सिताफळ आईसक्रिम

Submitted by आरती. on 4 December, 2011 - 21:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दूध - ५०० मिलि.
साखर - ८ ट॓बल स्पून
आईस्किम ईसेंन्स - १/४ टी स्पून
GMS Powder - १ ट॓बल स्पून + १ टी. स्पून
CMC Powder - १/४ टी स्पून
cornflour - १ ट॓बल स्पून + १ टी. स्पून
सिताफळांचा गर - १ वाटी किंवा १० मध्यम आकारांच्या सिताफळांचा गर
अॅल्युमिनियमचा डबा झाकणासहित

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम एका स्टीलच्या पातेल्यात दूध, साखर, GMS Powder , CMC Powder, cornflour एकत्र करा.
२. पातेल गॅसवर मंद आचेवर ठेवा व सतत चमच्याने ढवळत रहा.
३. १० मिनटांनी मिश्रण थोड दाट होईल. गॅस बंद करुन त्यात आईस्किम ईसेंन्स घालून ढवळावे.
४. मिश्रण थंड झाल्यावर अॅल्युमिनियमच्या डब्यात ओतून झाकण लावून डबा डिप फ्रिजर मध्ये ठेवा आणि डिप फ्रिजर HIGH वर ठेवा.
५. ६ तासांनी आईस्किम सेट होईल.
६. सेट झालेल्या मिश्रणाचे दोन भाग करा.
७. अर्ध मिश्रण म्किसरच्या भांडयात घालून ५ मिनट फिरवाव.
८. उरलेल्या अर्ध्या मिश्रणात अर्धि वाटी सिताफळचा गर घालून, म्किसरच्या भांडयात घालून ५ मिनट फिरवाव.
९. अॅल्युमिनियमच्या डब्यात दोन्हि मिश्रण घालून त्यात उरलेला सिताफळचा गर घालून, मिश्रण चमच्याने व्यवस्थित ठवळा.
१०. डब्याला झाकण लावून डिप फ्रिजर मध्ये ठेवा आणि डिप फ्रिजर MEDIUM वर ठेवा.
११. मिश्रण ४ तासांनी सेट होते.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍या व्यक्तीवर अवलंबून आहे.
अधिक टिपा: 

अॅल्युमिनियमचा डबा झाकणासहित नसेल तर केकच अॅल्युमिनियमच भांड वापराव व त्यावर एक ताट ठेवा.

१ ते ५ क्रमवार पा़ककृती हि बेसिक आईसक्रिमची आहे.
क्रमांक ६ पासून तुम्ही वेगवेगळी फळ (सट्रबेरी, आंबा, चिकू, काळी द्राक्ष), काजू, बदाम, पिस्ता, काळी मनूका, चोकलेट, कोको पावडर घालून आईसक्रिम तयार करु शकता.

माहितीचा स्रोत: 
आईस्क्रिमचा कोर्स
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे एकदम. यम्मी असणार.
पण १० सिताफळांचा गर काढायला सॉलिड पेशन्स पाहिजे. पुन्हा तो वाटीत शिल्लकही राहायला हवा.

खुपच मस्त रेसिपी आहे.मी सेम असेच करते..एकदा सिताफळ आइस्क्रीम ची चव घेतली कि गर काढायचे परिश्रम नाहीसे होतात..यात अर्धी सिताफळ गर बियांसकट २-३दा मिकसर मधे फिरवायचा न स्टील चाळणी वर गाळायचा बियांचे तुकडे वर रहातील अन गर खाली राहील..पण अर्धी सिताफळे मात्र गर पुर्ण काढायचा ..चव छान लागते..

मस्त आहे ही पाककृती Happy मी करून बघणार नक्कीच.

सावली, सिताफळ आईसक्रिम/ बासुंदीसाठी अति पिकलेली सिताफळं वापरायची आणि वर सुलेखाने लिहिलंय तसा बियांपासून गर वेगळा करायचा. कष्ट फारसे होत नाहीत. आणि सिताफळाची चव एकदम छान उतरते. काही वेळा मिक्सरही वापरावा लागत नाही, नुसताच गर गाळला की काम होते.

मस्त दिसतंय आईस्क्रीम Happy GMS पावडर वापरुन करतात हे माहीत होते पण अजून कधी करुन नाही पाहिले. खरं तर आईस्क्रीमचे प्रकारच फार क्वचित केले आहेत घरी. करुन पाहिले पाहिजे Happy

मस्तच.

वरील कृतीत दिल्याप्रमाणे ice cream करून बघितले पण काहीतरी चुकले.. ice cream fluffy न होता त्याचा बर्फ झाला.. कुणी सांगू शकेल का काय चुकले ते?

सामी,ह्या कृती प्रमाणे केले तर बर्फ नाहि होत. तुम्हि कस केल ते सांगाल का?? मिश्रण कोणत्या भांड्यात ठेवल होत??

आर, अग मिश्रण अल्युमिनियमच्या टोपात ठेवले कारण डबा न्हवता. आईसक्रिम ईसेंन्स फक्त मी घातला नाही . सिताफलाच्या एवजी चिकू वापरला.
जास्त वेळ फ्रीझर मध्ये ठेवले म्हणून बर्फ झाला का?

एकदा, बेसिक आईस्क्रिम करा, ते नीट जमल की फ्रुट किंवा ईतर ट्राय करा. व्हॉनीला आईस्क्रिमचा फोटो पहा. वरुन चोकलेट सॉस ने सजवल आहे.