे स्क्रीन शॉट मी घेतलेले नाहीत.. प्रत्येक पोस्टचा शॉट वेगळावेगळा आहे.. काही माझे आहेत, काही कॉपी केलेले आहेत.

आता आणखी एखादा हे सगळेच कॉपी करुन त्याच्या गोडाउनला लावू शकेल. Proud

हायला, त्या वरच्या पोस्टात उल्लेखलेला मास्तुरेंच्या उल्लेखाचा धागाच आता गायब झाला. Proud

Happy

Pages