मुरुक्कु (फोटोसह)

Submitted by डॅफोडिल्स on 22 November, 2011 - 02:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पिठ ३ वाट्या
फुटाणा डाळीचं पिठ १ वाटी
लोणी २ चमचे
तिळ २ मोठे चमचे
ओवा २ मोठे चमचे
तिखट मिठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

मुरुक्कु म्हणजे आपल्या चकलीची साउदींडीयन मावस बहिण.
महाराष्ट्रात जशी दिवाळीला चकली हवीच हवी. तसेच इथे कर्नाटकात कृष्णजन्माष्ठ्मीला आणि "बोंबे हब्बा" (म्हणजे बाहुल्यांचा उत्सव्-नवरात्रात दसर्‍या पर्यंत दहा दिवस घरात देविपुढे तर्‍हेतर्‍हेच्या बाहुल्या मांडून आरास करतात). साठी मुरुक्कु खास. ह्या खास वेळी घराघरांतुन ह्या मुरुक्कुचा खमंग दरवळ येत असतो.

योग्य ते प्रमाण घेउन भाजणी करा, ती गरम पाण्यात भिजवा, मग चकल्या करा हा सगळा कुटाणा नवशिक्यांना फार कठीण. म्हणून ही एक सोप्प्या प्रकारची चकली. नो कटकट, मुरुक्कु झटपट ! Happy

सर्वप्रथम फुटाणा डाळीचे पिठ करून घ्यायचे. मग हे पिठ, तांदळाचे पिठ, लोणी, तिखट, मिठ, ओवा, तिळ हे सगळे व्यवस्थित एकत्र मरुन घ्यायचे. पाणी न घालताच लोणी सगळ्या पिठात निट एकसारखे एकत्र होईल असे मिसळून घ्यायचे. मग गरजे नुसार पाणी टाकुन चकलीला भिजवतो तसे पिठ भिजवून घ्यावे. कढईत तेल तापायला ठेउन एकसारख्या दोन किंवा तिन वेढ्याच्या चकल्या कराव्यात. कडकडीत तेल तापवुन मग मध्यम आचेवर कुरकुरीत मुरुक्कु तळाव्यात. हलका गोल्ड्न ब्राउन रंग आल्यावर काढुन पेपर टॉवेल वर जास्तिचे तेल निथळायला ठेवाव्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. (ठेवायला उरतच नाहीत Proud )

चकलीचा अजुन एक वेगळा प्रकार इथे आहे

वाढणी/प्रमाण: 
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
अधिक टिपा: 

चकल्या तळतानाच्या सगळ्या टिपा ह्याला लागू जसे
प्रखर आचेवर मुरुक्कु तळल्याने लवकर तळले जाउन थंड झाल्यावर मउ पडतात.
पिठ मळताना लोण्याचे प्रमाण जास्त झाल्याने तळताना चकल्या हसतात (तेलात विरघळतात)

माहितीचा स्रोत: 
साउदींडीयन मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मंजु तेच डाळ्या आपण इडलीच्या चटणीला किंवा चिवड्यात घालतो त्या डाळ्या मिक्सर वर वाटून त्याचे पिठ करायचे.

छान Happy

मस्त लागतात ह्या. सोर्‍यातून न पाड्ता हाताने वळून पण घालतात. ह्याच मिश्रणाची छोटी बोरे पण बनवून तळली तरी मस्त लागतात चहा बरोबर. रोंबा नल्ला.

मस्त. हवीच होती मला ही कृती. इकडे बटर चकरी म्हणून वर दिसतात तशा चकल्या मिळतात तशी लागेल असे वाटते. आजच करून पहाते. Happy

छानच.

अनास्पुरे_जर्मनीकर>> हो बटर चालेल.

अमृता गायकवाड >> म्हणजे तेच डाळ्या आपण इडलीच्या चटणीला किंवा चिवड्यात घालतो त्या डाळ्या मिक्सर वर वाटून त्याचे पिठ करायचे. Happy

हा साहित्याच्या फोटो डाळ्या साठी Wink

in_murukku_recipie.jpg

ठान्कू Happy
ते जिन्नस मधे फक्त "लोणी" वाचले
म्हनुन इचारल
तस तो फोटो दिसतो बटर चा पण खात्री करुण घेतली......;)

संपदा, हे आईने केले होते. फारच मस्त झाले. आई आता दिवाळीला पण हेच करणारे Happy
मुलांना प्रचंड आवडलयं. खुप धन्यवाद!

अल्टिमेट झालेत मुरुक्कु !
प्ले डेट ला आलेल्या पोरांनी दहा मिनिटात फन्ना उडवला.
धन्यवाद डॅफो!

मी पण करुन बघणार आहे.

भिजवताना पाणी गरम घालायचे की नॉर्मल ? .. हेच विचारायला आली होती.
चकलीला भिजवतो तसे पिठ भिजवून घ्यावे... खुपच अनाडी प्रश्न तरीही नक्की कसे पिठ भिजवावे म्हणजे थोडे घट्ट का?

रविवारी वर दिलेल्या प्रमाणाच्या अर्धे प्रमाण घेऊन मी मुरुक्कु बनविण्याचा प्रयत्न केला पण तो पार फसला. चकली वरुन कडक आतुन नरम झाली Sad
तेल कडकडीत तापवुन नंतर मध्यम आचेवर तळल्यातरी. साबा म्हणाल्या तेल गरम करुन घालायला हव होते. मी त्यांना बटर चकली आहे असे सांगितल्यावर 'कसली ही हल्लीच्या सुनांची थेरे, सासुचे काही एकतील तर शपथ' असा लुक दिला मला Lol
माझ्या मते चकलीचा साचाच जाड होता. (नाचता येईना अंगण वाकडे)
या चकल्या बनविण्यासाठी मोठा शहाणपणा करुन आधीच प्रत्येकी १ किलो फुटाणा डाळ व तांदुळ आणुन ठेवलेत. पण नशिब आधी थोड्याच बनवुन पाहिल्या Proud

Pages