Submitted by प्रीति on 15 August, 2008 - 16:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
३ मध्यम आकारची कारली
अर्धी वाटी हरबरा दाळ पीठ भाजुन
अर्धी वाटी बारीक खोबरे
अर्धी वाटी दाण्याचे कुट
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
एक मोठा चमचा लिंबाचा रस
गुळाचा खडा
लसून जीरे कुटुन एक मोठा चमचा
धने पुड, जीरे पुड
दोन मोठे चमचे गरम मसाला
चवीनुसार ति़खट
मीठ
तेल
हिंग
कोथिंबीर, कडिपत्ता
क्रमवार पाककृती:
कारलाचे १-११/२ इंच लांबीचे तुकडे करावे आणि मधला गर काढुन ४ काप द्यावे.
हरबरा दाळ पीठ भाजलेले, खोबरे, दाण्याचे कुट, कांदा, लिंबाचा रस, गुळ, लसून जीरे पेस्ट, धने पुड, जीरे पुड, गरम मसाला, ति़खट, मीठ, कोथिंबीर मिसळुन घेणे. हे मिश्रण कारल्यात भरणे आणि जिरे, मोहोरी, हिंग, कडिपत्याची फोडणी करुन त्यात कारली टाकणे आणि झाकण ठेवुन शिजवुन घेणे. अधुन मधुन कारली खालीवर करणे.
वाढणी/प्रमाण:
४ जण
अधिक टिपा:
नॉनस्टिक भांड्यात केल्यास भाजी जळत नाही. असाच मसाला वापरुन वांगी पण छान लागतात
माहितीचा स्रोत:
मैत्रिण
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यात पाणी न
यात पाणी न घालता कारली कशी शिजतात? कारल्याला पाणी सुटते का?
वाफेवरच
वाफेवरच कारले शिजतात्...माझ्याकडे छिद्र असलेले काचेचे झाकण आहे...ते ठेवले कि भाज्या बिना पाण्याच्या छान शिजतात्...मधुन मधुन पहावे मात्र लागते.
चित्रात
चित्रात कार्ल्याच्या पाठी खरवडून काढ्लेल्या दिसत नाहीत. त्याने भाजी कडू नाही होत का? मी साधी भाजी करतानापण काढून टाकते तरी थोडा कडवटपणा रहातोच.
मी अशी
मी अशी भरलेली कारली, भाजी तयार होण्याआधी कधीच बघत नाही. मला मगरीच्या शेपटीत मसाला भरलाय असे वाटते
त्यामुळे भरली कारली फक्त भारतवारीत 
चित्रात
चित्रात कार्ल्याच्या पाठी खरवडून काढ्लेल्या दिसत नाहीत. त्याने भाजी कडू नाही होत का?>>मग सगळे त्यातले सत्व निघुन जाते म्हणुन मी तसेच ठेवते...गुळ आणि लिंबामुळे कडवटपणा जातो, थोडी फार कडु लागते पण ते लागणारच्...कडु कारलं तेलात तळलं, तुपात घोळलं तरी ते कडुच कडु
मी भाजी झाल्यावरचा फोटो काढायला विसरले ...
.
मला मगरीच्या शेपटीत मसाला भरलाय असे वाटते >>
रेसिपीबद्
रेसिपीबद्दल धन्यवाद. उद्या करुन पाहते आणि जमल्यास भाजी झाल्यावरचा फोटोही टाकते.
मला कारली
मला कारली अज्जिबात आवडत नाहित पण नवर्याला मात्र जाम आवडतात. त्यामुळे त्याच्यासाठी कारल केल कि मी माझ्यासाठी दोडका करते कारण तो दोडका खात नाही.

हि तुझी भाजी ट्राय करेन पण त्याच्यावर एकदा
हायला, मला
हायला, मला कारले खूप आवडते आणि नवर्याला आवडत नाही. पण तो काही माझ्यासाठी कारलं करत नाही फक्त मी कारले केले की स्वत:साठी हाटेलातनं चिकन मागवतो
कारली मला
कारली मला आवडत नाहीत आणि साहजिकच कारली खाणारी माणसेही मला आवडत नाहीत...
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
सेम मसाला
सेम मसाला भरुन केलेली वांगी....

मी अशी भाजी करताना आधी कढई
मी अशी भाजी करताना आधी कढई मध्ये थोडे तेल टाकून त्यात कारले, मीठ, हळद, पाणी टाकून थोडे उकडून घेते..ते पाणी टाकून देते, मग असा मसाला भरून फोडणीमध्ये कारले शिजवते..मसाल्यामध्ये थोडा चिन्च कोळ घालते
छान आहे रेसिपि पण हरबरा दाळ
छान आहे रेसिपि पण हरबरा दाळ पीठ भाजलेले कुटे मिलेल दुकानात मिलेल काय, कि दुसरे काहि ओप्शन आहे का.
भाजलेल्या हरबरा डाळीचं पीठ =
भाजलेल्या हरबरा डाळीचं पीठ = पंढरपुरी डाळव्याची पूड (हे डाळवं चिवड्यात वापरतात).
पण या पाकृमध्ये नेहेमीचं हरबरा डाळीचं पीठ भाजून मग वापरायला सांगितलेलं आहे.
मला एकही फोटो दिसत नाहीये.
मला एकही फोटो दिसत नाहीये.
पण हरबरा दाळ पीठ भाजलेले कुटे मिलेल दुकानात मिलेल काय, कि दुसरे काहि ओप्शन आहे का.>> बेसन भाजून वापरा की.
अहो हरबरा डाळ पीठ म्हणजेच
अहो हरबरा डाळ पीठ म्हणजेच साधे बेसन न ?? डाळवं म्हणजे फुटाण्याची डाळ न?
अहो हरबरा डाळ पीठ म्हणजेच
अहो हरबरा डाळ पीठ म्हणजेच साधे बेसन न ?? >> हो, पण हरभरा डाळ पीठ वाचल्याबरोबर पब्लिक गडबडलं.