वांग्याची भजी/वांग्याचे तळलेले काप

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 December, 2011 - 14:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कमी बिया असलेली मध्यम किंवा मोठी वांगी.
तांदळाचे पिठ २ ते ३ चमचे
चवीपुरते मिठ
हळद पाव चमचा
मसाला १ चमचा
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

१) वांगी धुवून त्याच्या गोल थोड्या पातळ चकत्या पाडायच्या.
२) चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाकायचे.
३) थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करायचे.

४) एका डिश मध्ये तांदळाचे सुके पिठ घेऊन त्यात हे काप घोळवायचे.

५) तवा चांगला तापवून, तेल सोडून हे काप मध्यम आचेवर तळायचे.

६) हे लगेच शिजतात त्यामुळे ३-४ मिनीटांनी उलट करून परत थोडे तेल तव्याभोवती सोडायचे व थोडा वेळ शिजून द्यायचे.

झाले तय्यार तळलेल्या वांग्याच्या तुकड्या Lol म्हणजे वांग्याची भजी हो.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ कमीत कमी.
अधिक टिपा: 

हा प्रकार ८०% लोकांना माही असणार पण हल्ली कॅमेर्‍याला छंद लागलाय ना पदार्थांचे फोटो काढून माबोवर प्रकाशीत करण्याचा Happy

तांद्ळ्याच्या पिठाच्या ऐवजी बेसनही वापरतात.
तेल आधीच जास्त घालू नका कारण तांदळाचे पिठ तेल लगेच शोषून घेते.
भाकरी व चपाती बरोबर एकदम छान.
लहान मुलांना आवडतात

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages