मँगो पाय

Submitted by सायो on 10 November, 2011 - 10:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

मँगो पल्प- १ कॅन,
हेवी क्रिम- हाफ पाईंट (२३६.५ मिली),
अनफ्लेवर्ड/ ऑरेंज जेलो- २ पॅकेट्स,
साखर- १ कप्,
क्रीम चीज- १ (८ औंस),
वॅनिला इसेन्स- १ टीस्पून (ऑप्शनल),
कोमट पाणी- १/४ कप.
ग्रॅहम क्रॅकर क्रस्ट- २

क्रमवार पाककृती: 

१. हेवी क्रीम पॅनमध्ये उकळवायला ठेवा.

२. जिलेटिन्/जेलो कोमट पाण्यात कण रहाणार नाहीत अशाप्रकारे मिक्स करुन घ्या.

३. हेवी क्रीम आणि जिलेटीन ब्लेंड करुन घ्या.

४. ह्यात क्रीम चीज आणि साखर मिसळून घ्या आणि पुन्हा ब्लेंड करुन घ्या.

५. मँगो पल्प ब्लेंडरला हळूहळू घालत बीट करुन घ्या. अशा तर्‍हेने पूर्ण मँगो पल्पचा कॅन संपवा.5)Pour the mango pulp turn by turn into the blender and beat it, until the whole can of mango pulp is finished.

६. ह्या बीट केलेल्या मँगो पल्पमध्ये वॅनिला इसेन्स घालून पुन्हा मिनिटभर बीट करुन घ्या.

७. हा पूर्ण पल्प ग्रॅहम क्रॅकर क्रस्टवर घालून साधारण ७ तास फ्रिजमध्ये ठेवा

वाढणी/प्रमाण: 
एका पाय क्रस्टचे साधारण ८ स्लाईसेस होतील.
अधिक टिपा: 

मी स्वतः केलेला नाही. मैत्रिणीने केलेला खाल्ला आहे. त्यामुळे बाकी काही बदल, सूचना सुचवता येत नाहीत,

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता, अगं त्यात जिलेटिन घातलं होतं. इथे एक हमखास यशस्वी रेसिपी आहे बघ-
http://cooking.jingalala.org/2012/12/mango-pie-recipe-no-bake-mango-pie-...

जिलेटिन ऐवजी आगरआगर घालू शकतेस.

लेकिने आज्जी साठी केलेला मॅन्गो पाय,
सिन्ड्रेला! तु लिन्क दिली होती तसा केला, मस्त झाला
IMG_5177.JPG

Pages